विदेह

नचिकेत

‘असं का पण? का? स्त्रीच का दु:खाचं मूळ? तीच का अशांततेचं कारण? तिला सोडाल तर मुक्ती मिळेल? स्वर्गप्राप्ती होईल आणि  अप्सरा मिळतील.. त्या स्त्रिया नाहीत काय? त्यांची प्राप्ती पुण्यप्राप्ती आणि पृथ्वीवर आपल्या बायकोवर प्रेम म्हणजे पाप! कुठला न्याय हा नचिकेत?’ थरथरत्या आवाजात ती कडाडली. आकाशात चमकलेल्या विजेसारखे तिचे डोळे क्षणार्धात ओलेचिंब झाले आणि खळकन बरसले. लेणींतील कुंद वातावरण ढवळून निघालं.

‘शब्बो व्हॉट रबिश! जास्त बोलू नकोस.. मिस्टर देशपांडे, आय एम सॉरी, प्लिज डोन्ट माइण्ड. प्लिज कंटिन्यू..’ अश्फाकची मृदू विनंती नचिकेतला ऐकू आली. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरून तो आश्चर्याने शबनमकडे पाहू लागला. पाझरणारे डोळे सावरत ती उत्तराची वाट पाहात होती.

‘येस.. म्हणजे तुमचा प्रश्न रास्त आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत स्त्रियांचं स्थान तर फार मानाचं होतं. सातवाहन राजे तर मातृसत्ताक होते. पण या कथेचं म्हणाल तर कथाकाराचा तसा काही इरादा नसावा. आपला काहीतरी गरसमज झालेला दिसतो मॅडम.’ असे म्हणत  तिची नजर टाळत नचिकेत पुढे सरकला. त्याला स्वत:लाच न आवडणाऱ्या गाइडच्या वरच्या पट्टीत त्याने पुढच्या िभतीवरील जातक सुरू केलं.

गाइिडग करायला लागल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. नेहमी तो बोलायचा, लोक ऐकायचे. आत्ताही शबनमने एवढं मनावर घेण्याजोगं काय होतं हेच त्याला कळत नव्हतं. खरं तर शबनमकडे तो पाहायचंच टाळत होता. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर काही क्षण तो नजर हटवू शकला नव्हता. सावळाराणी, ठेंगणी ठुसकी! कमरेपर्यंत केस, गोलसर गोड चेहरा, मोहक जिवणी आणि काळासावळा मखमली वर्ण! तो क्षणार्धात काही र्वष मागे गेला. भूतकाळातल्या सावळ्या आठवणी दाटून आल्या, पण सुर्वे सरांच्या शब्दांनी तो जागा झाला. ‘सर, बौद्ध स्थापत्याचा नचिकेतचा विशेष अभ्यास आहे, तो आमच्याकडचा सर्वात तरुण आणि हुशार गाइड !  नचिकेत, हे बांगलादेश हाय कमिशनचे प्रमुख मिस्टर अश्फाक परवेझ आणि या मिसेस परवेझ, या बौद्ध सांस्कृतिक अवषेशांचा अभ्यास करतायत.’ हस्तांदोलन करत साशंक नजरेने अश्फाक म्हणाला,

‘मिस्टर सुर्वे, आर यू शुअर? फारच लहान वाटतोय हा. दुसरं कोणी सीनियर नाही का?’

‘यु वोन्ट रिग्रेट सर’, सुर्वे हसतच म्हणाले.

