दसरा-दिवाळीसारख्या सणांचं निमित्त साधून घरातली मोठी खरेदी करायची प्रथा आहे. हल्लीच्या काळातली मोठी खरेदी म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू. त्या घेण्यासाठी या खास टिप्स झ्र्

दिवाळी-दसरा म्हटलं की सर्वात आधी कोणती गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे खरेदी. उत्सवाच्या या क्षणांना आयुष्यभर आठवणीत जपण्यासाठी फार पूर्वीपासूनच आपल्याकडे दिवाळी, दसरा, पाडवा या प्रमुख सणांना मोठी, अगर घरातल्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्याची प्रथा आहे. बऱ्याचदा दिवाळीतल्या मोठय़ा खरेदीसाठी वर्षभर बजेटची तरतूद केली जाते. आपली या वेळच्या दसरा-दिवाळीची खरेदी उत्तम व्हावी यासाठी काही घरगुती गोष्टींच्या खरेदीसाठी टिप्स..

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

लॅपटॉप घेताना –

लॅपटॉप कोणत्या कामासाठी घ्यायचा आहे या प्रश्नाचे उत्तर निश्चित केले तर आपले अनेक गोंधळ दूर होऊ शकतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स महत्त्वाचे असतात. ती पुढीलप्रमाणे

घरगुती दररोज वापरासाठी : घरातल्या दररोजच्या साधारण कामासाठी लॅपटॉप घेणार असाल तर साधारण कमीतकमी दोन जीबी किंवा अधिक रॅम डय़ुअल कोअर प्रोसेसर आणि सहज इथेतिथे नेता यावा यासाठी वजनाने हलका लॅपटॉप घेणे सोयीचे ठरू शकते.

घरगुती वापर आणि मनोरंजनासाठी :  लॅपटॉपचा वापर मनोरंजनासाठी करणार असाल तर आपल्याला किमान क्वाड कोअर प्रोसेसर, उत्तम रेझोल्युशनची (१२८० x ७२०) स्क्रीन, ४ जीबी क्षमतेचा रॅम, गाणी व्हिडीओ साठविण्यासाठी किमान १ टीबी हार्डडिस्क, ५०० एमबी अगर १ जीबी ग्राफिक कार्ड असावे.

ऑफिस वापर आणि प्रोग्रािमगसाठी : ऑफिसकामासाठीचा लॅपटॉप हा ने-आण करण्यासाठी सोयीचा (१४-१५ इंच स्क्रीन साइझ), आणि तरीही उत्तम क्षमतेचा असणे अपेक्षित आहे. यामध्ये किमान ८ जीबीचा रॅम, कमी वजनाचा पण जास्त क्षमता साठविणारी १ टीबी क्षमतेची एसएस ड्राइव्ह, क्वाड कोअर उत्तम प्रोसेसर (आय-७ किंवा ए-८) साधारण २ जीबीचे ग्राफिक कार्ड असावे. बॅकलीट आणि प्रोग्रामेबल कीबोर्ड आपले काम सोपे करू शकतात. जर आपले काम व्हिडीओ अगर ऑडिओ एडिटिंग असेल तर उत्तम, जरा मोठी स्क्रीन साइझ आणि जास्त क्षमतेचे ग्राफिक कार्ड आवश्यक ठरू शकते.

गेिमगसाठी : यासाठी लॅपटॉपची क्षमता प्रचंड असणे आवश्यक असते. किमान १६ जीबी अगर त्यापेक्षा जास्त क्षमतेचा रॅम, किमान २ टीबी एसएस ड्राइव्ह, ४ जीबीपेक्षा अधिक क्षमतेचे ग्राफिक कार्ड, १५ ते १७ इंची फुल एचडी रेझोल्युशन डिस्प्ले उत्तम साउंड सिस्टीम आणि चांगला डय़ुरेबल कीबोर्ड असणे किमान अपेक्षित असते.

लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स –

प्रोसेसर : सोप्या भाषेत प्रोसेसर म्हणजे संगणकातली अशी चिप, जिच्याशी संगणकाच्या साऱ्या गोष्टी कनेक्टेड असतात आणि त्या चिपद्वारेच त्या चालविल्या जातात. प्रोसेसरची क्षमता जितकी जास्त तेवढा संगणक अनेक कामं एका वेळेस करू शकतो. प्रोसेसरचे कोअर जितके जास्त असतात तितकी त्याची प्रोसेसिंग क्षमता वाढत जाते. सध्या बाजारात मुख्यत: इंटेल आणि एएमडी कंपनीचे वेगवेगळे प्रोसेसर उपलब्ध आहेत.

इंटेल प्रोसेसर : इंटेलची कोअर सिरीज सर्वाधिक चालणारी प्रोसेसर सिरीज आहे. याखेरीज एटॉम अगर एक्स सिरीजचे प्रोसेसरही इंटेलकडून बनविले जातात.

आय सिरीज : कोअर आय सिरीजमधले प्रोसेसर हे अनेक कामे एकाच वेळी करण्यासाठी तसंच अनेक कामे जलद गतीने साधण्यासाठी वापरले जातात. आय सिरीज ही सध्या बाजारात उपलब्ध असणारी उत्तम सिरीज आहे. आय-सेव्हनचे प्रोसेसर हे इंटेलचे सध्या सर्वात अपडेटेड प्रोसेसर्स आहेत.

एम सिरीज : खास प्रोग्रामिंगसाठी तयार करण्यात आलेले हे प्रोसेसर सहसा ऑफिस अगर आयटी कामांसाठी वापरले जातात. उत्तम बॅटरी आणि उत्तम मल्टीटास्किंग-साठी या प्रकारातील प्रोसेसर वापरतात. एम तीन ते ए-सेव्हन प्रकारात हे प्रोसेसर उपलब्ध आहेत.

एटोम एक्स सिरीज : एटोम एक्स सिरीज ही जलद वेब ब्राउजिंग, उत्तम बॅटरी सुविधा आणि घरगुती एन्टरटेन्मेंटसाठी वापरतात. एटोम तीन एक्स ते एटोम एक्स सेव्हन हा यातला सर्वोत्तम प्रोसेसर आहे.

पेन्टिअम, सेलेरॉन सिरीज : पेन्टिअम आणि सेलेरॉन हे इंटेलचे सर्वात बेसिक प्रकारचे प्रोसेसर आहेत. चांगली बॅटरी आणि ठीकठाक घरगुती वापरासाठीच्या संगणकांत हा प्रोसेसर वापरला जातो.

एएमडी प्रोसेसर

एफएक्स सिरीज : एफएक्स हे एएमडी प्रोसेसर सर्वात उत्तम आणि  जास्त काम एकाच वेळी करण्यासाठी वापरले जातात. मुख्यत: प्रोफेशनल गेिमगसाठी हे एफएक्स सिरीजचे प्रोसेसर वापरतात

ए सिरीज : एएमडीमधील सर्वाधिक खपाची सिरीज म्हणजे ए सिरीज ए-फोर, ए-सिक्स ए-टेन असे एकानंतर एक अनेक व्हर्जन्स बाजारात उपलब्ध आहेत. दररोजच्या वापरापासून ते प्रोग्रािमगसाठी एएमडी प्रोसेसर उत्तम ठरतात.

ई सिरीज : इंटेलच्या पेन्टियम सिरीजसारखी एएमडीची ई सिरीज ही सर्वात बेसिक सिरीज आहे.

रॅम : संगणकाच्या उत्तम क्षमतेसाठी रॅन्डम अ‍ॅक्सेस मेमरी वापरली जाते. रॅम जितका अधिक तेवढा संगणक जलद कामे किंवा एका वेळी अनेक कामे करू शकतो. दोन जीबीपासून ते १२ जीबीपर्यंत कोणताही रॅम आपण आपल्या गरज आणि बजेटनुसार निवडू शकतो.

