18 January 2019

News Flash

राश्यांतर : गुरू, राहू, केतू यांचे राशी परिवर्तन

राहू आणि केतू या दोन ग्रहांविषयी लोकांच्या मनात खूपदा धास्ती असते. २०१८ या वर्षी ते नवीन मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक

राहू आणि केतू या दोन ग्रहांविषयी लोकांच्या मनात खूपदा धास्ती असते. २०१८ या वर्षी ते नवीन मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

आकाशस्थ ग्रह-तारे एका राशीतून दुसऱ्या राशीत त्यांच्या गती व मार्गानुसार भ्रमण करीत असतात. त्यातल्या त्यात गुरू (एका राशीत १३ महिने वास्तव्य), राहू-केतू (एका राशीत १८ महिने मुक्काम) आणि शनी (एका राशीत अडीच वष्रे ठाण मांडणे) राहात असल्याने या चार ग्रहांचे दूरगामी परिणाम काय होणार, याचे ज्योतिष अभ्यासकांना औत्सुक्य, काळजी असते.

मागील वर्षांत २० जून २०१७ रोजी शनीने वृश्चिक राशीत वक्री प्रवेश केला आणि २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पुन्हा तो धनू राशीत मार्गी आला. त्यामुळे या राशी बदलाचा नवीन वर्षांत आपण विचार करणार नाही (कारण हा बदल नसून शनी परत धनूत मार्गी आला आहे.) वर्ष २०१८ मध्ये वृश्चिक-धनू-मकर या तीन राशींना साडेसाती आहे, असो. २०१७ मध्ये खऱ्या अर्थाने मंदगती ग्रहांचे राश्यांतर झाले ते गुरू, राहू व केतू यांचे. हे तिन्ही ग्रह वर्ष २०१८ मध्ये नवीन मुक्कामी राहणार असल्याने त्यांच्या परिणामांचा विचार करणे अगत्याचे ठरले.

दुसरे म्हणजे शनी, मंगळ, गुरू, राहू, केतू यांच्याविषयी समाजात एक प्रकारची धास्ती असते. खरे तर ती अनाठायी असते. देव देवता, ग्रह-तारे हे काही माणसाला छळण्यासाठी टपून बसलेले असतात असे नव्हे. पण काही लोकांनी तसा बागुलबुवा केला आहे. ग्रहांच्या बदलाचे सरसकट सर्वावर होणारे परिणाम एकसारखे नसतात. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगवेगळे परिणाम होतात. तसेच लहान लहान उपायांद्वारे परिस्थिती अनुकूल करता येते.

‘गुरू’ हा शुभ ग्रह असला तरी आपल्याकडे  ‘गुरू कितवा आहे’ हा धास्तावलेला प्रश्न असतो. गुरुबल आहे की नाही याचा लग्न जमवताना विचार करतात. बदलतात तर सगळेच ग्रह. पण गुरू १३ महिने एका राशीत राहात असल्याने त्याच्या बदलाची नोंद घेतली जाते. गुरूची धास्ती घेऊ नये एवढे मात्र खरे. राहू-केतू यांना खलनायक म्हणूनच रंगवले जाते. हे दोघे वक्री गतीने फिरतात व दीड वष्रे एका राशीत राहातात. त्यामुळे त्यांची पण भीती घातली जाते. पण तसे नसून, कुठल्या स्थानात, कुठल्या राशीत, किती अंशावर ते आहेत याचा व्यक्तीपरत्वे अभ्यास करणे यावर लक्ष दिले पाहिजे.

गुरू, राहू व केतूचे राशी परिवर्तन (२०१८ वर परिणाम)

