आइस्क्रीम्स हा उत्कृष्ट थंड आणि गोड पदार्थ. आबालवृद्धांमध्ये अत्यंत प्रिय पदार्थ. उन्हाळ्यात तर फारच लोकप्रिय पण सर्वच मोसमांमध्ये याचे सेवन केले जाते. दूध आणि फळे वापरून अनेक पद्धतीने करता येते. दोन, तीन, चार निरनिराळे स्वाद एकत्र करूनही तयार करता येते.

साधारणपणे सर्व आइस्क्रीम्ससाठी एकाच प्रकारचे प्राथमिक मिश्रण (बेस) वापरले जाते.

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

आइस्क्रीम बनवताना पाळावयाचे काही नियम :

दूध नेहमी रूम टेम्परेचरला असावे.
वापरण्याची भांडी पूर्णपणे कोरडी असावीत.
आइस्क्रीम ठेवण्यापूर्वी फ्रीझर एक तास कमीत कमी तपमानावर ठेवा.
आइस्क्रीमचा डबा त्याचा तळ फ्रीझरला पूर्ण स्पर्श करेल असा ठेवावा.
गारवा नीट येण्यासाठी बेस पाव-पाव लिटरच्या डब्यांमधे ठेवावा.
बेस दगडाप्रमाणे घट्ट करावा.
सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त कॉर्नफ्लोर घेऊ नये.
आइस्क्रीमचा डबा कायम कोरडा राहील याची पूर्ण काळजी घ्या. अन्यथा सुटणाऱ्या पाण्यामुळे खडे होतील.

आइस्क्रीम बेस

साहित्य :

फुल क्रिम दूध अर्धा लीटर (कच्चे न तापवलेले), कॉर्नफ्लोर दीड टेबलस्पून, जीएमएस (G.M.S.) पावडर* (Softner) दीड टेबलस्पून,  अल्जिनेट** किंवा सीएमसी   (C.M.C.) आइसक्रीम स्टेबिलायझर पाव टी स्पून, साखर ८ टेबलस्पून

कृती :

१. एका भांडय़ात दूध घ्या आणि त्यात सर्व जिन्नस घाला. ते सर्व नीट विरघळू द्या.
२. नंतर गॅसवर गरम करीत ठेवा. सतत ढवळत राहा. उकळी आल्यावर गॅस बारीक करा आणि १-२ मिनिटे ढवळत राहा. नंतर गॅस बंद करा. गॅसवरून उतरून चांगले थंड होईपर्यंत सतत ढवळत राहा. या वेळी साय येऊ न देणे हे अतिशय महत्त्वाचे असून सतत ढवळून याची नीट काळजी घ्या.
३. हे बेसिक आइस्क्रीमचे मिश्रण तयार झाले.
४. हवाबंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे भरून ते फ्रीझरमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवा. साधारणपणे सेट होण्यास निदान आठ तास तरी लागतात.

आइस्क्रीम बेस (अंडं वापरून)

साहित्य :

चार अंडय़ाचे पिवळे बलक, साखर २/४ कप, दूध दीड कप (फुल क्रीम), व्हॅनिलाइसेन्स २ चमचे, फ्रेशक्रीम दीड कप

कृती :

१. प्रथम अंडय़ाचे पिवळे बलक आणि साखर एकत्र करून लिंबू कलर येईपर्यंत घुसळा.
२. एका पसरट भांडय़ामध्ये दूध घेऊन व्हॅनिला इसेन्स घालून मंद आचेवर गरम करा. एक उकळी आल्यावर गॅस बंद करा.
३. एक कप गरम दूध घेऊन अंडय़ाच्या मिश्रणामध्ये हाताने घुसळत मिक्स करा. यामुळे अंडी थोडी गरम होऊन पुढील प्रक्रिया करताना दही (Curdling) होत नाही.
४. नंतर हे अंडय़ाचे मिश्रण पसरट भांडय़ांमधील दुधामध्ये हळुवारपणे घाला.
५. गॅस पुन्हा सुरू करून लहान आचेवर गरम करावे. स्पॅचुल्याला थोडेसे चिकटेल इतके घट्ट होईपर्यंत उकळा.
६. नंतर गाळून यामध्ये फ्रेश क्रीम घाला व नीट घुसळून घ्या. थंड करून फ्रीझरमध्ये सेट करा.

