07 March 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : चिपुटले चकली

एका कढईत तांदूळ, चनाडाळ, उडीदडाळ, मूगडाळ, साबुदाणा, धने हे सर्व साहित्य मंद गॅसवर परतून भाजून घ्यावे...

चिपुटले चकली

साहित्य:

१/२ किलो तांदूळ,      २ वाटी चनाडाळ,

१ वाटी उडीद डाळ,      १ वाटी मूगडाळ,

अर्धी वाटी धने, १/२ वाटी साबुदाणा,

३ ते ४ चमचे जिरे,     २ चमचे साखर,

मीठ चवीनुसार.

३ ते ४ चमचे लाल मिरचीचे फ्लेक्स्,

कृती:

एका कढईत तांदूळ, चनाडाळ, उडीदडाळ, मूगडाळ, साबुदाणा, धने हे सर्व साहित्य मंद गॅसवर परतून भाजून घ्यावे हे सर्व मिश्रण एकत्र दळून घ्यावे. ह्य मिश्रणात चिपुटले चिली किंवा मिरचीचा फ्लेक्स, जिरे, मीठ टाकून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे. पण जास्त घट्ट नसावे. चकल्याच्या साच्यामध्ये लावून थोडी कणीक टाकून चकल्या पाडाव्यात. कढईत तेल टाकून ह्य चकल्या लालसर होईपर्यंत तळून घ्याव्यात.

बनाना पिस्ता रोल

साहित्य:

२५० ग्रॅम मैदा, १/२ चमचा वेलची पावडर,

१/२ टेबल स्पून बेकिंग पावडर,    १२५ मी. लि. पाणी,

१०० ग्रॅम बटर, १/२ कप बनाना प्युरे,

१/२ वाटी पिस्ता (बारीक केलेले), तेल फ्राय करण्यासाठी;

शुगर सिरपसाठी- २०० ग्रॅम साखर,       १०० मि. लि. पाणी,

१/२ काडी दालचिनी,     २० मि. लि. रोजसिरप,

कृती:

एका भांडय़ात मैदा, वेलची पावडर, बेकिंग पावडर व बटर घेऊन त्यात थंड पाणी टाकून एकत्र त्याची कणीक बनवून घ्यावी. हे मळलेले पीठ एक दिवस फ्रीजमध्ये ठेवावे. कणकीचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटावे. पुरीला बटर लावून मधोमध थोडासा बनाना प्युरे व बारीक केलेला पिस्ता टाकावा, त्यावर बटर लावावे.

दुसरी पुरी ठेवून सर्व कडा दाबून त्याच्या साईडला कळा पाडाव्यात सर्व पुऱ्या केल्यानंतर मीडिअम तेलात मीडिअम लालसर होईपर्यंत फ्राय कराव्या.

शुगर सिरप – साखर पाणी व १/२ चमचा लिंबू, दालचिनी पावडर टाकून एकतार येईपर्यंत उकळावे. त्यामध्ये ह्य तयार केलेल्या पुऱ्या १० ते १५ मिनिटे ठेवून ड्रेन कराव्यात.

काजू आणि नारळाची करंजी

साहित्य:

१ कप रवा,     १ कप मैदा,

१/२ वाटी दूध,   ३ ते ४ चमचे तूप,

१ कप साखर,

१ ओला नारळ (खवलेले खोबरे),

१/२ चमचा जायफळ पूड,

१/२ वाटी काजूचे तुकडे,

१ चमचा इलायची पावडर, तळण्यासाठी.

सारणासाठी:

एका भांडय़ात रवा, मैदा, तूप, दूध व पाणी घालून साधारण मऊ असे पीठ मळून घ्यावे.

एका भांडय़ात खवलेले ओले खोबरे, साखर, काजू, वेलची पावडर, जायफळ पूड, सर्व एकत्र शिजवून घ्यावे. साधारणत: मिश्रण घट्ट असावे. तयार केलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून सर्व कडा दाबून कळा पाडाव्यात व मंद गॅसवर तळाव्यात. दिवाळीसाठी ही वेगळीच करंजी.

ड्रायफ्रूट बेक अनारसे

साहित्य:

१२५ ग्रॅम बटर, २२५ ग्रॅम साखर,

१०० मिली. क्रिम,      १२५ ग्रॅम काजू तुकडा,

१२५ ग्रॅम बदाम तुकडा,   १०० ग्रॅम मनुका,

१०० ग्रॅम बेदाणे,       १/२ वाटी

खसखस.

