06 March 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : नवा नवा मोबाइल हवा…

मोबाइलच्या खरेदीसाठी अनेकजण दिवाळीचा मुहूर्त गाठतात.

मोबाइलच्या खरेदीसाठी अनेकजण दिवाळीचा मुहूर्त गाठतात. दिवाळीत नवनवीन येणारे फोन हे त्यामागचं कारण. यंदाही ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता येईल असे काही मोबाइल बाजारात येत आहेत.

दसरा-दिवाळी म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. इतर खरेदीसोबतच हल्ली सर्वात महत्त्वाची खरेदी म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची खरेदी. जुना झालेला मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप बदलण्यासाठी उत्तम असा मुहूर्त म्हणजे दसरा-दिवाळी. सध्या ऑनलाइनपासून ते गल्लीतल्या छोटय़ात छोटय़ा दुकानातही वेगवेगळ्या ऑफर्सची रेलचेल आहे. त्यानिमित्याने विविध रेंजमधील उत्तम मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या खरेदीसाठीच्या या काही टिप्स.

दिवाळी खरेदीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फोनची खरेदी. या दिवाळीत बदलूनच टाकू असं म्हणत वर्षभर धकवलेला मोबाइल बदलायचा असेल तर त्यासाठी सध्या बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यातसुद्धा चायनीज फोन्सनी सध्या मोबाइल बाजारपेठ काबीज केलेली दिसतेय. मोबाइल खरेदी करण्याआधी आपण काही गोष्टी सुनिश्चित करू.

अगदी ५ हजारांपासून ते ८० हजारांपर्यंतचे फोन्स बाजारात उपलब्ध आहेत; परंतु वर्षभरात आपण आता खरेदी केलेला फोन जुना होत असतो, त्यामुळे वर्षभरासाठी आपण किती इन्व्हेस्ट करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

आपली गरज ओळखायला हवी. म्हणजे स्मार्टफोनच्या जमान्यात फक्त कॉल घेण्यासाठी आणि मेसेज पाहण्यासाठी लोक फोन घेतील हे चित्र तसं कमीच पाहायला मिळतं. आपल्याला फोटोग्राफीची आवड असेल तर उत्तम कॅमेरा क्वालिटी असणारे फोन घ्यावेत. यात बऱ्याचदा नवीन आलेल्या झेन, असूस कंपन्या मागे पडताना दिसतात. गेम खेळण्यासाठी मोबाइल हवा असेल तर उत्तम प्रोसेसर, चांगला रॅम, ग्राफिक्स आणि डिस्प्ले क्वालिटी चांगली असेल याची खात्री करून घ्यावी. शिवाय मोठे गेम स्टोअर करण्यासाठी चांगली मेमरीदेखील तितकीच आवश्यक ठरते. काहींना वाचण्यासाठी मोबाइलची गरज भासत असेल तर मोठा स्क्रीन असणारा मोबाइल आपल्याला सोयीचा ठरू शकतो. अन्यथा चांगले लेटेस्ट अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जन आणि साधारण रॅम, प्रोसेसर, उत्तम इंटर्नल मेमरी या बाबी पाहाव्यात. आपल्या बजेटच्या रेंजमध्ये उपलब्ध असणाऱ्या मोबाइल्सपैकी काही पर्याय पुढीलप्रमाणे-

१० हजारांपर्यंत-

शाओमी रेडमी नोट ३ (कअडटक फएऊटक ठडळए- 3)

का घ्यावा :  ५.५ इंच मोठी स्क्रीन, १६ आणि ५ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा असणाऱ्या या फोनची कॅमेरा क्वालिटी उत्तम आहे. इंटर्नल मेमरीसुद्धा चांगली आहे. २ आणि ३ जीबी रॅम या फोनला उत्तम बनवितो. क्वाड कोअर १.४ गीगाहर्ट्झचा प्रोसेसर या फोनचे वैशिष्टय़ आहे. अवघ्या दहा हजारांत इतक्या उत्तम सुविधा देणारा हा फोन आहे.