टीप :

जीएमएस पावडर म्हणजे ग्लिसेरॉल मोनोस्टिअरेट. हे रसायन आइस्क्रीमला फेस आणून हलके बनवण्याची क्रिया पार पाडते.

अल्जिनेटमध्ये पोषक तंतूंचे गुणधर्म असून ते समुद्रातील वनस्पतींवर सापडते. हे आइस्क्रीमचा फेसाळपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. अल्जिनेटऐवजी सीएमसी (काबरेक्सि मिथाइल सेल्युलोज) वापरले तरीही चालते.

आइस्क्रीममध्ये ताजी फळे वापरताना आधी त्यांचा पल्प बनवणे अतिशय आवश्यक आहे. ताजी फळे नुसती वापरल्यास त्यांना पाणी सुटत राहून आइस्क्रीमचा फेसाळपणा कमी होतो. या सुटलेल्या पाण्याचा  शेद (बर्फ) होऊन त्याचे खडे तयार होतात.

कोल्ड कॉफी विथ कॉफी आइस्क्रीम

साहित्य :

थंड दूध १ ग्लास, फ्रेश क्रीम अर्धी वाटी, व्हॅनिला आइस्क्रीम २ स्कूप, इन्स्टंट कॉफी ३ चमचे, कॉफी आइस्क्रीम २ स्कूप (कृति वेगळी दिलेली आहे)

कृती :

कॉफी आइस्क्रीम सोडून बाकी सर्व घटक एकत्र करून मिक्सरमध्ये नीट घुसळून घ्या. मोठय़ा उभ्या ग्लासमध्ये ओतून त्यावर कॉफी आइस्क्रीमचे २ स्कूप घालून थंड सव्‍‌र्ह करा.

स्ट्रॉबेरी आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लिटर, फ्रेश क्रीम अर्धा कप, स्ट्रॉबेरी इसेन्स अर्धा टी स्पून, स्ट्रॉबेरी कलर अर्धा टी स्पून, स्ट्रॉबेरी पल्प १ कप

कृती :

१.     एका भांडय़ात आइस्क्रीम बेस घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा व हॅण्ड मिक्सरने हाय स्पीडवर थोडेसे घुसळा नंतर फ्रेश क्रीम घाला व चांगले घुसळा.
२.     इसेन्स, कलर घालून चांगले फेसाळा. नंतर परत स्ट्रॉबेरी पल्प घालून परत चांगले फेसाळवा आणि फ्रीझरमध्ये सेट करत ठेवा.

स्ट्रॉबेरी – बेसिल फ्रोझन योगर्ट

साहित्य :

फ्रेश स्ट्रॉबेरी २ कप कापून तुकडे केलेले, साखर १ कप, बेसिलची (तुळस) पाने २ टेबल स्पून (बारीक कापलेली), लिंबाचे झेस्ट १ टी स्पून,  घट्ट दही १ कप, फ्रेश क्रीम १ कप

कृती :

१.     प्रथम एका बाउलमधे स्ट्रॉबेरी आणि साखर साधारण ३० मिनिटे मिसळून ठेवा. नंतर त्यामधे बेसिल आणि लेमन झेस्ट घालून मिक्सरमधे स्ट्रॉबेरी बारीक होइपर्यंत मिक्स करा.
२.     दही आणि क्रीम मिक्स करून वरील मिश्रणात नीट एकत्र होइपर्यंत मिसळा आणि १ तास थंड करून फ्रीझरमधे ठेवा.

