04 August 2020

News Flash

सण दिवाळी-दसऱ्याचा आनंद मोबाइल खरेदीचा

दसरा- दिवाळीची ही खरेदी उत्तम व्हावी या यासाठी मोबाइल खरेदीचे काही पर्याय.

मोबाइल

प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com

रुचकर-शॉिपग विशेष

दिवाळी-दसरा म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती खरेदी. उत्सवाचे हे क्षण आयुष्यभर आठवणीत जपण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. फार पूर्वीपासूनच आपल्याकडे दिवाळी, दसरा, पाडवा या प्रमुख सणांना मुहूर्ताची अक्षत लावून घर सजवले जात असे. मध्यमवर्गीय घरात आजही महत्त्वाच्या गोष्टींचे वाढदिवस दिवाळीगणिकच मोजले जातात. दिवाळीतल्या या मोठय़ा खरेदीसाठी वर्षभर बजेटची तरतूद केली जाते. गेली काही वर्षे दिवाळीमध्ये कपडय़ांबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्ची खरेदी आवर्जून केली जाते. दसरा- दिवाळीची ही खरेदी उत्तम व्हावी या यासाठी मोबाइल खरेदीचे काही पर्याय.

मोबाइल घेताना…

मोबाइल क्षेत्रात दिवसागणिक नवीन मॉडेल्स आणि पर्याय उपलब्ध होत असतात, हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत आणखी काही नवीन फोन बाजारात आलेले असतील. मोबाइलमध्ये लो एण्ड आणि हाय एण्ड असे दोन भाग पडतात. हाय एण्ड फोनमध्ये २५ हजार रुपयांच्या वरच्या फोन्सची गणती होते. त्यात सध्या ‘वनप्लस’, ‘सॅमसंग’, ‘अ‍ॅपल’, ‘असूस’सारख्या कंपन्यांची सर्वोत्तम मॉडेल्स आहेत. हाय एण्ड फोन हे संबंधित कंपनीच्या ब्रॅण्ड डिफायनिंगसाठी उत्तम असतात. कारण हाय एण्ड फोन ही फोनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. लो एण्ड फोन म्हणजे २० हजार रुपयांपर्यंतचे फोन. या फोनमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी उलाढाल पाहायला मिळते. कधी काळी ‘नोकिया’, मग ‘मायक्रोमॅक्स’, ‘सॅमसंग’, नंतर ‘शाओमी’, ‘एमआय’ आणि आता ‘रिअलमी’ अशा अनेक फोन कंपन्या आपापले वर्चस्व गाजवीत आहेत. लो एण्ड मोबाइल फोनमध्ये भरपूर पर्याय असल्यामुळे कोणता फोन घ्यायचा याबाबत गोंधळ होऊ शकतो. तो कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांचा आढावा घेत १० ते २० हजार रुपयांपर्यंतच्या उत्तम फोनचे काही पर्याय येथे सुचवत आहे.

१० हजार रुपयांपर्यंतचे उत्तम फोन

रिअलमी फाइव्ह

पॉलीकाबरेनेट बिल्ट असणारा २०० ग्रॅम वजनाचा हा फोन दहा हजाराच्या किमतीच्या फोनमधला उत्तम पर्याय आहे. त्याला ६.५ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ‘रिअलमी फाइव्ह’मध्ये दोन नॅनो-सिम कार्डसाठी बाजूला एक स्लॉट आणि मायक्रोएसडी कार्डासाठी स्लॉट दिलेला आहे. हा फोन कलरओएस ६.१ वर चालतो. त्याचा इंटरफेस वेगवान आहे.  यातील स्टॉक अ‍ॅण्ड्रॉइड-अ‍ॅण्ड्रॉइड नाइन पायच्या जवळ जाणारा आहे. फोनला स्नॅपड्रॅगन ६६५ एसओसी असून फोन तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यातील टॉपएण्ड मॉडेलमध्ये चार जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. अ‍ॅप आणि गेिमगमुळे फोन फार तापत नाही. ‘रिअलमी फाइव्ह’मध्ये मागील बाजूस चार कॅमेरे आहेत, प्राथमिक कॅमेरा आणि सेन्सर व्यतिरिक्त, रियलमीने वाईड-अँगल आणि मॅक्रोलेन्स देखील जोडले आहेत. १३ मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये व्हिडीओसाठी इलेक्ट्रॉनिक स्थिरीकरण देखील आहे. हे कॅमेरे चांगल्या प्रकाशात उत्तम फोटो काढतात, परंतु कमी प्रकाशात फोटो चांगला येऊ शकत नाही, असे जाणविते. ‘रिअलमी फाइव्ह’मध्ये पाच हजार एमएएच (milliamp Hour)  बॅटरी आहे. ती एकदा चार्ज केल्यावर दीड दिवस सहज टिकते. दुर्दैवाने, यात वेगवान चाìजग देण्यात आलेले नाही. एकंदरीत ‘रियलमी फाइव्ह’चे दहा हजारात मिळणारे सगळ्यात मुलभूत मॉडेल (३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज) पैसे वसूल करून देणारे असले तरी हजार-दोन हजार जास्त देऊन टॉप एण्ड मॉडेल घेणे हा स्मार्ट पर्याय ठरू शकतो.

