18 February 2019

News Flash

‘लंबी रेस’साठीची गुंतवणूक

गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट असतील तर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लांब पल्ल्यासाठी फायद्याची ठरते.

म्युच्युअल फंड्स हा गुंतवणूकदारांसाठी फार संशोधन किंवा विश्लेषण न करता आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे.

भालचंद्र जोशी – response.lokprabha@expressindia.com
लोकांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट असतील तर म्युच्युअल फंडातली गुंतवणूक लांब पल्ल्यासाठी फायद्याची ठरते.

म्युच्युअल फंड्स हा गुंतवणूकदारांसाठी फार संशोधन किंवा विश्लेषण न करता आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. म्युच्युअल फंडात विविधता, सोयीस्करपणा, कराच्या बाबतीत कार्यक्षमता आणि इतर अनेक फायदे उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी स्वतचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी जास्त वेळ नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी किमान प्रयत्न आणि कमी खर्चासह विविध प्रकारचे गुंतवणुकीचे लाभ घेण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये कमीत कमी ५०० रुपये रकमेद्वारे गुंतवणुकीची सुरुवात करता येते. कोणत्या स्टॉक, बॉण्ड किंवा कमोडिटीमध्ये गुंतवणूक करायची याची चिंता गुंतवणूकदारांनी करण्याची गरज नसते. व्यावसायिक फंड मॅनेजर ते काम करतात.

म्यच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार, म्युच्युअल फंड इक्विटी, डेट, गोल्ड वगरेसारख्या विविध प्रकारच्या मालमत्ता श्रेणींमध्ये पसे गुंतविण्याचा पर्याय दिला जातो. लोकांची आíथक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य साध्य करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओची जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार असलात तरी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टानुसार म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या जोखीम आणि परतावे असतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे, संभाव्य परतावा जितका उच्च, तितका संभाव्य नुकसानाचा धोका अधिक असतो. प्रत्येक म्युच्युअल फंडाचे पूर्वनियोजित उद्दिष्ट असते ज्याद्वारे फंडाची मालमत्ता, गुंतवणुकीचे क्षेत्र आणि गुंतवणुकीची पद्धती निश्चित केली जाते.

सध्या म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम आहे. ही एक अशी गुंतवणूक योजना असते ज्यात गुंतवणूकदारांकडून पसे गोळा करण्यावर भर दिला जातो आणि विविध गुंतवणूक भांडवल, बॉण्ड्स, शेअर्स आणि इक्विटीमध्ये गुंतविली जातो. म्युच्युअल फंडात अनेक सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्यात बॉण्ड, स्टॉक्स, फायनान्शियल मार्केट इन्स्ट्रमेन्स आणि इतर मालमत्ता यांचा समावेश आहे. या फंडांचे व्यवस्थापन व्यावसायिक व्यक्ती करतात ज्या गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न किंवा भांडवली लाभ मिळवण्यासाठी कौशल्याने योग्य प्रकारे पशाची गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओची आखणी ही कायम फंड प्रोस्पेक्टस नुसार गुंतवणुकीच्या उद्देशाप्रमाणे केली जाते.

उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीची एखाद्या तिमाहीची कामगिरी खराब होण्याच्या अगोदर तुम्ही त्या एका विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर, तुम्ही तुमचे पसे गमावून बसण्याचा धोका असतो कारण तुम्ही फक्त या एकाच कंपनीत गुंतवणूक केलेली असते. ज्यांच्यापाशी त्या कंपनीची थोडीफार गुंतवणूक असेल अशा फंडाच्या युनिट्समध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर कंपनीच्या वाईट कालावधीत तुम्ही त्या कंपनीत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तुमचे अगदी थोडे नुकसान होते. कारण आपण ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे, तिचा हिस्सा पोर्टफोलिओत फार अल्प असतो.

म्युच्युअल फंडाच्या योजनांची काही विशिष्ट उद्दिष्टे असतात आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार फंडाची निवड करू शकता. फंडाचा मॅनेजर तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा विचार करतो आणि त्यानुसार फंडाच्या पोर्टफोलिओची आखणी करतो आणि ही उद्दिष्टे ठराविक योजनांची उद्दिष्टे असतात. गुंतवणुकीच्या हेतूनुसार फंड मॅनेजर फंडाच्या पोर्टफोलिओत कोणते बॉण्डस आणि फंड्स समाविष्ट करायचे आणि कोणते नाही याचा निर्णय घेतो.

उदाहरणार्थ, सेवानिवृत्ती, विदेशी दौरा. मुलांच्या शिक्षणासह इतर आíथक उद्दिष्टे असलेल्या, दीर्घ मुदतीची भांडवल वृद्धी साध्य करण्याचा उद्देश असलेल्या गुंतवणुकदारांना इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुचविले जाईल.

म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे तपशिलवार स्पष्टीकरण देण्यासाठी आपण एक प्रत्यक्ष उदाहरण किंवा केस स्टडी घेऊ.