का टाळावा : अ‍ॅण्ड्रॉइड ५.१ व्हर्जन ही फक्त याची दुखरी बाजू ठरू शकते. शहरात सहज उपलब्ध होणारी सव्‍‌र्हिस महाराष्ट्रात सर्वदूर उपलब्ध असेल याची शाश्वती फार कमी आहे. त्यामुळे हा किंवा कोणत्याही नवीन कंपनीचा म्हणजेच असूस, लिनोव्हो, शाओमी हे खरेदी करताना सव्‍‌र्हिस कशी व कुठे उपलब्ध हे याची जरूर चौकशी करावी.

रेडमी ३ एस प्राइम (फएऊटक 3र ढफकटए)

का घ्यावा : रेडमीचा ९ हजारांपर्यंत असणारा हा मोबाइल ५ इंच स्क्रीन १३ आणि ५ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा आहे. उत्तम इंटर्नल मेमरी आणि ३ जीबी रॅम या फोनला उत्तम बनवतो. क्वाड कोअर १.४ गीगाहर्ट्झचा प्रोसेसर या फोनचे वैशिष्टय़ ठरतो. शिवाय ४१०० एमएएचची बॅटरी उत्तम असा बॅकअप देते. इतर मोबाइल्सच्या तुलनेत उत्तम बाब म्हणजे या बजेट रेंजमध्ये इतक्या सुविधांसह अ‍ॅण्ड्रॉइड ६ हे लेटेस्ट व्हर्जन देणारा हा मोबाइल उत्तम आहे.

का टाळावा : सव्‍‌र्हिस मोठय़ा शहरांत उपलब्ध असली तरी लहान शहरांत ती सहज उपलब्ध होत नाही. कॅमेरा क्वालिटी ठीकठाक अशी आहे. लो लाइट इमेज जरा अपेक्षाभंग करतात.

मोटो जी – ४ प्ले

का घ्यावा : मोटोरोला कंपनी ही मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांतली सर्वात जुनी कंपनी आहे आणि गेल्या २ वर्षांत १०-१५ हजारांत उत्तम असे फोन या कंपनीने बाजारात आणले आहेत. त्याच धर्तीवर असलेला हा त्यांचा फोन म्हणजे मोटो ४जी प्ले. अ‍ॅण्ड्रॉइड ६ व्हर्जनवर चालणारा हा मोबाइल स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोअर प्रोसेसरसह उपलब्ध आहे.

का टाळावा : २८०० एमएएच इतक्या बॅटरीसह उपलब्ध असणारा हा मोबाइल बॅटरी आणि कॅमेराच्या बाबतीत इतर मोबाइलच्या तुलनेत मागे राहतो.

सॅमसंग गॅलेक्सी ऑन-५ प्रो

का घ्यावा : चायनीज मोबाइलचे बाजारात सध्या वर्चस्व असले तरी सॅमसंगसारख्या विश्वासू आणि ब्रॅण्डचे मोबाइल खरेदी करणे अनेक ग्राहक पसंत करतात. या रेंजमध्ये सॅमसंगच्या जे-२ सीरीजमधील फोनदेखील मोडतात; परंतु हा फोन त्याहून काही बाबतीत जरा सरस वाटतो. त्यामुळे उत्तम ब्रॅण्ड आणि उत्तम सेवेची हमी हवी असल्यास या रेंजमध्ये ऑन- ५ प्रो उत्तम पर्याय ठरू शकतो. क्वाड कोअर १.३ गीगाहर्ट्झ प्रोसेसर अनुक्रमे ८ आणि ५ मेगा पिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा २ जीबी रॅमसह उपलब्ध होतो.

