08 March 2021

News Flash

निर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण!

अतिनील किरणांच्या साहाय्याने विषाणूंचा नाश करणारं हे उपकरण संपूर्ण खोलीभर सहज फिरवता येतं.

-जय पाटील
टाळेबंदी शिथील झाल्यापासून हातात जंतुनाकशकांचे फवारे घेऊन वाहनं, दुकानं, कार्यालयांचं निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. पण खूप मोठ्या जागेचं निर्जंतुकीकरण करायचं असेल तर? आणि द्रव जंतुनाशकांमुळे बिघडू शकतील, अशी उपकरणं तिथे असतील तर? आयआयटी मुंबईने या प्रश्नांवर उत्तर शोधलं आहे.

आयआयटीतल्या संशोधकांच्या चमूने पोर्टेबल यूव्ही सॅनिटायझर तयार केलं आहे. अतिनील किरणांच्या साहाय्याने विषाणूंचा नाश करणारं हे उपकरण संपूर्ण खोलीभर सहज फिरवता येतं. खोलीच्या कानाकोपऱ्यांत लपलेल्या विषाणूंचाही नाश करून जागा पूर्णपणे निर्जंतूक करतं. जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अंबरीश कुंवर आणि प्राध्यापक किरण कोंडबागिल यांनी हे उपकरण विकसित केलं आहे. सध्या ते आयाआयटी- बी च्या रुग्णालयातल्या विविध उपकरणांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलं जात आहे.

हेच यंत्र रोबोटिक स्वरूपात उपलब्ध करण्याच्या दृष्ट्नेही पावलं उचलण्यात आली आहेत. रोबोटिक स्वरूपातलं यंत्र अधिक प्रभावी ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. विमानं, बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचं आणि विमानतळं, मॉल्स, हॉटेलसारख्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते वापरता येणार आहे. उपकरणाला रोबिटका स्वरूप देण्यासाठी आयआयटीच्याच सिस्टिम अ‍ॅण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटरची मदत घेण्यात येत आहे.

यात निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचा वापर करण्यात येतो. ही किरणं मानवी शरीराला अपायकारक असल्यामुळे माणसं नसलेल्या जागेतच हे यंत्र वापरता येतं. त्याला दूरून दिशा देता येते (रिमोट कंट्रोल). कर्मचारी स्वतः उपस्थित राहून निर्जंतुकीकरण करणार असतील, तर त्यांना या किरणांपासून सुरक्षित ठेवणारी वैयक्तिक सुरक्षा साधनं वापरावी लागतात. कोविड काळात निर्माण झालेल्या अनेक लहानमोठ्या समस्यांवर आयआयटीने उत्तरं शोधली आहेत. यूव्ही सॅनिटायझरमुळे त्यात आणखी एका उत्तराची त्यात भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 11:54 am

Web Title: iits new tool for disinfection msr 87
Next Stories
1 कोणे एके काळी…
2 बालक-पालक दोघेही प्रतिक्षेत…
3 आनंदद्रव्यासाठी रांगा लावणारा आनंदी लोकांचा देश
Just Now!
X