स्टोरेज टाइप : आपल्या लॅपटॉपमध्ये फोटो, गाणी, किंवा इतर साऱ्या फाइल्स साठविण्यासाठी जे मेमरी डिव्हाइस वापरले जाते त्याला हार्ड डिस्क किंवा सॉलिड स्टेट ड्राइव्ह असे म्हणतात. या दोघांतील फरक सोबतच्या तक्ता एकमधून कळू शकेल.

स्क्रीन साइझ : स्क्रीन साईझ ही आपापल्या कामानुसार ठरवता येऊ शकते. साधारण कामांसाठी १४ इंची किंवा त्यापेक्षा अधिक स्क्रीन असलेली बरी. परंतु वाढत्या स्क्रीन साइजसोबत बॅटरी कन्झम्पश्न आणि लॅपटॉपचा आकारही वाढत जातो. त्यामुळे आपल्याला उत्तम पोर्टेबिलिटी हवी असेल तर लहान आकाराचा स्क्रीन उत्तम ठरेल.

ग्राफिक कार्ड : आपल्या लॅपटॉपमध्ये व्हिडीओ अगर चित्र पाहण्याची क्षमता ही ग्राफिक कार्डवर अवलंबून असते. प्रत्येक लॅपटॉपमध्ये इनबिल्ट ग्राफिक क्षमता असतेच, पण मोठे व्हिडीओ चालविण्यासाठी तेवढी पुरेशी ठरत नाही. म्हणून एक्स्टर्नल ग्राफिक कार्ड वापरावे लागते.

लॅपटॉपचे प्रकार –

नोटबुक : या प्रकारचे लॅपटॉप हे आकाराने मोठे असतात, मोठय़ा आकारासोबतच इतरांपेक्षा त्यांच्या क्षमताही अधिक असतात. गेमर्स आणि व्हिडीओ एडिटर्स सहसा नोटबुक वापरताना दिसतात. कमी क्षमतेचे नोटबुक घरगुती कामांसाठीही वापरले जाते. मोठा आकार आणि अधिक वजनामुळे त्यांची ने-आण करणे थोडे कठीण असते.

नेटबुक : नोटबुकचा लहान भाऊ म्हणजे नेटबुक. याचा आकार बराच लहान असतो. बऱ्याचदा याचा कीबोर्ड, स्क्रीन साइझ कमी असतो.

अल्ट्राबुक : नेटबुकपेक्षा आकाराने लहान असलेल्या लॅपटॉपना अल्ट्राबुक असे म्हणतात. सहसा अल्ट्राबुक्सची मागणी ही ऑफिस अगर प्रोग्रािमगसाठी होते. त्यांना कनेक्टिव्हिटी पर्याय कमी असतात, पण त्यांचे वजन अतिशय कमी आणि प्रोसेसिंग क्षमता अधिक असते.

हायब्रीड लॅपटॉप : लॅपटॉप इतकी क्षमता परंतु टॅब्लेटइतकी पोर्टेबिलिटी ही हायब्रीड लॅपटॉपची खासियत असते. वेळप्रसंगी याची स्क्रीन वेगळी करून टॅब्लेटसारखी वापरता येते. टच स्क्रीन हे खास फीचर याला अधिक महागडे बनविते. यांना कन्व्हर्टबिल असेही म्हणतात.

वरील सर्व बाबींची माहिती घेऊन त्यानुसार आपली गरज ठरवून या दिवाळीत नवीन लॅपटॉप घेता येऊ शकेल.

टीव्ही घेताना…

टीव्ही घेण्यासाठी आपण दुकानात किंवा ऑनलाइन शोधाशोध करायला सुरुवात केली की आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे एलसीडी, एलईडी, प्लाझ्मा, ओएलईडी, कव्‍‌र्ह्ड स्क्रीन.. यातला कोणत्या प्रकारचा टीव्ही घ्यावा..? बजेटनुसार बाजारात उपलब्ध असणाऱ्या या पर्यायांबद्दल थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपण तक्ता दोनची मदत घेऊ शकता.