व्हॅनिला आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लीटर  ८ व्हॅनिला इसेन्स दीड टी स्पून, फ्रेश क्रीम अर्धा कप (शक्यतो घरचे क्रीम वापरा)

कृती :

१.     एका भांडय़ात आइस्क्रीम बेस घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा व हॅण्ड मिक्सरने हाय स्पीडवर घुसळा. नंतर त्यात क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घाला. घुसळत रहा. मिश्रण चांगले फेसाळेपर्यंत घुसळा. मिश्रण नीट फेसाळल्यावर एका हवाबंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये सेट करण्यास ठेवा.
२.     साधारण आठ तास सेट होण्यास लागतील. सेट झाल्यावर व्हॅनिला आइस्क्रीम तयार. चॉकलेट सॉस आणि चेरीने सजवून सव्‍‌र्ह करा.

बटरस्कॉच आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लीटर, फ्रेशक्रीम अर्धा कप, बटरस्कॉच इसेन्स अर्धा टी स्पून्स, लेमन यलो कलर पाव टी स्पून, अक्रोड/बदामाचे तुकडे अर्धा कप, साखर ४ टेबलस्पून, साजुक तूप थोडेसे

कृती :

१.     प्रथम थोडय़ाशा तुपावर अक्रोड किंवा/आणि बदाम तळून घ्या.
२.     साखर एका पॅनमध्ये घालून गॅस सुरू करा. साधारण ब्राउन झाल्यावर त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट घाला आणि चिक्कीचा रंग आल्यावर एका ताटलीत पसरून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर कुटून बारीक तुकडे करा.
३.     आइस्क्रीम बेस बारीक तुकडे करून थोडेसे घुसळा. नंतर फ्रेश क्रीम आणि इसेन्स घाला व नीट घुसळून फेसाळून घ्या. नंतर त्यात वरील चिक्की घालून परत थोडे घुसळून फ्रीझरमध्ये सेट करीत ठेवा.

कॉफी आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लीटर, फ्रेशक्रीम अर्धा कप, इन्स्टंट कॉफी २ टी स्पून, रम किंवा व्हॅनिला इसेन्स १ चमचा

कृती :

१.     आइस्क्रीम बेसचे बारीक तुकडे करून थोडेसे घुसळा नंतर फ्रेश क्रीम, इसेन्स आणि कॉफी घाला व चांगले फेसाळेपर्यंत घुसळा.
२.     सेट होण्यासाठी फ्रीझरमधे ठेवा. कोन, कप किंवा कोल्ड कॉफीबरोबर सव्‍‌र्ह करा.

फालुदा

साहित्य :

व्हॅनिला आईस्क्रिम २ कप, फालुदा शेव १ कप, गुलाबाचे सरबत, ताजे क्रीम अर्धा कप, दूध १ लीटर, गुलाब इसेन्स २ छोटे चमचे, बदाम व पिस्ते अर्धा कप, साखर ४ चमचे, सब्जा अर्धा वाटी (पाण्यात भिजवलेला)

कृती :

१.     दुधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब इसेन्स टाकून थंड करत फ्रीझमध्ये ठेवा.
२.     सव्‍‌र्ह करताना एका उभ्या ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालुदा, शेवया आणि सब्जा टाका त्यावर थंड केलेले दूध टाका.
३.     किंवा यांमध्ये तुम्हाला आवडणारा आइस्क्रीम फ्लेवर, इसेन्स घालून त्याची चव वाढवू शकता.

पायनॅपल आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लीटर, फ्रेशक्रीम अर्धा कप, पायनॅपल इसेन्स अर्धा टी स्पून, लेमन यलो कलर अर्धा टी स्पून, पायनॅपल पल्प १ कप

कृती :

१.     एका भांडय़ात आइस्क्रीम बेस घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा व हॅण्ड मिक्सरने हाय स्पीडवर थोडेसे घुसळा नंतर फ्रेश क्रीम घाला व चांगले घुसळा.
२.     इसेन्स, कलर घालून चांगले फेसाळा. नंतर परत पायनॅपल पल्प घालून परत चांगले फेसा आणि फ्रीझरमध्ये सेट करत ठेवा.

