17 December 2017

News Flash

गोविंदाचा पाऊस

श्रीकृष्ण जन्माच्या आख्यायिकेनुसार कृष्णजन्म झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता.

अमृता अरुण | Updated: August 11, 2017 10:53 PM

श्रीकृष्ण जन्माच्या आख्यायिकेनुसार कृष्णजन्म झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता

ढाक्कुमाकुम,ढाक्कुमाकुम

ढाक्कुमाकुम, ढाक्कुमाकुम

खिडकीतल्या ताई आता वाकू नका

पुढे वाकू नका

दोन पैसे देतो मला भिजवून टाका..

असं म्हणणारा गोिवदा पाण्यात भिजण्यासाठी इतका आतूर असतो की चक्क स्वतच्या खिशातले पैसे द्यायला देखील तयार होतो. आणि अशातच जर का वरूणराजाने कृपा केली तर काही विचारायलाच नको. पैसेही वाचतील आणि हवं तेवढं भिजताही येईल.

दहीहंडी फोडण्यासाठी रात्रंदिवस सराव करून जीवाच पाणी करणारी ही गोिवदापथकं गोपालकाल्याच्या दिवशी सकाळपासून उन्हातान्हाची गल्लीबोळ्यातून हंडी फोडण्यासाठी भटकत असतात. एकमेकांच्या अंगावर चढून थरावर थर रचताना अक्षरश अंगांगातून घामाच्या धारा निघतात. अशावेळी पावसाची एक सरही या गोिवदा पथकांच्या मनाला दिलासा देऊन जाते. त्यांच्या घामाच्या धारेचे रूपांतर पावसाच्या धारेत झालं की हंडय़ा फोडण्यासाठी एक नवीन उत्साह, नवी उमेद त्यांच्या मनात जागृत होते व दहीकाल्याचा आनंद लुटता लुटता ते पावसाचाही आनंद लुटू लागतात.

श्रीकृष्ण जन्माच्या आख्यायिकेनुसार कृष्णजन्म झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. नद्यांना पूर आले होते. विजांचा कडकडाट होत होता आणि अशा वादळी पावसातच वसुदेवाने श्रीकृष्णला नदी पार करून नंदी राजाकडे नेले. याशिवाय कृष्णाच्या राधेसोबतच्या पावसाळ्यातील रासलीलांच्या देखील आख्यायिका आहेत. शिवाय कृष्णाच्या डोक्यावर असलेलं मोरपीस आणि त्याला प्रिय असणारा मोर हादेखील पावसाळ्यातच पिसारा फुलवून नाचतो. यावरूनच श्रीकृष्णाला पाऊस अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. म्हणूनच कृष्णजन्माष्टमीला आणि गोपळकाल्याच्या दिवशी पाऊस पडणे हा चांगला संकेत मानला जातो. पण सध्या मानवाच्या कृत्यामुळे पावसाची एवढी हानी झाली आहे की पाऊस कधीही अवेळी येतो आणि जेव्हा हवा तेव्हा येत नाही. त्यामुळे गोिवदा पथकांना पावसाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी दहीहंडीच्या आयोजकांनी खास कृत्रिम पावसाची सोय गोिवदा पथकांसाठी केलेली असते. लालबाग, ठाणे, गिरगाव इत्यादी ठिकाणी मोठय़ा संख्येने गोिवदापथक एकत्र येतात आणि कृत्रिम पावसाचा वर्षांव त्यांच्यावर केला जातो. बक्षीस नाही मिळालं तरी चालेल पण कृत्रिम पावसाच्या पाण्यात का होईना पण मनसोक्त भिजणं या गोष्टीचा आनंद त्या गोिवदाच्या डोळ्यातून दिसत असतो. पावसामुळे होणाऱ्या चिखलात गोिवदा माखून निघतात पण तो चिखलदेखील त्यांना दहीहंडीच्या दिवशी दहीकाल्यासारखा भासतो. चिखलात लोळून थर लावताना पाय सरकलाजाण्याची शक्यता असते पण तरीदेखील पाऊस मात्र त्यांना हवाच असतो. अशावेळी या गोिवदा पथकांना बघणाऱ्या लोकांनी सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या अंगावर पाण्याच्या पिशव्या किंवा फुगे न टाकता हंडी फोडून झाल्यावर त्यांना प्यायला आणि हातपाय धुवायला पाणि दिले पाहिजे.

पावसात न्हाऊन निघालेला हा गोिवदा दरवर्षी तितक्याच आतुरतेने दहीहंडीची आणि त्याहीपेक्षा गोपळकाल्याच्या दिवशी पडणाऱ्या पावसात भिजण्याची वाट बघत असतो. वर्षांतून येणाऱ्या या एका दिवसाची तयारी गोिवदापथके कितीतरी महिने अगोदरपासून करत असतात. थकूनभागून शाळा-कॉलेजातून,ऑफिसातून घरी येऊन ठरलेल्या वेळी ठरल्या ठिकाणी एकत्र भेटून, एकमेकांच्या सोबतीने, पडत धडपडत, रात्र रात्र जागरण करून, सराव करून अखेर आपलं पथक ते मोठय़ा मेहनतीने तयार करतात. सराव देखील पावसाळ्याच्याच दिसतात असल्यामुळे सराव करताना आलेला पाऊसही जरी त्यांच्या सरावात व्यत्यय आणत असला तरी त्यांना तो आणखी जोमाने सराव करण्यास प्रेरणा देत असतो. पावसाळ्याच्या दिवसात मित्र मत्रिणीसोबत सहलीला जाणं, घरी बसून खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेणं, प्रियकर-प्रेयसी सोबत डेटवर जाणं किंवा भर पावसात चहा-कॉफी, भजी किंवा मक्याचं कणीस खाणं या सगळ्या गोष्टी आनंद तर देतातच परंतु गोपालकाल्याच्या दिवशी आपल्या गोिवदापथकासोबत दिवसभर घराबाहेर राहून पावसाचा मनमुराद आनंद लुटणं आणि हंडी फोडल्यावर हाच आनंद द्विगुणित करणं यातील मज्जा फक्त त्या गोिवदांनाच कळू शकते. श्रीकृष्णाचं पावसाशी असलेलं नातं पथकातील प्रत्येक गोिवदा त्यादिवशी अनुभवत असतो आणि पथकातील बालगोपाल तर गोपालकाल्याच्या दिवशी श्रीकृष्णाचंच जीवन जगत असतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र, घडय़ाळात बाराचे ठोके पडताच घराघरातून ऐकू येणारे ‘बाळा जो जो रे’ चे बोल आणि बाहेर पडत असलेल्या पावसाची रिमझिम जणू पाळण्याच्या सुरात सूर मिसळत असते.

First Published on August 11, 2017 8:00 pm

Web Title: govinda festival 2017 janmashtami 2017 krishna janmashtami 2017 dahi handi festival 2017