04 June 2020

News Flash

मान्सून डायरी : असूनि खास मालक घरचा…

जारवांसह आणखी सहा आदिवासी जमाती हे अंदमानातले मूळ रहिवासी.

जारवांसह आणखी सहा आदिवासी जमाती हे अंदमानातले मूळ रहिवासी. इथल्या खडतर निसर्गाशी एकरूप होत या सगळ्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. पण आता मात्र त्यांची संख्या झपाटय़ाने कमी व्हायला लागली आहे.

मोठे डोळे, भेदक नजरा, मध्यम बांधा, कृष्णवर्ण, शरीर आणि चेहऱ्यावर पांढरे टॅटू लावल्यासारख्या खुणा. असा तो माणूस आमच्या गाडीच्या जवळून निघाला. त्याच्या हातात त्याच्याच उंचीचा एक धनुष्यही होता. दुसऱ्या हातात काही तीक्ष्ण बाण घेऊन तो रस्त्याच्या कडेला नागव्या पायाने चालत होता. थोडय़ाच अंतरावर त्याच्यासारखीच अजून चार माणसं दिसली. त्या चार माणसांसोबत आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखे कपडे आणि जोडे घातलेला एक माणूसही होता.

आदिवासी संरक्षित क्षेत्रांतून जाताना आम्हाला ‘जारवा’ हे अंदमानातले मूळ आदिवासी दिसले होते. ‘जारवा’ ही आदिवासी जमात अंदमान आणि निकोबार बेटांवर राहणाऱ्या सहा मूळ जमातींमधली एक प्रमुख जमात आहे. त्याच्यासोबत असलेला आपल्यासारखा दिसणारा तो माणूस म्हणजे त्यांचा गार्डमित्र होता.

ग्रेट अंदमान ट्रंक रोड दक्षिण आणि मध्य अंदमानातून दोन जारवा संरक्षित क्षेत्रातून जातो. या रस्त्यात दक्षिण अंदमानात ४६ किमी, आणि मध्य अंदमानात २९ किमी असे दोन पल्ले येतात जेव्हा आपल्याला जारवा आदिवासींच्या क्षेत्रातून जावं लागतं. या क्षेत्रांतून जाताना आपल्याला काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. या दोन्ही क्षेत्रांच्या दोन्ही टोकाला पोलिस चौक्या आहेत, तिथे प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या माणसाची नोंद असते.

पोर्ट ब्लेअरहून दिगलीपूरला जाताना दक्षिण अंदमानातला जारवा संरक्षित क्षेत्राचा पहिला टप्पा येतो. जीरकाटांगपासून मिडल स्ट्रेटपर्यंतचा हा ४६ किमीचा रस्ता आहे. संरक्षित क्षेत्रात दोन्ही बाजूने गाडय़ा सोडण्याचे वेळापत्रक आहे. वेगवेगळ्या वेळांनुसार पोलीस इथून गाडय़ा सोडतात. या क्षेत्रात आपण ४० किमीच्या वेगानेच गाडय़ा चालवू शकतो, शिवाय रस्त्यात कोठेही थांबू शकत नाही. इथे गाडय़ा एकाच रांगेत एकामागून एक अशा चालतात आणि ओव्हरटेक करू शकत नाहीत. फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करायला कडक बंदी आहे. या क्षेत्रात आपल्याला जारवा आदिवासी दिसल्यास त्यांना काही खायला देणे, तसेच काही बोलणे किंवा स्पर्श करणे हादेखील गंभीर गुन्हा आहे. कोणतेही नियम तोडल्यास मोठा दंड भरावा लागतो. दोन्हीकडून पोलीस चेक पोस्टपासून एकामागे एक गाडय़ा सोडण्याच्या या प्रकाराला इथे कॉन्व्हाय असे म्हणतात. दोन्हीकडून दिवसातून फक्त चारदा गाडय़ा सोडल्या जातात. सोडताना प्रत्येक गाडी आणि प्रवाशाची परिचयपत्रासहित नोंद केली जाते. कॉन्व्हायला गाडय़ा सोडताना पहिली आणि शेवटची गाडी पोलिसांची असते, तसेच मधल्याही काही गाडय़ांमध्ये पोलिस सोबत बसतात.