२०१७ च्या १२ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर या काळात काही महत्त्वाचे ग्रह परिवर्तन झाले. ज्योतिषशास्त्राप्रमाणे हा एक मोठा बदल होता. काही महत्त्वाच्या ग्रहांनी एकापाठोपाठ जागा बदलली. हे बदललेले ग्रह २०१८ या पूर्ण वर्षांत नवीन जागी स्थिर राहणार आहेत. म्हणून नवीन वर्षांतील बदल स्थिर व महत्त्वाचे राहतील. १२.०९.२०१७ मंगळवार भाद्रपद कृष्ण ७ ला ६.५६ मिनिटांनी गुरू कन्येतून तूळ राशीत गेला. गुरू हा देवांचा गुरू अर्थात चांगल्या प्रवृत्तीच्या दैवत तर शुक्र्र हा दैत्यांचा गुरू अर्थात विलासी प्रवृत्तीचा ग्रह आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे तिथे गुरूसारखा सात्त्विक ग्रह १३ महिने राहणार आहे. कल्पना करा की एखाद्या दारुडय़ाला एखाद्या दैवी उपासकाबरोबर राहायला सांगितले तर दोघेही सुखी राहणार नाहीत. दोघांची मन:स्थिती खराब होईल. तसाच काहीसा प्रकार या परिवर्तनाने होणार आहे. समाजात बऱ्याच प्रकारची अस्थिरता राहील. जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. देव, धर्म, शास्त्र यांची पण प्रगती होईल. तसेच शस्त्र, अणुबॉम्ब, धार्मिक भावना भडकवणे असे प्रकारही होतील.

गुरू परिवर्तनाचे परिणाम

वृषभ-कर्क-धनू या राशींना गुरू सुवर्णपादांनी येत आहे. या राशींना गुरू चिंता वाढवेल. कुठलेही काम सरळ न होता थोडी अडचण निर्माण करेल. मनस्ताप देईल, मग काम होईल.

मेष-कन्या-मकर या राशींना गुरू रौप्यपादांनी येत आहे जो शुभ लक्षण दाखवतो या राशीच्या आयुष्यात होणाऱ्या घटना शुभ असतील. नवीन विचार व काम सुरू करायला हरकत नाही.

सिंह-वृश्चिक-मीन या राशींना गुरू ताम्रपादांनी येत आहे. जो श्रीमंतीचे लक्षण दाखवतो. या १३ महिन्यांत पसा, फायदा व इच्छीत यश मिळेल. पण काम करणे आवश्यक आहे. नवीन काम सुरू करा, चालू कामात बदल करा, पण जितके कष्ट कराल त्यापेक्षा जास्त मोबदला मिळेल.

मिथुन-तूळ-कुंभ या राशींना गुरू लोहपादांनी येत आहे. जो १३ महिने कष्ट दाखवत आहे. या काळात यश लवकर मिळणार नाही. पण गुरू नुकसान करणार नाही. लोकांपेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. गुरू उपासना व पिवळ्या वस्तूचे दान बरीच मदत करेल.

गुरू कर्क राशीला ४ था, मीन राशीला ८ वा व वृश्चिक राशीला  – १२ वा येत आहे.

या राशींच्या लोकांना लग्न व विविध कार्याकरिता गुरुबळ नसते. तेव्हा योग्य त्या ज्योतिषांना, पत्रिका दाखवावी. गुरू बली होण्यासाठी जप, शांती, यज्ञ, दान असे बरेच प्रकार सुचवले जातात. पण योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे.

गुरू हा देवांचा गुरू आहे. रागावला तरी मारत नाही. सुधारणा मात्र नक्की करून घेतो.

२०१७ चे दुसरे मोठे परिवर्तन हे सप्टेंबरमध्ये  १७ तारखेला झाले ते म्हणजे राहू व केतूचे राशी परिवर्तन. या दिवशी भाद्रपद कृष्ण २ ला राहू सिंहेतून कर्केत गेला तर केतू कुंभेतून मकरेत गेला.

बऱ्याच लोकांना माहीत नसते की राहू व केतू हे नेहमी वक्री (मागे) जातात. दोघांतील अंतर सात घरांचे असते. राहू-केतू हे छायाग्रह आहेत. परिक्रमा करताना पृथ्वी व चंद्र ज्या दोन िबदूंवर एकत्र येतात ते दोन िबदू म्हणजे राहू व केतू.

राहू : राहू हा ग्रह अतिपापग्रह आहे, त्याला ‘यमाचा दरबार’ म्हणतात. तो पूर्ण आयुष्याचा हिशोब ठेवतो. एकीकडे राहू सुडबुद्धी, कपटी, फसवा आहे तर दुसरीकडे (जेव्हा तो उच्चीचा, बलवान व वर्गोत्तम) असतो तो माणसाला मानसन्मान, राजयोग, सांपत्तिक उत्कर्ष देतो;

केतू : शरीराचे डोके सोडून खालच्या भागाचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह केतू आहे. अत्यंत विरक्तवादी व नराश्यवादी व कष्टकरी स्वभावाचा हा ग्रह आहे. केतूवरून होणारी दुखणीही पाहिली जातात. या ग्रहाने प्रभावित व्यक्ती शृंगार, प्रणय व प्रेम याबाबतीत उदासीन असतात. त्यामुळे विवाहास उशीर लागतो. अर्थात इतर ग्रह पण विचारात घ्यावे लागतात.

