उत्साह, आनंद, संपन्नता यांचं प्रतीक म्हणजे दिवाळी. आल्हाददायक हवामान, खाण्यापिण्याची रेलचेल, पाहुण्यांची वर्दळ म्हणजे दिवाळी. भेटवस्तूंचं आदानप्रदान, नवे कपडे, भरगच्च रांगोळ्या म्हणजे दिवाळी. अंध:काराचा नाश करत अवघं आयुष्य उजळणं म्हणजे दिवाळी.. तिच्या तयारीची तुमची लगबग सुरू झाली असेलच, त्यात ‘लोकप्रभा’चाही हा खारीचा वाटा..

मसूर व तुरीच्या दाण्याचे कटलेट

साहित्य :

तुरीचे दाणे १ वाटी क्रश करून किंवा मोड आलेले मसूर

बटाटे २ (उकडून कुचकरलेला)

आलं १ इंच

मिरच्या ३-४

आलं-मिरची क्रश करून (आवडीप्रमाणे)

मीठ आवडीप्रमाणे

कोथिंबीर अर्धी वाटी बारीक चिरून

पुदिना १/४ वाटी बारीक चिरून

रवा अर्धी वाटी घोळण्यासाठी (घोळवण्यासाठी)

तेल

कांदा १ (बारीक चिरून)

कृती :

तुरीचे दाणे क्रश करून थोडय़ा तेलावर परता व चांगली वाफ आणा. कांदा पण थोडय़ा तेलावर परतून घ्या. मसूर तेलावर परता. मसूर किंवा तुरीचे दाणे, उकडलेला बटाटा, आलं-मिरची क्रश, मीठ, पुदिना, कांदा, कोथिंबीर सर्व नीट एकत्र करा. त्याचे लहान-लहान लिंबाएवढे गोळे करा व दोन्ही हाताने दाबा. रव्यामध्ये घोळवून फ्राय पॅनमध्ये श्ॉलो फ्राय करा. गरमगरम लसूण चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा किंवा सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

टीप :

मसूर घेतल्यास फक्त तेलावर परता. एक वाफ द्यावा.

दही वडा

साहित्य :

उडीद डाळ १ वाटी (चार ते पाच तास भिजवलेली)

मूगडाळ अर्धी वाटी (चार ते पाच तास भिजवलेली)

आलं १ इंच क्रश ल्ल हिरवी मिरची १-२ क्रश करून

घट्ट दही ३०० ते ५०० ग्रॅम ल्ल गोड चिंचेची चटणी अर्धा वाटी

भाजलेल्या चिराची पूड १ टेबल स्पून ल्ल चाट मसाला १ टेबल स्पून

तिखट- १ टेबल स्पून ल्ल बारीक शेव व बारीक चिरलेली

कोथिंबीर सजावटीसाठी ल्ल मीठ चवीप्रमाणे ल्ल तेल तळण्यासाठी

कृती :

भिजवलेली उडीद डाळ व मूगडाळ बारीक वाटताना जास्त पाणी घालू नका. वाटलेल्या डाळीत क्रश आलं, मिरची व मिठ घाला. नीट एकत्र करा. कढईत तेल तापत ठेवा. तापलेल्या तेलात लहान वडे तळा. ब्राऊन रंगावर तळा. एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवा. एक उकळी आल्यावर गॅस बंद करा व त्यात वडे टाका. साधारण १५-२० मिनिट ठेवा. वडा मऊ झाल्यावर त्यातले पाणी दाबून काढा. दह्यमध्ये मीठ व साखर घाला. घोटून घ्या. एका मोठय़ा पसरट बाऊलमध्ये सर्व वडे ठेवा. त्यावर दही घाला. गोड चटणी, जिरेपूड, चाट मसाला टाका, तिखट भुरभुरवा शेवटी बारीक शेव व कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा. किंवा वेगवेगळ्या बाऊलमध्ये दोन वडे ठेवून वरीलप्रमाणे दही, गोड चटणी, चाट मसाला, जिरेपूड, तिखट घालून प्रत्येकाला देऊ शकता.

