एकीकडे काळा रंग अशुभ मानला जातो, तर दुसरीकडे हा रंग आवडणाऱ्यांचे फॅन क्लब आहेत. काळ्या रंगाला कितीही नाकं मुरडली तरी फॅशनच्या दुनियेत त्याचं गारूड मनामनांवर आहे.

12-lp-youthस्टाइल, लेटेस्ट ट्रेंड्स, लुक्स हे शब्द आता आपल्याला परवलीचे झाले आहेत. पण  वेगवेगळ्या ब्रँडचे महागडे कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी तुमच्या कपाटात असून भागत नाही, हे सगळं व्यवस्थितपणे कॅरी कसं करावं, हे जास्त महत्त्वाचं असतं. कॉकटेल पार्टी, फॉर्मल पार्टी, फ्रायडे ड्रेसिंग या आता केवळ पाश्चात्त्य संकल्पना राहिल्या नसून आपल्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. पण अशा कार्यक्रमांना नक्की काय घालावं? कसा लुक असावा हा प्रश्न असतोच. सतत बदलणाऱ्या ट्रेंड्सच्याही पलीकडे एखादा लुक आपल्याला साजेसा दिसेल अशा प्रकारे कसा स्वीकारावा, वेगवेगळी निमित्तनुसार केली जाणारी ड्रेसिंग या सगळ्याचा लेखाजोगा..

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

सीझन ऑफ डार्क

तसं म्हणायला काळा रंग हा अपशकुनी मानला जातो. चांगल्या प्रसंगामध्ये शक्यतो या रंगाचा वापर टाळायचा प्रयत्न केला जातो. असं असूनही वर्षांच्या सुरुवातीलाच गडद रंगांबद्दल बोलायचं म्हणजे तसं थोडं विचित्र वाटेल खरं, पण त्याला निमित्तही तसंच जोडून आलं आहे. उद्या मकरसंक्रांत आहे. एरवी सणासुदीच्या काळात आपण मस्त ब्राइट रंगांना पसंती देतो. लाल, नारंगी, निळा, हिरवा असे मस्त ब्राइट रंगाचे कपडे घालतो. पण संक्रांतीला मात्र आवर्जून काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालायला पसंती देतो. त्यात सध्याचा हिवाळा म्हणजे डार्क शेड्ससाठी अगदीच उत्तम. उबदार, गडद रंगाचे जॅकेट, स्वेटर गुरफटून छान लेअिरग मिरवायची संधी या दिवसांमध्ये आवर्जून मिळते. त्यातच गंमत म्हणजे २०१७ साल हे गडद रंगांच्या छायेतच असणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यंदा बऱ्याच डिझायनर आणि ब्रँड्सनी ब्राइट किंवा पेस्टल शेड्स ऐवजी गडद रंगांना पसंती दिली आहे. अशा वेळी या गडद रंगांबद्दल न बोलता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे त्यांच्यावर अन्यायच ठरेल.

बरं इतर बाबतीत काळ्या रंगाबाबत वेगवेगळी मतं असू शकतात, पण गडद रंगाच्या कपडय़ांचे बरेच फायदे असतात. काळ्यासोबतच सगळेच गडद रंग प्रतीक असतात, आत्मविश्वासाचे. त्यामुळेच फॉर्मल्समध्ये गडद रंग प्रामुख्याने वापरतात. तुमच्यातील नेतृत्वगुण, खंबीरपणा या रंगांमध्ये अधोरेखित होतो. तुम्हाला मस्त स्लिम दिसायचं असेल किंवा तुमची शरीरयष्टी फोकसमध्ये आणायची असेल, तर काळा रंग कधीही उत्तम. पार्टी किंवा कार्यक्रमात गडद रंगाचे कपडे चटकन फोकसमध्ये येतात. या कपडय़ांमध्ये उंचीही जास्त दिसते. बरं दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा रंग तुम्ही वापरू शकता, त्याला वेळेचं बंधन नाही. एखाद दिवशी काय घालावं हे सुचत नसेल, तर गडद रंगाचे ड्रेस सहजच घालू शकता. फक्त तो तुम्ही कॅरी कसा करता, हे महत्त्वाचं. सहज एकदा मूड आला म्हणून फेसबुकवर ‘ब्लॅक कलर फॅन क्लब’ म्हणून शोधा. काळ्या कपडय़ाच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. या चाहत्यांना काळ्या कपडय़ांशिवाय इतर कोणताही रंग आवडत नाही. अशी मिजास अजून कोणत्या रंगाविषयी पाहिली आहे का? नाही म्हणता गुलाबी रंगाचे मुलींकडून लाड होतात, पण ते एका ठरावीक वयापर्यंत.

बरं इतके फायदे सांगितले म्हणजे हा परफेक्ट रंग आहे, असंही नाही. याचे काही तोटेही आहेत. काळ्या किंवा गडद रंगांमुळे एकसुरीपणा येऊ शकतो. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या मूडनुसार लुक फ्रेश वाटेल, पण दिवस सरेपर्यंत लुकसुद्धा डल वाटू शकतो. गडद रंगांमध्ये स्लिम आणि उंच दिसतो, म्हटलं जातंच. पण चुकीच्या पद्धतीने हे ड्रेस घातल्यास तुम्ही बेढबसुद्धा दिसू शकता. त्यामुळे गडद रंगांचं ड्रेसिंग करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं.

