टीव्हीवरून आपण जी कार्टून्स बघतो, त्यांना आपण सरसकटपणे कार्टून म्हणत असलो तरी प्रत्यक्षात ती असतात अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्स. डिस्नेची अशी अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्स तुफान लोकप्रिय झाली, तशी आपल्याकडची होऊ शकली नाहीत.

कार्टून म्हटलं की आपल्याला साहजिकच आठवतात ती टीव्हीवरची धम्माल मजा करणारी पात्रं. पण कार्टूनचा विचार करताना कार्टून (सामाजिक आणि राजकीय भाष्य करणारी अर्कचित्रे) आणि अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर असा दोन भिन्न पातळीवर विचार करावा लागेल. कार्टूनचे असे मुळात दोन वेगवेगळे भाग आहेत. मला काहीतरी सुचतंय, कदाचित त्यात राजकीय भाष्य असेलच असं नाही, पण आजूबाजूच्या जीवनात घडणाऱ्या घटना असू शकतील. रस्त्यातील खड्डे, पावसाचं दुर्भिक्ष्य, कुपोषण अशा घटना असू शकतील. समाजात घडणाऱ्या अशा गोष्टी आणि राजकीय घटनांवरील भाष्य व्यंगचित्रातून दाखवणं हा एक भाग झाला. त्याला आपण कार्टून म्हणू शकतो. तर अ‍ॅनिमेशनच्या दृष्टीने एखादं पात्र निर्माण करणे हा वेगळा भाग झाला. या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे आधी लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे मिकी माऊस किंवा आज जे काही आपण टीव्हीवर पाहतो ती प्रस्थापित पात्रं यांना मी कार्टून म्हणणार नाही. ही पात्रं म्हणजे एखाद्या कसबी कलाकाराने, इलस्ट्रेटरने तयार केलेली पात्रं आहेत.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
What is a virtual card How does it work
Money Mantra : व्हर्च्युअल कार्ड काय असतं? ते कसं काम करतं?

27-lp-cartoon

अशा पात्रांना इलस्ट्रेटरच न्याय देऊ शकतो. इलस्ट्रेटर अनेक गोष्टींचा अभ्यास करत असतो. अ‍ॅनिमेशनसाठी अशी पात्रं तयार करण्याचं काम हा अ‍ॅनिमेटर करत असतो आणि तो एक चांगला इलस्ट्रेटर असतो. तो राजकीय काटरून वगैरेकडे फारसा वळत नाही. त्याचा कल हा नवीन पात्र जन्माला घालण्याकडेच अधिक असतो. तो अ‍ॅनिमेशनच्या अंगानेच विचार करतो. तर कार्टूनिस्ट हा समाजातील घटनांना डोळ्यासमोर ठेवून त्या मांडत असतो. त्यामुळे कार्टूनिस्ट आणि अ‍ॅनिमेटर हे भिन्न आहेत.

इलस्ट्रेशनच्या वर्गातील सर्वच विद्यार्थी कार्टून करतात असे नाही. कार्टूनिस्टवर विशिष्ट शैलीचे संस्कार होत असतात. बाळासाहेब ठाकरे यांची कार्टून ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचली तसे संस्कार आमच्या पिढीतील कार्टूनिस्टवर झाले आहेत. बाळासाहेब डेव्हिड लो याचे चाहते होते तसेच त्यांच्यावर घरातील राजकीय वातावरणाचा प्रभाव होता.

समाजात जे कार्टून रुजलं ते वर्तमानपत्रातून. म्हणजेच मुद्रित माध्यमातून. पण आज लोकप्रिय आहे ते टीव्हीवर दिसणारं इलस्ट्रेटेड कॅरक्टर. ते आलं ते मुळात परदेशातून. त्यांच्याकडे अशी पात्रनिर्मिती ठरवून केली गेली. आपल्याकडे अशी प्रसिद्ध पात्रनिर्मिती झाली नाही. फिल्म डिव्हिजनने काही पात्रं तयार केली गेली. ‘एक चिडीया अनेक चिडीया’ हे गाणं आठवत असेल, पण ते आपल्याकडे एक पात्रं म्हणून 28-lp-cartoonप्रस्थापित झाले नाही. त्याचं कॅरेक्टरायझेन झालं नाही.

आज टीव्हीवर जे कॉर्टून आहे, त्याचं सगळं श्रेय डिस्नेचं आहे. अ‍ॅनिमेशनचा प्रकार हा तेव्हा त्यांच्याकडे विकसित झाला होता. पण मिकी माऊस येण्यापूर्वी त्याचं ब्रॅण्डिंग केलं. त्यामुळे कित्येक पिढय़ा गेल्या तरी त्याचा प्रभाव पुसला गेला नाही.

