00-lp-devi-logoदागिने हा खास स्रियांचा प्रांत अशी तुमची समजूत असेल तर तुम्ही नक्कीच ‘गया गुजऱ्या जमान्या’तले आहात. हल्लीच्या काळात पुरुषांसाठीही दागिने आहेत आणि हे दागिने घालून पुरुष मिरवतातदेखील.

‘दागिने’ हा शब्द वाचून पान पालटणाऱ्या तमाम पुरुषांनो, जरा थांबा. आज आपण तुमच्याबद्दलच बोलणार आहोत. ‘पुरुषांचे दागिने’ हा मुळात बोलायचा विषय आहे का? फारतर पुराणातील देवांचे दाखले देता येतील, पण आजच्या काळात छे, हे कुठे शक्य आहे. ‘हां.. कधी तरी भिकबाळी घालतो, एखादं ब्रेसलेट किंवा चेन. पण म्हणून दागिन्यांची हौस वगैरे नाही हां.’ असा विचार येऊ शकतो तुमच्या मनात. आणि हो ‘सोन्याचा आणि आमचा दूरवर संबंध नाही,’ अर्थात श्रीमंतीचं दर्शन किंवा कौतुक म्हणून जाडजूड सोन्याच्या चेनपासून सोन्याचे शर्ट मिरविणारे राजकारणी, गर्भश्रीमंत वर्ग हा पूर्णपणे वेगळाच गट, अशी समजूत करून ‘आम्ही नाही त्यातले,’ असा विचार नक्कीच करू शकता. पण हे सगळं करून पुरुष आणि दागिने यांचा आजच्या घडीला काहीच संबंध नाही, असं अजिबात बोलू शकत नाही.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

कुछ हटके

एरवी गळ्यात एक चेन, एखादी अंगठी किंवा ब्रेसलेट हे ज्वेलरीचे प्रकार मुलं वापरतात. पण कानातले डूल, िरग्स, नथनी हे प्रकार मुलांसाठी नवीन नाहीत. मध्यंतरीच्या काळात हातात कडे घालण्याचा ट्रेंड चालू होता. त्यानंतर सलमानचे र्टक्वइश स्टोन असलेल्या सिल्व्हर प्लेटिंग ब्रेसलेटची क्रेझ होती. स्वप्निल जोशीच्या ‘मुंबई पुणे मुंबई’नंतर भिकबाळी घालण्याची फॅशन सुरू झाली. पण सध्या या दागिन्यांसोबतच पारंपरिक खास पारंपरिक टच असलेले दागिनेही या पंक्तीत शिरले आहेत. यात प्रामुख्याने नथनी, कानातले िरग्स, डूल, माळा यांचा समावेश आहे.

10-lp-yuth-jwel

सलमान खान, रणवीर सिंग, हृतिक रोशन म्हणजे आजच्या तरुणाईमध्ये ‘मॅचो मॅन’ या संकल्पनेत बसणारे नायक. सलमानचा ‘प्रेम रतन धन पायो’, रणवीरचा ‘बाजीराव मस्तानी’, हृतिकचा ‘जोधा-अकबर’ या सिनेमांमध्ये तिघांनी मस्त राजेशाही ज्वेलरी कॅरी केली. (‘दागिने घातले तर पोरी हसतील,’ असा विचार पटकन तुमच्या मनात आला असेल, तर आधीच सांगते या तिघांचा हा खास घरंदाज लुक पाहून मुली अधिकच घायाळ झालेल्या.) कुंदन नेकलेस, लांब मोठय़ांच्या माळा, खास राजस्थानी स्टाइल मीनाकारी काम केलेली ज्वेलरी यांनी घातली होती. बाजीराव-मस्तानीमध्ये रणवीरने तर मोठाले कानातले डूलसुद्धा मिरविले होते. ही सिनेमातील किंवा नायकांची उदाहरणे झाली, पण सध्या बऱ्याच लग्नसमारंभात नवरामुलगा शेरवानीसोबत हमखास मोत्यांच्या माळा घालतो. पंजाबी, राजस्थानी लग्नांमध्ये तर नवऱ्याच्या गळ्यातील नेकलेस, माळा हा त्याच्या लुकचा महत्त्वाचा भाग असतो. एरवीही नोकरीला लागल्यावर जमविलेल्या पगारातून स्वत:साठी सोन्याची अंगठी, चेन किंवा लेटेस्ट स्टाइलचं ब्रेसलेट करण्याकडे मुलांचा कल आहे. कित्येक तरुण कॉलेज, ऑफिसला जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या चेन्स, ब्रेसलेट्स याचं मस्त कॉम्बिनेशन करताना दिसतात. बऱ्याचदा साखरपुडय़ाची अंगठी घालणं मुलांना पसंत नसतं, अशा वेळी चेनमध्ये पेंडेंट म्हणून अंगठी वापरली जाते.

