अदिती पाध्ये – response.lokprabha@expressindia.com

रुचकर-शॉिपग विशेष

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात आकाशकंदील, पणत्या, फटाके, अभ्यंगस्नान आणि खमंग फराळ. करंजी, शेव, चकली, चिवडा, लाडू, अनारसे हे फराळाचे पारंपरिक पदार्थ दिवाळीला केले जातातच, पण त्याचबरोबर दिवाळीला फराळाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही हटके, चविष्ट तरीही पौष्टिक पदार्थ केले तर सणाची मजा द्विगुणित होईल.

झटपट पावभाजी

साहित्य :

मटार, फ्लॉवर, टोमॅटो, कांदे, सिमला मिरची प्रत्येकी पाव किलो

बटाटे अर्धा किलो

लिंबू १

मीठ चवीनुसार

गरम मसाला १ चमचा

तिखट १ चमचा

पावभाजी मसाला १ चमचा

अमूल बटर १ पाकीट

गोडे तेल २ चमचे

कोथिंबीर अर्धी वाटी

आलं-लसूण पेस्ट १ चमचा

पाणी आवश्यकतेनुसार

कृती :

आलं-लसूण पेस्ट करून घ्या. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मटार सोलून घ्या. एका कुकरमध्ये खाली थोडे (पाव कप) पाणी घालून त्यावर बटाटे, मटार, कांदे, सिमला मिरची, टोमॅटो असे क्रमाक्रमाने घालून घ्या. त्यावर थोडे बटर, त्यावर आलं-लसूण पेस्ट आणि तिखट, गरम मसाला, थोडे मीठ घाला आणि कुकरला चार शिट्टय़ा करून घ्या. थंड झाल्यावर स्मॅशरने स्मॅश करा आणि त्यावर फोडणी घालून मीठ आणि गरम पाणी घालून एक उकळी काढा. फोडणीसाठी तेल आणि दोन चमचे बटर गरम करून त्यात पावभाजी मसाला आणि गरम मसाला घालून भाजीवर घाला. लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून, पाव बटर लावून गरम करून घ्या. भाज्या शिजवताना आधी शिजणाऱ्या भाज्या खाली घाला आणि लवकर शिजणाऱ्या वर असा थर करा. अशी भाजी पटकन होते आणि चवीलाही खूप छान लागते.

मिश्र कडधान्यांची मिसळ

साहित्य :

मटकी, चवळी, मूग, हिरवे वाटाणे, छोले (काबुली चणे), हरभरे यांपैकी सगळी किंवा मिळतील तेवढी कडधान्ये पाव वाटी प्रत्येकी

तेल १ वाटी

मीठ चवीनुसार

गरम मसाला २ चमचे

तिखट २ चमचे

कांदे ४ मध्यम

लिंबू २

कोथिंबीर २ चमचे

फरसाण

वाटणासाठी :-

खसखस भाजून

ओलं खोबरं, सुकं खोबरं भाजून

आलं लसूण पेस्ट

धणे जिरेपूड

लाल मिरचीची पेस्ट किंवा पावडर

प्रत्येकी २ चमचे

तीळ १ चमचा (भाजून)

कृती :

प्रथम वाटणाचे साहित्य एकत्र करून वाटण करून घ्या. मटकी आणि बाकीची कडधान्ये भिजवून शक्य असल्यास मोड आणा. लिंबाचा रस काढून घ्या. २ कांदे बारीक चिरून तेलावर वाटण परतून घ्या. त्यात मीठ घालून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून एक उकळी काढा. खायला देताना एका बोलमध्ये उसळ, त्यावर फरसाण आणि वर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालून पावाबरोबर द्या.

दिवाळीत गोड धोड खाऊन झाल्यावर पाहुण्यांसाठी हा छान झणझणीत आणि पौष्टिक पदार्थ आहे.

कॉर्न – पडवळ बिर्याणी

साहित्य :

पडवळाची भाजी पाव किलो कॉर्न / मक्याचे दाणे पाव किलो

दही २ कप      आलं लसूण पेस्ट १ चमचा

गरम मसाला १ चमचा   तिखट १ चमचा

मीठ चवीनुसार   तांदूळ अख्खा बासमती २ वाटय़ा

काजू २ मोठे चमचे      केशरकाडय़ा अर्धा चमचा

दूध २ चमचे    तेल अर्धी वाटी

कोथिंबीर.

कृती :

काजू, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर तळून घ्या. २ चमचे तेलावर  पडवळ आणि कॉर्न पेस्ट थोडे मीठ घालून वाफवून घ्या. नंतर त्यात गरम मसाला, तिखट घाला, गॅस बंद करून त्यात दही घालून एकत्र करा. गरम दुधात केशराच्या काडय़ा घालून ठेवा.

भाजीच्या कुकरमध्ये तळाला तेल घालून त्यावर बटाटय़ाचे काप, त्यावर भात, त्यावर भाजी, त्यावर तळलेला कांदा, काजू, कोथिंबीर पुन्हा भात, त्यावर केशराचे दूध असे दोन-तीन थर देऊन वर तळलेला कांदा आणि काजू घालून अर्धा तास मंद आचेवर वाफ द्या.

दिवाळी ही हटके बिर्याणी पाहुण्यांना नक्कीच आवडेल.

चिंचेचा भात

साहित्य :

शिजवलेला फडफडीत भात २ वाटय़ा

चिंचेचा कोळ अर्धी वाटी

डाळं, तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं प्रत्येकी १ चमचा

जिरे १ चमचा

हिंग पाव चमचा

लाल मिरच्या ५

तेल ४ चमचे

मीठ चवीनुसार

गूळ १ चमचा.

