06 July 2020

News Flash

गॅजेट मॅन डोरेमोन

डोरेमोन एक कॅरेक्टर म्हणून मला खूप आवडतो.

दुपारी टीव्हीवर काय बघायचं हा मोठा प्रश्न असतो कधी कधी. मग रिमोट हातात आला की सुरू होतं चॅनल सर्फिग. एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर उडी सुरू होते. म्युझिक, मुव्ही, एंटरटेन्मेंट चॅनलवरून गाडी वळते ती कार्टून चॅनलकडे. दुपारचा टीव्ही बघण्यासाठी एक उत्तम कारण मिळतं, ते म्हणजे डोरेमोन! दुपारचा कंटाळा आला की हा डोरेमोन माझ्या मदतीला धावून येतो. मग त्याची सवयच लागली आहे आता. दुपार आणि डोरेमोन हे समीकरणच झालंय. हातात चिवडा-फरसाणची डिश, डोक्याखाली उशी आणि समोर डोरेमोन; वाह वाह! मला असं बघून आजी आतून आवाज देते, ‘हे असं खात राहिलीस ना; तर त्या त्याच्यासारखीच (आजीला त्याचं नाव काही आठवत नाही) होशील पोटू. कमी खा.’ पण मला काहीच फरक पडत नाही. आजीच्या सकाळपासून चालू असणाऱ्या बोिरग सीरियल बघून इतका कंटाळा यायचा आणि त्यात ते रिपीट टेलिकास्ट. काय मज्जा यायची या आज्यांना कुणास ठाऊक? असो. खरं तर मीही डोरेमोनचे भाग कितीही वेळा आजही पाहू शकते. अर्थात तो ‘द डोरेमोन’ आहे!

डोरेमोन एक कॅरेक्टर म्हणून मला खूप आवडतो. इतका आवडतो की त्यात आपण आपलं कल्पनाविश्व रंगवायला लागतो. म्हणजे आपण लोबितासारखे झालो तर आपल्याला डोरेमोनसारखा एखादा गॅजेट मॅन मिळेल का? असं सारखं वाटत राहतं. कल्पनाविश्व काय हे या कार्टून सीरिजमधून कळायचं. या सीरिजचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे डोरेमोनचे गॅजेट्स. मला सगळ्यात जास्त आवडलेली त्याची गॅजेट्स म्हणजे अ‍ॅनिव्हेअर डोअर हेलिकॉप्टर, कॉम्प्युटर पेन्सिल अर्थात ही सगळी गॅजेट्स माझ्याकडे पण असती तर; असा विचार नेहमीच यायचा. कितीदा तरी माझा भाऊ आणि मी आमच्या आमच्यात खेळताना या गॅजेट्सचा वापर करायचो. म्हणजे घर-घर खेळताना मध्येच ऑफिसला जायची वेळ झाली की ‘अ‍ॅनिव्हेअर डोअर’ ओरडायचं की आपण लगेच ऑफिसमध्ये.

मला त्यातलं जियान हे कॅरेक्टर पण भन्नाट आवडायचं. त्याचं बेसूर गाणं पोट धरून हसायला लावायचं. तेव्हा शाळेत एक ट्रेण्ड झाला होता की कुणी बेसुरा गात असेल तर त्याला जियान असं चिडवायचं. तसं बघायला गेलं तर जियानमुळेच एक स्टोरी तयार व्हायची. सगळी कॅरेक्टेर्स ही एक फॅण्टसीच आहे पण तरी ते पटकन रिलेट होतात आणि म्हणूनच इंटरेस्टिंगसुद्धा वाटतात.
ऋतुजा फडके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:25 am

Web Title: doraemon
Next Stories
1 शिकवण देणारा रिची रिच
2 सिम्पल सिली डकटेल्स
3 अत्रंगी माशा आणि बिचारा बेअर
Just Now!
X