हे सगळं झालं फेस्टिव्हल किंवा वेिडग ज्वेलरीबद्दल. पण रोजच्या वापरातील दागिन्यांमध्येसुद्धा विविधता पाहायला मिळते आहे. नुकतंच एका मासिकाच्या कव्हरवर रणवीरचा नाकात नथनी घातलेला फोटो झळकला होता. आयुष्मान खुरानानेही नाकात नथनी घालून एका इव्हेंटला हजेरी लावली होती. िरगच्या आकारातील नथनी सध्या मुलांमध्ये प्रसिद्ध आहे. नाकातली िरग किंवा चमकी सध्या ट्रेंडमध्ये आहे. ९०च्या दशकात गर्लफ्रेंडच्या हट्टापोटी कानात िरग घालणारा ‘फ्रेंड्स’मधला रॉस तेव्हा विनोदाचा विषय ठरलेला, पण आज अभिषेक बच्चन, आमीर खान, अजय देवगण, सलमान खान ही मंडळी कानात िरग, चमकी किंवा खडय़ाचे कानातले घालणं पसंत करतात. ‘ये जवानी है दिवानी’मध्ये रणबीर कपूरने कानात िरग घातली होती. सुरुवातीला कान टोचलेल्या मुलाला चिडविणारे त्याचे मित्रमंडळ आता आवर्जून कान, नाक टोचून ज्वेलरी मिरविताना दिसतात.

निमित्तानुसार वर्गीकरण

गेल्या काही वर्षांत भिकबाळी मुलांमध्ये बरीच लोकप्रिय झाली आहे. छोटी भिकबाळी रोजच्या वापरात सहज घातली जाते. ‘बाजीराव-मस्तानी’नंतर रणवीरची लांब भिकबाळी प्रसिद्ध झाली होती. ती घालायची असेल, तर मात्र सणांचं निमित्त शोधावं लागेल. नवरात्रीच्या दिवसांत गरबा खेळताना चापाचे कानातले डूल कित्येक पुरुष घालतात. गरब्याच्या ठेक्यासोबत हलणारे डूल कडक दिसतात. पण हे डूल एरवी कोणीही वापरणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं, तर दागिने कोणत्या कारणासाठी, कधी, कुठे घालायचे आहेत यानुसार पुरुषांच्या दागिन्यांमध्येही प्रकार आहेत. अर्थात मुलींप्रमाणे प्रत्येक निमित्तानुसार मुलांची दागिन्यांची निवड बदलते. पुरुषांच्या दागिन्यांचे वर्गीकरण करायचे झाल्यास मुख्य तीन गट पडत असल्याचे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे डिझायनर देबाशिष मिश्रा सांगतात. पहिला ‘रेग्युलर वेअर’ म्हणजेच रोजच्या वापरातील दागिने, दुसरा ‘स्टायलिश दागिने’ आणि तिसरा ‘वेिडग ज्वेलरी’. शहरातील फॅशन स्ट्रीटवर चक्कर मारली, तर रेग्युलर वेअरमधील पुरुषांच्या दागिन्यांमधील विविधता पाहायला मिळेल. रोज कॉलेज किंवा ऑफिसला जायला सहज घालता येणारे, ‘मॅनली’, ‘कुल’ या व्याख्यांमध्ये बसणारे दागिन्यांचे प्रकार यात येतात. ब्रेसलेट्स, कडा, पिअìसग स्टड्स, अँकलेट्स हे रेग्युलर वेअर दागिन्यांचे प्रकार आहेत. साधे, स्वस्तात मस्त, पण नजरेत भरणारे, सिल्व्हर फिनिशचे दागिने यात पाहायला मिळतात.

सणसमारंभाच्या निमित्ताने ट्रेंडी पण रुबाबदार दागिने निवडायचे झाल्यास स्टायलिश दागिन्यांचा पर्याय आहे. यामध्ये वेगवेगळे पेंडेंट्स, ब्रेसलेट्स, ब्रोचेस, व्रीस्ट बँड, अंगठय़ा यांचा समावेश होतो. चांगल्या समारंभाला एखादा दागिना घालायचा म्हणजे तो अगदी भरजडीत नको पण अगदी स्ट्रीट मार्केटमधून उचलेला असाही नको असं काहीतरी हवं असतं. अशा वेळी चांदीच्या दागिन्यांना पसंती दिली जाते. अँटिक सिल्व्हर ज्वेलरीही सध्या तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. ब्लॅक डायमंड, प्लॅटिनमच्या ज्वेलरीलाही पुरुषांकडून मागणी आहे. चांदी किंवा प्लॅटिनमचा ओम, स्वत:च्या नावाचं आद्याक्षर त्याला लेदरचा पट्टा असा ब्रेसलेटचा प्रकार पुरुष पसंत करतात.

