खबर राज्यांची
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

आसाममधल्या  एका उद्योजकाने बांबूपासून बाटल्या तयार केल्याची बातमी सध्या चच्रेत आहे. पण, बांबू हे तिथलं केवळ उत्पादन नाही, तर आसामींच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे. तिथलं बरंच अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ

देशातल्या एकूण बांबू उत्पादनापकी तब्बल ६६ टक्के उत्पादन आसाममध्ये होतं. घराच्या परसात, बागेत, शेतात, माळरानावर कुठेही बांबूची दाट बनं वाढलेली दिसतात. एवढय़ा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या उत्पादनाचा साहजिकच तिथे जळीस्थळी वापर झालेला दिसतो. तिथल्या ग्रामीण भागात आजही बांबूने बांधलेल्या आणि मातीने िलपलेल्या झोपडय़ा दिसतात. या झोपडय़ांची दारं-खिडक्याही बांबूच्याच! नद्यांवरचे पूल, धान्य साठवण्याच्या भल्यामोठय़ा टोपल्या, मासेमारी-शेतीची साधनं, फíनचर, शोभेच्या वस्तू अशी विविध रूपं घेऊन तिथे बांबू अक्षरश जळीस्थळी उपस्थिती लावतो.

बांबूच्या पिकाला भरपूर पाणी लागतं. सुरुवातीचे पाच-सहा महिने काळजी घेतली की त्यानंतर मात्र बांबू सहज वाढतो. आसाममध्ये आणि एकूणच ईशान्य भारतात पर्जन्यमान चांगलं आहे. त्यामुळे आसामसह अन्य शेजारी राज्यांतही बांबूचं पीक आणि वापर मोठय़ा प्रमाणात होतो. आसाममध्ये साधारण पाच-सहा प्रजातींचे बांबू उगवतात. त्यापकी दालू आणि मुली या सर्वाधिक उपयुक्त प्रजाती आहेत. मुली प्रजातीच्या बांबूचा वापर बांधकाम क्षेत्रात केला जातो, तर दालू बांबू टोपल्या विणण्यासाठी आणि अन्य कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. फ्लोअिरगपासून छतापर्यंत आणि पडद्यांपासून गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत सारं काही बांबूपासून तयार केलं जातं.

बांबूचं वैशिष्टय़ हे की तो अतिशय हलका असतो आणि लवचीक असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वजन पेलू शकतो. त्यामुळे बांबूपासून तयार केलेलं बांधकाम साहित्य भूकंपग्रस्त भागांत घरबांधणी करण्यासाठी आदर्श ठरतं. अशा साहित्यापासून बांधलेलं घर कोसळलं, तरी त्यात राहणाऱ्यांना फारशी इजा होत नाही आणि साहित्याचा पुनर्वापरही करता येतो. बांबू हा लाकडाला अतिशय सक्षम पर्याय ठरू शकतो, असा तिथल्या उद्योजकांना विश्वास आहे. त्यामुळे त्याची अधिकाधिक टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी तिथे विविध संस्था सातत्याने संशोधन करत आहेत.

बांधकामाव्यतिरिक्त, घरातील कलात्मक आडोसे (पार्टशिन्स), चटई, अगरबत्ती, फíनचर आणि अन्य हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठीही बांबू वापरला जातो. अर्थात हे लघुउद्योग आहेत. बांबूच्या टेबल-खुच्र्या घराला एक नसíगक छटा मिळवून देतात. त्यामुळे त्यांना मोठी मागणी असते. पण त्याला वाळवी किंवा अन्य प्रकारची कीड लागण्याची भीती ग्राहकांना नेहमीच असते. आसाममधील फíनचरचं मात्र असं होत नाही, असा दावा तिथले उत्पादक करतात. बांबूंना फíनचरचा आकार देण्यापूर्वी ते बराच काळ गोमूत्र आणि शेणात बुडवून ठेवले जातात. ते नसíगक कीटकनाशकाचं काम करतात, असं कारागिरांचं म्हणणं आहे.

बांबूपासून तयार केलेली उत्पादनं १०० टक्के विघटनशील असतात. अलीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्याविषयी अनेकजण आग्रही झाले आहेत. त्यामुळे या उत्पादनांना असणाऱ्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे.

आसाममध्ये बांबूच्या कोंबांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. कधी हे कोंब स्वतंत्र पदार्थ म्हणून शिजवले जातात, तर कधी मांस किंवा माशांच्या पदार्थामध्ये वापरले जातात. बांबूच्या कोंबांचं लोणचंही घातलं जातं. थोडक्यात सर्वत्रच बांबूचा वावर दिसतो.

