01 June 2020

News Flash

फराळाच्या पलीकडे…

पाहुण्यांना जर त्याबरोबरच एखादा वेगळा पदार्थ खाऊ घातला तर फराळाची मजा अधिकच वाढते.

दिवाळी अनोखे पदार्थ

अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com

रुचकर-शॉपिंग विशेष

दिवाळीच्या फराळासाठी सगळीकडे तेच तेच पारंपरिक पदार्थ खावे लागतात. आलेल्या पाहुण्यांना जर त्याबरोबरच एखादा वेगळा पदार्थ खाऊ घातला तर फराळाची मजा अधिकच वाढते. फराळाबरोबर देता येण्यासारखे काही पदार्थ.

मूग डाळ गुजिया

मूग डाळ – अर्धा कप (४ ते ५ तास भिजवून गाळून घ्या आणि कोरडी करून घ्या.

खवा – अर्धा कप (थोडासा परतून घ्या)

पिठीसाखर – १ कप

वेलची पावडर- १ चमचा

बदाम काप – २ टेबलस्पून

पिस्ता काप – १ चमचा सजावटीसाठी

मूग डाळ १ टेबलस्पून तुपावर परतून वाफ आणून शिजवून घ्या. त्यामधे मावा, पिठीसाखर, वेलची पावडर, बदामाचे काप एकत्र करून बाजूला ठेवा.

मैदा – २ कप

साजूक तूप  – पाव कप

पाणी – गरजेप्रमाणे

साजूक तूप – तळण्यासाठी

पाव कप तूप मद्यात चांगले एकत्र करा. पाण्यात भिजवा. अर्धा तास तसेच ठेवा.

साखर – १ कप

पाणी – १ कप

पाणी-साखर एकत्र उकळा आणि एकतारी पाक तयार करा.

सारणाचे सारखे भाग करून ओव्हल शेप द्या. आवरणाचेही भाग करा. आवरणाची जाड पुरी लाटा. पुरीच्या अध्र्या भागावर सारणाचा ओव्हल शेप गोळा ठेवा. दुसरी बाजू त्यावर दुमडून दोन्ही बाजू पाण्याचा हात लावून बंद करा. कातणीने काता किंवा नाजूक मुरड घाला. अशा प्रकारे सर्व गुजिया तयार करून घ्या.

कढईत तूप घालून मध्यम गॅसवर गरम करा. त्यामधे गुजिया दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्या. पेपरवर काढा. तळलेल्या गुजिया साखरेच्या एकतारी पाकात बुडवून ठेवा. दुसरा घाणा तळेपर्यंत पहिला घाणा बुडवून ठेवा. मग पाकातून काढून प्लेटमधे घालून कोरडय़ा हाऊ द्या. प्लेटमध्ये गुजिया ठेवून पिस्त्याच्या कापाने सजवा आणि सव्‍‌र्ह करा.

खिमा बेक

चिकन खिमा- अर्धा किलो स्वच्छ धुवून घ्यावा.

आलं-लसूण-मिरची-कोिथबीर वाटण – १ टेबलस्पून (आलं –      १ इंच, लसूण – ७ ते ८ पाकळ्या, मिरची – २, कोिथबीर – थोडी)

हळद – अर्धा चमचा      ८ तिखट – अर्धा चमचा

चिकन मसाला – २ चमचे ८ गरम मसाला – १ चमचा

अंडी – ४ फोडून घेणे

बटाटे – ३ उकडून सोलून पातळ काप केलेले.

मीठ – चवीप्रमाणे

मिरी पावडर- अर्धा चमचा अंडय़ासाठी

मिरी पावडर- अर्धा चमचा वेगळी

कोिथबीर – पाव वाटी

कांदा – २ बारीक चिरलेले  ८ तेल – पाव वाटी

प्रथम चिकन खिम्याला हळद, मीठ, तिखट, चिकन मसाला, गरम मसाला आणि वाटण लावून अर्धा तास ठेवा.