नावाप्रमाणे वेिडग ज्वेलरी म्हणजे लग्नात घालायचा दागिन्यांचा प्रकार. पूर्वीपासून राजस्थानी, पंजाबी लग्नांमध्ये नवरामुलगा गळ्यात मोत्यांच्या माळा, नेकलेस, हातात अंगठय़ा मिरवतात. फक्त नवरामुलगा नाही तर वऱ्हाडी, नवऱ्याचे भाऊ, मित्रदेखील दागिने घालत. स्त्रियांसोबत पुरुषांनीही दागिने मिरविणे, हे त्यांच्याकडे प्रतिष्ठेचे मानले जाते. हल्ली मराठी लग्नांमध्येही नवरदेवाच्या गळ्यात मोत्यांच्या माळा हमखास पाहायला मिळतात. कुंदनचे हार, टेम्पल ज्वेलरी, राजस्थानी टचचे नेकलेस वेिडग ज्वेलरीमध्ये प्रसिद्ध आहेत. शेरवानी किंवा फेटय़ावरचा ब्रोच हासुद्धा लग्नात भाव खातो.

स्कल, वाघनख…

मुलींच्या दागिन्यांतील मोटीफ म्हटले की फ्लोरल, पेझ्ली प्रकार पाहायला मिळतात. अर्थात पुरुषांच्या दागिन्यांचे मोटीफ वेगळे असतात. सध्या बाजारात स्कल म्हणजेच डोक्याची कवटी हा मोटीफ पुरुषांच्या दागिन्यांमध्ये बराच प्रसिद्ध आहे. सिल्व्हर, हिरे, रंगीत खडे यांचा वापर करून केलेले स्कलच्या वेगवेगळ्या प्रकारांना बाजारात मागणी आहे. हा मोटीफ मुख्यत्वे रेग्युलर वेअर ज्वेलरीमध्ये पेंडेंट म्हणून ब्रेसलेट, चेनमध्ये वापरतात. तसेच कानातल्या स्टडमध्येही यांचा उपयोग होतो. वाघनखे आधीपासून पुरुषांच्या दागिन्यांमध्ये महत्त्वाची मानली जायची. त्यांना शुभही मानलं जायचं. अजूनही चेनमध्ये वाघनखाचे पेंडेंट वापरले जाते. याशिवाय ओम, स्वस्तिकचे चिन्ह, सुपरमॅन, बॅटमॅनचा लोगो, पीसचे चिन्ह, सिंह, तलवार, गरुड हे मोटीफ रेग्युलर वेअर दागिन्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. ‘बजरंगी भाईजान’नंतर गदासुद्धा पेंडेंटमध्ये दिसू लागली. याशिवाय भौमितिक ट्राइबल मोटीफ वेिडग ज्वेलरीमध्ये पसंत केले जातात.

सोन्याचा अँटिक लुक

सोने, चांदीच्या दागिन्यांनासुद्धा तरुणांची पसंती असते. विशेषत: त्यातील अँटिक लुक ते जास्त पसंत करतात. स्टायलिश ज्वेलरीमध्ये प्लॅटिनमसुद्धा तरुण पसंत करतात. याशिवाय मोती, ब्लॅक डायमंड, र्टक्वइश, ओम्ब्रे ग्रीन या प्रेशियस स्टोन्सनासुद्धा तरुणांकडून मागणी आहे. ‘मुलांच्या दागिन्यांमध्ये मुलींप्रमाणे जास्त रंगांचा वापर केलेला नसतो, तरीही हायलाइट्स म्हणून विविध खडे वापरले जातात,’ असे देबाशिष मिश्रा सांगतात.

बदलती लाइफस्टाइल

मुळात इतकी र्वष दागिने, सोने या नावानेच अ‍ॅलर्जी येणारा पुरुषवर्ग दागिन्यांकडे कसा वळतो आहे, हे सांगताना यामागे बदलती लाइफस्टाइल कारणीभूत असल्याचे देबाशिष सांगतात. ‘बिग फॅट इंडियन वेिडग’ची संकल्पना मधल्या काळात तेजीत होती. अशा वेळी संगीत, हळद, लग्न, रिसेप्शन अशा वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी वेगवेगळे लुक्स असावेत अशी मुलींप्रमाणे मुलांचीही इच्छा असते. दागिने यात मदत करतात. ‘हल्लीच्या तरुणाईकडे पसा खेळू लागला आहे. त्यांना स्वत:वर खर्च करायला आवडते. जोधा-अकबरसारखे सिनेमे, त्यातील नायकांचा लुक याचाही प्रभाव तरुणाईवर असतो. त्यातील राजेशाही लुक, घरंदाज अंदाज त्यांना आकर्षति करतो. त्यामुळे त्यांना दागिने आपलेसे वाटू लागले आहेत,’ असे ते नमूद करतात. त्यामुळे अगदी छोटय़ाशा पेंडेंटपासून मोठाल्या नेकलेसपर्यंत वेगवेगळ्या दागिन्यांना पुरुषांचीही मागणी वाढू लागली आहे. अगदी १०० रुपयांच्या स्ट्रीट ज्वेलरीपासून काही लाखांची सोन्याची ज्वेलरी घेण्याला ते पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या फेस्टिव्हल सिझनमध्ये तुमच्यासाठीही एखादा खास ठेवणीतला दागिना घेऊनच टाका.
(छायाचित्र सौजन्य : पीएनजी ज्वेलर्स)
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com