आरसा
गायत्री हसबनीस – response.lokprabha@expressindia.com
आज.. सेल्फी आहे, डिजिटल छायाचित्रं आहेत, छायाचित्र अ‍ॅप्स आहेत. इतकं सगळं वैविध्य असताना लोकांना जुन्या पेहरावात, जुन्या पद्धतीने फोटो काढून घ्यायला आवडायला लागलं आहे. िवटेज फोटोग्राफीने सध्या अनेकांना वेड लावलं आहे.

काळ गेला तशा काही सवयी गेल्या, काही आठवणी विसरता आल्या, पण त्यांची साक्षीदार ठरली ती छायाचित्रे. त्या गेलेल्या काळातल्या छायाचित्रात जुने राजवाडे पाहिले, राण्या पाहिल्या आणि त्या साडय़ा, दागिने पाहिले. आणि वाटले हे आज मला करून छायाचित्र काढून फ्रेम करता आले तर? या कल्पनेला अर्थात िवटेज फोटोग्राफीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  तरुण पिढीतील तसेच विविध वयोगटांतील मंडळी जुन्या काळातल्या पेहरावात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट छायाचित्र काढून घ्यायला लागली. आज तो पूर्वीच्या काळचा लुक मिळावा आणि तो फील यावा यासाठी भन्नाट प्रयोग आणि तितकेच प्रयत्न करायला लागली. िवटेज छायाचित्रांचे हे खूळ आले ते पाश्चात्त्यांकडूनच.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!

िवटेज छायाचित्र ही संकल्पना इथली नाही. सोशल नेटवìकग साइट आणि सोशल मीडियातून ही संकल्पना पुढे आली आहे. पाश्चात्त्य देशांत िवटेज छायाचित्र काढण्याचे प्रयोग केले गेले. ते सोशल मीडियावर अपलोड केले आणि त्या छायाचित्रासोबत #श््रल्ल३ंॠीढँ३ॠ१ंस्र्ँ८ हा हॅशटॅग वापरला. आणि ही संकल्पना सोशल मीडियावर व्हायरल होत गेली. या भन्नाट प्रयोगाला तरुण पिढीने चांगलाच प्रतिसाद दिला. तरुणच काय वयस्कर लोकही जुन्या पेहरावात थाटात फोटो काढून घ्यायला उभे राहू लागले. िवटेज छायाचित्रांची सुरुवात ही अशी प्रयोगातून झाली. याबद्दल छायाचित्रकार शिरीष कराळे सांगतात की, ‘काळा घोडा फेस्टिव्हलसाठी काही वेगळे करायचे असा विचार करत होतो. तेव्हा मी जुन्या काळातल्या वयस्कर गृहस्थांचे छायाचित्र पाहिले. तेव्हा मला १९५० ते ६० सालातल्या त्या छायाचित्रातून एक कल्पना सुचली. मग मी जुन्या काळातल्या छायाचित्रांचा व्यवस्थित अभ्यास केला. पूर्वी आऊटशूट कसे असायचे, पूर्वीचे छायाचित्रकार कसे छायाचित्र काढायचे, त्या वेळची माणसे कशी असायची, त्या वेळी बॅकग्राउंड कसे होते.. त्या सगळ्यातून जुन्या काळातल्यासारखा पेहराव करून तसाच फोटो काढायचा ही संकल्पना ‘काळा घोडा’ला वापरली तेव्हा ती बऱ्याच जणांना आवडली. तो मी केलेला पहिला प्रयोग लोकप्रिय झाला.’’ शिरीष कराळे सांगतात. त्यामुळे िवटेज छायाचित्र काढून घेण्यासाठी मोठी रांग लागली. लोकांना आजच्या त्याच त्याच छायाचित्रांचा कंटाळा आलाय. त्यामुळे छायाचित्रात स्वत:ला वेगळ्या रूपात लोकांना पाहायचे आहे. त्याचा हा परिणाम होता. ‘‘िवटेज छायाचित्रात लुक महत्त्वाचा ठरतो. वेगळ्या पेहरावात मी कसा दिसतो किंवा मी कशी दिसते हा विचार करण्यामागचा तो गमतीशीर वेडेपणा असतो. आज लग्नसमारंभाची छायाचित्रेसुद्धा लोकांना िवटेज फॉरमॅटमध्ये, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट  हवी असतात. त्यांना वाटतं की आपलं सौंदर्य िवटेज लुकमध्येच खुलून येते.’’ असं छायाचित्रग्राफर तृषांत तेली यांनी सांगितले. मुळात कलाक्षेत्रात सध्या बऱ्याच जुन्या गोष्टी परत येत आहेत, त्यामुळे जुने दागिने, साडय़ा, वस्तू, फíनचर सगळीकडेच सहज उपलब्ध होत आहेत.

