एखादे संग्रहालय पाहायला आपण जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे संग्रहालये ही केवळ वस्तू ठेवायची ठिकाणे नाहीत तर ती ज्ञानप्राप्तीची केंद्रे असतात. तिथल्या वस्तूंना विशिष्ट संदर्भ असतात. आपल्याला इतिहासाशी तसंच वेगवेगळ्या विषयांशी जोडून घेणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे, याचं भान आपण सतत बाळगणं आवश्यक आहे.

ग्रीक आणि रोमन पुराणकथांनुसार कला, विज्ञान, साहित्य यांच्या नऊ अधिष्ठात्री देवता मानल्या गेल्या आहेत. त्यांना ‘म्युझेस’ असे म्हटले जाते. त्यांच्यावरूनच ‘म्युझिअम’ हा शब्द रूढ झाला आहे. कला, विज्ञान, इतिहास, मानवी संस्कृती यांच्याशी निगडित महत्त्वाच्या वस्तूंचे जिथे जतन आणि प्रदर्शन केले जाते त्या जागेला आपण वस्तुसंग्रहालय म्हणतो. मात्र ही संग्रहालये कशी पाहावी, त्यासाठी सुजाण प्रेक्षक कसे व्हावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..

संग्रहालयात जाणारा प्रेक्षक हा वेगवेगळ्या हेतूंनी तिथे जातो. काही लोक पाहुण्यांसोबत फिरायला, मुलांना दाखवण्यासाठी तर काही अभ्यासक विशिष्ट वस्तू पाहण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी येतात. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी अलासांद्रा (ं’ं२ंल्ल१िं) नावाचे एक इटालियन अभ्यासक डोसो डोसी या इटालियन चित्रकाराच्या एका चित्राचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आले होते. साधारणत: तीन दिवस त्या चित्राचा अभ्यास करण्यासाठी ते थांबले होते. सामान्य प्रेक्षक किंवा अभ्यासक हे त्यांच्या गरजेप्रमाणे, हेतूनुसार संग्रहालयात येतात आणि त्यानुसार ते पाहतात. अभ्यासकांचा हेतू अर्थात स्पष्ट असतो. मात्र सामान्य प्रेक्षकाने संग्रहालय पाहण्यापूर्वी आपल्याला किती वेळ आहे, उपलब्ध वेळेत नेमके काय आणि किती पाहता येईल, याचा विचार करावा.

संग्रहालयात केलेली वस्तूंची मांडणी ही विशिष्ट हेतूने आणि ठरावीक पद्धतीने केली जाते. ते वर्गीकृत प्रदर्शन असते. उदाहरणार्थ निसर्ग-इतिहास दालनात पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले वर्गीकरण आणि त्याचे प्रदर्शन. त्यानंतर एक प्रकार म्हणजे सिस्टमॅटिक डिस्प्ले. उदाहरणार्थ कला दालनात केलेली १४ ते २० या शतकांतील लघुचित्रांची मांडणी. तिसरा प्रकार ‘डायोरामा.’ पक्ष्यांच्या संदर्भात बोलायचे झाले तर समजा त्यांचा प्रजननकाळ दाखवायचा आहे तर त्यासाठी चित्रे, आकृत्या, आभासी प्रतिमा यांच्या साहाय्याने तो सुस्पष्ट दाखवता येतो. मात्र तेच पक्षी उडतात कसे, त्यांच्या उडण्याच्या तंत्रातील बारकावे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे सांगाडे कसे दिसतात, त्यांच्या दातांची रचना कशी आहे हे ‘थिमॅटिक’ प्रदर्शनातून सांगितले जाते. आणखी एक प्रकार असतो तो विशिष्ट कलाकृतीपुरता किंवा वस्तूपुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ शिवाजीकालीन होन किंवा पूजा, धार्मिक कार्यातील भांडी यांचे प्रदर्शन. ते साहित्य किंवा विशिष्ट वस्तू पाहताना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भ समोर येतात. समजा आपण एखादी शिवकालीन तलवार पाहात आहोत तर ती पाहताना केवळ एक शस्त्र किंवा ऐतिहासिक वस्तू म्हणून न पाहता त्या तलवारीची निर्मिती कशी झाली असेल, तिची लांबी, रुंदी, उंची काय असेल, तिचे वजन ठरावीकच का असेल त्यावरून तलवार परजणाऱ्या योद्धय़ाचे शारीरिक बळ किती असेल आणि तसे बळ मिळवण्यासाठी त्याचा काही विशिष्ट आहार होता का, हे सगळे संदर्भ त्याच्या जोडीने येतात आणि मग त्या वस्तूला एक अनोखे मूल्य प्राप्त होते. काही वस्तू या फक्त दृश्यात्मक सौंदर्य लक्षात घेऊन मांडल्या जातात. उदाहरणार्थ पोर्सलिीनची वेगवेगळ्या आकाराची, उंचीची विशिष्ट रचनेत मांडलेली अनेक भांडी.