मिकी माऊस हे कार्टून म्हणूनच आपल्याकडे प्रस्थापित झालं. पण खरे तर ते इलेस्ट्रेटेड कॅरेक्टर आहे. त्याचं तंत्र वेगळं आहे. वैयक्तिक विचार करायचा झाला तर जेव्हा मला हे अर्थ माहीत नव्हते, तेव्हा आपल्याकडे हे लोकप्रिय झालं ते कार्टून फिल्म म्हणून. मात्र आता कळतंय की ते अ‍ॅनिमेटेड कॅरक्टर आहे. पण ते कार्टून म्हणूनच इतकं खोलवर रुजलंय की मी जर लोकांना सांगू लागलो की त्यांना इलेस्ट्रेटेड कॅरेक्टर म्हणायचं तर ते लोकांच्या पचनी पडणार नाही.

कार्टुन आणि अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर ही दोन्ही वेगवेगळी आहेत. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ती रेखाटतानाची मानसिकता वेगळी आहे. कार्टुन आणि अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर या दोहोंमध्ये अवघड काय असा एक सहज प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर अर्थातच नवीन पात्र जन्माला घालणे कधीही अवघड म्हणावे लागेल. असं पात्र विकसित करताना ते कशासाठी आहे, त्याची व्यक्तिरेखा काय आहे याची वन लाइन स्टोरी ठरवावी लागते. मिकी माऊस हा खोडय़ा करणारा, जेरी हा टॉमच्या मागे कायम पळत असणार, छोटा भीम गावावर आलेलं संकट दूर करणारा. हे सारं ते पात्र रेखाटण्यापूर्वीच ठरवावे लागते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे पात्र कोणासाठी आहे त्याचा विचार. मिकी माऊस हा आबालवृद्धांना डोळ्यासमोर ठेवून केला आहे, तर भीम लहान मुलांसाठी. कथानकाचे हे सूत्र वर्षांनुवर्षे तेच राहते. त्यात बदल होत नाही. त्याचबरोबर त्याची रेखाटणीही त्या पात्रांच्या आवाजावर आणि वागणुकीवर अवलंबून असते. हे पात्र सहजसोपे असावे लागते, जेणेकरून ते सफाईने हालचाली करू शकेल. हे सर्व पात्र विकसित करण्याआधीच ठरवावे लागते. त्या पात्राचं जगणं डोळ्यासमोर ठेवावे लागते.

आपल्याकडे तुलनेनं कार्टुनवर अधिक भर दिला गेला. त्यातही राजकीय कार्टुनवर. कदाचित माध्यमांकडून त्वरित मिळणारी प्रसिद्धी हा त्यामागचा दृष्टिकोन असावा. प्रत्येक कार्टुनिस्टची एक शैली ठरलेली असते. त्यांचे विचार करणे, घटनेकडे पाहण्याची दृष्टी हे सारं कार्टून पाहिल्यावर लगेचंच जाणवतं. भारतीय कार्टुनिस्टमध्ये बाळासाहेबांचा विचार केला तर ते कायम थेट भाष्य करायचे; त्यामुळे त्यांच्या रेषा थेट आहेत, बोल्ड आहेत, त्यात उगाच अति वळणदार रेषांना वाव नव्हता. प्रसंग खुलवण्यासाठी आजूबाजूची वातावरण निर्मिती नाही. तर आर. के.च्या कॉमन मॅनभोवती प्रचंड डिटेलिंग दिसून येते. ऑफिसमधील कर्मचारी दाखवायचा असेल तरी त्याच्यामागे शिपाई, त्याच्या हातात फाइल्सचा ढीग असं सारं दिसतं.