रेडमी नोट सेव्हन एस

‘शाओमी’चा बजेट स्मार्टफोन शाओमीच्या ‘रेडमी नोट सेव्हन’ आणि ‘रेडमी नोट सेव्हन प्रो’चे बेस व्हर्जन मानले जाते. ‘शाओमी’ने याचेही डिझाइन सारखेच ठेवले आहे, म्हणूनच या तीन स्मार्टफोनमधला फरक प्रथमदर्शनी ओळखणे कठीण आहे. ‘रेडमी नोट सेव्हन’ एस मध्ये गोरिला ग्लास ५ बरोबर ६.३ इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे. ‘शाओमी’ने ‘रेडमी नोट सेव्हन एस’ मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० एसओसीची निवड केली असून त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे. इतर ‘शाओमी’ स्मार्टफोनप्रमाणेच हादेखील ‘एमआय’च्याच युजर इंटरफेसवर चालतो. ‘रेडमी नोट सेव्हन’च्या तुलनेत याचा कॅमेरा सेटअप थोडा वेगळा आहे, कारण यात ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर तसेच ५ मेगापिक्सलचा सेन्सर आहे. उत्तम फोटो काढण्यासाठी हा फोन उपयुक्त आहे. याचा १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही चांगले फोटो काढतो. ‘शाओमी’ने ‘रेडमी नोट सेव्हन एस’मध्ये चार हजार एमएएच बॅटरी दिलेली आहे. तिच्यामुळे फोनचे आयुष्य वाढते. ‘रेडमी नोट सेव्हन एस’ हा  चांगला स्मार्टफोन आहे, परंतु याला ‘रेडमी नोट सेव्हन’ आणि ‘असूस झेनफोन मॅक्स प्रो एम टू’चा थेट पर्याय आहे. थोडा जास्त खर्च करायची तयारी असेल तर ‘रेडमी नोट सेव्हन प्रो’चा विचार करावा.

१५ हजारांपर्यंत उपलब्ध फोन

रीयलमी थ्री प्रो

सध्या १५ हजारांच्या रेंजमध्ये सर्वोत्तम पर्याय असणारा हा फोन आहे. ६.३ इंचाचा फुल-एचडी + आयपीएस डिस्प्लेमुळे त्याचा स्क्रीन आपल्याला थेट सूर्यप्रकाशाखालीदेखील उत्तम दर्जा देऊ शकतो. फोनमध्ये दोन नॅनो-सिम स्लॉट आणि मायक्रोएसडी कार्डसाठी एक स्लॉटदेखील मिळतो. अलीकडील क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एसओसीसाठी २० हजार रु. मोजावे लागतात, पण १५ हजार रुपयांत हे फीचर देणारा सध्या हा एकमेव फोन आहे. तो ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि सहा जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. हा अ‍ॅण्ड्रॉइड नाइन पायवर चालतो. यात आपल्याला भरपूर शॉर्टकट आणि जेश्चरदेखील मिळतात. अ‍ॅप आणि गेिमगसाठी हा फोन चांगला आहे. एरवीच्या कामांसाठी फोन नियमित वापरताना गेमिंग केले तरी तो तापत नाही. याच्यासाठी वापरला जाणारा कॅमेरा सेन्सर हा वन प्लसच्या कॅमेऱ्यात वापरला जातो. त्यामुळे मुख्य १६-मेगापिक्सलचा कॅमेरा तपशीलवार लॅण्डस्केप्स आणि मॅक्रो कॅप्चर करतो. व्हिडीओ फोर के फॉर्मेटमध्ये रेकॉर्ड केले जाऊ शकतात. ४०४५ एमएएच बॅटरी क्षमता ही या फोनची खरी ताकद म्हणता येईल. फोनसोबत येणाऱ्या VOOC ३.० या वेगवान चार्जरमुळे बॅटरीची क्षमता वाढते. तुम्ही ब्रॅण्डबाबत आग्रह नसेल आणि पैसे पुरेपूर वसूल करायचे असतील तर हा ‘रीअलमी थ्री प्रो’ हा फक्त ऑनलाइन उपलब्ध असणारा उत्तम पर्याय आहे.