दलीयाचा गोड सांजा

साहित्य :

दलीया १ वाटी मध्यम जाड

पिवळा गूळ ३/४ बारीक बारीक चिरून

साजूक तूप अर्धी वाटी

बेदाणा ४-५, बदाम ८-१० बारीक तुकडे करावेत

वेलची पावडर १ चमचा

दूध अर्धी वाटी व १ वाटी पाणी

वेलची १-२

अक्रोड ४-५ सोललेले बारीक तुकडे करून

केळे – १/२ चे काप तुपावर परतणे सवर्ि्हगसाठी

ओले खोबरे- १/४ वाटी.

कृती :

प्रथम दलीया धुऊन ठेवा. कढईत १/४ वाटी तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यावर वेलची टाका. लगेच त्यावर दलीया टाका. चांगल्या परता. खोबरे टाका, परता, त्यावर बेदाणा, बदामाचे काप, अक्रोडचे तुकडे टाका व परत चांगले परता. तूप सुटू लागल्यावर त्यात दूध व पाणी गरम करून घालावे. चांगले ढवळावे व झाकण ठेवून दलीया शिजवून घ्यावा. वरून वेलची पावडर घाला. गुळात थोडेसे पाणी घालून गरम करा. गूळ विरघळल्यावर तो दलीयामध्ये घालून चांगले परतून एकत्र करून घ्या. वाफ आणा. उरलेले १/४ वाटी तूप घाला. चंगली वाफ आणा. केळ्याचे काप थोडय़ा तुपावर परता. एका वाटीला तुपाचा हात लावून त्यावर दलीयाचा सांजा घाला व वाटीच्या आकाराचे साचे पाडा. त्यावर केळ्याचे काप ठेवा. गरम सांजा सव्‍‌र्ह करा.

टीप : वेलची पावडर वरून घातली की स्वाद- वास चांगला येतो.

कॉर्न-पोटॅटो रोल

साहित्य :

मैदा १ वाटी

बटाटे ३ उकडून कुस्करणे

कॉर्न अर्धी वाटी वाफवून घेणे

हिरवी मिरची ३-४ क्रश करून

आलं १ इंच किसून घेणे

चाट मसाला १ चमचा

मीठ चवीप्रमाणे

कोंथिबीर १ टेबलस्पून

तेल  तळण्यासाठी

कॉर्नफ्लॉवर १ टेबल स्पून

हिरवी चटणी – सवर्ि्हग करिता किंवा टोमेटो केचअप.

कृती :

प्रथम मैद्यात मीठ व तेलाचे मोहन घालून मऊसूत भिजवावा, एक तास ओल्या रुमालाखाली ठेवा.

बटाटा, कॉर्न, मिरची, आलं, चाटमसाला, मीठ, कोंथिबीर एकत्र करून सारण बनवा.

मैद्याला तेलाचा हात लावून चांगला मळून घ्यावा. त्याचे गोळे बनवून चपाती लाटावी. त्यावर बटाटा-कॉर्नचे सारण सर्वत्र नीट पसरवा. हलक्या हाताने रोल करून घ्या. रोल थोडासा दाबावा व साधारण इंच किंवा बोटाच्या एका पेराएवढे रोल कापा.

रोल कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवा. जास्तीचे कॉर्नफ्लॉवर काढून टाका. डीप फ्राय करा. गरमागरम रोल आणि चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

मटर-पनीर कचोरी

साहित्य :

कव्हरसाठी मैदा २५० ग्रॅम ल्ल साजूक तूप अर्धी वाटी (पातळ केलेले)

मीठ चवीप्रमाणे.

कृती :

प्रथम मैदा चाळून घ्या. परातीत मैदा, तूप, मीठ सर्व एकत्र करा. सर्व निट एकत्र करा. कोमट पाण्यात मैदा मऊसर भिजवा. बंद डब्यात झाकून ठेवा.