कोणत्या ब्रॅण्डचा टीव्ही घ्यावा…

या प्रश्नाला खरंतर एक उत्तर देता येणे तसे कठीण आहे. कारण बऱ्याच कंपन्या या त्यांच्या परीने उत्तम असे टीव्ही बाजारात दाखल करत असतात. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्यांच्या सारख्याच टिकतील याची काहीच खात्री नसते. तरीही टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये पूर्वीपासून असणाऱ्या कंपन्यांवर विश्वास ठेवणे सोयीचे ठरू शकते. उदा. एलजी, पॅनासॉनिक, व्हिडीओकॉन, सोनी, सॅमसंग. पण फक्त ब्रॅण्ड आणि कंपनी बघून टीव्ही घेण्यापेक्षा आपल्या टीव्हीमधील इतर सुविधांवरून आपण आपल्यासाठी योग्य टीव्हीची निवड करायला हवी.

प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर कोणत्या निकषांवर टीव्ही तपासावा?

चांगला टीव्ही निवडताना त्याच्यातील दोन बाबी उत्तम असणे गरजेचे असते १. त्याची चित्र दाखविण्याची क्षमता २. त्याची साऊंड सिस्टीम क्षमता. या दोन बाबी दुकानात टीव्ही घेण्यासाठी गेल्यावर कशा प्रकारे तपासता येतील ते पाहू

चित्र दाखविण्याची क्षमता :

कॉन्ट्रास्ट : उत्तम कॉन्ट्रास्ट म्हणजे, पांढरा रंग हा पांढराच वाटायला हवा. यामध्ये इतर कोणत्याही रंगाची सरभेसळ असणे अपेक्षित नसते. बऱ्याचदा हा रंग पांढरा दिसत नाही. त्यात निळा अगर लाल रंग वेगळा पाहता येतो. त्याचप्रमाणे संपूर्ण काळा रंग हा काळाच दिसणे अपेक्षित असते, यामध्ये राखाडी, गडद निळा अशी इतर रंगांची सरमिसळ असता कामा नये. प्लाझ्मा प्रकारातील टीव्ही उत्तम काळा रंग दाखवितात म्हणून प्लाझ्मा टीव्हीची चित्र दाखविण्याची क्षमता एलसीडी-एलईडीपेक्षा थोडी उत्तम समजली जाते.

रंग : उत्तम टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे रंग हे उठावदार असणे अपेक्षित असते. त्यासाठी एखाद्या रंगाची कडा पाहावी. ती अगदी सरळ, स्मूथ असेल तर उत्तम. बऱ्याचदा रंगांची कडा फारशी वेगळी पाहता येत नाही. कडेला आजूबाजूचे रंग एकमेकात मिसळल्याचा भास होतो. कमीतकमी प्रकाशात रंग जास्तीतजास्त खरे वाटणे अपेक्षित असते. त्यामुळे दुकानात टीव्ही निवडताना कमीतकमी प्रकाशातील एखादे चित्र निवडावे व त्याचा रंगाचा पोत पाहावा.

मोशन : अधिकाधिक वेगातील चित्रे स्क्रीनवर जास्तीत जास्त सुस्पष्ट दिसणे अपेक्षित असते. रिफ्रेश रेट ही टेक्निकल टर्म त्यासाठी वापरतात. म्हणजे एका सेकंदात किती वेळा चित्राबद्दलची माहिती रिफ्रेश केली जाते. साधारण ८० ते १२० अगर २४० हर्ट्झ (120ँ३९) अशा क्षमतेचे टीव्ही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ही संख्या जितकी जास्त तितक्या वेगातील चित्रे सुस्पष्टपणे पाहता येऊ शकतात. कंपनीने लिहिलेल्या आकडय़ांवर विश्वास न ठेवता आपण दुकानात गेल्यावर वेगाने जाणाऱ्या गोष्टींची फीत किंवा वेगवान खेळ पाहू शकतो. त्यावरून ही क्षमता तपासता येईल.