पूर्वीच्या छायाचित्रातून एक साधेपण दिसते. चित्राचा स्तब्धपणा (स्टील लाइफ) आकर्षणाचा केंद्रिबदू असतो. त्या छायाचित्रात आजूबाजूला घडय़ाळ, टेबल, खुर्ची, पडदे, खिडकी, दरवाजे, जुन्या इमारती दिसतात. माणसांच्या चेहऱ्यावर फारसे हावभाव नसतात. कारण तेव्हा लोकांना माहीत असायचे की फोटो हा केव्हातरी एकदाच काढला जाणार आहे. तेव्हा तो नीटनेटका, आपली आठवण कायमस्वरूपी जपणारा हवा.  ‘छायाचित्रात लाइट महत्त्वाचा असतो. एखाद्या साडी नेसलेल्या स्त्रीने उन्हात उभे राहून छायाचित्र काढले तर रंगीत छायाचित्रात तिच्या अंगावर ऊन पडलेले दिसते. त्यामुळे ते छायाचित्र उन्हात काढलाय असे वाटेल, पण त्याच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट छायाचित्रामध्ये ऊन जास्त प्रखरपणे दिसतं, कारण त्यात काळ्याबरोबरच पांढऱ्या रंगाचा उठाव असतो. त्यामुळे जास्त लाइट हा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमध्ये व्यवस्थित कळून येतो. त्यामुळे छायाचित्र काळे-पांढरे असले तरी त्यातल्या प्रकाशामुळे ते उन्हात काढलेय हे समजून घेणे पूर्वी सोपे असायचे. आजही एखादे छायाचित्र िवटेज पद्धतीने काढले तरी त्याचा जो नसíगक फील असतो तो यावा लागतो.’’ असे तृषांत सांगतात. त्या सर्व जुन्या छायाचित्रांमध्ये त्या काळाचा एक असा भाव आहे की ती छायाचित्रे आपल्याला पुन्हा पुन्हा आकर्षित करतात. चेहऱ्यावरील भाव, कपडे, स्टुडिओतील वस्तूंवर योग्य प्रकाश पडणे हे िवटेज छायाचित्रात आवश्यक असते. या सर्व गोष्टींमुळे िवटेज छायाचित्र काढताना ‘एडिटिंग’ला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे ती प्रक्रिया छायाचित्रकारांकडून समजून घेता आली. िवटेज छायाचित्र आधी रंगीत शूट केले जाते. रंगीत छायाचित्रे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमध्ये परावíतत होऊ शकतात. ज्याने ग्रे टोन मॉडिफाइड राहतो. पुढे छायाचित्रशॉप, लाइट रूममध्ये एक्सट्रीमेंट कलर वैगेरे वापरता येतात. त्यामध्ये कलर लेयिरगवर काम होते. जेथे आधी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट मग सेफिया, किंवा दोघांचे मिक्स्चर, मग जुनी पाश्र्वभूमी वापरली जाते. छायाचित्र कम्पोझ केल्याने कलरपेक्षा ब्लॅक ब्लॅक व्हाइट जास्त उठावदार दिसते. यात कलर कॉन्ट्रास पाहावा लागतो जसे की िवटेज छायाचित्रात जास्त ब्राइटनेसही योग्य नसतो आणि जास्त श्ॉडोही वापरलेली चांगली नसते. त्यात समतोल असावा लागतो. िवटेज छायाचित्रे डिजिटलपेक्षा फिल्म कॅमेऱ्यावर काढली जातात. डेव्हलिपग करतानाच कॉन्ट्रास तपासला जातो. तो वापरला नसेल तर फिल्म कॅमेऱ्यात ब्लॅक ब्लॅक व्हाइट बॅलन्स नीट नाहीये हे कळते. पोझ देताना पूर्वी जशी माणसे ताठ उभी राहायची तशी पोझ दिली जाते. नाहीतर जुन्या छायाचित्रातून काही कॉपी केलेल्या पोझ वापरल्या जातात.