दुसऱ्या २९ किमीच्या टप्प्यात कॉन्व्हाय सिस्टम नसते, पण नियम तेच असतात. एवढी कडक नियमावली आणि पोलिस बंदोबस्त मागच्या काही वर्षांपासून अमलात आला आहे, कारण इथे बाहेरच्या लोकांमध्ये आणि जरावांमध्ये संघर्ष झाल्याच्या काही घटना घडून गेल्या होत्या.

जारवा आदिवासी या क्षेत्रातले मूळ रहिवासी आहेत, जे आजच्या काळातही अश्मयुगातील जीवन जगत आहेत. हे आदिवासी आजही विवस्त्र असतात आणि जंगली प्राण्यांची शिकार करून खातात. काही संशोधनांनुसार हे आदिवासी पन्नास हजार वर्षांपासून इथे राहात आहेत. हजारो वर्षांपासून ते या बेटांवर निसर्गाशी एकरूप होऊन आजही त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. त्यांनी स्वतला स्थानिक हवामानाशी जुळवून घेतलं आहे. हजार वर्षांपासून निसर्गाचा अनेक मारा सहूनसुद्धा त्यांनी त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे.

१९व्या शतकात ब्रिटिशांच्या काळापासून या आदिवासींची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे आणि आज ते बोटांवर मोजण्याएवढेच उरले आहेत. आधी ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात शेकडो आदिवासी मारले गेले, नंतर स्थलांतरित माणसांच्या संपर्कात येऊन नवीन रोगांनीही त्यांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. इतर नामशेष जमतींप्रमाणेच आज जारवा आदिवासींची संख्या फक्त २४० एवढीच उरली आहे.

अंदमान आणि निकोबारातल्या मूळ आदिवासी जमाती जारवा हे आदिवासी इतर माणसांशी तसे मित्रवत आहेत. एकदा ‘इंमी’ नावाचा एक जारवा मुलगा जवळच्या गावातल्या केळीच्या बागेजवळ एका नाल्यात पडला होता. कदमतला इथल्या पोलिसांना त्याला नाल्यातून काढण्यात यश आले. त्याला लगेच पोर्ट ब्लेअर इथल्या दवाखान्यात पाठवण्यात आलं. इथे त्याचे उपचार चालू असताना त्याची तिथल्या डॉक्टर आणि नर्स यांच्याशी मैत्री झाली. तो काही िहदी शब्दही शिकला. नंतर त्या मुलाची आदिवासी कल्याण विभाग तसेच काही मानव विज्ञान अभ्यासकांशीही मैत्री झाली. पूर्णपणे बरा झाल्यावर जेव्हा त्याला पुन्हा त्याच्या जमातीत पाठवण्यात आले तेव्हा जारवा जमातीने सगळ्यांचे आभार मानले. या घटनेनंतर अभ्यासक आणि आदिवासी कल्याण विभागाला जारवा लोकांशी संपर्काला वाव मिळाला.

पण नंतर काही वर्षांत देशी आणि विदेशी पर्यटकांच्या चुकीच्या वर्तनाने पुन्हा या संपर्कात अडथळा आणला. काही लोकांनी जारवांना मद्य दिले, त्यांचे विवस्त्र फोटो काढून सोशल नेटवर्कवर प्रसिद्ध केल्याच्या घटना झाल्यापासून पर्यटकांसाठी कडक नियमावली बनवण्यात आली. पोलिसही या नियमांची अंमलबजावणी होण्याची काळजी घेतात.

आज जारवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी बरेचसे सरकारी प्रयत्न होत आहेत. त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा, संपर्क, शिक्षण यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याबरोबर काही गार्ड मित्रही नेमण्यात आले आहेत. हे गार्ड मित्र त्यांच्याबरोबर असतात आणि संवादही करतात. तसेच महामार्गावर कोणाहीकडून काही गैरवर्तन झाल्यास लगेच पोलिसांना त्याची सूचना देतात.

