रुचकर-शॉपिंग विशेष

ज्योती चौधरी मलिक – response.lokprabha@expressindia.com

टोमॅटो पुरी

साहित्य :

मोठे टोमॅटो- ३

गव्हाचे पीठ- दीड कप

चिरलेली कोथिंबीर- अर्धा कप

लाल तिखट- १ चमचा

गरम मसाला पावडर- १ चमचा

धणेजिरे पावडर- १ चमचा

ओवा- अर्धा चमचा

मीठ- चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

कृती :

टोमॅटो २ ते ३ मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. मग बाहेर काढून साले काढा. थंड झाल्यावर तुकडे करून मिक्सरमधून वाटून घ्या. गव्हाच्या पिठात टोमॅटोचे वाटण, मसाले, मीठ तसेच कोिथबीर घालून घट्ट मळून घ्या. वरून १ चमचा तेल घालून परत मळून घ्या. १० मिनिटे झाकून ठेवा. कढईत तेल छान गरम झाले की पिठाच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या करून तळून घ्या. हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा. याचप्रमाणे पालकाचे वाटण करून पालक पुरीही तयार करता येते.

दही कबाब

साहित्य :

दही- अर्धा किलो

किसलेले पनीर- अर्धी वाटी

मदा- २ चमचे

धणे पावडर- १ चमचा  कॉर्न फ्लॉवर- २ चमचे

ठेचलेल्या सुक्या लाल मिरच्या- २

मीठ चवीनुसार           तेल- तळण्यासाठी

कृती :

दही कापडात बांधून, पाणी काढून त्याचा चक्का तयार करा. त्यात किसलेले पनीर आणि इतर सर्व साहित्य घालून एकत्र करून घ्या. छान मळून घ्या. त्याच्या टिक्क्या करा. फ्राय पॅनमध्ये थोडे तेल तापवून श्ॉलो फ्राय करून घ्या.

मूगडाळ वडे

साहित्य :

मूगडाळ- अर्धा कप (२ तास भिजवून)

उकडलेले बटाटे- २

कांदा बारीक चिरून- १

हिरव्या मिरच्या -२

आले- १ इंच

कोिथबीर- पाव वाटी (बारीक चिरून)

जिरे- १ चमचा

हळद- अर्धा चमचा

मिरचीपूड- १ चमचा

धणेजिरे पावडर- १चमचा

चाट मसाला- १चमचा

मीठ- चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

कृती :

भिजवलेल्या मूगडाळीतून पाणी काढून टाका. त्यात हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे एकत्र करून मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. पाणी जास्त घालू नका. उकडलेले बटाटे किसून घ्या. एक मोठा वाडगा घेऊन त्यात मूगडाळ आणि बटाटा कीस एकत्र करा. त्यात चिरलेला कांदा आणि कोिथबीर घाला. त्यात सगळे मसाले आणि मीठ घालून मिसळून घ्या.

गॅसवर कढईत तेल गरम करून घ्या. गरम तेलात मध्यम आचेवर पकोडे खरपूस तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

अंडय़ाचे आप्पे

साहित्य :

अंडी- ४ दूध- पाव कप

कॉर्न फ्लॉवर- २ चमचे    कांदा- १

टोमॅटो- १      शिमला मिरची- १

कोिथबीर- पाव कप     मीठ- चवीनुसार

कांदा लसूण मसाला- १ चमचा

कृती :

४ अंडी एका मोठय़ा बोलमध्ये फोडून घ्या. पाव कप दुधात कॉर्न फ्लॉवर एकत्र करून अंडय़ात घालून फेटून घ्या.

कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोिथबीर बारीक चिरून घ्या. अंडय़ात मिसळा. शेवटी कांदा लसूण मसाला आणि मीठ घालून सगळे मिश्रण परत फेटून घ्या.

आप्पे पात्र तेल लावून गॅसवर गरम करून घ्या. ते गरम झाले की चमचाने हे मिश्रण आप्पे पात्रात टाका. २ मिनिटे झाकण ठेवा. त्यानंतर आप्पे उलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर हे आप्पे खूप छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतात.

रवा-बटाटा िफगर

साहित्य :

मध्यम आकाराचे बटाटे उकडून- ४

रवा- १ मोठी वाटी

कांदा बारीक चिरून- १

हिरव्या मिरच्या- ३/४

कोिथबीर बारीक चिरलेली- अर्धी वाटी

चमचा चाट मसाला- १

चमचा जिरे- १

मीठ चवीप्रमाणे

तळण्यासाठी तेल

कृती :

१ वाटी पाणी उकळून घ्या. गॅस बंद करा. त्यात १ वाटी रवा घालून ५ मिनिटे झाकण ठेवा. उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात उकडलेला रवा घालून छान मळून घ्या. म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. त्यात चिरलेला कांदा, कोिथबीर, मिरची, चाट मसाला आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. हाताला तेल लावून रोल करून बोटाच्या आकाराचे गोळे करून घ्या. कढईत तेल तापवून घ्या. तेल गरम झाले की िफगर टाकून खरपूस सोनेरी तळून घ्या. सॉस किंवा चटणीबरोबर खायला द्या.