का टाळावा : २८०० एमएएचची बॅटरी ही काळजी ठरू शकते आणि यूजेबल मेमरी (प्रत्यक्ष वापरता येणारी मेमरी) कालांतराने घटत जाते. त्यामुळे ८ जीबी इंटर्नल मेमरी असूनही फक्त काही जीबी आपल्याला वापरता येतात. त्यामुळे कालांतराने अनेक अपडेट्स आल्यानंतर फार अ‍ॅप्लिकेशन्स स्टोअर करता येत नाहीत. १० हजारांच्या रेंजमध्ये असूस आणि झेन या कंपन्यांचे फोनही साधारण या रेंजमध्ये आहेत. नवीन आलेली ली एको ली कंपनीदेखील या रेंजमध्ये उत्तम फोन सादर करते. परंतु नवीन कंपन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल आणि सव्‍‌र्हिसबद्दल आत्ता सांगणे कठीण होईल. म्हणून हे वर वापरून पाहिलेले भरवसा करता येईल असे काही निवडक चांगले फोन्स देत आहे.

१५ हजारांपर्यंत :

शाओमी मी मॅक्स

का घ्यावा : स्नॅपड्रॅगन ६५० क्वाड कोअर १.५ गीगाहर्ट्झ डय़ुअल कोअर प्रोसेसर हे या मोबाइलचे मोठे वैशिष्टय़ आहे. याशिवाय उत्तम ग्राफिक्ससाठी ग्राफिक प्रोसेसिंग युनिटही या फोनमध्ये आहे. यामुळे ग्राफिक्स आणि गेम्स अतिशय उपयुक्त रीतीने चालविता येतील. यासाठी ४८५० मिली एएचची बॅटरी पुरू शकते. १६ आणि ५ मेगापिक्सेल कॅमेरा चांगली कॅमेरा क्वालिटी पुरवितात.

का टाळावा : खूप मोठी ६.४४ इंच स्क्रीनमुळे हा मोबाइल आकाराने बराच मोठा ठरतो आणि शाओमीचा फोन असल्यामुळे याची सव्‍‌र्हिस कशी आणि कितपत असेल, याबाबतही शंका व्यक्त केली जाऊ शकते.

मोटो एक्स प्ले

का घ्यावा : ५.५ इंच आयपीएस डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६१५ क्वाड कोअर १.७ गीगाहर्ट्झ प्रोसेसर, अ‍ॅड्रीनो ४०५ ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, अनुक्रमे २१ आणि ५ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा हे याचे वैशिष्टय़ ठरू शकते.

का टाळावा : याची ३६३० एमएएचची बॅटरी वरकरणी पुरेशी वाटत असली तरी चांगले गेम्स खेळताना कमी पडू शकते. शिवाय या फोनचा चार्जिग टाइमही अधिक आहे, म्हणजेच मोबाइलला पूर्ण चार्ज करण्यासाठी बराच वेळ लागतो.

सॅमसंग गॅलेक्सी जे सेव्हन (२०१६)

का घ्यावा : सॅमसंग हा जुना व उत्तम ब्रॅण्ड असल्यामुळे सव्‍‌र्हिस उत्तम उपलब्ध होते १.६ गीगाहर्ट्झ ऑक्टा कोअर प्रोसेसर पुरविण्यात आलेला आहे. ५.५ इंच स्क्रीन आणि सिंगल सिम मोबाइल या रेंजमध्ये उपलब्ध आहे. १३ मेगापिक्सेल बॅक आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा व त्यांची इमेज क्वालिटीही उत्तम आहे.

माली चा टी ८३० ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट या मोबाइलसाठी पुरवण्यात आलेला आहे.

का टाळावा : याची बॅटरी फार काळ तग धरू शकत नाही. ग्राफिक प्रोसेसिंग युनिट असला तरी याचे स्क्रीन रेझोल्युशन फार चांगले नाही. शिवाय अ‍ॅण्ड्रॉइडचे ५.१ व्हर्जन यात पुरविण्यात आले आहे, जे लवकरच अण्ड्रॉइड ६ ला अपडेट होईल.