पॅनमधे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. चांगला परता, त्यावर खिमा घालून परता. खिम्याला पाणी सुटेल ते आटवा. वरती झाकण ठेवून त्यामधे पाणी घाला. खिमा शिजवून कोरडा करून घ्या. वर कोिथबीर घाला.

अंडय़ामधे मीठ आणि मिरपूड घालून फेटून घ्या.

बेकिंग पॅनला तेलाने ग्रीजिंग करा. त्यात प्रथम खाली उकडलेल्या बटाटय़ांचा थर लावा. त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड भुरभुरवा. त्यावर खिमा घाला, त्यावर फेटलेली निम्मी अंडी घाला. त्यावर परत उकडलेल्या बटाटय़ाचा थर लावा, त्यावर थोडं मीठ आणि मिरपूड भुरभुरवा. वर खिमा घालून परत त्यावर उरलेली अंडी घाला आणि १८० अंश सेल्सिअसला अंडी वरून ब्राऊन होईपर्यंत बेक करा नंतर त्याच्या वडय़ा पाडा.

खिमा बेक टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी, कांद्याची िरग, िलबाबरोबर सव्‍‌र्ह करा.

टीप : चिकन खिम्याऐवजी मटण खिमा वापरला तरी हरकत नाही. अशा वेळी फक्त चिकन मसाल्याऐवजी मटण मसाला वापरा.

छोले टिक्की चाट

काबुली चणे – १ वाटी (रात्रभर भिजवून मीठ घालून शिजवून घेणे)

उकडलेले बटाटे – २ कुस्करलेले

आलं – अर्धा इंच

मिरच्या – २ ते ३

लसूण पाळ्या – ४ ते ५

(आलं, मिरच्या आणि लसूण ठेचून घेणे)

छोले मसाला – २ चमचे

आमचूर पावडर- अर्धा चमचा

कोिथबीर – पाव वाटी बारीक चिरलेली

मीठ – चवीप्रमाणे

ब्रेड क्रम्ब्स – अर्धी वाटी

कॉर्न फ्लोर – १ टेबलस्पून

गोड दही – २ वाटय़ा     ८ गोड चटणी – अर्धी वाटी

पुदिना चटणी – अर्धी वाटी ८ बारीक शेव – अर्धी वाटी

डािळबाचे दाणे – अर्धी वाटी      ८ चाट मसाला – अर्धा चमचा

काबुली चणे जाडसर वाटा. त्यात कुस्करलेला उकडलेला बटाटा, आलं, लसूण, मिरची ठेचा, छोले मसाला, आमचूर पावडर, मीठ आणि कोिथबीर एकत्र करा आणि त्याची मोठी टिक्की बनवा.

ब्रेड क्रम्स आणि कॉर्न फ्लोर एकत्र करून त्यामध्ये टिक्की घोळवा आणि तेलामधे श्ॉलोफ्राय करा.

सìव्हग प्लेटमधे टिक्की ठेवून तिचे चार तुकडे करा. त्यावर गोड दही, गोड चटणी आणि पुदिना चटणी घाला. वर चाट मसाला, डािळबाचे दाणे, बारीक शेव आणि कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

रस्सम वडे

तूर डाळ – पाव वाटी (भिजवून नीट शिजवून घ्या)

हिरवी मिरची – २ ते ३ उभ्या चिरलेल्या

टोमॅटो – २ बिया काढून एकदम बारीक चिरलेला

रस्सम पावडर- २ टेबलस्पून

कढीपत्ता – २ ते ४ काडय़ा

चिंचेचा कोळ- पाव वाटी

मीठ – चवीप्रमाणे

पाणी – ४ वाटय़ा किंवा जरुरीप्रमाणे

कोिथबीर काडय़ा – ७ ते ८

३ वाटय़ा पाण्यात चिंचेचा कोळ, मीठ, हिरवी मिरची, रस्सम मसाला आणि कढीपत्ता घालून १० मिनिटं उकळत ठेवा. नंतर त्यामध्ये गाळ शिजलेली तूर डाळ घाला. गरज असल्यास १ कप पाणी घाला. कोिथबिरीच्या काडय़ा घालून परत १० मिनिटे उकळत ठेवा. रस्सम तयार झाला. पण त्याला फोडणी द्यायची आहे.

