X
निवडणूक निकाल २०१७

मोबाइलचं गिफ्ट लै भारी

दिवाळी-दसऱ्याच्या बोनसमधून या वर्षी नवीन मोबाइल घ्यायचा आहे?

दिवाळी-दसऱ्याच्या बोनसमधून या वर्षी नवीन मोबाइल घ्यायचा आहे?  विविध रेंजमधील उत्तम मोबाइलच्या खरेदीसाठी या काही खास टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील..

मोबाइल घ्यायचा असेल तर सध्या बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यातसुद्धा चायनिज फोन्सनी सध्या मोबाइल बाजारपेठ काबीज केलेली दिसते आहे. मोबाइल खरेदी करायचा त्याआधी आपण काही गोष्टी सुनिश्चित करायला हव्यात.

आपले बजेट : हल्ली अगदी पाच हजारांपासून ते ८० हजारांपर्यंतचे फोन बाजारात उपलब्ध आहेत; परंतु आपण आत्ता खरेदी केलेला फोन वर्षभरात जुना होत असतो. त्यामुळे वर्षभरासाठी आपण मोबाइलमध्ये किती गुंतवायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

आपली गरज ओळखायला हवी. म्हणजे आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात फक्त कॉल घेण्यासाठी आणि मेसेज पाहण्यासाठी लोक फोन घेतील हे चित्र तसे कमीच पाहायला मिळते. फोटोग्राफीची आवड असेल तर उत्तम कॅमेरा क्वालिटी असणारे फोन घ्यावेत, ज्यात बऱ्याचदा नवीन आलेल्या झेन असूस कंपन्या मागे पडताना दिसतात. आपण गेम खेळण्यासाठी मोबाइल वापरू इच्छित असाल तर उत्तम प्रोसेसर, चांगला रॅम, आणि ग्राफिक्स आणि डिस्प्ले क्वालिटी चांगली असेल याची खात्री करून घ्यावी. शिवाय मोठे गेम स्टोअर करण्यासाठी चांगली मेमरीदेखील तितकीच आवश्यक ठरते. काहींना वाचण्यासाठी मोबाइलची गरज भासत असेल तर मोठा स्क्रीन असणारा मोबाइल आपल्याला सोयीचा ठरू शकतो. अन्यथा चांगले लेटेस्ट अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन आणि साधारण रॅम, प्रोसेसर, उत्तम इंटर्नल मेमरी या बाबी पाहाव्यात.

आपल्या बजेटच्या रेंजमध्ये उपलब्ध असणाऱ्या मोबाइल्सपकी काही पर्याय पुढीलप्रमाणे..

१० हजारांपर्यंत…

शाओमी रेडमी नोट-४

का घ्यावा?

५.५ इंच मोठी स्क्रीन १६ आणि ५ मेगापिक्सेल बॅक आणि फ्रंट कॅमेरा असणाऱ्या या फोनची कॅमेरा क्वालिटी खूप छान नसली तरी बजेटच्या मानाने ती चांगली आहे. उत्तम डिझाईन, ऑक्टा कोअर २ गीगा हर्टझचा प्रोसेसर या फोनचे वैशिष्टय़ ठरतो. अवघ्या दहा हजारांत उत्तम डिझाईन, सॉफ्टवेअर आणि उत्तम बॅटरी लाइफ उपलब्ध करून देणारा देणारा हा फोन बेस्ट बजेट डील ठरू शकतो.

का टाळावा?

शहरात सहज उपलब्ध होणारी सíव्हस महाराष्ट्रात सर्वदूर उपलब्ध असेल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हा अगर कोणताही नवीन कंपनीचा म्हणजेच असूस, लिनोव्हो, शाओमीचा मोबाइल खरेदी करताना सíव्हस कशी व कुठे उपलब्ध आहे याची जरूर चौकशी करावी. यात जलद चाìजगचा पर्याय नाही. शोओमीचे युजर इंटरफेस काहींसाठी त्रासदायक वाटू शकते. खूप चांगल्या कॅमेरा क्वालिटीची अपेक्षा असेल तर हा फोन टाळावा.

मोटो ई ४ प्लस

का घ्यावा?

१.३ गीगा हर्टझचा क्वाड कोअर प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे, जो साधारण वापरासाठी पुरेसा ठरतो. अनुक्रमे १३ आणि ५ मेगा पिक्सेलचे बॅक आणि फ्रंट कॅमेरे हे उत्तम प्रतीचे फोटो काढून देऊ शकतात. याची बॅटरी भरपूर मोठ्ठी, पाच हजार एमएएचची आहे. तिला जलद चाìजगचा देखील पर्याय उपलब्ध आहे. ही या मोबाइलची सर्वात जमेची बाजू ठरू शकते.