आज या आदिवासींची संख्या अत्यल्प आहे. त्यांची जीवनशैली अश्मयुगातील असूनही या बेटांवर निसर्गाशी जुळवून घेतल्यामुळे तसेच हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या पारंपरिक ज्ञानामुळे अनेक नैसíगक आपत्तींना झेलूनही आजवर ते आस्तित्व टिकवून आहेत. हे आदिवासी मान्सून आणि त्याचाशी संबंधित निसर्गाशी एकरूप झालेले दिसतात. त्यांच्या वसाहती समुद्रापासून उंचीवर दाट जंगलात असतात, तसेच त्यांची स्थानिक लाकडांपासून बनलेली घरे ही जमिनीपासून काही उंचीवर बांधलेली असतात. मुसळधार पाऊस असताना जंगलातून वाहणाऱ्या पाण्याचा त्यामुळे यांना काही अडथळा येत नाही तसेच यांची घरेही टिकून असतात. पावसाळ्यात होणाऱ्या रोगांपासून बचावासाठी हे लोक जंगली वनस्पतींचा वापर करतात. त्यांच्यात इथल्या हवामानातून होणाऱ्या रोगांचा मुकाबला करण्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. पावसाळ्यात डास आणि अन्य कीटकांपासून रक्षणासाठी ते विशिष्ट जंगली वनस्पती आणि मातीचा लेप लावतात.

एकंदरीतच अंदमानात स्थलांतरन करून आलेल्या लोकांपेक्षा इथले मूळ आदिवासी निसर्गाच्या अधिक जवळ आहेत. आज जिथे स्थलांतरित लोकांना मान्सून, मुसळधार पाऊस, घोंघावणारे चक्रीवादळ, मोठे भूकंप – त्सुनामी, तसेच उष्णकटिबंधीय वर्षांवने आणि समुद्र या परिस्थितीशी संघर्ष करावा लागतोय, तिथेच इथले मूळ आदिवासी याच निसर्गचक्राला एकरूप झालेले दिसतात.

पण आज या मूळ आदिवासींना आदर मिळण्याऐवजी त्यांची उपेक्षाच होत आहे. टुरिझमशी संबंधित व्यवसाय असणारे तसेच टुरिस्ट टॅक्सी ड्रायव्हर यांच्या मते या आदिवासींना कुठल्यातरी एका बेटावर पाठवून द्यायला पाहिजे. आज यांच्यामुळे अंदमानचा विकास होत नाहीये. वास्तविक हे म्हणजे आपण बाहेरून येऊन इथल्या मूळ रहिवाशांना त्यांच्याच घरातून हाकलण्यासारखं आहे.

पोर्ट ब्लेअरला परतताना संध्याकाळी जंगल क्षेत्रात मोठा पाऊस झाला. सगळीकडे दाट जंगल आणि नुसते पाण्याचे ओढे. या भयंकर पावसात आमच्या ड्रायव्हरला गाडी चालवायला खूप त्रास होत होता. विजांचा कडकडाटही होत होता, अशातच मनात जारवांचा विचार आला आणि हजारो वर्षांपासून टिकवलेल्या त्यांच्या आस्तित्वाबद्दल त्यांना मनातल्या मनात सलाम केला.

32-lp-monsoonअंदमान आणि निकोबारातल्या मूळ आदिवासी जमाती

जारवा हे आदिवासी इतर माणसांशी तसे मित्रवत आहेत. एकदा ‘इंमी’ नावाचा एक जारवा मुलगा जवळच्या गावातल्या केळीच्या बागेजवळ एका नाल्यात पडला होता. कदमतला इथल्या पोलिसांना त्याला नाल्यातून काढण्यात यश आले. त्याला लगेच पोर्ट ब्लेअर इथल्या दवाखान्यात पाठवण्यात आलं. इथे त्याचे उपचार चालू असताना त्याची तिथल्या डॉक्टर आणि नर्स यांच्याशी मैत्री झाली. तो काही िहदी शब्दही शिकला. नंतर त्या मुलाची आदिवासी कल्याण विभाग तसेच काही मानव विज्ञान अभ्यासकांशीही मैत्री झाली. पूर्णपणे बरा झाल्यावर जेव्हा त्याला पुन्हा त्याच्या जमातीत पाठवण्यात आले तेव्हा जारवा जमातीने सगळ्यांचे आभार मानले. या घटनेनंतर अभ्यासक आणि आदिवासी कल्याण विभागाला जारवा लोकांशी संपर्काला वाव मिळाला.