कृती:

एका भांडय़ात बटर, साखर, क्रीम टाकून नीट मिसळून घ्यावे. त्याला उकडी आल्यावर काजू, बदाम, मनुका, बेदाणे टाकून गॅस बंद करावा व हे नीट सर्व एकत्र करून घ्यावे. थंड झाल्यावर एका बेकिंग ट्रेमध्ये तेल पसरवून घ्यावे. मिश्रणाचे छोटे गोळे करून खसखसमध्ये रोल करून बेकिंग ट्रेवर ठेवून थोडेसे थापून घ्यावेत. हे १६० से.ला ओव्हनमध्ये ८ ते १० मिनिटे बेक करावे. गरम असताना हे ट्रेवरून उचलले जाणार नाहीत. म्हणून थंड झाल्यावर त्यांना ट्रेमधून काढून घ्यावे. थंड झाल्यावर हे अनारसे कडक व कुरकुरीत होतील.

पिस्ता बटर वडय़ा

साहित्य:

४५० ग्रॅम बटर,

१७० ग्रॅम बारीक साखर,

१०० ग्रॅम आयसिंग साखर,

७५० ग्रॅम मैदा,

१/२ वाटी पिस्ता (बारीक केलेला)

कृती:

एका भांडय़ात बटर, साखर व आयसिंग साखर फेटून घ्यावे. त्यात मैदा टाकून हळुवारपणे मिक्स करून एका बेकिंग ट्रेवर  थापावे. त्यावर पिस्ता टाकून लाटून घ्यावे. त्याच्या वडय़ा पाडाव्यात. व १८० सेल्सिअस तापमानावर किंवा ३८० सेल्सिअस तापमानावर ओव्हनमध्ये १० ते १२ मिनिटे बेक करावे.

बदाम खजूर पुरी बेक

साहित्य:

एक वाटी मैदा,

१०० ग्रॅम बदाम (सोललेले),

१०० ग्रॅम साखर,

१ चमचा वेलची पावडर,

१/२ वाटी खजूर (वाटून घेतलेले)

२ ते ३ काडी केशर,

१-१/२ वाटी दूध,

२ ते ३ चमचे तूप.

कृती:

सोललेल्या बदामाची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. एका भांडय़ात मैदा, बदामाची पावडर, साखर, वेलची पावडर, केशर, दूध व तूप टाकून कणीक भिजवून घ्यावी. त्या  पिठाचे छोटे गोळे करून त्यात वाटून घेतलेल्या खजुराच्या छोटय़ा गाळ्या टाकून पुऱ्या बनवून घ्याव्यात. ह्य पुऱ्या एका बेकिंग ट्रेवर ठेवून १८० सेल्सिअस तापमानात ८-१० मिनिटे ओव्हनमधून भाजून घ्याव्यात.

पाकातल्या पुऱ्या

साहित्य:

१ वाटी मैदा,    अर्धी वाटी बारीक रवा,

३ ते ४ चमचे कॉर्न फ्लॉवर,      ३ ते ४ चमचे तांदळाचे पीठ,

मीठ चवीनुसार, १/२ वाटी दही,

पिस्ता किंवा बदामाचा चुरा सजावटीसाठी.

साखर पाक:

२ वाटी साखर, १ वाटी पाणी,

१/२ चमचा वेलची पूड,   तळण्यासाठी तूप.

कृती:

मैदा व रवा एकत्र करून मीठ व दही घालून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे. साखर व पाणी एकत्र करून जाडसर पाक तयार करावा. त्यात वेलची पावडर घालून मिक्स करावे. मळलेल्या पिठाच्या पुऱ्या तयार करून तुपामध्ये तळून घ्याव्यात. ह्या पुऱ्या गरम गरम असतानाच गरम साखरेच्या पाकात १० ते १५ मिनिटे मुरू द्याव्यात. त्यानंतर साखरेचा पाक ड्रेन करून त्यावर पिस्ता किंवा अल्मंड् पावडर टाकून सजवावे. ह्या पुऱ्या साधारणत: दिवाळीमध्ये पकवान म्हणून जेवणात वाढतात.