राहू हा वृषभ, कर्क व धनू या राशीत शक्तिशाली असतो व चांगले फळ देतो. तर वृश्चिक, मिथुन, धनू या राशीत केतू शक्तिशाली असतो व चांगले फळ देतो.

या राशी परिवर्तनाचे परिणाम

मेष – नवीन संधी मिळतील, कामाचे पूर्ण यश मिळेल, पण कष्ट करावे लागतील.

वृषभ – आíथक यश, नवीन कामात यश. निर्णय घेण्यात त्रास व सर्दी-खोकल्याचा विशेष प्रभाव.

मिथुन – विद्यार्थ्यांना चांगला काळ, उपासनेला उत्तम काळ. चोरी व वस्तूंचे नुकसान.

कर्क – धनलाभ होईल. आíथक प्रश्न मार्गी लागतील, चिंता वाढेल. मन काळजीत राहील.

सिंह – परदेशगमन, आíथक उन्नती, व्यापारात लाभ होईल. पण तणाव, वाद, कोर्ट केसेसचा त्रास होईल.

कन्या – विदेश यात्रा, सरकारी फायदे, सरकारी पद मिळेल तसेच संततीसंबंधी त्रास, कष्ट व पसा खर्च करावा लागेल.

तूळ – नोकरी मिळेल, पदोन्नती व बदलीचे योग आहेत. द्विधा मन:स्थिती राहील, नीट सल्ला घेऊन निर्णय घ्या.

वृश्चिक – सुरुवातीचे काही महिने त्रास होईल, पण नवीन वर्षांची सुरुवात चांगली होईल. वर्षभर यश मिळत राहील. आíथक प्रश्न सुटतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

धनू – प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना यश, शत्रूचा त्रास कमी होईल. जुनी दुखणी बरी होतील.

मकर – तब्येतीसंबंधी त्रास वाढतील. वाद-विवाद विकोपाला जातील, प्रवास योग येतील व त्यातून फायदा होईल. आध्यात्मिक उन्नतीचा काळ आहे.

कुंभ – सुखसमृद्धी मिळेल. चिंता कमी होतील, शत्रू व रोगाचा नाश होईल. लग्न जमण्यास त्रास होईल.

मीन – गाडी, बंगला पसा यश काहीही मागा मिळेल. ताण, द्वेष व दगदग वाढेल, शांत डोक्याने काम करा. दान देणे या काळात योग्य असते.

२०१७ या वर्षी झालेल्या मोठय़ा बदलात २६ ऑक्टो २०१७ रोजी शनी मार्गी झाला. अर्थात शनी वक्री होऊन तुळेत काही महिन्यांकरता आला होता तो वृश्चिकेत जाऊन परत मार्गी झाला.

वृश्चिक-धनू-मकर या तीन राशींना साडेसाती चालू झाली आहे. वरील बदल क्रमप्राप्त आहेत, ते होणारच. आपण रोज कुलदेवतेची उपासना, गुरूची उपासना करणे आवश्यक आहे. रोज रात्री झोपण्याआधी आपल्या इष्ट देवतेला धन्यवाद म्हणा व नवीन दिवस चांगला जाण्याची प्रार्थना करा.

सारांश

ग्रहचक्र आणि ऋतुचक्र यांचे बदल नसíगकच आहेत. कुठलाही बदल हा माणसाचा नाश करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी होत नाही. प्रत्येक बदल हे आयुष्यात नवीन काही तरी घडवण्यासाठी  होत असतात. याला आपण ‘करेक्शन पीरियड’ म्हणत असतो. ग्रह बदलांची धास्ती न घेता त्यास सकारात्मक पद्धतीने घ्या  व आपल्या आधुनिक आयुष्याशी सुसंगत असे सरळ, सोपे, साधे उपाय करा. उपासावर भर न देता उपासनेवर भर द्या. उपास ही शारीरिक शुद्धी तर उपासना ही मानसिक शुद्धी आहे. मानसिक शुद्धी जास्त महत्त्वाची असते असे मला वाटते.
मनीषा देशपांडे – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 29, 2017 1:02 am

Web Title: guru rahu ketu transit 2018 effect on your zodiac signs