सुरक्षित भवितव्यासाठी गुंतवणूक करताना ती आपल्याला गरज असेल तेव्हा उपयोगीही पडायला हवी. त्यासाठी गुंतवणुकीवर कसे कर आकारले जातात, हे आपल्याला माहीत असायला हवे.

आíथक नियोजन करताना आपल्या पशांचा सुयोग्य प्रकारे उपयोग करून आपली आíथक उद्दिष्टे साध्य करणे हा उद्देश असतो. आíथक उद्दिष्टांमध्ये घर विकत घेणे, मुलांचे शिक्षण, परदेश प्रवास, वैद्यकीय खर्चाची तरतूद, निवृत्तीनंतरच्या खर्चाची तरतूद, वगरे गोष्टी येतात. यामधील काही उद्दिष्टे ही दीर्घ मुदतीनंतर आकारास येणार असतात आणि त्यासाठी जास्त पशांची आवश्यकता भासते. त्या वेळेला किती पशांची आवश्यकता भासेल याचे आता अनुमान करणेसुद्धा कठीण जाते. त्यामुळे आपल्या सध्याच्या उत्पन्नातून थोडे-थोडे पसे बाजूला ठेवून योग्य वेळेला तो उद्दिष्टांसाठी खर्च करणे हे काम हुशारीने करावे लागते. यासाठी सल्लागाराची मदत घेणे उचित आहे. कारण यामध्ये अनेक आव्हाने आहेत, बदलती परिस्थिती, आíथक गणिते, महागाई, बदलते कायदे वगरे असतात.

या आíथक नियोजनामध्ये आपले पसे आपल्याला गरजेच्या काळात उपलब्ध होणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी ते योग्य अशा गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतविणे गरजेचे असते. अशी गुंतवणूक करताना प्रामुख्याने चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक  सुरक्षितता, दोन त्यावर मिळणारे उत्पन्न आणि भांडवली वाढ आणि तीन तरलता (LIQUIDITYY) आणि चार करपात्रता. या चारही गोष्टींचा मेळ साधणे कठीण असते. गुंतवणूक सुरक्षित असेल तर त्यावर उपन्न कमी मिळते, जोखीम जास्त असली तर उत्पन्न चांगले मिळण्याची अपेक्षा जास्त असते तसेच तोटा होण्याचा धोका असतो, गुंतवणुकीत तरलता असेल परंतु उत्पन्न करपात्र असेल किंवा भांडवली वाढ नसेल, वगरे, वगरे. आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणे चांगले.

गुंतवणूक करताना त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कराचा वाटा हा फार मोठा आहे. योग्य करनियोजन न करता गुंतवणूक केल्यास ३३ टक्क्यांपर्यंत कर भरावा लागतो. कर भरल्यानंतर हातात राहणारी रक्कमही कमी होते. कोणत्या गुंतवणुकीवर किती आणि केव्हा कर भरावा लागतो आणि तो वाचविण्याचे काय उपाय आहेत हे माहीत असणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीचे जे लोकप्रिय पर्याय आहेत त्यावर करआकारणी कशी होते याचा आढावा घेऊ या.

शेअर्समधील गुंतवणूक :

शेअर्समधील गुंतवणूक ही प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागता येईल. एक म्हणजे शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स आणि शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या खासगी कंपन्यांचे शेअर्स. दोन्हींसाठी करपात्रता वेगळी आहे.

१) शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स :

या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला मिळणारे उत्पन्न म्हणजे लाभांश, बोनस शेअर्स, शेअर्सची विक्री केल्यावर मिळणारा भांडवली नफा. यावरील कर आकारणी खालील प्रमाणे :

लाभांश : वैयक्तिक करदाते, िहदू अविभक्त कुटुंब (HUF), भागीदारी संस्था, इतर करदाते (स्वदेशी कंपनीव्यतिरिक्त) यांना मिळालेला शेअर्सवरील लाभांश दहा लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे.  या करदात्यांना दहा लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांशावर दहा टक्के कर भरावा लागतो. हा कर आपले इतर उत्पन्न कोणत्याही स्लॅबमध्ये असले तरी भरावा लागतो.

बोनस शेअर्स : बोनस शेअर्स हे कंपनीच्या विद्यमान समभाग धारकाला एका विशिष्ट प्रमाणात जाहीर केले जातात. कंपनी बोनस शेअर्स जाहीर करते तेव्हा त्यावर कोणताही कर गुंतवणूकदाराला भरावा लागत नाही. परंतु जेव्हा हे बोनस मिळालेल्या शेअर्सची विक्री केली जाते तेव्हा मात्र त्याच्या धारणकाळाप्रमाणे त्याची करपात्रता ठरते. शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी ज्या दिवशी बोनस जाहीर झाला त्या दिवसापासून एका वर्षांच्या आत या बोनस शेअर्सची विक्री केल्यास त्यावर १५ टक्के कर भरावा लागेल आणि बोनस जाहीर केलेल्या दिवसापासून एक वर्षांनंतर शेअर्स विकले तर कलम १०(३८) नुसार दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असेल. बोनस शेअर्सचा भांडवली नफा गणतांना खरेदीमूल्य ‘शून्य’ असे गृहीत धरावे.