गडद रंग म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काळा, राखाडी, ब्राऊन, नेव्ही, मेहेंदी, मरून या शेड्स येतात. पण त्याही पलीकडे गडद रंगाच्या अनेक छटा आहेत. अगदी या वर्षीच्या ट्रेंड्सच्या बाबतीत सांगायचं झालं, तर रिव्हरसाइड (रॉयल ब्ल्यू आणि नेव्ही यांच्या मधली शेड), शार्कस्कीन (नावाप्रमाणेच हलका राखाडी), ब्लड रेड, गडद बिस्कीट रंग, वाइन कलर, बॉटल ग्रीन, स्पायसी मस्टड, डार्क ब्राऊन, पर्पल, कोबाल्ट ब्ल्यू, खाकी ग्रीन, गडद गुलाबी या शेड्स इन आहेत. हे रंग पेस्टल किंवा अर्थी टोन्ससोबत वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी वापरता येऊ शकतात. तुमच्या वॉडरोबमधील एरवीच्या ब्राइट रंगांऐवजी हे रंग नक्की वापरून पहा. उदाहरणच द्यायचं झालं तर नवी डेनिम किंवा ट्राऊझर घेताना खाकी ग्रीन, पर्पल, मस्टर्ड रंगांचा विचार करता येईल. यामुळे तुमच्या कपाटात एका रंगाची भर पडेल. पांढरा रंग या टोन्ससोबत मस्त जुळून येतो. त्यामुळे पांढरा शर्ट आणि ट्राउझर असं लुक ऑफिससाठी ट्राय करू शकता. पेन्सिल स्कर्टमध्येसुद्धा या शेड्स सुंदर दिसतात. तसच दोन गडद शेड्सचं कॉम्बिनेशनसुद्धा करू शकता. मस्टर्ड पँट आणि काळा शर्ट हे क्लासिक कॉम्बिनेशन आहे. तसंच खाकी शेडसोबत पर्पल शेड छान दिसते. राखाडी शेडसुद्धा वेगवेगळ्या रंगांसोबत वापरता येऊ शकते.

गडद रंग वापरताना इतर रंगांप्रमाणे पहिल्यांदा तुमचा बॉडीशेप नजरेसमोर ठेवा. तुम्ही बुटके आणि पेअर शेपचे असाल तर डार्क शेड शक्यतो बॉटम वेअर म्हणजेच जीन्स, स्कर्टच्या स्वरूपात वापरा. लाइट शेड्स बॉटमवेअरमध्ये घेतल्यास मांडय़ांचा फुगीरपणा नजरेत येतो. तसेच अति फिटेड कपडे वापरू नका. बारीक असाल, तर डार्क शेड पँटसोबत लूझ शर्ट किंवा टी-शर्ट वापरा. तसेच ओव्हरसाइज जॅकेटने शरीराला वॉल्यूम मिळतो. प्लेन शेड वापरण्याऐवजी स्ट्राइप्स, भौमितिक आकारामध्येही या शेड्स मस्त दिसतात. आडव्या पट्ट्यांची डिझाइन असलेला मॅक्सी ड्रेस किंवा स्कर्ट वापरता येईल. ब्लॅक अँड व्हाइट स्ट्राइप स्कर्ट किंवा पलॅझो सध्या ट्रेंडमध्ये आहे. यांच्यासोबत बोल्ड किंवा डार्क शेडचे शर्ट्स वापरू शकता. ऑल ओव्हर ब्लॅक हाही एक मोठा ट्रेंड आहे. यात तुमचा संपूर्ण पोशाख काळ्या रंगाचा असतो. पण या लुकसाठी प्रत्येक कपडय़ाचे कापड, टेक्चर वेगवेगळे असेल, याची खात्री करा. त्यामुळे लुकला उठाव येईल. शिफॉन टॉप आणि लेिगग, त्यावर लेदर जॅकेट/ हुडी आणि शाल असा लुक करू शकता. ब्राइट एम्ब्रोयडरी किंवा पिंट्रनेही लुकला उठाव देता येईल.

दिवसाच्या कोणत्या वेळेला हा रंग वापरता आहात, त्यानुसार या डार्क रंगांचे प्रमाण ठरते. सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाताना शक्यतो डार्क शेड्स फोकसमध्ये नकोत. पेस्टल शेड्ससोबत त्यांना पेअर करा. त्यामुळे लुकमध्ये फ्रेशनेस येईल. पावडर कलर यामध्ये वापरू शकता. रात्री डार्क शेड्स फोकसमध्ये ठेवू शकता. एखाद्या पार्टीमध्ये डार्क शेडसोबत गोल्ड किंवा सिल्व्हर शेडसुद्धा वापरू शकता. काळ्या साडीसोबत काळा ब्लाउज वापरण्याऐवजी गोल्ड किंवा सिल्व्हर ब्लाउज वापरून बघा. किंवा साडीतील पिंट्रमधील दुसरी गडद शेडसुद्धा तुम्ही वापरू शकता.