पंचपुरण शंकरपाळ्या

साहित्य:

१ कप गव्हाचे पीठ,     १/२ वाटी मैदा,

२ टेबल स्पून बडीशेप,   २ टेबल स्पून मिरचीचे फ्लेक्स,

२ टेबल स्पून धने,     २ टेबल स्पून काळीमिरी,

मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.

कृती:

मिरचीचे फ्लेक्स, धने, जिरा, काळीमिरी, बडीशेप, मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे. एका भांडय़ात, गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व दळलेले सर्व साहित्य एकत्र करून कणकेप्रमाणे भिजवून घ्यावे. अर्धा तास तरी या पिठाला झाकून ठेवावे. पिठाचा गोळा मध्यम लाटून कातणाने शंकरपाळ्याचा आकार कापून तेलात मध्यम गॅसवर तळाव्यात. ह्य कुरकुरीत शंकरपाळ्यामध्ये बंगालचा पंचपूरण मसाला घातला की हे कुरकुरीत शंकरपाळे छान लागतात.

मावा गुलकंद बर्फी

साहित्य:

१ वाटी गुलकंद, १ वाटी मावा,

१/२ वाटी कंडेन्स्ड मिल्क,       १ चमचा वेलची पूड,

३ ते ४ चमचे पिस्त्याचे तुकडे.    २ ते ३ चमचे तूप,

कृती:

एका कढईत थोडय़ा तुपावर पिस्ता तुकडे थोडे भाजून घ्यावे. एका कढईत कंडेन्स्ड मिल्क व गुलकंद टाकून मंद गॅसवर गरम करावे. त्यात मावा, वेलची पूड व तूप टाकून त्या मिश्रणाला तूप लावलेल्या ताटात पसरवून घ्या.

त्यावर पिस्त्याचे तुकडे टाकून आपल्या आवडीच्या आकाराच्या वडय़ा पाडाव्यात.

मॅन्गो कोकोनट वडय़ा

साहित्य:

२०० मि. ली. पाणी,

२२५ ग्रॅम मॅन्गो पल्प,

६०० ग्रॅम साखर,

१०० ग्रॅम लिक्वीड ग्लुकोज,

३५० ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट,

१ चमचा जायफळ पावडर.

कृती:

एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पाणी, साखर, मॅन्गो पल्प व लिक्वीड ग्लुकोज टाकून ३ तारी पाक करून घ्यावा. त्यात ड्राय कोकोनट व जायफळ पावडर टाकून नीट एकत्र करावे. व लगेचच तूप लावलेल्या थाळीमध्ये थापावे. १ दिवस त्याला झाकून तसेच ठेवावे. नंतर आवडीप्रमाणे वडय़ा पाडाव्यात.

पोहे आणि मक्याचा चिवडा

साहित्य :

१/२ किलो पातळ पोहे,   १०० ग्रॅम शेंगदाणे,

१०० ग्रॅम सुके खोबरे (काप केलेले)        ८ ते १० हिरव्या मिरच्या,

१/२ किलो ड्राय कॉर्न,    २०० ग्रॅम तेल,

२-३ चमचे लाल मिरचीचे फ्लेक्स, १ चमचा बडीशेप,

१ चमचा  धने (बारीक केलेले),   १ चमचा जिरे (बारीक केलेले),

मीठ चवीनुसार, १५ ते २० बेसीलची पाने.

कृती:

एका कढईत तेल टाकून त्यात मिरची व बेसील पाने घालून थोडे परतावे. त्यात सुके खोबरे काप, लाल मिरचीचे फ्लेक्स, बडीशेप, धने, जिरे व मीठ टाकून परतावे. त्यात दाणे, पोहे व ड्राय कॉर्न टाकून मंद गॅसवर चांगले भाजून द्यावे. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावा.

ट्रॉपिका श्रीखंड

साहित्य:

१ छोटी पपई पिकलेली,

अर्धी वाटी मॅन्गो पल्ब,

१ छोटा अननस,

२ केळी,

१ शाहळ्याचे बारीक केलेले खोबरे,

३०० ग्रॅम चक्का,

१/२ वाटी साखर,

१ चमचा वेलची पूड,

१/२ चमचा जायफळ पावडर.