कॉर्न ओपन टोस्ट

साहित्य :

टोस्टसाठी दहा ब्रेड स्लाइस

थोडं बटर

मक्याच्या पुरणासाठी –

मक्याचे दाणे (कॉर्न)- २ वाटय़ा

हिरव्या मिरच्या- २ ते ३

मोठा कांदा- १

दूध- २ कप

मिरपूड- १ मोठा चमचा

लोणी- अर्धा चमचा

चिरलेली कोिथबीर

मीठ- चवीनुसार

कृती :

मक्याचे दाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. मक्याच्या वाटणात दूध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टय़ा करा. नॉनस्टीकच्या भांडय़ात लोणी तापवा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परता. कांद्याची हिरवी पातसुद्धा वापरू शकता. मग शिजलेले मक्याचे दाणे, मीठ आणि मिरपूड घाला. खाली उतरवल्यावर कोिथबीर मिसळा. ब्रेडचे स्लाइस टोस्टरमधून भाजा. त्रिकोणी दोन तुकडे कापा. त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न पसरा. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खायला द्या.

दिल्ली आलू चाट

साहित्य :

उकडलेले बटाटे- ४

फेटलेले घट्ट दही- १वाटी

चिंच खजूर चटणी- आवडीप्रमाणे

पुदिना चटणी- आवडीप्रमाणे

बारीक शेव- १ वाटी

बारीक चिरलेला कांदा- १

बारीक चिरलेला टोमॅटो- १

मिरची पावडर, चाट मसाला, धनेजिरे पावडर- अर्धा अर्धा चमचा

मीठ- चवीप्रमाणे

साजूक तूप- तळण्यासाठी

कृती :

फ्रायपॅनमध्ये तूप घालून बटाटय़ाच्या फोडी लालसर तळून घ्या. त्यावर दही, दोन्ही चटण्या घाला. मसाले आणि मीठ घाला. त्यावर कांदा, टोमॅटो व कोिथबीर घाला. त्यावर चाट मसाला भुरभुरवा. सर्व एकत्र करा. सर्वात शेवटी शेव घाला आणि लगेच सव्‍‌र्ह करा.

व्हेज मेयो सँडविच

साहित्य :

ब्रेडचे स्लाइस- ८

कांदा- १ काकडी- १

टोमॅटो- १ गाजर- १

मेयोनीज- ४ ते ५ चमचे

मिक्स हर्ब- १ चमचा

चिली फ्लेक्स- १ चमचा

टोमॅटो सॉस- २ चमचे

चाट मसाला- १ चमचा

मोजोरेला चीज – १ क्यूब

काळीमिरी पावडर- अर्धा चमचा

कोिथबीर- अर्धी वाटी

मक्याचे दाणे (वाफवून)- अर्धी वाटी

उकडलेल्या बटाटय़ाचे तुकडे- १

कृती :

एका मोठय़ा वाडग्यात सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. त्यात मेयोनीज, मसाले आणि सॉस मिसळून घ्या. बटाटे आणि मक्याचे दाणेही मिसळा. नंतर मोजरेला चीज किसून घाला. छान एकत्र करून घ्या. आता एका ब्रेडच्या स्लाइसवर हे मिश्रण पसरा. त्यावर दुसरा स्लाइस ठेवून सँडविच तयार करा. आवडत असेल तर ग्रील करा, नाही तर असाच खाल्ला तरी चालेल. मुलांना देताना वरून थोडे किसलेले चीज घालून द्या. लहान मुलांना शाळेत डब्याला द्यायला हा छान पदार्थ आहे. मुले आवडीने खातात, भाज्या किसूनही घालू शकता. त्यात उकडलेले मशरूम किंवा ब्रोकोली, डाळिंब सफरचंद अशी फळेसुद्धा घालू शकता.

सिमला मिरची पकोडा चाट

साहित्य : पकोडय़ासाठी :

लहान आकाराच्या सिमला मिरच्या- ४ ते ५

बेसन- २ वाटय़ा

हळद- अर्धा चमचा

मिरची पूड- १ चमचा

चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल

चाटसाठी :

कांदे- २

टोमॅटो- १

हिरव्या मिरच्या- २

िलबू- १

कोिथबीर बारीक चिरून- पाव वाटी

चाट मसाला- १ चमचा

फरसाण किंवा शेव- २ वाटी

कृती :

प्रथम कढईत तेल तापत ठेवा. सिमला मिरचीचे प्रत्येकी दोन उभे तुकडे करून बिया काढून घ्या. बेसन पिठात हळद, मिरचीपूड आणि पाणी टाकून जाडसर मिश्रण करून घ्या. त्यात सिमला मिरची घोळवून भज्यांप्रमाणे २ ते ३ मिनिटे सर्व मिरच्या तळून घ्या.

सर्व्हिंग प्लेटमध्ये १ मिरची वाटीप्रमाणे ठेवून त्यात बारीक चिरलेले सर्व जिन्नस, मीठ आणि चाट मसाला एकत्र करून घाला. त्यावर फरसाण घाला. वरून िलबू पिळा. सिमला मिरची चाट खायला रेडी. त्यात तुम्ही एखादी उसळसुद्धा घालू शकता.

लाल भोपळ्याच्या घाऱ्या

साहित्य :

लाल भोपळ्याचा कीस- २ वाटय़ा  गूळ- दीड वाटी किसलेला

गव्हाचे पीठ- दोन वाटय़ा वेलची पावडर- १ टी स्पून

मीठ- अर्धा टी स्पून      खसखस- गरजेप्रमाणे

कृती :

लाल भोपळ्याचा कीस आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ, मीठ, वेलची पावडर एकत्र करून पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. ते थापून किंवा लाटून घाऱ्या तयार करा. वरून खसखस लावा आणि तळून घ्या. भोपळ्याप्रमाणे गाजराचा कीस घालूनही घाऱ्या करू शकता. गूळ, लाल भोपळा आणि गाजरामध्ये लोह असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.