चॉकलेट फ्रोझन योगर्ट विथ कॅरॅमलाइझ्ड बनाना

साहित्य :

पांढरे लोणी २ टेबल स्पून, पिकलेली केळी २ मोठी अर्धा इंच जाडीचे तुकडे करून, ब्राउन शुगर २ टेबल स्पून, रम इसेन्स १ टेबल स्पून दूध अर्धा कप आणि ३ टेबल स्पून वेगळे, कोको पावडर अर्धा कप, साखर पाऊण कप, मीठ १ चुटकी, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, घट्ट दही सवा कप, चॉकलेट अर्धी वाटी, केळ १

कृती :

१.     एका नॉनस्टिक पॅनमध्ये लोणी विरघळवून त्यावर केळ्याचे काप नीट पसरून ठेवा. त्यानंतर त्यावर ब्राउन शुगर पसरून मंद आचेवर गरम करत ठेवा. त्यामध्ये केळी नीट कॅरॅमलाइज होऊ द्या (साधारण ८ मिनिटे). एकदा उलटवा. त्यानंतर गॅस बंद करून त्यावर रम इसेन्स टाकून उरलेली ब्राउन शुगर विरघळवा. यातील साधारण पाऊण भाग केळी काढून घेऊन मिक्सरमध्ये २ टेबल स्पून दूध घालून मिक्स करून त्याची प्युरी बनवा. एका बाउलमध्ये काढून फ्रीझमध्ये चिल करा.
२.     दुसऱ्या एका बाउलमध्ये कोको, साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि उरलेले अर्धा कप दूध दह्यमध्ये घालून व्हिस्कने एकत्र करा. त्यानंतर थंड केलेली केळ्याची प्युरी मिक्स करा.
३.     शेवटी हे सर्व त्यामध्ये कापलेली केळी आणि चॉकलेटचे तुकडे मिसळून एअर टाइट कंटेनरमध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवा.

मँगो आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लीटर, फ्रेश क्रीम अर्धा कप, मँगो इसेन्स अर्धा टी स्पून, यलो कलर अर्धा टी स्पून, मँगो पल्प १ कप, सजावटीसाठी आंब्याच्या बारीक फोडी

कृती :

१. एका भांडय़ात आइस्क्रीम बेस घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा व हॅण्ड मिक्सरने हाय स्पीडवर थोडेसे घुसळा नंतर फ्रेश क्रीम आणि इसेन्स घाला व चांगले घुसळा.
२. इसेन्स, कलर घालून चांगले फेसाळा. नंतर परत मँगो पल्प घालून परत चांगले फेसाळा आणि फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवा. फ्रेश आंब्याच्या बारीक कापलेल्या फोडी घालून सव्‍‌र्ह करा.

जिंजर लाइम आइस कँडी

साहित्य :

साखर २ कप, पाणी २ कप, आले १२५ ग्रॅम (बारीक चिरलेले), पुदिना २ टेबल स्पून बारीक चिरलेला, लिंबू झेस्ट काढलेले आणि रस

कृती :

१. प्रथम एका पसरट भांडय़ामध्ये पाणी आणि साखर घेऊन मंद आचेवर विरघळवा नंतर त्यामधे आले आणि पुदिना घालून मंद उकळी आणा. गॅस बंद करून साधारण २० मिनिटे थंड करा.
२. वरील एक कप सिरपमधे दीड कप पाणी, िलबाचा रस आणि झेस्ट घालून आइसक्रीम कँडीच्या मोल्डमध्ये घालून फ्रीझरमधे ठेवून नंतर कँडी सव्‍‌र्ह करा.