बांबूपासून पाण्याची बाटली

गुवाहाटीपासून साधारण २५० किमीवर असलेल्या नाबापूर भागातले रहिवासी धृतीमान बोरा अनेक र्वष बांबूवर आधारित उत्पादनांची विक्री करत होते. त्यांना इतरांपेक्षा आगळंवेगळं काहीतरी करायचं होतं. पण बांबूचा व्यावसायिक वापर आता एवढा स्थिरावला आहे की त्यात नावीन्य आणणं फार मोठं आव्हान होतं. उत्पादनांच्या प्रचंड गर्दीत उठून दिसेल, असं उत्पादन तयार करण्यासाठी ते धडपडत होते. तब्बल १७ वष्रे व्यवसायात काढल्यानंतर त्यांना नवी वाट गवसली. त्यांनी बांबूपासून पिण्याच्या पाण्याची बाटली तयार केली. हे उत्पादन अगदी नवं कोरं होतं. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दिल्लीमध्ये एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांनी त्यांच्या बाटल्या मांडल्या. तिथे काही युरोपीय विक्रेत्यांनी चौकशीसुद्धा केली, मात्र विक्री झालीच नाही.

नेमकं काय चुकतंय हे त्यांच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. पहिली ऑर्डर ब्रिटनमधून आली. त्यांना २०० बाटल्या हव्या होत्या. कोणताही रंग किंवा ग्लॉस नसलेल्याच बाटल्या पाठवण्यात याव्यात हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. तेव्हा बोरा यांना त्यांची चूक उमगली. ग्राहकांना पूर्णपणे नसíगक उत्पादन हवं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाणार असल्यामुळे कोणताही रंग किंवा रसायन नसलेली बाटली त्यांना हवी होती. ते आजवर बाटल्यांना महागडं अमेरिकन वॉटर रेझिस्टंट पॉलिश लावत होते आणि हेच त्यांचं उत्पादन वेगळं असूनही विकलं न जाण्याचं मूळ कारण होतं.

आता ते ज्यांना पॉलिश लावलेल्या बाटल्या हव्या आहेत त्यांना तशाच बाटल्या विकतात आणि ज्यांना पूर्णपणे नसíगक स्वरूपातील बाटल्या हव्या आहेत त्यांना पॉलिश न लावलेल्या बाटल्यांची विक्री केली जाते. वाहतुकीदरम्यान बाटल्या नीट राहाव्यात यासाठी फक्त त्यावर कापूर आणि मोहरीच्या तेलाचा थर लावला जातो. आज त्यांच्या बाटल्यांना परदेशातून मागणी येऊ लागली आहे. काही ग्राहकांना स्मोक इफेक्ट हवा असतो, काहीजण झाकणाला दोरी हवी असल्याचं सांगतात. मागणी वाढत असताना तेवढय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्या प्रमाणात पुरवठा करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. बोरा यांच्यासारखचं अनेक व्यावसायिक आसाममध्ये आहेत, जे कौटुंबिक स्तरावर बांबूच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करतात.

जापी

जापीच्या रूपाने बांबूने आसामच्या संस्कृतीत अढळपद मिळवलं आहे. जापी म्हणजे बांबूपासून तयार केलेली वैशिष्टय़पूर्ण टोपी. चिनी प्रवासी युआन त्संग जेव्हा भारतभ्रमण करताना आसाममध्ये गेला तेव्हा ही खास आसामी पद्धतीची टोपी देऊन त्याचं स्वागत केल्याचं सांगितलं जातं. एखाद्या छोटय़ाशा छत्रीएवढी असणारी पण थेट डोक्यावर घालता येणारी जापी ही टोपी आसामी संस्कृतीतलं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. पूर्वी गुरं राखणारे आणि शेतात काम करणारे उन्हा-पावसात स्वतचं संरक्षण करण्यासाठी ही भलीमोठी टोपी वापरत. बांबूपासून तयार केलेली ही टोपी अगदी साधी असे. राजे-रजवाडे जी जापी वापरत ती रंगीत आणि अलंकृत केलेली असे. बिहू साजरा करताना जे नृत्य केलं जातं त्यातील नर्तक ही टोपी वापरत आणि आजही वापरतात. घरी आलेल्या पाहुण्यांचं ही टोपी देऊन स्वागत केलं जात असे. आजही विविध सार्वजनिक कार्यक्रमांत पाहुण्यांच्या डोक्यावर ही टोपी ठेवून त्यांना गौरवलं जातं. काळाच्या ओघात जापीचं रूपडंही काहीसं पालटलं आहे. आता तिचा आकार लहान झाला आहे आणि विविधरंगी कापडाने तिला सजवलं जाऊ लागलं आहे. पूर्वी केवळ एक उपयुक्त वस्तू किंवा पोशाखाचा एक डौलदार प्रकार म्हणून वापरली जाणारी जापी आज अनेक घरांच्या दर्शनी भागात शोभेची वस्तू म्हणून ठेवलेली दिसते.