कृती:

एका भांडय़ात पपईचे तुकडे, मॅन्गो पल्ब, अननसाचे तुकडे, केळ्याचे बारीक तुकडे, वेलची पूड, जायफळ पावडर व साखर टाकून मंद गॅसवर शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

चक्का पूरण यंत्रामधून बारीक चकतीमधून दोन ते तीन वेळा फिरवून घ्यावे. त्यामध्ये तयार केलेला फ्रुट प्युरे व खोबऱ्याचे बारीक तुकडे हळुवार मिक्स करून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवावे. डेझर्ट म्हणून पुरीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

चक्का घरी कसा करावा

३०० ग्रॅम चक्कासाठी ५०० ग्रॅम ताजे दही, बारीक मलमलच्या कपडय़ामध्ये १ दिवस टांगून ठेवावे. नंतर त्यावर वजन ठेवून कमीत कमी अर्धा तास तरी (प्रेस) दाबून ठेवावे. यामुळे जो काही पाण्याचा अंश उरला असेल तर तो बाहेर येईल.

शिंगाडे व शेवई बासुंदी

साहित्य :

१ लिटर म्हशीचे दूध,

१/२ वाटी साखर,

२ चमचे तूप,

१/२ वाटी शेवई,

४ ते ५ बेक केलेले शिंगाडे (सोलून बारीक तुकडे केलेले),

अर्धा चमचा वेलची पूड,

३ ते ४ चमचे चारोळी,

कृती :

तव्यावर थोडेसे तूप टाकून त्यावर शेवई व शिंगाडय़ाचे तुकडे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतावे. एका भांडय़ात दूध घेऊन ३/४ होईपर्यंत अटवावे. त्यामध्ये साखर, वेलची पूड, चारोळी टाकून एक उकळी येईपर्यंत उकळवावे. त्यात शिंगाडे व शेवई टाकून मंद गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत मधून मधून ढवळत राहावे. गरम पुरीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

दुधी व गाजर हलवा रोल

साहित्य:

दुधी बर्फी,

२ वाटय़ा किसलेला दुधी,

१-१/२ वाटी हरियाली मावा,

अर्धी वाटी शुगर,

१/२ वाटी मिल्क पावडर,

१ वाटी दूध, १ चमचा मिरची पावडर.

कृती:

एका भांडय़ात दूध, साखर, मिल्क पावडर आणि हरियाली मावा, वेलची पावडर टाकून मंद गॅसवर थोडेसे बॉइल होईपर्यंत उकळावे, पण सतत ह्या मिश्रणाला हलवत राहावे नाहीतर खाली लागेल किंवा करपेल, ह्यात किसलेला दुधी टाकून चांगला कूक करून घ्यावा. हे सर्व मिश्रण थोडेसे तूप लावलेल्या थाळीवर ठेवावे.

कॅरेट हलवा

साहित्य:

गाजर २ वाटय़ा, मिल्क १ वाटी,

१/२ वाटी मिल्क पावडर, पाववाटी साखर,

१० ते १५ पिस्ता चॉप केलेले.     २ ते ३  चमचे तूप,

सिल्वर फॉइल   सोनेरी किंवा चांदीचा वर्क,

१/२ चमचा वेलची पावडर

कृती:

एका भांडय़ात मिल्क, कॅरेट, साखर, वेलची पावडर टाकून मंद गॅसवर सतत मिश्रण हलवत राहून थोडेफार ड्राय करावे. कूक झाल्यानंतर गॅसवरून खाली उतरावे. साधारणत: ८x६ची सिल्वर फॉइल घेऊन त्यावर तुपाचा हात फिरवावा. अर्धी वाटी दुधी हलवा घेऊन त्यावर पसरट थापावे. त्यावर अर्धी वाटी गाजर हलवा सेम पसरट थापावा. या सर्व मिश्रणाला सिल्वर फॉइलमधून रोल करत जावे व रोल बनवावा. ह्या रोलला १ ते २ दिवस झाकून ठेवून ड्राय करावे. हळुवार सिल्वर फॉइल काढून रोलचे १ १/२ ते २ इंचाचे तुकडे पाडावेत. त्यावर पिस्ताचा चुरा सोनेरी किंवा चांदेरी वर्क लावून सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:17 am

Web Title: food recipe diwali 2016 chiputle chakli
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : शाही फ्रूट बॉल्स
2 रुचकर – शॉपिंग विशेष : सात पडी पुरी
3 रुचकर – शॉपिंग विशेष : झटपट बेसन वडी
Just Now!
X