टीप : उरलेले सिरप साधारणपणे १५ दिवस फ्रीजमध्ये चांगले राहाते. हे एक छान थंड एनर्जी िड्रकसुद्धा आहे.

केशर पिस्ता आइस्क्रीम

साहित्य :

आइस्क्रीम बेस अर्धा लिटर, फ्रेश क्रीम अर्धा कप, लेमन यलो किंवा केशरी रंग पाव टी स्पून, केशर इसेन्स अर्धा टी स्पून, केशर १ चिमूट (अर्धा टेबलस्पून दुधामध्ये भिजवून), पिस्ते पाव कप (बारीक तुकडे केलेले)

कृती :

१.     एका भांडय़ात आइस्क्रीम बेस घेऊन त्याचे बारीक तुकडे करा व हॅण्डमिक्सरने हाय स्पीडवर घुसळा. २. नंतर त्यात क्रीम, इसेन्स, रंग आणि केशर घाला. घुसळत राहा. मिश्रण चांगले फेसाळेपर्यंत घुसळा.
२.     मिश्रण नीट फेसाळल्यावर त्यात पिस्त्याचे तुकडे मिसळा आणि एका हवाबंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये सेट करण्यास ठेवा.
३.     साधारण आठ तास सेट होण्यास लागतील. सेट झाल्यावर केशर पिस्ता आइस्क्रीम तयार.

आइस्क्रीम केक

साहित्य :

स्पॉन्ज केक १, चॉकलेट चिप्स जरुरीपुरत्या, आइस्क्रीम फेसाळलेले फ्रिझरमध्ये ठेवण्यापूर्वीचे, इतर सजावटीचे साहित्य, ताज्या फळांचे तुकडे

कृती :

१.     प्रथम एक चाळणीची िरग जाळी काढून घ्या. एका पॉलिथिन किंवा बेकिंग पेपरवर ठेवा.
२.     त्या रिंगमध्ये स्पॉन्ज केक ठेवा साधरण अर्धा इंचांचा परीघ आत मोकळा ठेवा.
३.     केकवर चॉकलेट चिप्स किंवा ताज्या फळांचे तुकडे घाला.
४.     दिलेल्या आइस्क्रीमपकी योग्य ते आइस्क्रीम घेऊन ते सर्व बाजूंनी आणि वरती साधारण १ ते १.५ इंचांचा थर होईल इतके ओता आणि फ्रिझरमध्ये घट्ट करण्यसाठी ठेवा. जर दोन थर हवे असतील तर ठेवलेला पहिला थर नीट सेट झाल्यावर बाहेर काढून त्यावर केक ठेवून परत आइस्क्रीमचा थर घाला आणि परत सेट होण्यासाठी  ठेवा.
५.     आइस्क्रीम सव्‍‌र्ह करताना त्यावर इतर सजावटीचे जिन्नस आणि चॉकलेट किंवा ताज्या फळांचे तुकडे घाला.

टीप :   केक आणि आइस्क्रीम यांची निवड एकमेकांना पूरक असावी. उदा. चॉकलेट केक वापरल्यास व्हॅनिला आइस्क्रीम वापरावे. ज्यामुळे काप केल्यावर वेगळे वेगळे रंग आणि थर दिसतील.

निरनिराळ्या फळांचे पल्प

इतर फळांची आइस्क्रीमदेखील इथे दिली आहेत तशीच करावी. फक्त त्यांचे पल्प वेगवेगळ्या प्रकारे करावेत. त्यांची पद्धत खाली दिली आहे. आइस्क्रीम करताना इसेन्स आणि रंग फळांच्या स्वाद आणि रंगानुसार बदलावा आणि योग्य ते वापरावेत. सर्व पल्प फ्रिजमध्ये ठेवून थंड करून वापरावेत.