तेल – १ टेबलस्पून      ८ मोहरी – अर्धा चमचा   ८ हळद – अर्धा चमचा

लाल सुकी मिरची – ३ ते ४ बिया काढून

कढीपत्ता – ५ ते ६ पानं

तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, लाल मिरची, कढीपत्ता घालून फोडणी द्या आणि परत उकळा.

उडीद डाळ -२ वाटी -६ ते ७ तास भिजवून बारीक वाटणे.

आलं – मिरची – २ चमचे ठेचलेलं

मीठ – चवीप्रमाणे ८ तेल – तळण्यासाठी

सर्व एकत्र करून वडे तळून घ्या.  गरम गरम रस्सम वडय़ाबरोबर सव्‍‌र्ह करा. आवडत असल्यास चटणीही सव्‍‌र्ह करा.

सफरचंद -रताळं क्र म्बल

रताळं- २५०  ग्रॅम (१ सें.मी. क्यूब)

सफरचंद – २ सालं काढून साधारण २ सें. मी. क्यूब)

िलबू – १ झेस्ट आणि रस

अक्रोड – ९० ग्रॅम बारीक तुकडे केलेले

बदाम – ९० ग्रॅम बारीक चिरलेले   ८ मध – १ टेबलस्पून

ओट्स रोल्ड- ६० ग्रॅम    ८ व्हॅनिला इसेन्स – १ टेबलस्पून

दालचिनी पावडर- १ चमचा       ८ ऑलिव्ह ऑइल – १ चमचा

रताळं मिक्स : रताळं, सफरचंद, िलबाचे झेस्ट, रस आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून वरती झाकण ठेवून हाय हीटवर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ८ मिनिटे ठेवा. बाहेर काढून थंड होऊ द्या.

ओव्हन २०० डिग्री से.ला गरम करत ठेवा.

एका मध्यम आकाराच्या भांडय़ामधे अक्रोड, बदाम, मध, ऑलिव्ह ऑइल आणि ओट्स घालून नीट एकत्र करा.

एका बेकिंग डिशमधे रताळ्याचे मिश्रण घाला आणि नीट पसरा. नंतर त्यावर क्रम्बल मिक्स घाला आणि साधारण २० मिनिटे किंवा वरचा थर सोनेरी होईपर्यंत बेक करा. व्हॅनिला आइस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करा.

मूग डाळ कचोरी

मूग डाळ – १ वाटी २ तास पाण्यात भिजवून पाणी काढून जाडसर वाटा

धणे पावडर- १ चमचा    ८ कोिथबीर – अर्धी वाटी बारीक चिरलेली

हिरवी मिरची – २ ते ३ ठेचलेल्या

बडिशेप पावडर- १ चमचा  ८ तिखट – अर्धा चमचा

आलं – १ इंच बारीक किसलेलं

गरम मसाला – अर्धा चमचा      ८ जिरे – अर्धा चमचा

िहग – १ चिमूट ८ मीठ – चवीप्रमाणे

कढईत तेल गरम करा. त्यात जिरे िहग घाला. त्यावर ठेचून बारीक केलेली मिरची आणि आलं घाला, लगेच त्यावर धणे पावडर व बडिशेप पावडर घालून परता (सतत परतत राहा). त्यावर हळद घाला, त्यावर जाडसर वाटलेली डाळ घालून परता. त्यावर मीठ, गरम मसाला, हळद, तिखट आणि आमचूर पावडर घालून परतत राहा. डाळ सुकी होऊन खरपूस होईपर्यंत परता. एका प्लेटमध्ये काढून थंड करा. वरून बारीक चिरलेली कोिथबीर घालून नीट एकत्र करा. सारणाचे सारखे १२ भाग करा.