29-lp-cartoon

कार्टुनिस्ट तुलनेनं नवीन पात्रनिर्मितीत फारसे पडलेले नाहीत. चित्राच्या माध्यमातून भाष्य हा उद्देश महत्त्वाचा. तर अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर करताना ते सर्वसामान्याला पटणं महत्त्वाचं असतं. मला जपानी, चिनी कॅरेक्टर अजिबात आवडत नाही. नाकाच्या जागी डोळा, डोयाच्या जागी आणि काहीतरी असे करून काय साधतात कळत नाही. कॅरेक्टर डेव्हलप करताना आकार महत्त्वाचा मानला जातो. आपण माणूस आहोत. आपल्या आजूबाजूला सारी माणसं चालती-बोलती-हालती असतात. त्यामुळे माशा बेअरमध्ये अस्वलाचे पात्र दोन पायांवर चालते. पण तेच जर अस्वलासारखं चालायला लागलं तर त्याला मर्यादा येतील. मिकी माऊस लोकप्रिय का झाला त्याचं कारण हेच आहे. मिकी माऊस आला तोच कपडे घालून. आणि तो तुमच्या-आमच्यासारखा वाटू लागला. त्याचं बोलणं, चालणं, वागणं, कपडे हे सारं आपल्या जवळचं होतं. म्हणून लोकांनी त्याला लगेच स्वीकारलं. कदाचित त्याच्यातील मिश्कील खोडकरपणा आपणास अधिक भावला असेल, जवळचा वाटला असेल. डोरेमॉन हे पात्र ते भारतातदेखील पाहिले जाणार हे डोळ्यासमोर ठेवून विकसित केले असावं असे म्हणता येईल. सुरुवातीचे जंगल बुक टूडी जे होतं त्याला कार्टुन म्हणता येईल. पण चित्रपटात मात्र हे सारं रिअ‍ॅलिस्टिक केले आहेत त्याला कार्टुन म्हणणे अवघड आहे, तो एक चित्रपट म्हणता येईल. कॅरेक्टर डेव्हलपमेंट वेगळी हवी हेच यातून सांगता येईल. कॅरेक्टर डेव्हलप होताना आपोआपच त्याच्या आजूबाजूचं वातावरण येतं. असो.

हल्ली जी पोकेमॉन, शिन्चॅन अशी जपानी-चिनी कॅरेक्टर आहेत ती मला अजिबात आवडत नाहीत. त्याचे रेखाटनदेखील चांगले नाही आणि ग्राफिक्सदेखील वाईट आहेत. तुलनेनं डोरेमोन चांगला वाटतो. जी कार्टून व्यवस्थित डिझाइन केली आहेत. त्यांचे प्रमाण योग्य आहे आणि 30-lp-cartoonज्याच्या डिझाइनमध्ये एखादी कमेंट दडलेली आहे अशी कॅरेक्टर मला आवडतात. मिकीमाऊस, टॉम अ‍ॅण्ड जेरीही त्या अंगाने जाणारी आहेत. किंबहुना आवडणारी बहुतांश कॅरेक्टरही डिस्नेची आहे. त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत आहे. जपानी-चिनी पात्रांमध्ये या मेहनतीचा अभाव आहे.

आपल्याकडे कृष्णा ही मालिका आली होती, ती बऱ्याच अंशी चांगली डिझाइन केलेली होती. नंतरच्या काळात हनुमान, गणेश अशी अ‍ॅनिमेशन आली. गणेशच्या अनेक भेटवस्तूदेखील आल्या, पण ही अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर प्रस्थापित होऊ शकली नाहीत. इतर पात्रांच्या तुलनेत टिकून राहली नाहीत. कदाचित त्यांना पुराण कथांच्या दृष्टीनेच पाहिलं गेलं असावं. दुसरं असं की डिस्नेप्रमाणं त्यांचं बॅ्रण्डिंग झालं नाही. मध्यंतरी शिवाजी महाराजांच्या जीवनावर अ‍ॅनिमेशन केलं जात असल्याचं ऐकायला आलं. तो एक माहितीपट  म्हणून चांगला होऊ शकेल. त्यातून पात्र प्रस्थापित करणे, विकसित करणे होत नाही. गणेश, कृष्णा, हनुमान याकडेदेखील कथा म्हणूनच पाहिले गेले असावे. पण छोटा भीम तयार होताना ती एक स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून तयार झाली. पुराणकथांशी न जोडता एका गावातील पात्र म्हणून त्याची रचना करण्यात आली. गावाचा संकटमोचक अशी सुपरहिरोची भूमिका त्याला मिळाली. त्यामुळे त्याचं ब्रॅण्िंडगदेखील चांगले झाले आणि तो लोकप्रिय झाला. पण इतर पात्रांचं ब्रॅण्िंडग होताना मात्र त्याला धार्मिक दृष्टिकोनाच्या मर्यादा आल्या असाव्या असे वाटते. गणेशाची खेळणी त्यावेळी बाजारात आली होती. त्या सॉफ्ट टॉइजचा वापर कसा असावा यावर नाही म्हटल्या तरी मर्यादा आल्या. त्याला पाय लागू नये, किंवा ती कोठे ठेवलेली असावीत, अशा मर्यादा त्यावर आल्या असाव्यात असे जाणवते.

अशा अनेक कारणांमुळे कदाचित आपल्या पात्रांची डिझाइन लोकप्रिय झाली नसावीत. आपल्याकडे अनेक पात्रं आहेत, पण ती जाहिरातींमध्ये वापरण्यापुरती मर्यादित राहिली. आपल्या कथादेखील देवाधर्माशी निगडित झाल्या आहेत. त्यामुळेच आपल्याकडे नव्याने पात्रनिर्मिती झाली नाही असे म्हणावे लागेल.
नीलेश जाधव – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन : सुहास जोशी