भांडवली नफा : शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे शेअर्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा होतो. ज्या सूचिबद्ध शेअर्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (STT) भरला गेला आहे, असा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त आहे आणि अशा लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो.

सूचिबद्ध शेअर्स खासगीरीत्या विकले किंवा शेअर्स कंपन्यांना बाय-बॅक योजनेअंतर्गत विकले तर त्यावर होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र आहे; कारण त्यावर शेअर उलाढाल कर भरला जात नाही. या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत विचारात घेऊन भांडवली नफा गणणे आणि त्यावर २० टक्के इतका कर भरणे किंवा महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमत विचारात न घेता भांडवली नफा गणणे आणि त्यावर दहा टक्के इतका कर भरणे. या दोन्ही पद्धतीने देय कर किती आहे ते पाहणे आणि जी पद्धत करदात्याला फायदेशीर आहे ती पद्धत वापरून त्यावर कर भरणे. लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

१ फेब्रुवारी, २०१७ रोजी सादर झालेल्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या सुधारणेत कलम १०(३८) नुसार दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर मिळणारी करमुक्तता ही खालील परिस्थितीत मिळणार नाही :

१) शेअर्सची खरेदी १ ऑक्टोबर, २००४ नंतर झाली असेल आणि

२) त्या खरेदीवर शेअर उलाढाल कर भरला नसेल

खालील प्रकारचे शेअर्स खरेदी व्यवहार या सुधारणेतून वगळण्यात आले आहेत :

१. आयपीओ (पब्लिक इश्यू)

२. बोनस शेअर्स

३. राइट शेअर्स

४. अनिवासी भारतीयाने एफडीआय नियमानुसार खरेदी केलेले शेअर्स

२. शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या खासगी कंपन्यांचे शेअर्स :

सूचिबद्ध नसलेले खासगी कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा होतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणतांना महागाई निर्देशांकानुसार खरेदी किमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४ एफ (54 F) नुसार किंवा ५४ ईसी(EC) नुसार गुंतवणूक (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करता येते.

लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक :

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागता येईल. एक म्हणजे इक्विटी ओरिएंटेड फंड आणि डेब्ट फंड.

१. इक्विटी ओरिएंटेड फंड :

इक्विटी ओरिएंटेड फंडाची ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये असेल तर तो फंड इक्विटी ओरिएंटेड फंड म्हणून ओळखला जातो. इक्विटी ओरिएंटेड फंडातील गुंतवणुकीवरील परतावा हा शेअर बाजारातील चढ-उतारावर अवलंबून असतो. शेअर्समधील गुंतवणुकीप्रमाणे या फंडातील गुंतवणुकीत जोखीम जास्त असल्यामुळे उत्पन्न अधिक मिळण्याची शक्यता असते तसेच तोटा होण्याचीसुद्धा शक्यता असते.

या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला मिळणारे उत्पन्न म्हणजे लाभांश, फंडाची विक्री केल्यावर मिळणारा भांडवली नफा. यावरील कर आकारणी खालीलप्रमाणे :

लाभांश : इक्विटी ओरिएंटेड फंडाच्या गुंतवणुकीवरील लाभांश करमुक्त आहे.

भांडवली नफा : इक्विटी ओरिएंटेड फंडाच्या विक्रीवरील तरतुदी या शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे शेअर्सच्या विक्रीवर असलेल्या तरतुदीप्रमाणे आहेत.

२. डेब्ट फंड :

डेब्ट फंडातील गुंतवणूक ही काही अंशी सुरक्षित आहे आणि नियमित उत्पन्न देणारी आहे. बँकेतील मुदत ठेवीला हा एक पर्याय आहे. बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज हे करपात्र आहे तर डेब्ट फंडावरील लाभांश हा करमुक्त आहे. बँकेतील मुदत ठेवीच्या मुद्दल रकमेत वाढ होत नाही परंतु डेब्ट फंडातील गुंतवणुकीच्या मुद्दल रकमेत थोडय़ा प्रमाणात वाढ होते. डेब्ट फंडातून लाभांश आणि भांडवली नफा हे उत्पन्न मिळते. यावरील कर आकारणी खालीलप्रमाणे :

लाभांश : इक्विटी फंडावरील लाभांश हा करमुक्त आहे. डेब्ट फंडावरील लाभांश हा लाभांश घेणाऱ्यासाठी करमुक्तच आहे परंतु फंडाला यावर कर भरावा लागतो आणि तो कर गुंतवणूकदाराकडून वसूल केला जातो. त्यामुळे जेव्हा डेब्ट फंडाकडून करदात्याला लाभांश मिळतो त्यावर त्याला परत कर भरावा लागत नाही.

भांडवली नफा : डेब्ट फंडचे युनिट्स हे खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा होतो. डेब्ट फंडाच्या युनिट्सच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (रळळ) भरला जात नसल्यामुळे दीर्घ मुदतीचा किंवा लघू मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र असतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणतांना महागाई निर्देशांकानुसार खरेदी किंमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४ एफ (54 F) नुसार किंवा ५४ ईसी(EC) नुसार गुंतवणूक (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करता येते.

लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

घरामधील गुंतवणूक :

अन्न, वस्त्र आणि निवारा यापकी निवारा ही एक प्राथमिक गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आपले घर असावे असे स्वप्न असते. सरकारसुद्धा एका घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी काही सवलती देत आहे. पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी सरकार गृहकर्जाच्या व्याजावर तीन ते ६.५ टक्के अनुदान अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी देते. या शिवाय प्राप्तिकर कायद्यात एक घर करमुक्त आहे आणि एकापेक्षा जास्त घरांवर कर भरावा लागतो. शिवाय पहिल्या घरासाठी प्राप्तिकर कायद्यात अतिरिक्त सवलती आहेत.

घरांच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनसुद्धा याकडे बघितले जाते. घराच्या गुंतवणुकीपासून दोन प्रकारचे उत्पन्न मिळू शकते. एक घरभाडे आणि भांडवली नफा.

घरभाडे उत्पन्न : स्वत:च्या एका राहत्या घराचे उत्पन्न करपात्र समजले जात नाही. आणि शिवाय या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जावरील दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची उत्पन्नातून वजावट मिळते. एका घरापेक्षा जास्त घरे असतील आणि भाडय़ाने दिली असतील तर भाडय़ाचे उत्पन्न ‘करपात्र उत्पन्नात’ गणावे लागते आणि जरी घरे भाडय़ाने दिली नसतील तरी अनुमानित उत्पन्न ‘करपात्र उत्पन्नात’ गणावे लागते. या उत्पन्नातून मालमत्ता कर, प्रमाणित वजावट ३० टक्के आणि गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळते. गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीवर मर्यादा नाही. परंतु १ एप्रिल, २०१७ पासून अशा व्याजाच्या वजावटीनंतर येणारा तोटा इतर उत्पन्नातून फक्त दोन लाख रुपयांपर्यंत वजा करता येतो. बाकी तोटा पुढील आठ वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो.

भांडवली नफा : घर ही एक संपत्ती आहे. त्यामुळे घराची विक्री केल्यावर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. घर खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी (३१ मार्च, २०१७ पूर्वी ३६ महिने) धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा होतो. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणतांना महागाई निर्देशांकानुसार खरेदी किमतीचा फायदा घेता येतो आणि त्यानुसार गणलेल्या नफ्यावर २० टक्के इतका कर भरावा लागतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४एफ नुसार किंवा ५४ईसीनुसार गुंतवणूक (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करता येते. लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

सोन्यामधील गुंतवणूक

आपल्याकडे सोने हे गुंतवणुकीचे साधन म्हणून बघितले जात नाही. हौस-मौज, लग्नसमारंभ वगरेंच्या कारणासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली नाही. आणि भविष्यात सोन्याच्या किमती खूप वाढतील अशी परिस्थिती नाही. यामुळे सोन्यातील गुंतवणूक, इतर पर्याय बघता, फार फायदेशीर नाही. सोने ही सुद्धा एक भांडवली संपत्ती आहे. साधारणत: घरात वापरात असलेली भांडी, कपडे ही भांडवली संपत्ती होऊ शकत नाही. परंतु सोन्या-चांदीपासून बनवलेली भांडी किंवा सोन्याचा जर असलेली साडी किंवा कपडे भांडवली संपत्ती होते. त्यामुळे सोने विकल्यास लघू मुदतीचा किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा किंवा तोटा होऊ शकतो. सोने खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो आणि ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा होतो. इतर भांडवली नफ्याप्रमाणे यावर कर भरावा लागतो. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल किंवा कमी भरावयाचा असेल तर कलम ५४एफ नुसार किंवा ५४ईसीनुसार गुंतवणूक (कमाल मर्यादा ५० लाख रुपये) करता येते. लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो.

प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गोल्ड सोवरन बॉण्डमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते. सुरक्षेच्या दृष्टीने बॉण्डमधील गुंतवणूक चांगली. या बॉण्डचे व्यवहार बाजारातील सोन्याच्या किमतीप्रमाणे ठरतात. जेव्हा लग्न-समारंभाला सोने पाहिजे असेल तेव्हा बॉण्ड विकून सोने घेता येते. बॉण्डवर २.५० टक्के दर साल व्याजदेखील मिळते. हे व्याज मात्र करपात्र आहे. वैयक्तिक करदात्यांना मुदतीनंतर या बॉण्डचे पसे परत मिळाल्यानंतर होणारा भांडवली नफा हा करमुक्त असतो. या बॉण्डची खरेदी-विक्री शेअर बाजारात केली जाते. मुदतीपूर्वी विक्री केलेल्या बॉण्डवर लघू किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होतो. आणि तो इतर भांडवली नफ्याप्रमाणे करपात्र आहे.

कोणतीही गुंतवणूक करताना वरील बाबींचा विचार केल्यास योग्य नियोजन होऊन संपत्ती वैध मार्गाने वाढविता येते.

(लेखक हे सनदी लेखापाल व करसल्लागार आहेत.)
प्रवीण देशपांडे – response.lokprabha@expressindia.com