मैदा – २ कप   ८ तेल – पाव कप       ८ मीठ – अर्धा चमचा

सर्व साहित्य एका मोठय़ा बोलमधे नीट मिसळून घ्या. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हलकेच मळून घ्या. जास्त मळू नका. हा मळलेला गोळा एका ओल्या रुमालाखाली झाकून ठेवा.

वापरते वेळी मळलेल्या मद्याचेही १२ भाग करा.

मैद्याचा प्रत्येक भाग गोल करून, लाटून त्याची वाटी करा. त्यामध्ये मूग डाळीचे सारण भरून वाटी हळू हळू बंद करा. सर्व कचोऱ्या अशा प्रकारे करून ठेवा. कचोऱ्या दोन्ही हाताने हलके दाबा.

कढईमध्ये तेल गरम करा. कचोरी तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर ठेवा. कढईत २ ते ३ कचोऱ्या घाला. तेलात कचोरी वर आल्यावर ती उलटवा. सोनेरी रंगावर तळून घ्या. कचोरी पेपर नॅपकीनवर काढून घ्या.

इतर : तेल – तळण्यासाठी

पुदिना चटणी, गोड चटणी आणि बारीक शेव सìव्हगसाठी

कचोरी प्लेटमधे ठेवून मधे फोडा. पुदिना चटणी, गोड चटणी आणि आवडत असल्यास शेव घालून सव्‍‌र्ह करा.

टीप : आवडत असल्यास गोड दही घाला.

व्हेज कटलेट

बटाटे – २ उकडून कुस्करलेले

फरसबी – अर्धी वाटी बारीक चिरलेली

फ्लॉवर- अर्धी वाटी बारीक चिरलेला

गाजर – पाव कप बारीक चिरलेलं

मटार- अर्धा कप

कांदा – १ बारीक चिरलेला

तेल – अर्धी वाटी + पाव वाटी

ब्रेडक्रम्ब्स-१ वाटी

कॉर्नफ्लोर- १ टेबलस्पून

चाट मसाला – १ चमचा

मीठ – चवीप्रमाणे

वाटण -(१ इंच आलं + चार ते पाच हिरव्या मिरच्या + चार ते पाच पाकळ्या लसूण) क्रश करून.

कोिथबीर – अर्धी वाटी बारीक चिरलेली

पॅनमध्ये पाव वाटी तेल घाला. त्यावर थोडासा िहग घालून लगेच त्यावर कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाल्यावर वाटण घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यावर बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घालून परता. मीठ घालून झाकण ठेवून वाफ आणा. भाज्या जराशा कच्च्यावर ठेवा. गार झाल्यावर त्यामध्ये चाट मसाला, कोिथबीर घालून नीट एकत्र करा. नंतर उकडून कुस्करलेला बटाटा एकत्र करा आणि हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा.

ब्रेडक्रम्ब्स आणि कॉर्नफ्लोर एकत्र करून त्यामध्ये कटलेट घोळून पॅनमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून श्ॉलोफ्राय करा.

टोमॅटो सॉसबरोबर गरम गरम सव्‍‌र्ह करा.

ओट-मूग डाळ दहीवडा

मूग डाळ – १ वाटी ५ ते ६ तास भिजवून बारीक वाटलेली

ओट- १ ते दीड वाटी भाजून पावडर करणे.