रेडमी नोट सेव्हन प्रो

या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ४८-मेगापिक्सेल कॅमेरा, गोरिला ग्लास फाइव्हच्या लेयरद्वारे संरक्षित ६.३ इंचाचा फुल-एचडी + (१०८०७२३४० पिक्सेल) एलटीपीएस इन-सेल डिस्प्ले आहे. फोनमध्ये सहा जीबी रॅमवरून स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर आहे. हेवी मल्टिटास्किंग असो की पबजीसारखे गेम असो, फोन नीट चालतो. ‘रेडमी नोट सेव्हन प्रो’ अ‍ॅण्ड्राइड नाइन पायवर आधारित एम-आय-यूआय टेन चालविते. यात अनेक उत्तम वैशिष्टय़ं आहेत.  पण याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे याच्या यूआयमध्येच आपल्याला त्रासदायक जाहिरातीदेखील पाहाव्या लागतात. फोनचा ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उत्तम तपशील टिपू शकतो. रात्रीचे फोटोही नीट टिपता येतात. चार हजार एमएएच क्षमतेच्या बॅटरीमुळे ‘रेडमी नोट सेव्हन प्रो’ संपूर्ण दिवस सहजपणे चालू शकेल. सोबतच क्वालकॉमच्या क्विक चार्ज ४.० द्वारे फास्ट चार्जिगही उपलब्ध आहे.

२० हजारांपर्यंत उपलब्ध उत्तम फोन

रियलमी एक्स

‘रियलमी एक्स’ ही प्रीमियम ऑफर रीअलमी कडून आहे. त्यात इन-डिस्प्ले िफगरिपट्र सेन्सर आणि एक पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. २० हजार रुपयांत ६.५३ इंचाचा, फुल-एचडी + ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यामुळे चांगले रंग तयार होतात आणि त्यांची चमक चांगली आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एसओसी चीप आहे. तो कलरओएस सहावर चालत असून अँड्रॉइड नाइन पायवर आधारित आहे. फोनचा आकार थोडा मोठा असल्यामुळे तो वापरायला थोडा त्रासदायक वाटू शकतो पण त्याची क्वालिटी उत्कृष्ट आहे आणि कार्यक्षमता खूप चांगली आहे. फोनमध्ये अ‍ॅप्स आणि गेम वापरताना कोणताही त्रास होत नाही. ‘रियलमी एक्स’मध्ये ४८-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यामध्ये मोठे लॅण्डस्केप्स, क्लोज-अप शॉट्स आणि व्हिडीओ रेकॉìडग फोर के फॉर्मेटमध्ये करता येऊ शकतात. फोनचा कॅमेरा आणि त्याचे सेन्सर्स-कमी प्रकाशात खूप चांगले फोटो काढतात. २० हजारांमध्ये फोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा फोन हा एक उत्तम पर्याय आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ५० एस

‘सॅमसंग ए ५०’ चे थोडे सुधारित व्हर्जन म्हणून ‘ए ५० एस’ कडे पाहण्यास हरकत नाही. दोन्हीमध्ये इतर बरीच वैशिष्टय़े सारखीच आहेत, परंतु यामुळे कंपनीला ‘रिअलमी’, ‘एम आय’ यांची आक्रमक स्पर्धा रोखायला मदत होईल. ‘गॅलेक्सी ए ५० एस’ मध्ये ६.४ इंचाची फुल-एचडी + सुपर एमोलेड स्क्रीन आहे. ती त्याच्या सर्वोत्कृष्ट वैशिष्टय़ांपकी एक आहे. सहज वापरासाठी हा स्क्रीन थोडासा मोठा वाटू शकतो, परंतु फोन तुलनेने हलका आणि पातळ आहे, त्यामुळे ही हाताळणी तेवढी कठीण होत नाही. ‘सॅमसंग’चा वन युजर इंटरफेसदेखील मोठय़ा स्क्रीनचा लाभ घेण्यासाठी डिझाइन केला गेलेला आहे. ‘गॅलेक्सी ए ५०’ मध्ये सॅमसंगचा स्वत:चा एक्झिनोस ९६११ प्रोसेसर वापरला गेला आहे. तो ‘गॅलेक्सी ए ५०’ मधल्या एक्झिनोस ९६१० सारखाच आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, ८-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा, पाच-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर तसेच ३२-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिवसाच्या प्रकाशात उत्तम दर्जाचे फोटो देतात, पण कमी प्रकाशात मात्र हे फोटो चांगले येत नाहीत. ४ जीबी आणि ६ जीबी रॅमचा पर्याय असूनही १२८ जीबी इंटर्नल मेमरी मिळते. ती दैनंदिन कामांसाठी सामान्यत: पुरते. ४ हजार एमएएचच्या बॅटरीमुळे फोनचे आयुष्य वाढते. फोनचे चाìजग देखील वेगवान आणि उत्तम आहे. ब्रॅण्डबद्दल आग्रही असणाऱ्यांनी हा फोन घ्यायचा विचार करायला हरकत नाही. अर्थात याच पशात यापेक्षा अधिक उत्तम दर्जाचे फोन बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचाही विचार करता येईल.