स्ट्रॉबेरी पल्प

२ डझन स्ट्रॉबेरीचे मोठे तुकडे करा. ३ टेबलस्पून साखर घालून उकळवा. त्यानंतर त्यात पाव टी स्पून लाल रंग आणि पाव टी स्पून स्ट्रॉबेरी इसेन्स घाला.

किलगड पल्प

४ कप किलगड, ४ टेबलस्पून साखर व १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर उकळवा व त्यात पाव टी स्पून लाल रंग घाला.

पायनॅपल (अननस) पल्प

एका अननसाचे बारीक तुकडे करून त्यात पाऊण कप साखर आणि पाव कप पाणी घालून उकळा आणि अननस शिजवा.

लिची पल्प

२ डझन लिचीचे बारीक तुकडे करा व त्यात अर्धा कप साखर, अर्धा पाव कप पाणी घालून लिची शिजेपर्यंत उकळवा. नंतर त्यात पाव टीस्पून लिची किंवा मिक्सफ्रुट इसेन्स घाला.

सीताफळ पल्प

१ किलो सीताफळ (बिया काढून), ३ टेबलस्पून साखर घालून उकळवा.

चिक्कू पल्प

६ ते ७ चिक्कूंची साले काढून बारीक तुकडे करा व त्यात २ टेबलस्पून साखर घालून उकळवा. त्यात पाव टी स्पून चॉकलेट कलर घाला.

पपया पल्प

३ कप पपया व ३ टेबलस्पून साखर एकत्र उकळवा. त्यात पाव टी स्पून पिवळा रंग आणि पायनॅपल इसेन्स घाला.

काला जामुन (जांभूळ) पल्प

५०० ग्रॅम काला जामुन बिया काढून ३ टे. साखर घालून उकळवा.

मँगोपल्प

३ ते ४ बारीक कापलेले आंबे आणि ३ टेबलस्पून साखर घालून उकळवा.

शहाळ्याची मलई पल्प

४ शहाळ्यांची बारीक कापलेली मलई आणि ३ टे. स्पून साखर घालून उकळवा.

केळा पल्प

३ ते ४ बारीक चिरलेली वेलची केळी आणि १ टे. स्पून साखर घालून उकळा. पाव टी स्पून केशर इसेन्स व पाव टी स्पून  पिवळा रंग घाला.

द्राक्ष पल्प

अर्धा किलो बिया नसलेली द्राक्षे, मिक्सफ्रुट इसेन्स व ४ टे. स्पून साखर एकत्र उकळवा.

संत्रा पल्प

४ संत्री साले व बिया काढून, मिक्सफ्रुट इसेन्स व ४ टे. स्पून साखर घालून उकळवा.

अंजीर पल्प

१ डझन अंजिरांची साल काढून बारीक तुकडे करा व त्यात ३ टेबलस्पून साखर घालून उकळवा आणि त्यात पाव टी स्पून लाल रंग घालावा.

चॉकलेट आइस्क्रीम

साहित्य :

दूध अर्धा लिटर, जीएमएस पावडर १ टे. स्पून, अल्जिनेट १/८ टी स्पून, साखर ८ टे. स्पून, कोको पावडर १ टे. स्पून, व्हॅनिला कस्टर्ड पावडर अर्धा टे. स्पून, ड्रिंकिंग चॉकलेट १ टे. स्पून, फ्रेश क्रीम अर्धा कप (एकदम शेवटी घुसळताना घालणे.)

कृती :

१.     क्रीमखेरीज बाकी सर्व जिन्नस एकत्र करून उकळी आणा. हा बेस थंड करून फ्रीझरमधे ठेवून द्या.
२.     घट्ट झाल्यावर बारीक तुकडे करून थोडेसे घुसळा नंतर फ्रेश क्रीम घाला व चांगले फेसाळेपर्यंत घुसळा.
३.     परत सेट होण्यासाठी फ्रीझरमधे ठेवावर चॉकोचिप्स किंवा चॉकोफ्लेक्स घालून सव्‍‌र्ह करा.
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com