पण नंतर काही वर्षांत देशी आणि विदेशी पर्यटकांच्या चुकीच्या वर्तनाने पुन्हा या संपर्कात अडथळा आणला. काही लोकांनी जारवांना मद्य दिले, त्यांचे विवस्त्र फोटो काढून सोशल नेटवर्कवर प्रसिद्ध केल्याच्या घटना झाल्यापासून पर्यटकांसाठी कडक नियमावली बनवण्यात आली. पोलिसही या नियमांची अंमलबजावणी होण्याची काळजी घेतात.

आज जारवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी बरेचसे सरकारी प्रयत्न होत आहेत. त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा, संपर्क, शिक्षण यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याबरोबर काही गार्ड मित्रही नेमण्यात आले आहेत. हे गार्ड मित्र त्यांच्याबरोबर असतात आणि संवादही करतात. तसेच महामार्गावर कोणाहीकडून काही गैरवर्तन झाल्यास लगेच पोलिसांना त्याची सूचना देतात.

आज या आदिवासींची संख्या अत्यल्प आहे. त्यांची जीवनशैली अश्मयुगातील असूनही या बेटांवर निसर्गाशी जुळवून घेतल्यामुळे तसेच हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या पारंपरिक ज्ञानामुळे अनेक नैसíगक आपत्तींना झेलूनही आजवर ते आस्तित्व टिकवून आहेत. हे आदिवासी मान्सून आणि त्याचाशी संबंधित निसर्गाशी एकरूप झालेले दिसतात. त्यांच्या वसाहती समुद्रापासून उंचीवर दाट जंगलात असतात, तसेच त्यांची स्थानिक लाकडांपासून बनलेली घरे ही जमिनीपासून काही उंचीवर बांधलेली असतात. मुसळधार पाऊस असताना जंगलातून वाहणाऱ्या पाण्याचा त्यामुळे यांना काही अडथळा येत नाही तसेच यांची घरेही टिकून असतात. पावसाळ्यात होणाऱ्या रोगांपासून बचावासाठी हे लोक जंगली वनस्पतींचा वापर करतात. त्यांच्यात इथल्या हवामानातून होणाऱ्या रोगांचा मुकाबला करण्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. पावसाळ्यात डास आणि अन्य कीटकांपासून रक्षणासाठी ते विशिष्ट जंगली वनस्पती आणि मातीचा लेप लावतात.

एकंदरीतच अंदमानात स्थलांतरन करून आलेल्या लोकांपेक्षा इथले मूळ आदिवासी निसर्गाच्या अधिक जवळ आहेत. आज जिथे स्थलांतरित लोकांना मान्सून, मुसळधार पाऊस, घोंघावणारे चक्रीवादळ, मोठे भूकंप – त्सुनामी, तसेच उष्णकटिबंधीय वर्षांवने आणि समुद्र या परिस्थितीशी संघर्ष करावा लागतोय, तिथेच इथले मूळ आदिवासी याच निसर्गचक्राला एकरूप झालेले दिसतात.

पण आज या मूळ आदिवासींना आदर मिळण्याऐवजी त्यांची उपेक्षाच होत आहे. टुरिझमशी संबंधित व्यवसाय असणारे तसेच टुरिस्ट टॅक्सी ड्रायव्हर यांच्या मते या आदिवासींना कुठल्यातरी एका बेटावर पाठवून द्यायला पाहिजे. आज यांच्यामुळे अंदमानचा विकास होत नाहीये. वास्तविक हे म्हणजे आपण बाहेरून येऊन इथल्या मूळ रहिवाशांना त्यांच्याच घरातून हाकलण्यासारखं आहे.

पोर्ट ब्लेअरला परतताना संध्याकाळी जंगल क्षेत्रात मोठा पाऊस झाला. सगळीकडे दाट जंगल आणि नुसते पाण्याचे ओढे. या भयंकर पावसात आमच्या ड्रायव्हरला गाडी चालवायला खूप त्रास होत होता. विजांचा कडकडाटही होत होता, अशातच मनात जारवांचा विचार आला आणि हजारो वर्षांपासून टिकवलेल्या त्यांच्या आस्तित्वाबद्दल त्यांना मनातल्या मनात सलाम केला.

क्रमश :
नितीन ताम्हनकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2016 1:22 am

Web Title: monsoon diary andaman
Next Stories
1 नाट्यरंग : विचारांमध्ये गुंतवणारा आविष्कार
2 दखल : भुताचा दगड
3 कथा : वसंत
Just Now!
X