सुनीता कुलकर्णी
लोकप्रभा दिवाळी २०२०

गेल्या काही महिन्यांत चित्रपट क्षेत्रातल्या घराणेशाहीवरून कोण गहजब झाला. तापसीही बाहेरून आलेल्यांपैकीच एक! पण या आकांडतांडवाचा भाग होण्याऐवजी तिने उत्तमोत्तम भूमिका मिळवण्यावर आणि त्या पूर्ण ताकदीने साकारण्यावर भर दिला. थप्पड, बदला, सांड की आँख, मनमर्जियाँ, िपक, नाम शबाना.. तिने केलेल्या प्रत्येक चित्रपटात तिची भूमिका व्यापून उरलेली दिसते. तिचं हे वेगळेपण उलगडण्याचा प्रयत्न.. करोनाने मनोरंजन क्षेत्राला अभूतपूर्व हादरे दिले. चित्रपट, मालिका, नाटक सारं काही बंद पडलेलं असताना या क्षेत्राला तारून नेलं ते ओटीटी या तुलनेने नव्या माध्यमाने. या माध्यमातील ट्रेण्डविषयी..

सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे विक्रम सेठ लिखित ‘सुटेबल बॉय’ ही अगदी अलीकडच्या काळामधली माध्यमांतर करण्यात आलेली म्हणजे कादंबरीचं वेबसीरिजमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे अशी कलाकृती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १८ महिन्यांचा काळ तिच्यामध्ये चितारण्यात आला आहे. मोठा आवाका असलेल्या या कादंबरीची मीरा नायर यांच्यासारख्या दिग्दर्शिकेने वेबसीरिज केली म्हटल्यावर तिच्यावर उडय़ा पडणं अगदी साहजिक होतं. पण या कादंबरीचं माध्यमांतर अगदीच निराशाजनक झालेलं आहे. मुळात मोठा आवाका असलेली ही कादंबरी एकेक तासाचे सहा अशा भागांमध्ये बसवण्यात आली आहे. लिखित माध्यमाचं दृश्य माध्यमात रूपांतर करताना अनेक गोष्टींची काटछाट करावी लागते, काही गोष्टी बदलाव्या लागतात. ज्यांना दृश्यमानता देता येईल असेच प्रसंग निवडावे लागतात. ती सगळी प्रक्रिया अर्थातच ‘सुटेबल बॉय’ या वेबसीरिजमध्ये केली गेली आहे. पण तरीही ती वेबसीरिज म्हणून प्रभावी होत नाही.दुसरी मालिका आहे सोनी लाइव्हवरची ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’.  हर्षद मेहताने केलेला शेअर घोटाळा उघडकीला आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशीष बासू यांच्या ‘द स्कॅम हू वन, हू लॉस्ट अ‍ॅण्ड हू गॉट अवे’ या पुस्तकावर ही मालिका आधारित आहे. १९८० च्या दशकात शेअर बाजारचा अमिताभ बच्चन तसेच बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता या शेअर दलालावरची ही मालिका बऱ्यापैकी चर्चेत आहे.

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)