बऱ्याच टीव्हींमध्ये विविध मोड्स असतात, जेणेकरून त्या त्या प्रकारचे चित्र पाहताना टीव्ही त्या प्रकारचे चित्र दाखविण्यासाठी स्वत:ला उत्तम प्रकारे आपोआप अ‍ॅडजेस्ट करून घेतो. ते मोड कोणकोणते आहेत या बाबी तपासता येतात. जसं की मूव्ही मोड, स्पोर्ट्स मोड त्या त्या मोडमध्ये जाऊन टीव्ही तपासता येऊ शकतो.

इतर बारकावे : आपल्याला स्क्रीनवर दिसणारे चित्र किती स्प्ष्ट दिसते आहे यालाही तितकेच महत्त्व आहे. म्हणजे स्क्रीनवर सर्वसाधारण अंतरावर असणारे हिरव्या रंगाचे झाड आपल्याला हिरवा गोळा दिसतो की त्यातील सगळे बारकावे, त्यातील पान अन् पान आपणास वेगळे पाहता येते हे आपण तपासू शकतो. आपण जो टीव्ही खरेदी कराल त्यामध्ये सध्याच्या गरजेनुसार यूएसबी पोर्ट, एचडी एमआय पोर्ट आणि ऑडिओ जॅक उपलब्ध असावे, जेणेकरून  स्मार्टफोन्स, कॅमेरा टीव्हीला जोडता येऊ शकतो.

फ्रिज घेताना –

उपलब्ध जागा : आपण घेतलेला रेफ्रिजरेटर हा आपल्याला सारखा सारखा हलविता येत नाही. त्यामुळे तो खरेदी करताना आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे, याचा सर्वप्रथम विचार करणे अत्यावश्यक आहे. तसेच फ्रिजचे दरवाजे हे नेहमी बाहेरच्या दिशेने उघडतात, त्यामुळे हे दरवाजे पूर्णत: उघडले जातील अशी योग्य जागा निवडावी. वरील गोष्टींचा विचार केल्याने आपल्याला कोणत्या प्रकारातील फ्रिज घ्यावयाचा आहे (सिंगल डोअर, डबल डोअर, टॉप फ्रिजर, बॉटम फ्रिजर, इ.) हे निश्चित करण्यास मदत होते. किती लिटरचा फ्रिज घ्यायचा याचे उत्तर प्रत्येक घरातील फ्रिजमध्ये साठवल्या जाणाऱ्या सामानाच्या क्षमतेवरून ठरवता येऊ शकते. साधारण चार जणांच्या कुटुंबासाठी तीनशे लिटर अगर त्यापेक्षा मोठय़ा क्षमतेचा फ्रिज असणे सोयीचे ठरते.

इतर काही महत्त्वाच्या सुविधा रेफ्रिजरेटर्समध्ये असणे कधीही उत्तम. त्या पुढीलप्रमाणे –

कूलिंग टाइप : आपला रेफ्रिजरेटर कोणत्या प्रकारे काम करतो यानुसार म्हणजे कूलिंग करण्याच्या पद्धतीनुसार दोन मुख्य प्रकार आहेत.

डायरेक्ट कूल : रेफ्रिजरेटरमधील तापमान थंड राखण्यासाठी फॅिनग किंवा सक्र्युलेशन पद्धतीचा अवलंब या प्रकारच्या फ्रिजमध्ये केला जात नाही. त्यामुळे फ्रिजर विभागात सतत बर्फ साठत असतो, ज्यासाठी मॅन्युअल अथवा सेमी ऑटोमॅटिक पद्धतीने फ्रिजरसारखे डी-फ्रिज करावे लागतो. अशा प्रकाराला डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्स म्हणतात. याची किंमत सहसा कमी असते. तसेच याची वीज वाचविण्याची क्षमताही उत्तम मानली जाते.