का टाळावा?

मोटोरोला आणि हल्ली लिनोव्होचा असलेला हा मोबाइल बॅटरीच्या बाबतीत उत्तम असला तरी डिस्प्लेच्या बाबतीत यथातथाच आहे. यात फुल एचडी डिस्प्ले पुरविण्यात आलेला नाही. आणि इतर मोबाइलच्या तुलनेत हा मोबाइल जरा मागेच पडतो.

नोकिया- ३

का घ्यावा?

नोकिया ही कधी काळी मोबाइल क्षेत्रातली दादा कंपनी होती. त्याच नावावर विश्वास ठेवून आपल्याला हा फोन खरेदी करावासा वाटू शकतोच. फक्त ८ मेगापिक्सेल फ्रंट आणि बॅक कॅमेरा असला तरी त्याची फोटो घेण्याची क्षमता भरपूर चांगली आहे.

का टाळावा?

नऊ हजाराच्या तुलनेत उपलब्ध होणाऱ्या सुविधा या सेगमेंटमधल्या इतर मोबाइल्सच्या तुलनेत खूपच कमी आहेत. याची बॅटरी फक्त २६०० एमएएचची आहे. शिवाय प्रोसेसर आणि रॅमची क्षमताही या सेगमेंटमधल्या इतर मोबाइल्सच्या तुलनेत फारच कमी आहेत. फक्त नावाला भुलून हा मोबाइल घेणे शक्यतो टाळावे.

दहा हजाराच्या रेंजमध्ये सध्या शाओमी नोट फोर मोबाइल उत्तम असला तरी तुमची साधारण एक हजाराने बजेट वाढविण्याची तयारी असेल तर लिनोव्होचा के-एट प्लस हा मोबाइल बेस्ट डील ठरू शकतो. कारण साधारण अकरा हजारांमध्ये बॅकला डय़ुअल कॅमेरा ऑप्शन, ऑक्टा-कोअर प्रोसेसर, उत्तम बॅटरी फास्ट चाìजग ऑप्शनसह उपलब्ध आहे. असूसचे काही फोनसुद्धा  साधारण या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.

१५ हजारापर्यंत…

मोटोरोला जी ५ प्लस

का घ्यावा?

स्नॅप ड्रॅगन -६५० क्वाड कोअर २ गीगा हर्ट्झ ऑक्टा कोअर प्रोसेसर, ६४ जीबी इंटर्नल मेमरी, या मोबाइलचे मोठे वैशिष्टय़ आहे. १३ मेगापिक्सेलचे दोन डय़ुअल कॅमेरा आणि फ्रंट आठ मेगापिक्सेलचा कॅमेरादेखील उत्तम कॅमेरा क्वालिटी उपलब्ध करून देतात.

का टाळावा?

या रेंजमध्ये मोबाइल विकणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत हा एक उत्तम फोन आहे. पण याच्या प्रोसेसरची क्षमता अजून वाढू शकते.

एम आय ए-वन

का घ्यावा?

शाओमी या मोबाइल ब्रॅण्डच्या काही मोबाइल्सची सध्या बाजारात खूप चलती आहेच. त्यातला एमआयए-वन हा त्याचा १५ हजारांतला आहे. त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे यातल स्टॉक अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जन. स्टॉक अ‍ॅण्ड्रॉइड म्हणजे गुगलने लॉन्च केलेले अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जन तसंच्या तसं वापरणं. खूपदा कंपन्या आपल्या फोनला योग्य ठरतील असे बदल करून मग अ‍ॅण्ड्रॉइड व्हर्जन लॉन्च करून उपलब्ध करून देत असतात, ज्यामुळे आपल्या फोननुसार अ‍ॅण्ड्रॉइडचे नवीन अपडेट आपल्याला उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ओरिओचं येणारं अपडेट या मोबाइलसाठी नक्कीच उपलब्ध असेल. शिवाय एमआयच्या इतर मोबाइलच्या तुलनेत याच्या कॅमेराची क्वालिटी अनेक पटींनी उत्तम आहे.

का टाळावा?

फ्रंट कॅमेरा फक्त पाच मेगापिक्सेलचा असून त्याला फ्लॅश सुविधा उपलब्ध नाही. त्याच्या बॅटरीची क्षमता मोबाइलच्या तुलनेत जरा कमी वाटते.

लिनोव्हो के-एट नोट

का घ्यावा?