लॅपटॉप घेताना

लॅपटॉप कोणत्या कामासाठी?

या प्रश्नाचे उत्तर निश्चित केले तर आपले अनेक गोंधळ दूर होऊ शकतात, आणि आपल्याला कोणता लॅपटॉप घेतला पाहिजे याचे उत्तरही मिळू शकते. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी कॉन्फिगरेशन महत्त्वाची असतात. ती पुढीलप्रमाणे

रोजच्या घरगुती वापरासाठी : घरातल्या दररोजच्या साधारण कामासाठी लॅपटॉप घेणार असाल तर साधारण कमीत कमी चार जीबी किंवा अधिक रॅम डय़ुअल कोअर प्रोसेसर आणि सगळीकडे सहज नेता यावा यासाठी वजनाने हलका लॅपटॉप घेणे सोयीचे ठरू शकते.

घरगुती वापर आणि मनोरंजनासाठी : लॅपटॉपचा वापर मनोरंजनासाठी करणार असाल तर आपल्याला किमान क्वाड कोअर प्रोसेसर, उत्तम रेझोल्युशनची  (१२८०  ७२०) स्क्रीन, ४ ते ६ जीबी  क्षमतेचा रॅम, गाणी-व्हिडीओ साठविण्यासाठी किमान १ टीबी हार्डडिस्क, ५०० एमबी अगर १ जीबी ग्राफिक कार्ड असावे.

ऑफिस वापर आणि प्रोग्रािमगसाठी : ऑफिसकामासाठीचा लॅपटॉप हा ने -आण करण्यासाठी सोयीचा (१४-१५ इंच स्क्रीन साईझ), आणि तरीही उत्तम क्षमतेचा असणे अपेक्षित आहे. यामध्ये किमान ८ जीबीचा रॅम, कमी वजनाचा पण जास्त क्षमता साठविणारी १ टीबी क्षमतेची एस एस ड्राईव्ह, क्वाड कोअर उत्तम प्रोसेसर (आय-सेव्हन किंवा ए-एट ) तसेच साधारण २ जीबीचे ग्राफिककार्ड असावे. बॅकलीट आणि प्रोग्रामेबल कीबोर्ड आपले काम सोपे करू शकतात.  व्हिडीओ अगर ऑडिओ एडिटिंगसाठी लॅपटॉप घ्यायचा असेल तर मोठी स्क्रीन साईज आणि जास्त क्षमतेचे ग्राफिक कार्ड आवश्यक ठरू शकते.

गेमिंग : यासाठी आपल्या लॅपटॉपची क्षमता प्रचंड असणे आवश्यक असते. किमान १६ जीबी अगर त्यापेक्षा जास्त क्षमतेचा रॅम, किमान २ टीबी एस एस ड्राइव्ह, ४ जीबीपेक्षा अधिक क्षमतेचे ग्राफिक कार्ड, १५ ते १७ इंची फुल एच डी रेझोल्युशन डिस्प्ले, उत्तम साऊंड सिस्टम आणि चांगला डय़ुरेबल कीबोर्ड असणे किमान अपेक्षित असते.

एकदा गरज लक्षात आली की मोठा प्रश्न असतो तो ब्रॅण्डचा. कोणत्या कंपनीचा लॅपटॉप घ्यावा, याचे सहज सोपे उत्तर आहे, ज्यांची सíव्हस उत्तम आहे असा कोणताही लॅपटॉप घेण्यास हरकत नाही. या यादीत सध्या लिनोव्हो, डेल, एचपी ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. त्यामुळे आपल्या गरजा, बजेट यापैकी कोणत्या ब्रॅण्डबरोबर जुळते ते  पहावे, कोणाकडे डिस्काऊंट उपलब्ध आहे का पहावे आणि त्यानुसार त्या कंपनीचा लॅपटॉप घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2019 1:07 am

Web Title: mobile purchase options in diwali festival times
Next Stories
1 फराळाच्या पलीकडे…
2 दिवाळीसाठी खास चविष्ट पदार्थ
3 पाहुणे येता घरा…
Just Now!
X