समजा, शुभदा ही एक २४ वर्षांची अविवाहित मुलगी असून तिच्यावर तिची आई आणि भाऊ अवलंबून आहेत आणि तिचा पगार ३० ते ४० हजार रुपये आहे. तिला आíथक नियोजन/गुंतवणुकीचे ज्ञान नसून तिला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तिला तिच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट जाणून घ्यावे लागेल, तिच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा अंदाज घ्यावा लागेल आणि तिला किती जोखीम सहन करता येते हे समजून घ्यावे लागेल. या प्रक्रियेत तिला ऑनलाइन उपलब्ध असलेली जोखीम-मूल्यांकन आणि मालमत्ता विभाजन साधनांची मदत होईल.

जोखमीचे स्वरूप निश्चित करणे

शुभदाचे वय, सध्याचे उत्पन्न, अवलंबित व्यक्ती, सध्याची नोकरी, करिअर, व्यवसाय, घरची स्थिती, एकूण उत्पन्नाची  स्थिती, पशाची बचत करण्याची पद्धत, गुंतवणुकीच्या ज्ञानाचे प्रमाण, आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार हे साधन तिच्या जोखमीचे स्वरूप निश्चित करेल.

जोखमीचे विश्लेषण

दिलेल्या संपूर्ण माहितीच्या आधारावर, विद्यमान उत्पन्न आणि कौटुंबिक स्थितीसह शुभदाची जोखीम घेण्याची क्षमता आणि जोखीम सहन करण्याची क्षमता मुद्दलाला माफक असल्याचे मूल्यमापन करण्यात येईल. याचा अर्थ ती मध्यम जोखमीसह गुंतवणूक करू शकते.

मालमत्ता विभाजन

शुभदाच्या जोखमीच्या स्वरूपानुसार, तिच्या गुंतवणुकीची विभागणी करण्यासाठी डेट फंड हे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मालमत्तेची श्रेणी ठरू शकते. विशिष्ट कालावधीत चांगल्या प्रमाणात नफा मिळविण्यासाठी खासगी क्षेत्रातील आणि सरकारी डेट फंड  दोन्ही योग्य असतील. तिने इक्विटी इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास इक्विटी फंड देखील तिच्यासाठी एक चांगला पर्याय असेल.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे लाभ देतात. गुंतवणुकदार त्यांच्या इच्छेनुसारमध्ये त्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार नफा मिळवू शकतात. परंतु, गुंतवणूकदार सुज्ञपणे गुंतवणूक धोरण तयार करण्यास जबाबदार असतो. त्याने चुकीच्या गुंतवणुकीच्या पद्धती आणि साध्या चुकांमुळे होणारी जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करावा.

गरवाजवी परताव्याची अपेक्षा आणि मूलभूत पलूंची माहिती नसताना गुंतवणूक करणे या गुंतवणुकीच्या संदर्भातील काही चुका आहेत, ज्या टाळल्यास मोठय़ा प्रमाणात जोखीम कमी करता येईल. तुमच्यापाशी संयम असल्यास, घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळा आणि वाजवी जोखीम घ्या. म्युच्युअल फंड गुंतवणुकीमुळे तुम्ही लक्षणीय नफा मिळवू शकता.

ज्याप्रमाणे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असे म्हणतात, त्याचप्रमाणे लहान पण नियमित गुंतवणूक केल्यास कालांतराने संपत्ती निर्माण करता येते. एसआयपी किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानही म्युच्युअल फंड योजनेमध्ये नियमितपणे, निश्चित रकमेची गुंतवणूक करण्याची पद्धती आहे. एसआयपीमुळे गुंतवणूकदाराला महिन्याच्या कोणत्याही एका ठरावीक तारखेला नियमितपणे युनिट खरेदी करता येतात. यामुळे कालांतराने संपत्ती निर्माण करण्यास मदत होऊ शकते.

एसआयपी ही एक अशी गुंतवणूक सुविधा आहे ज्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला कमीत कमी ५०० रुपये इतकी गुंतवणूक करू शकता. गेल्या काही वर्षांत एसआयपीची लोकप्रियता वाढली आहे. मुलांचे शिक्षण, विवाह, सेवानिवृत्ती यासह दीर्घ मुदतीची आíथक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एसआयपीचे दीर्घ कालावधीत संपत्ती निर्मितीचे उद्दिष्ट असते.

उद्दिष्टानुसार गुंतवणूक केल्यास पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यास मदत होते. त्यामुळे उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करता येते आणि भांडवल बाजारातील अल्पकालावधीच्या चढउताराचा परिणाम सोसावा लागत नाही.

नियमित गुंतवणुकीमुळे आपल्याला शिस्त लागते आणि आपण आíथक उद्दिष्टांविषयी अधिक जागरूक होतो. लवकर सुरुवात हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा महामंत्र आहे आणि हा महामंत्र जे अमलात आणतील त्यांची सर्वच उद्दिष्टे निश्चितपणे साध्य होतील. म्हणूनच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हे आपली आíथक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे.

(टीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.)

(लेखक गेली २७ वष्रे बँकिंग आणि आíथक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, म्युच्युअल फंड कंपनीच्या गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

First Published on July 27, 2018 1:06 am

Web Title: mutual fund investment profitable for long term