नुकताच  बाजारात आलेल्या या मोबाइलचा २.३ गीगा हर्ट्झचा डेका कोअर प्रोसेसर विशेष आहे. १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उत्तम परफॉर्मन्स देतो. मल्टिमीडिया फीचरसाठी हा मोबाइल उत्तम आहे. या किमतीत इतक्या सुविधा देणाऱ्या मोबाइलच्या यादीत याचा सर्वात आधी समावेश केला पाहिजे.

का टाळावा?

चित्रातल्या अगर फोटोमधल्या वस्तूच्या खोलीचा अंदाज घेणे यासाठी मोबाइलच्या मागे दोन कॅमेरे उपलब्ध करून दिले जातात. पण याचे कॅमेरे त्यासाठी आपलं काम नीट बजावू शकत नाही.

या बजेटमध्येदेखील या तीनपेक्षाही वेगळे मोबाईल उपलब्ध आहेत उदा. कूलपॅड, कूलप्ले, असूस, झेनफोन-थ्री हे पर्याय उपलब्ध आहेत.  लेटेस्ट अ‍ॅण्ड्रॉइड-नॉट शक्य असल्यास ओरिओच अपडेट असण्याची गॅरंटी, डय़ुअल कॅमेरा, दोन गीगा हर्ट्झ त्यावरचा प्रोसेसर, तीन किंवा चार जीबी रॅम आणि फुल एच डी रेझोल्युशन या रेंजमध्ये अपेक्षित आहे. अशा सुविधा देणाऱ्या, आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या, चांगली सव्‍‌र्हिस देऊ शकणाऱ्या कंपनीचा फोन निवडण्यास काहीच हरकत नाही.

२० हजारापर्यंत…

सॅमसंग ऑन मॅक्स टू

का घ्यावा?

तुम्हाला मोठ्ठा डिस्प्ले आवडत असेल, आणि तुमचं महत्वाचं काम असेल तर हा फोन खास  तुमच्यासाठी आहे. याचा प्रोसेसर लहान असला तरी सॅमसंगच्या नावामुळे याची किंमत २० हजाराच्या घरात पोहोचते. मोबाइलची डिझाइन त्यातले असणारे फीचर्स उत्तम आहेत. कॅमेरा क्वालिटी अतिशय उत्तम आहे.

का टाळावा?

याची जास्त किंमत. आपण दिलेल्या पशाचा आपल्याला पुरेसा मोबदला मिळत नाही.

२० हजारांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या मोबाइल्समध्ये १५ हजारांच्या आतले फोनदेखील येतात.  खरं तर २० हजारापर्यंत सध्या सगळ्यात लेटेस्ट फोन सध्या लॉन्च होत आहेत. त्यामुळे सॅमसंग अगर एचटीसीसारख्या विश्वासार्ह कंपन्यांचा हाय एण्ड मोबाइल घ्यायचा असेल आणि बजेट फक्त २० हजारांचं असेल तर वरचा किंवा जे-सेव्हन प्रो, किंवा एचटीसी मोबाइलचा पर्याय चांगला आहे. अन्यथा कमी पशात तेवढय़ाच किंबहुना त्यापेक्षा अधिक सुविधा देणारा मोबाइल खरेदी करावा.

वीस हजाराच्या वर बजेट असल्यास असुस, सॅमसंग एचटीसी हल्लीचा स्वस्त पण आता जुना झालेला आयफोन असे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत २२ हजारापासून ते अगदी ८० हजारापर्यंत आहे. फरक असलाच तर दोन ते चार हजारांचा असेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळं लिहिलं नाही. शिवाय हाय अ‍ॅण्ड कंपन्या हे फोन बनवत असल्यामुळे आणि जास्तीच्या किमतीमुळे त्यांच्या उत्पादनांवर विश्वास ठेवायला हवा. त्यातही आठ ते दहा जीबी रॅम डय़ुअल कॅमरा १२८ अगर ६४ जीबी इंटर्नल मेमरी मोठी स्क्रीन आणि उत्तम मल्टिमीडिया परफॉर्मन्स हे निकष हे फोन निवडताना असू शकतो. सध्या आयफोन एक्सच्या जरा आधीपासून एल जी आणि सॅमसंगने सुरू केलेली एज टू एज डिस्प्ले फोन हा ट्रेण्ड इन आहे. त्यामुळे लेटेस्ट फोन खरेदी करणार असाल तर याचा विचार करायला हरकत नाही. कारण आता येत्या काळात हे तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on: October 6, 2017 1:04 am
Outbrain