नचिकेतला खरं तर तिडीकच आली होती, पण तेवढय़ात अवघडलेल्या शांततेला बाजूला सारत एक मधाळ आवाज आला, ‘मिस्टर नचिकेत, व्हेरी अनयुज्वल नेम. यू मे कॉल मी शबनम. तीन दिवस फार कमी होतील का? अश्फाकच्या व्यग्र वेळापत्रकातून कसेबसे तीन दिवस मिळाले, खरं तर जास्त वेळ काढून मी एकटीच येणार होते.’ अश्फाककडे पाहात तिची नजर टाळत तो म्हणाला, ‘नाही मॅडम, पुरेसे होतील, तसे तर काही लोक काही तासांमध्ये उरकतात. पण एक दिवस तसा पुरेसा असतो.’ अश्फाक तिचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘सी आय वॉज टेिलग यू, यू. एस. कॉन्सुलेटकडून आमंत्रण होते, पण तुला इथं यायचं होतं.’ ‘अश्फाक, वी स्पोक अबाऊट धिस. यू कॅरी आऊट.’ ती गुरगुरली. नचिकेत आणि सुर्वे थोडे अवघडले. तेवढय़ात शबनमने दोघांनाही जेवायचं आमंत्रण दिलं. सुर्वे दोघांनाही गाडीपर्यंत सोडून आले. नचिकेत ऑफिसमध्येच बसून होता. परत येताच नचिकेतच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. ‘बाळ यात चिडण्यासारखे काहीच नव्हते. तुला मी फक्त गाइड म्हणून बोलवत नाही, तू विश्वासातला आहेस. डिपार्टमेंटने केलेली कामंपण तू अभिमानाने दाखवतोस. परदेशी पाहुणे आहेत, व्यवस्थित सांभाळून घे आणि सहा नंबरचं फसाडचं काम नक्की दाखव. आणि बिल ऑफिसच्या नावाने पाठवून दे..’ नचिकेतने थोडी नाराजीनेच मान हलवली, सुव्र्याशी हात मिळवून तो बाहेर पडला.

फाईव्ह स्टार हॉटेलची चायनीज रूम थोडी छोटी, पण कोझी होती. सावळाराणी आल्याने मनावरचं थोडंसं आबुट (मळभ, ढग) दूर झालं. तो पुढे गेला. ‘वेलकम मॅडम. प्लीज हॅव अ सीट. मिस्टर अश्फाक?’ थोडय़ाशा नाराजीनेच ती पुटपुटली, ‘अश्फाकला यायला वेळ लागेल आणि आपल्या बडबडीने तो कंटाळून जाईल. सो टेल मी पोस्ट ग्रॅज्युएशन इन आर्ट हिस्टरी फ्रॉम द नॅशनल म्युझिअम, डिप्लोमा फ्रॉम इन्स्टिटय़ूट ऑफ आíकओलॉजी, हे सगळे करून तुला गाइड व्हावंसं का वाटलं?’ बयेने नेटवर सगळा सी.व्ही. पाहिलेला दिसतोय. ‘मॅडम नोकरीच्या बंधनात अडकावंसं वाटलं नाही आणि इथे बरं वाटतंय.’

‘ओ.के. मला बौद्ध तत्त्वज्ञान आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेलं स्थापत्य हे इंटरेस्िंटग वाटतं. अश्फाकचं पुढचं पोस्िंटग श्रीलंकेत असणार आहे. तो फार खूश नाही, पण थेरवाद जवळून अनुभवायला मिळणार आहे, म्हणून मी खूश आहे. भारतात तीन र्वष राहून कधी अजिंठय़ाला येता नाही आलं. निघण्यापूर्वी मोठय़ा मुश्किलीने जमवलं. ‘सो नाऊ यू हॅव हय़ूज रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक मी अंडरस्टॅण्ड अजंठा.’ नचिकेतला होम पिचवर आल्यावर बरं वाटलं, त्याने तीन दिवसांतले दोन दिवस अंजठा अणि एखादा दिवस वेरुळला द्यायचं ठरवलं. भुकेची वेळ टळून चालली होती, त्याची अस्वस्थता पाहून तिने अश्फाकला मोबाइलवर िरग दिली. ‘एंगेज अ‍ॅज युज्वल, एनी वे लेट्स ऑर्डर.’

वाईनचे दोन ग्लास पोटात गेल्यावर नचिकेत जरा सलावला. आता तो जरा तिच्याकडे पाहू शकत होता. काय वय असेल हिचे? ४०-४२? खरं तर ३०-३५ची वाटते.. अल्लड नजर.. शुक! फोकस यू आर ऑन डय़ूटी! कधी नव्हे ते अश्फाकच्या येण्यामुळे त्याला बरं वाटलं. ‘सो यंग मॅन, व्हॉट इज दी प्लान?’ ‘निथग मच.. बट टू बोर यू विथ माय प्रिचिंग..’

वातावरण जरा हलकं झालं. जेवताना अश्फाकने यजमानची भूमिका उत्तम निभावली. अर्थात बोलण्याचे मुख्य विषय राजकारण, भारतातली नोकरशाही, भारत-पाकिस्तान संबंध इ. होतं. नचिकेतने दोघांचेही आभार मानत सकाळी भेटण्याची वेळ ठरवून घेतली.

(संपूर्ण कथेसाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)