साहित्य :

सारणासाठी मटार १ वाटी वाफवून

पनीर १ वाटी किसलेले

चाट मसाला अर्धा चमचा

बडिशेप पावडर अर्धा चमचा जाडसर

साखर १ चमचा

कोथिंबीर १/४ वाटी बारीक चिरलेली

आलं १ चमचा किसून

हिरवी मिरची ४-५ क्रश करून

मीठ आवडीप्रमाणे ल्ल तेल तळण्यासाठी

कृती :

एका मोठय़ा बोलमध्ये तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्या. भिजवून ठेवलेल्या मैद्याला तेलाचा हात लावून हलक्या हाताने मळून घ्या. मैद्याची पुरी लाटा. त्यात सारण भरपूर (गच्च किंवा ठासून) भरा. पुरी दोन्ही बाजूने बंद करत हळूहळू पूर्णपणे बंद करा व त्याचा गोल आकार द्या. कचोरी पूर्ण नीट बंद झाली पाहिजे. नाही तर तळताना फुटून सारण बाहेर येईल. साधारण चार-पाच कचोऱ्या झाल्यावर गरम तेलात तळायला घ्या. कचोरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने सतत तेल उडवत रहा. साधारण ब्राऊन रंग झाल्यावर गॅस मंद करावा. कचोरी तळून घ्या. जास्त ब्राऊन करू नका. गरम-गरम कचोरी दह्य़ाच्या डीप बरोबर सव्‍‌र्ह करा

टीप : चक्का १ वाटी- घट्टी दही कापडात बांधून पाणी काढून घ्या, चाट मसाला अर्धा १/२ चमचा, हिरवी मिरची- १-२ क्रश करून, मीठ आवडीप्रमाणे, कोथिंबीर १ चमचा बारीक चिरून, सर्व साहित्य एकत्र करा. व्हिस्कने घोटून घ्या. कोथिंबीर करून घाला.

टीप : ही कचोरी जास्त टिकत नाही. लगेच संपवावी.

बेक व्हेज

साहित्य :

बटाटे ३-४ उकडून कुस्करणे

गाजर १ किसून

मटार अर्धी वाटी वाफवून घेणे

फरसबी अर्धी वाटी लांब चिरलेली वाफवणे

पुदिना अर्धी वाटी बारीक चिरून

मोझेरेला चीज अर्धी वाटी किसून

अर्धी वाटी प्रोसेस्ड चीज किसून

दूध अर्धी वाटी  ल्ल कॉर्नफ्लॉवर १ चमचा

बारीक शेव सजावटीसाठी

बेकिंग पॅन बटर  ल्ल मीठ.

कृती :

प्रथम बोलमध्ये बटाटा, गाजर, मटार, फरसबी, पुदिना, मीठ एकत्र करा. अर्धी वाटी दुधात १ चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करा व ते बटाटामध्ये मिक्स करा.

बेकिंग पॅनला बटरने ग्रीसिंग करा. सर्वत्र नीट लागले गेले पाहिजे. त्यावर वरील अर्धा मिश्रण टाका. त्यावर परत मोझेरेला चीज टाका व चीज सर्वत्र नीट पसरवून टाका. शेवटी प्रोसेस चीज पसरवा.

१८० अंश सेल्सियसला १५-२० मिनिटे बेक करा. चीज वितळून साधारण ब्राऊन रंग आला पाहिजे.

थंड करा. त्याचे वडय़ा कापा. सव्‍‌र्ह करताना बारीक शेव भुरभुरावा.