आलं – १ इंच

हिरवी मिरची – २ ते ३ (आलं-मिरची ठेचून)

मीठ – चवीप्रमाणे

तेल – तळण्यासाठी

घट्ट दही – अर्धा किलो

खजुराची चटणी – पाव वाटी

चाट मसाला – १ चमचा

जिरेपूड- १ चमचा

तिखट – १ चमचा

फ्रुटसॉल्ट- पाव चमचा

साखर – आवडीप्रमाणे

प्रथम मुगाची वाटलेली डाळ, ओट्सची पावडर, आलं-मिरची,  मीठ एकत्र करून घ्या. थोडे पाणी लागेल तसे घाला.

फ्रुटसॉल्ट घालून नीट एकत्र करा. कढईत तेल गरम करून त्यात वरील पिठाचे वडे तळून घ्या.

एका भांडय़ात उकळलेलं पाणी घ्या. त्यात हे तळलेले वडे टाका आणि झाकण ठेवा. साधारण ३० मिनिटांनी वडे खाली बसतील. नंतर हलक्या हाताने दाबून वडय़ातील पाणी काढून एका मोठय़ा बोलमध्ये ठेवा.

दही घुसळून त्यात मीठ व साखर घालून थंड करा. आता आपल्याला हवे तेवढे वडे (२ ते ४) एका बोलमधे ठेवा. त्यावर गोड दही, खजुराची चटणी, चाट मसाला, जिरे पावडर घाला. वरून लाल तिखट भुरभुरवा आणि थंड दहीवडा सव्‍‌र्ह करा. आवडत असल्यास वर थोडी शेव घाला.

कॉर्नअरांसिनि

तयार स्वीटकॉर्न सूप – १ डबा (४०० ग्रॅम)

मैदा – १ कप

मेयोनीज-सìव्हगसाठी

बासमती तांदूळ – ४५० ग्रॅम शिजवलेला

चीज – २ कप किसलेलं

कोिथबीर – १ लहान जुडी बारीक चिरलेली

मोझरेला चीज – ११० ग्रॅम साधारण अर्धा सें.मी.चे २४ क्यूब

अंडी – २ फेटलेली

ब्रेड क्रम्ब्स- दीड कप

िलबू – फोडी केलेले

एका मायक्रोवेव्ह सेफ भांडय़ामध्ये भात काढून घ्या. त्यामध्ये स्वीटकॉर्न सूप घालून नीट एकत्र करा. ३ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, गरम असताना त्यामध्ये चीज घालून ते वितळेपर्यंत ढवळत राहा. निम्मी कोिथबीर घालून नीट एकत्र करून थंड करा.

झाकण ठेवून साधारण १ ते २ तास फ्रिजमध्ये ठेवा. िलबाएवढा गोळा बनवून त्यामध्ये मोझरेला क्यूब ठेवून नीट बंद करा. मद्यामध्ये घोळून अंडय़ात बुडवून काढा. ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळून तेलामध्ये डीप फ्राय करा. अशा प्रकारे उरलेल्या सर्व भाताचे गोळे बनवून तळून घ्या.

कागदाच्या रुमालावर ठेवून तेल काढून घ्या. वर थोडं मीठ घालून कोिथबीर भुरभुरवा. मेयोनीज आणि िलबाच्या फोडींबरोबर सव्‍‌र्ह करा.

टीप : कॉर्नऐवजी दुसऱ्या कोणत्याही भाजीचे सूप वापरण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ – मशरूम सूप वगरे.

सिंपल चीज केक

अननस – १ डबा (टिनमधला) अननसाचे तुकडे रसामधून काढून रस वेगळा ठेवून द्या.

साखर – १ कप ८ ब्राऊन साखर – १ कप

व्हॅनिला इसेन्स- १ टेबलस्पून

लोणी – १२५ ग्रॅम वितळवलेले

लोणी -ग्रीसिंगसाठी वेगळे

चॉकलेट बिस्किट- २५० ग्रॅम

क्रीम चीज ७५० ग्रॅम थंड

अंडी – ३ ८ नारळाचं घट्ट दूध – ४४० मि.लि.

