26 November 2020

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०२० – अजस्र प्रवाळ भिंत

बोटीत आमच्या पायाशी असणाऱ्या पारदर्शक काचांतून खाली पाहिल्यावर समुद्राच्या तळाशी असणारे काही काळे खडक आणि त्यांच्या शेजारचे रंगीबेरंगी प्रवाळ खडक अगदी स्पष्ट दिसू लागले.

काचेचा तळ असणारी ती बोट आम्हाला घेऊन प्रवाळ-समुद्राच्या थोडय़ाशा खोल भागाकडे निघाली.

विजय दिवाण
लोकप्रभा दिवाळी २०२०

आता एका अद्भुत सागरी-विश्वात प्रवेश करणार आहोत याचे भान आम्हाला आले. मग आम्ही त्या किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या अनेक बोटींपैकी एका बोटीत चढलो. त्या बोटीच्या तळाला पारदर्शक काचा लावलेल्या होत्या. त्या काचांतून खालचा समुद्र अगदी स्पष्ट दिसत होता. त्या छोटय़ा बोटीत बसून आम्ही तिथल्या विशाल कोरल-समुद्राच्या तळाशी असलेले सागरी प्रवाळ-जगत याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी निघालो. काचेचा तळ असणारी ती बोट आम्हाला घेऊन प्रवाळ-समुद्राच्या थोडय़ाशा खोल भागाकडे निघाली. बोटीत आमच्या पायाशी असणाऱ्या पारदर्शक काचांतून खाली पाहिल्यावर समुद्राच्या तळाशी असणारे काही काळे खडक आणि त्यांच्या शेजारचे रंगीबेरंगी प्रवाळ खडक अगदी स्पष्ट दिसू लागले. त्या खडकांवरून आपल्याकडच्या रोहू माशासारखे दिसणारे काही कार्प मासे आणि निमुळत्या तोंडाचे, लांबसडक असे ‘गार’ मासे थव्याथव्याने पोहत होते. त्यांच्या अवतीभोवती वेगवेगळ्या रंगांचे आणि निरनिराळ्या आकारांचे खेकडे आणि झिंगेही इकडून तिकडे जात-येत होते. समुद्राच्या पृष्ठभागावरील लाटांमुळे खालचे पाणी थोडे हलत असल्याने त्या प्राण्यांची शरीरे लवलवती वाटत होती. आमच्या बोटीखालच्या समुद्रात १९० प्रकारच्या कठीण प्रवाळ-प्रजाती आणि सुमारे १०० वेगवेगळ्या प्रकारच्या मृदू प्रवाळ-प्रजाती आहेत, असे आम्हाला आमच्या गाईडने सांगितले. ते दृश्य फार सुंदर होते. त्या प्रवाळ-खडकांवरून पट्टेदार झेब्रा-फिश नावाच्या मोठय़ा माशांचा एक थवा सतत ये-जा करत फिरत होता. असे मोठे मासे प्रवाळांवरील छोटे मासे आणि इतर छोटे समुद्री जीव खाण्यासाठी येतात. समुद्रतळाच्या त्या प्रवाळांमध्ये एका ठिकाणी आम्हाला भलीमोठी ब्रेन-कोरल दिसली. तिचा आकार, तिच्या पृष्ठभागावरची नक्षी हुबेहूब माणसाच्या मेंदूसारखी दिसते. या ब्रेन-कोरलच्या आसपास सपाट खडकासारख्या आणि उभ्या नळकांडय़ासारख्या कोरल्सही अनेक होत्या. त्या प्रवाळांच्या कवचांतून लवलवत्या शरीरांचे आणि फुलांसारख्या आकाराचे आदिजीव डोकावत होते.

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 6:43 am

Web Title: coral big wall lokprabha diwali issue 2020 dd70
Next Stories
1 तापसीच्या फिटनेसने नेटकरी अवाक
2 करीनाचा लघु उद्योगांना मदतीचा हात
3 पुन्हा बेबीशार्क
Just Now!
X