रव्याचे तिखट अप्पे

साहित्य :

बारीक रवा १ वाटी

तांदळाचे पीठ १ टेबल स्पून

आलं-मिरची क्रश १ टेबल स्पून (आलं १ इंच, ३-४ हिरवी मिरची)

दही अर्धी वाटी

गाजर अर्धी वाटी किसून

मीठ, साखर (आवडीप्रमाणे)

इनो १/४ चमचे

चटणी सवर्ि्हगसाठी

तेल

कोथिंबीर १/४ वाटी बारीक चिरलेली

कृती :

रवा, तांदळाचे पीठ, आलं-मिरची क्रश, दही, गाजर, मीठ, साखर, कोथिबीर एकत्र करा. १५ मिनिटे ठेवून द्या. अप्पे पात्र तेल लावून गरम करा. वरील पिठात लागेल तसे थोडे पाणी घालून इडली पिठाप्रमाणे भिजवा. नंतर त्यात इनो घालून चांगले मिक्स करा व गरम अप्पे पात्रात घाला. झाकण ठेवून चांगली वाफ द्यावा. खालची बाजू ब्राऊन झाल्यावर अप्पे चमच्याने उलटा. थोडेसे तेल टाका. खालील बाजू ब्राऊन करून घ्या. चटणीबरोबर गरम गरम सव्‍‌र्ह करा.

चटणी- १ वाटी ओलं खोबरं, ३-४ हिरव्या मिरच्या, मीठ, चिमूटभट साखर, १ चमचा लिंबू रस, १/२ वाटी कोथिंबीर. सर्व एकत्र वाटून थोडी पातळ चटणी तयार करा.

चॉकलेट चीज केक

साहित्य :

पनीर ३०० ग्रॅम

चक्का १० ग्रॅ्रम

चॉकलेट स्लॅब १ डबल बॉइल करून वितळून घेणे

साखर अर्धी वाटी

रम इसेन्स १ चमचा

ऑरेंज इसेन्स

जिलेटिन २ चमचे थंड पाण्यात घालून विरघळून डबल बॉईल करणे

स्पांज केक १

ऑरेंज ज्यूस १ लहान टेट्रा पॅक

वेफर बिस्किट सजावटीसाठी

ट्रान्स्परन्ट ग्लास ५ ते ६.

कृती :

प्रथम पनीर किसून घ्या. मोठय़ा बाऊलमध्ये पनीर, चक्का, चॉकलेट स्लॅब, रम इसेन्स, ऑरेंज इसेन्स, जिलेटिन, साखर सर्व एकत्र करा. हे मिश्रण मिक्सरमधून काढा. ट्रान्स्परन्ट ग्लास, किंवा बाऊलमध्ये खाली स्पाँज केक ठेवा. त्यावर ऑरेंज ज्यूस १-२ चमचे टाका, त्यावर पनीरचे मिश्रण टाका व फ्रीजमध्ये १ ते २ तास ठेवा. चांगले सेट झाले पाहिजे.

सव्‍‌र्ह करताना वर वेफर्स बिस्किट तिरपे कापून लावा किंवा रंगीत शुगर बॉल भुरभुरावा.

ग्लासात सेट केल्यास प्रत्येकाला १-१ ग्लास देता येतो.

गाजर व केळं स्मुदी

साहित्य :

केळ १ चांगले पिकलेले

गाजर १ मध्यम किसन

दही १ गोड दही

सब्जा १ चमचा भिजवलेला

साखर १ टेबल स्पून

मिक्स फ्रूट इसेन्स अर्धा चमचा

पुदिना पाने सजावटीसाठी.

कृती :

मिक्सरच्या जारमध्ये केळं, गाजर, दही, साखर, मिक्स फ्रूट इसेन्स घाला. सर्व मिक्सरमधून काढा. ग्लासात खाली भिजवलेल्या सब्जा टाका. त्यावर वरील बसवलेले मिश्रण घाला. वरती पुदिन्याची पाने ठेवा सव्‍‌र्ह करा.

मिक्स भजी

साहित्य :

१ कांदा (बारीक चिरून)

बटाटा (सोलून बारीक चिरून)

पालक ५-६ पाने चिरून

कोबी १ वाटी लांब चिरलेली

आवडत असलेल्या भाज्या थोडय़ा-थोडय़ा घालाव्यात

बेसन १ ते दीड वाटी लागल्यास जास्त घालावे

ओवा १ चमचा

हळद १ चमचा

सोडा बाय कार्ब- अर्धा चमचा

हिरवी मिरची ४-५ बारीक चिरून

कोथिंबीर अर्धा वाटी बारीक चिरून

मीठ आवडीप्रमाणे

तेल तळण्यासाठी

चाट मसाला १ चमचा.