किसलेलं सुकं खोबरं (डेसिकेटेड कोकोनट) – १ कप

ओव्हन १४० डिग्री से.ला गरम करत ठेवा. बिस्किट आणि लोणी मिक्सरमध्ये घालून बारीक करा. बेकिंग ट्रे ग्रीसिंग करून हे मिश्रण घालून नीट पसरा.

क्रीम चीज आणि साखर एका भांडय़ात घेऊन साखर पूर्ण विरघळेपर्यंत बीट करा (साधारण ५ मिनिटे). नंतर एक एक अंडं फोडून घाला. नारळाचं दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून नीट एकत्र करा. नंतर त्यामध्ये अध्रे अननसाचे तुकडे घालून बेकिंग ट्रेमध्ये हे मिश्रण घालून १४० डिग्री से.ला साधरण ५० मिनिटे बेक करा. नंतर ओव्हन बंद करून दार उघडे ठेवून गार होऊ द्या. हा केक फ्रिजमध्ये ठेवा.

एका पॅनमध्ये उरलेला अननस घेऊन त्यामध्ये ब्राऊन शुगर घालून मंद आंचेवर पाणी आटेपर्यंत गरम करा. त्यामध्ये पाव कप काढून ठेवलेला अननसाचा रस घालून १-२ मिनिटे शिजवा. फ्रिजमधून केक काढून वर हे मिश्रण तसंच सुकं खोबरं आणि उरलेला अननसाचा रस घाला.

फिश कटलेट

पापलेट, सुरमई किंवा रावस- १ आख्खा मासा ८ उकडलेले बटाटे -३

अंडं- १ ८ िलबाचा रस- अर्धा िलबू   ८ कोिथबीर – अर्धी वाटी बारीक चिरलेली

पुदिना – अर्धी वाटी बारीक चिरलेला ८ ब्रेड क्रम्ब्स- १ वाटी

कॉर्न फ्लोर- १ टेबलस्पून  ८ मिरपूड -१/४ चमचा

मीठ – चवीप्रमाणे ८ तेल – श्ॉलो फ्रायसाठी

आलं – १ इंच   ८ लसूण- ४ ते ५ पाकळ्या

हिरव्या मिरच्या- २      ८ कोिथबीर -अंदाजे

वाटणाचे वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट वाटून घ्या.

आलं -१  इंच   ८ हिरव्या मिरच्या- ४ ते ५

आलं आणि मिरच्या नीट बारीक करून घ्या.

मासा नीट धुवून त्याला चिरे पाडून घ्या. त्याला माशासाठी केलेलं र्अध वाटण, मीठ आणि िलबाचा रस नीट लावा. सर्व चिरांमधे हे वाटण नीट भरा. अर्धा तास नीट मुरण्यासाठी ठेवून द्या.

नंतर मासा वाफवून त्यातील काटा नीट काढून घ्या. त्याचे बारीक तुकडे करा. त्यामध्ये उरलेलं वाटण नीट एकत्र करा.

बटाटे नीट कुस्करून त्यामध्ये बटाटय़ासाठीचं वाटण, कोिथबीर, पुदिना नीट एकत्र करा. त्यामधे वरील फिशचे तुकडे एकत्र करून त्याचे कटलेट तयार करा.

अंडं नीट फेटून त्यामधे मीठ आणि मिरपूड घाला. ब्रेडक्रम्ब्स आणि कॉर्नफ्लोर नीट एकत्र करा.

तयार केलेलं कटलेट अंडय़ात बुडवून ब्रेडक्रम्ब्समधे घोळून पॅनमध्ये तेलावर श्ॉलोफ्राय करा.

गरमगरम फिश कटलेट सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:05 am

Web Title: food beyond diwali faral
Next Stories
1 दिवाळीसाठी खास चविष्ट पदार्थ
2 पाहुणे येता घरा…
3 वेष्टनात दडलेला आनंद
Just Now!
X