या बजेटमध्येही या तीन मोबाइलपेक्षाही अनेक नवीन मोबाइल उपलब्ध आहेत, उदा. लिनोव्हो झ्यूक झेड १, असूस झेनफोन २ हे पर्याय उपलब्ध आहेत. स्नॅपड्रॅगन ८०१ क ६५२, ६५०, ६१७ हे काही उत्तम प्रोसेसर सध्या बाजारात आहेत. कमीत कमी अ‍ॅण्ड्रॉइड ५ आणि २ जीबी आणि त्यापुढे रॅम आणि १०८० पिक्सेल रेझोल्युशन असणे अपेक्षित आहे. अशा सुविधा देणारा आपल्या बजेटमध्ये बसणारा, चांगली सव्‍‌र्हिस देऊ शकणाऱ्या कंपनीचा फोन निवडण्यास हरकत नाही.

२० हजारांपर्यंत :

लिनोव्हो व्हाइब एक्स ३

का घ्यावा : ५.५ इंच आयपीएस डिस्प्ले, ३ जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन ८०८-१.४ गीगाहर्ट्झ प्रोसेसर, अनुक्रमे २१ आणि ८ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा यामुळे मोबाइल उत्तम ठरतो.

का टाळावा : अ‍ॅण्ड्रॉइडचे ५.१ व्हर्जन यात आहे, जे ६ होणे भविष्यकाळात अपेक्षित आहे. याची बॅटरी क्षमता ३८०० एमएएचची आहे. यात पुन्हा स्लो चार्जिगचा प्रश्न उद्भवतो.

वन प्लस टू

का घ्यावा : ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर या फोनमध्ये पुरविण्यात आलेला आहे. उत्तम ग्राफिक्ससाठी ५.५ इंच उत्तम रेझोल्युशन असणारी स्क्रीन आणि अ‍ॅड्रिनो ४३० ग्राफिक प्रोसेसर यामध्ये पुरविण्यात आलेला आहे. १३ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सेल अनुक्रमे बॅक आणि फ्रंट कॅमेरा या मोबाइलमध्ये पुरविण्यात आलेले आहेत, ज्याची कॅमेरा क्वालिटी ठीकठाक आहे.

का टाळावा : नॉनएक्स्पाण्डेबल मेमरी ही वन प्लस टू ची सर्वात वाईट बाब आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे प्राइम

का घ्यावा : लेटेस्ट अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जन ६ सह येणारा हा फोन सॅमसंग कंपनीचा असल्यामुळे यासोबत त्यांची उत्तम सव्‍‌र्हिस ही जमेची बाजू आहे. ऑक्टा कोअर १.६ गीगाहर्ट्झ प्रोसेसर, ३ जीबी रॅम, १३ आणि ८ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.

का टाळावा : याची इंटर्नल मेमरी ही कालांतराने डोकेदुखी ठरते. कारण उपलब्ध मेमरी आणि वापरायला मिळणारी मेमरी यामध्ये फरक असतो, ज्यामुळे कालांतराने आपण फार अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकत नाही. २० हजारांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या मोबाइल्समध्येही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु साधारणत: एचडी डिस्प्ले, या रेंजमधील फोनमध्ये स्नॅपड्रॅगन-८ सीरीजमधले प्रोसेसर असणे अपेक्षित आहे. शिवाय ३-४ जीबी रॅम, बॅटरी किमान २८०० एमएएचची असावी, किमान अ‍ॅण्ड्रॉइड ५.० असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोन ४जी असावा. या सुविधा उपलब्ध करून देणारा योग्य फोन घेण्यास हरकत नाही.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:08 am

Web Title: food recipe diwali 2016 buying new mobile phone
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : ट्रेण्डी टिक टिक!
2 रुचकर – शॉपिंग विशेष : प्रीती परी पर्सवरी!
3 रुचकर – शॉपिंग विशेष : चपलांची चंमत गं…
Just Now!
X