कृती :

प्रथम तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि डाळं भाजून पूड करा. कढईत तेल तापवून त्यात जिरे, हिंग, लाल मिरच्या परता. नंतर चिंचेचा कोळ घालून एक उकळी काढा. त्यात मीठ आणि गूळ घाला. तीळ, शेंगदाणे यांचे कूट घाला आणि एकत्र करा. नंतर शिजवलेला फडफडीत भात घाला आणि परता. गॅस बंद करून वरील (२ चमचे तळलेले शेंगदाणे आणि तीळ) दोन चमचे कच्चे तेल घाला.

वरून तेल घातल्यामुळे हा भात कोरडा लागत नाही.

थोडे तळलेले शेंगदाणे आणि तीळ घातल्यास आणखीन चविष्ट लागते.

पनीर भुर्जी

साहित्य :

पनीर ४०० ग्रॅम

कांदे ३ मध्यम

तिखट २ चमचे

गरम मसाला १ चमचा

चवीनुसार मीठ

आलं-लसूण पेस्ट १ चमचा

कोथिंबीर २ चमचे (बारीक चिरून)

फोडणीचे साहित्य, लिंबाचा १ चमचा.

कृती :

पनीर रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा. नंतर किसून घ्या. कांदे बारीक चिरून घ्या. पेस्ट करा. कढईत तेल २ चमचे, मोहरी, त्यात आलं-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परता. गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करा आणि थोडे परतून खरपूस करून घ्या. नंतर गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.

ही पनीर भुर्जी नान, ब्रेड, पुरी किंवा पोळी कशाबरोबरही छानच लागते.

दिवाळीत गोडाधोडाच्या बरोबरीने प्रथिनयुक्त अशी ही भुर्जी नक्की करा आणि जिभेची रुची वाढवा.

जांभळा हलवा

साहित्य :

२ वाटय़ा गव्हाचे पीठ

अर्धी वाटी मनुका (काळ्या)

बीटाचा रस अर्धी वाटी

अर्धी वाटी गूळ

अर्धी वाटी साजूक तूप

सजावटीसाठी बदामाचे काप

पाव वाटी रताळ्याचा गर

पाव वाटी मिल्क पावडर.

कृती :

प्रथम रताळं उकडून बारीक करून घ्या. काळ्या मनुका कोमट पाण्यात २ तास भिजवा. बीटाचे बारीक तुकडे करून घ्या. नंतर कढईत तूप घालून त्यावर गव्हाचे पीठ भाजून घ्या. त्यात मनुका वाटून घाला. नंतर त्यात बीटाचा रस आणि रताळे घाला. घट्टसर झाल्यावर गूळ घाला. तो एकत्र झाला की मिल्क पावडर घालून परता आणि झाकण ठेवून एक वाफ आणा. एका बोलमध्ये खाली बदामाचे काप घालून त्यावर हलवा घाला तो डिशमध्ये उपडा करून खायला द्या.

यात सगळे पौष्टिक घटक आहेत.

मनुका आणि बीटाचा रस एकत्र केला की नैसर्गिक जांभळा रंग येतो, तो आकर्षक दिसतो.

मनुका आणि मिल्क पावडर गोड असल्यामुळे गुळाचे प्रमाण कमी घ्या.

इन्स्टंट बेसन लाडू

साहित्य :

पाव किलो साजूक तूप    पाव किलो पिठी साखर

अर्धा किलो पंढरपुरी डाळ  वेलचीपूड १ चमचा

केशर, बदाम, पिस्ते ऐच्छिक

कृती :

पंढरपुरी डाळ मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर करून घ्या. नंतर तूप वितळवून घ्या, आणि त्यात पिठीसाखर थोडी थोडी घालून एकत्र करा. नंतर डाळ्याची पावडर/ पीठ थोडे थोडे घालून एकत्र करा. हाताने नंतर त्याचे लाडू वळून घ्या, हवे असल्यास १ चमचा दुधात केशर भिजवून घ्यावे, म्हणजे रंग छान येतो.

पंढरपुरी डाळं भाजलेलं असल्यामुळे पुन्हा भाजावे लागत नाही, बेसन भाजण्याचा वेळ वाचतो, म्हणून हे लाडू झटपट होतात.

हे लाडू खूप झटपट होतात आणि चवीला छान लागतात.

झटपट ढोकळा

साहित्य :

२ वाटय़ा बेसन पीठ

२ चमचे बारीक रवा

चवीनुसार मीठ

हळद अर्धा चमचा

आंबट ताक २ वाटय़ा

खायचा सोडा १ चमचा

कोमट पाणी अर्धा कप

तेल २ चमचे

फोडणीचे साहित्य

कृती :

प्रथम बेसन, रवा, मीठ, हळद एकत्र करून घ्या. त्यात कोमट पाणी घाला. नंतर आंबट ताक घाला आणि एकत्र करा. तोपर्यंत इडली पात्राला तेल लावून घ्या आणि त्यात पाणी घालून उकळण्यास ठेवा. नंतर पिठात खायचा सोडा घालून चमच्याने गोल गोल ढवळा (एकाच दिशेने) बुडबुडे येऊन मिश्रण हलके होईपर्यंत ढवळा, आणि इडलीपात्रात मिश्रण घालून वाफवायला ठेवा. साधारण १५ ते २० मिनिटांत छान फुलून येईल. ते हिरव्या चटणीबरोबर वाढा.

इडली पात्रात वाफवल्यामुळे पटकन शिजते आणि आणखीन हलकेपणा येतो.

दिवाळीत गोड खाऊन कंटाळा आलेल्या पाहुण्यांसाठी हा खास पदार्थ आहे.