26 February 2021

News Flash

ब्लॅक लाईव्हज मॅटर

'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'ला जगभरातून प्रतिसाद मिळाला.

(Photo | AP)

– सुनिता कुलकर्णी

करोनाचं रामायण सुरू झालं आणि त्याचं महाभारतात रुपांतर झालं असं आपल्याकडेच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी घडताना दिसतं आहे. अगदी अमेरिकादेखील त्याला अपवाद नाही. जॉर्ज फॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसाच्या बुटाखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत पुन्हा ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीने जोर धरला आहे. वंशभेदाला विरोध करण्यासाठी, त्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी ही चळवळ २०१३ मध्ये सुरू झाली असं सांगितलं जातं. अर्थात त्याही आधी बराच काळापासून तिथे गोऱ्यांच्या वर्चस्ववादाविरुद्ध, वंशभेदाविरुद्ध संघर्ष सुरू आहे, पण नागरी हक्कांच्या मागणीसाठी चाललेल्या या लढ्याला आता मानवी हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे.

बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर तिथल्या वंशभेदामध्ये, गोऱ्यांच्या वर्चस्ववादामध्ये फरक पडेल अशी अनेकांना आशा वाटत होती. पण तसं काही घडलं नाही. २०१३ मध्ये फ्लेरिडामध्ये मारल्या गेलेल्या एका १७ वर्षीय कृष्णवर्णीय युवकासंदर्भात अॅलिशिया गार्झ, पॅट्रिक कूलर्स आणि ओपल टोमेट या तिघींच्यामध्ये फेसबुकवर चर्चा सुरू होती. अॅलिशिया गार्झा यांनी लिहिलं, ‘अवर लाईव्हज, मॅटर्स, ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्स’. त्यानंतर लगेचच ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर्स’ या हॅशटॅगने समाजमाध्यमांवर जोर पकडला. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ मध्ये मिसोरी मध्ये एका १८ वर्षाच्या कृष्णवर्णीय मुलाची हत्या झाली. त्याच वर्षी एरिक गार्नर या कृष्णवर्णीय व्यक्तीचा न्यूयॉर्कमध्ये पोलिसी छळामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ चळवळीने जोर पकडला.

‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ हा हॅशटॅग तर तेव्हापासून आजपर्यंत ३० दशलक्ष वेळा वापरला गेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी ‘ऑल लाईव्ह्ज मॅटर’, ‘ब्ल्यू लाईव्ह्ज मॅटर’ हे हॅशटॅगही चालवले गेले आहेत. पण ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ला जगभरातून प्रतिसाद मिळाला.  आता जॉर्ज फॉईडच्या मृत्यूनंतर ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ हा हॅशटॅग अधिक व्हायरल होतो आहे. अमेरिकेत घडलेल्या या घटनेविरोधात युरोपात इंग्लंडमध्ये, पॅरिसमध्येही कृष्णवर्णियांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली यावरून त्याचं लोण किती आणि कसं पसरलं हे लक्षात येतं. जॉर्ज फॉईडच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पोलिसी क्रौर्य जगभरातल्या सगळ्या लोकांना अधिक उद्वीग्न करते आहे.

गेले तीन महिने करोनामुळे जगभरात अनेक ठिकाणी टाळेबंदी लावली गेली आणि त्यामुळे लोकांना एक प्रकारच्या अस्थैर्याला, अनिश्चिततेला, अभावाला, भीतीला तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या कदाचित लक्षात आले असेल की आपल्याला तीन महिनेदेखील सहन होऊ शकत नाही ती सगळी परिस्थिती अमेरिका, युरोपमधले कृष्णवर्णीय लोक आयुष्यभर अनुभवत असतात. आपल्याकडे तर या प्रश्नाला कातडीच्या रंगाचे नाही तर जातीचे अंग आहे. उर्वरित जगात जगात निदान काळे आणि गोरे असा भेद आहे. आपल्याकडे जातीच्या मुद्द्यावर भेदभावदेखील विभागला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 11:45 am

Web Title: george floyd black lives matter nck 90
Next Stories
1 डिअर क्लास ऑफ २०२०…
2 हसू आणणारा करोना
3 रशियन ‘आरोग्य सेतू’चा ताप
Just Now!
X