फ्रॉस्ट फ्री : रेफ्रिजरेटरमधील तापमान थंड राखण्यासाठी फॅिनग किंवा सक्र्युलेशन पद्धतीचा अवलंब या प्रकारच्या फ्रिजमध्ये केला जातो. त्यामुळे फ्रिजर विभागात सतत बर्फ साठत नाही व तापमान योग्य प्रकारे नियंत्रित केले जाते, ज्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थाचे आयुर्मान वाढते.  या प्रकारच्या रेफ्रिजरेटर्सची किंमत सहसा जास्त असते व वीज वाचविण्याची क्षमता कमी असते.

कप्पे : रेफ्रिजरेटर्सचा उत्तम क्षमतेने वापर करण्यासाठी त्यामध्ये विविध कप्पे असणे महत्त्वाचे असते. पूर्वी फक्त बर्फ व इतर वापरासाठीचे कप्पे रेफ्रिजरेटर्समध्ये असत. परंतु सध्या विविध गोष्टी साठविण्यासाठी विविध कप्पे पुरविले जातात. उदा. डेअरी प्रॉडक्ट्स; जसे दूध, बटर इ. गोष्टी साठविण्यासाठी वेगळा कप्पा. भाज्या साठविण्यासाठी थोडय़ा जास्त तापमानावर असणारा वेगळा कप्पा. सतत बर्फ हवा असणाऱ्यांसाठी कमीतकमी वेळात बर्फ उपलब्ध व्हावा यासाठी क्विक फ्रिज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. असे विविध वापरांसाठी विविध कप्पे आपल्या रेफ्रिजरेटर्समध्ये असणे अन्न साठवणुकीच्या दृष्टीनेही उत्तम असते.

रेफ्रिजरेटर्समध्ये उपलब्ध असलेले कप्पे आपल्याला लहानमोठे करता येत असतील तर आपल्याला हव्या त्या आकाराच्या वस्तू आपण त्यामध्ये साठवू शकतो. बर्फ आणि पाणी यासाठी उत्तम डिस्पीन्सर असावा. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही मॉडेल्समध्ये फ्रिज न उघडताही बर्फ व थंड पाणी घेता येण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.

आवाजाची पातळी : आवाज हा अनेक रेफ्रिजरेटर्सचा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे आपण रेफ्रिजरेटर निवडण्यापूर्वी तो किती आवाज करतो हे न विसरता तपासून पाहा.

एनर्जी एफिशिएन्सी : स्टार मार्कवरून रेफ्रिजरेटर्सची वीज खेचण्याची क्षमता आपल्याला कळू शकते. जेवढे स्टार्स जास्त तेवढी वीज कमी वापरली जाणार.

कोणत्या कंपनीचा रेफ्रिजरेटर खरेदी करावा… हा प्रश्न प्रत्येकासमोर असतो. व्हिडीओकॉन, गोदरेज, सॅमसंग यांसारख्या कंपन्या खात्रीलायक व वेगवेगळे रेफ्रिजरेटर्स उपलब्ध करून देतात. सिमेन्स, व्हर्लपूल कंपन्या या कंपन्या रेफ्रिजरेटर्स व वॉिशग मशीनसारखी घरगुती उपकरणे बनविण्यात उत्तम आहेत. परंतु त्यांची सव्‍‌र्हिस सेंटर्स ही फारच कमी ठिकाणी असतात, ज्यामुळे कधी आपले उपकरण बिघडले तर सव्‍‌र्हिसिंगसाठी वेळ जाऊ शकतो. त्यामुळे शक्यतो माहितीतला पूर्वी वापरलेला ब्रॅण्डचा फ्रिज खरेदी करावा.

सो हॅप्पी शॉपिंग
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com