एखादे प्रदर्शन पाहताना त्याच्या आसपास केलेला गडद किंवा सौम्य रंगांचा वापर, प्रकाश-छाया योजनादेखील त्या मांडणीसाठी पूरक आणि त्याच्या आशयात भर घालणारी असते. मुघलकालीन कलाकृतींचे दालन पाहताना हिरवा रंग किंवा माशांचे प्रदर्शन पाहताना त्याच्या आजूबाजूला दिसणारा समुद्री निळा-हिरवा रंग मांडणीचे सौंदर्य वाढवतो. आपण संग्रहालयातील वस्तू किंवा दालने पाहताना त्यांच्याविषयीची माहिती देणारे तक्ते अवश्य वाचावेत. विशेषत: विज्ञान संग्रहालयात अमूर्त संकल्पना समजविण्यासाठी सोप्या रचना, डेमॉन्स्ट्रेशन्स केली जातात. वैज्ञानिक तत्त्वे सोप्या पद्धतीने कळण्यासाठी प्रेक्षकाला समजेल अशा भाषेत, त्याला सहज हाताळता येतील अशा पद्धतीने ती डेमॉन्स्ट्रेशन्स स्वत: केल्यास कुतूहलही शमते आणि ज्ञानात भर पडते. काही दालनात दृक्श्राव्य माध्यमातून रचना समजावून देण्यात येते तर ऑडिओ गाइडच्या मदतीने संग्रहालय समजून घ्यायची सोय आहे.

माझे एक निरीक्षण असे आहे की, मंदिरशिल्पे, देवादिकांच्या मूर्ती पाहताना काही प्रेक्षकांना तिथे नमस्कार करायचा असतो, फुले वाहायची असतात. मात्र आपण देवळात नसून संग्रहालयात आहोत आणि ती मूर्ती अभ्यासाकरिता मांडलेली आहे, हे भान असावे. संग्रहालयाला भेट देण्यासाठी शालेय सहली मोठय़ा प्रमाणावर येतात, मात्र त्यात शिस्तीचा अभाव असतो. मुलांची संख्या, संग्रहालय भेटीसाठी त्यांच्याकडे असलेला मर्यादित वेळ, मुलांचा सांभाळ करताना होणारी तारांबळ यांमुळे मूळ उद्देशाला बगल मिळते. एकदा तर मुलांना सांभाळताना गोंधळ झालेल्या एका शिक्षकाने ‘इकडे-तिकडे न पाहता गुपचूप रांगेत चाला’, अशी ताकीद दिली. मात्र संग्रहालय हे पाहण्यासाठीच असते, तेच नेमके तो विसरला आणि त्याची सूचना हास्यास्पद ठरली. त्याच जोडीला असेही दिसून आले आहे की शिक्षक स्वत: अशास्त्रीय भाषेत किंवा शास्त्रदृष्टय़ा चुकीची माहिती देतात. यामुळे त्या विद्यार्थ्यांचाच तोटा होत असतो आणि त्याची संग्रहालय पाहण्याची दृष्टी विकसित होत नाही. असे होऊ नये म्हणून सहल आणण्यापूर्वी शिक्षकांनी स्वत: एकदा संग्रहालय पाहावे. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनक्षम वयानुसार काय आणि किती पाहणे आवश्यक आहे, हे ठरवून त्यानुसार नियोजन करावे, दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा जेणेकरून मुलांनाही सांभाळताना अडचण येणार नाही आणि माहिती समजावण्यास पुरेसा अवधी मिळेल. गरजेनुसार संग्रहालयात असलेल्या पुस्तिका, शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेले संच (२ूँ’ ‘्र३२) वापरावेत. (सिंधू संस्कृतीविषयी माहिती देणारे असे संच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उपलब्ध आहे.)

संग्रहालये ही ज्ञानप्राप्तीची केंद्रे आहेत. आपल्याला संस्कृती, इतिहास यांचे आकलन होण्यासाठी, त्यांचे नेमके भान येण्यासाठी आणि आपल्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी त्यांचे महत्त्व अबाधित आहे.

(लेखक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथील निवृत्त वरिष्ठ अभिरक्षक आहेत.)

शब्दांकन : ओंकारपिंपळे
दिलीप रानडे

response.lokprabha@expressindia.com