कृती :

प्रथम बाऊलमध्ये सर्व भाजा, ओवा, हळद, मिरची, कोथिंबीर, मीठ सर्व नीट एकत्र करून घ्या. त्यात थोडे थोडे बेसन घालत राहा. सर्व भाजांना बेसन नीट लागले गेले पाहिजे. थोडे पाणी घालून सैल सर भिजवावे. कढईत तेल तापत ठेवा. तेल चांगले तापल्यावर वरील मिश्रणात सोडा घालावा. व नीट मिक्स करून घ्या व तापलेल्या तेलात हाताने किंवा चमच्याने भजी टाकून खमंग तळून घ्यावी. भजी तळल्यावर वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा. गरम भजी सव्‍‌र्ह करावीत.

इडली मंच्युरिअन

साहित्य :

तयार इडल्या पाच-सहा (एका इडलीचे चार भाग करा)

मैदा १ वाटी

कॉर्नफ्लॉवर अर्धा वाटी

मीठ चवीप्रमाणे

चिली सॉस २ टेबल स्पून.

कृती :

मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, चिलीसॉस एकत्र करा. थोडेसे पाणी घाला. बॅटर बनवा. त्यात इडलीचे तुकडे बुडवून डीप फ्राय करून बाजूला ठेवा.

मंच्युरिअन साहित्य :

कांदा

लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची- १ वाटी चिरून

सोया सॉस १ टेबल स्पून

कांद्याची पात १ वाटी बारीक चिरून

ग्रीन चिली सॉस १ टेबल स्पून किंवा आवडीप्रमाणे

मिरी पावडर- अर्धा चमचा

आलं व लसूण १ ते दीड चमचा बारीक चिरून

टोमॅटो सॉस १ टेबल स्पून.

कृती :

पॅनमध्ये तेल गरम त्यात प्रथम लसूण टाका, परत लगेच आले टाका परता, लगेच कांदा टाका परता, लाल, पिवळी, हिरवी, सिमला मिरची टाका, परता. त्यावर सोया सॉस चिली सॉस व १ टेबल-स्पून टोमॅटो सॉस टाका. मीठ टाका. मिरी पावडर एका परता. त्यावर तळलेली इडलीचे तुकडे टाका. नीट सर्व मिक्स करा. शेवटी बारीक चिरलेली कांद्याची पात टाका. गरम-गरम सर्व करा.

कलाकंद

साहित्य :

कंडेन्स्ड मिल्क १ डबा (४०० ग्रॅम)

फ्रेश पनीर २५० ग्रॅम किसून

घट्ट फ्रेश क्रीम- १०० ग्रॅम

साखर १ टेबल स्पून

वेलची पावडर अर्धा चमचा (हवी असल्यास)

काजू, बदाम, पिस्ता अर्धी वाटी  पातळ काप

केसर ८-१० धागे.

कृती :

सपाट थाळीला तुपाचा हात लाून बाजूला ठेवा. एका जाड बुडाच्या भांडय़ात किंवा नॉनस्टीक पॅनमध्ये कंडेन्स्ड मिल्क, पनीर, घट्ट फ्रेश क्रीम, साखर एकत्र करून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर ठेवा व सतत ढवळत राहा. हे मिश्रण हळूहळू घट्ट होत जाईल. शेवटी त्याचा गोळा बनेल. गॅस बंद करा हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत सर्वत्र नीट पसरवा. वरून काजू, बदाम, पिस्ता काप सर्वत्र टाका. केशर टाका व हलक्या हाताने दाबा, सेट होण्यासाठी ठेवा. साधारण चार-पाच तास लागतात. चांगले सेट झाले की वडय़ा पाडा. सव्‍‌र्ह करा.
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com