खरंतर प्रोप्स, कपडे, मेकअप हे महत्त्वाचे असतातच, कारण छायाचित्र एडिट करताना ते महत्त्वाचे ठरते. जुन्या काळातल्या काही विशेष घरगुती वस्तू, कपडे, दागदागिने आपल्या आजही लक्षात आहेत. त्यांचा वापर मुख्यत्वे छायाचित्राच्या शूटसाठी होतो, कारण त्या जुन्या लोकप्रिय गोष्टी आपल्याही छायाचित्रात असाव्यात असे आज छायाचित्र काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला वाटते. स्टुडिओत छायाचित्राचे शूट असते तर काही बाबतीत पाश्र्वभूमी हे ठरलेली असते. पूर्वी छायाचित्र काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे पेंटिंग हे असायचे त्यामुळे ते आजही वापरले जाते. या पेंटिंगमध्ये जुना वाडा, बाग, मदान, कौलारू घर, दगडाच्या इमारती, पडकी िभत अशी चित्रे असतात. थोडक्यात त्या वेळचे शहर आणि परिसर त्यासाठी वापरला जातो. शूटसाठी लोक खुर्चीवर बसतात तेव्हा र्अध फíनचर झाकले जाते त्यामुळे डेकोरेट करण्यासारख्या गोष्टींमध्ये टेबल आहे, ज्यावर टेबल क्लॉथ ठेवून त्यावर ग्रामोफोन किंवा फ्लॉवरपॉट ठेवण्यात येतो.

िवटेज छायाचित्रात कपडय़ांनादेखील महत्त्व आहे, शूटसाठी एखादी स्त्री नऊवारी नेसते, दागिने घालते, तेव्हा आपोआपच तिच्यात एक ग्रेस तयार होते.  त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील भाव आजचे आहेत असे वाटतच नाही. ती अगदी पूर्वीसारखी सोज्वळ सौंदर्यवतीच वाटते. लहान मुलांना खाकी पँट, काळी टोपी घातली की तीही अगदी वेगळी दिसायला लागतात. पूर्वी घरंदाज बायका फक्त नऊवारी नेसत नसत, तर त्या बुट्टय़ांच्या नऊवारी साडीवर रेशमी शेला असायचाच. त्यामुळे िवटेज छायाचित्रे काढताना कपडय़ांचा खूप बारकाईने विचार करावा लागतो.  पूर्वी दागदागिन्यांमध्येदेखील बुगडी, मोत्याचे कानातले, मंगळसूत्र, बांगडय़ा, पाटल्या, कोयरी हार, ठुशी, राणीहार, नथ हे स्त्रियांच्या अंगावर असायचेच. तर केसांची रचना म्हणजे वेणी, अंबाडा असायचा. त्यामुळे आम्ही िवटेज थीम जेव्हा सुरू केली तेव्हा हे पूर्वी रोज वापरले जाणारे दागिने लोकांना आवडले. त्यानंतर आमच्याकडे छायाचित्र काढून घेण्यासाठी येणारी मंडळी स्वत:हूनच स्वत:कडे असलेले १०० र्वष जुने दागिने घालून, नऊवारी साडी नेसून तयार होऊन यायला लागली. यापूर्वी कधीही त्यांनी त्या साडय़ा, दागिने कपाटातून बाहेर काढून पाहिलेच नव्हते. ते या िवटेज छायाचित्रांच्या निमित्ताने काढून घालू शकले. आम्ही लहान मुलींना तो इरकलचा परकर पोलका, दोन वेण्या, काळ्या रिबिन्स, टिकली, मोत्याच्या बांगडय़ा, गजरे असं घालायला देतो. पुरुषही तो काळा कोट, धोतर, टोपी, चप्पल हे सर्व घालून पाहतायत, अशी माहिती कला दिग्दर्शक वर्षां कराळे यांनी दिली. पूर्वी काळ्या-पांढऱ्या रंगांचा जमाना होता, त्यामुळे कपडे कोणत्या रंगाचे असतात हे समजून घेणे अशक्यच होते, फक्त कपडय़ांवरच्या रंगांच्या छटांचा अंदाज बांधता येत होता. मुळात जुन्या पद्धतीचे नुसतेच छायाचित्र काढून काही उपयोग नाही तर तेव्हा लोक आपले छायाचित्र ज्या मजेने बघत होते ती मजा आजही असे छायाचित्र काढल्यावर आली पाहिजे. तरच िवटेज छायाचित्रे काढणे सार्थकी लागेल.

काहींना जुन्या छायाचित्राप्रमाणे हुबेहूब पोट्र्रेट्स हवे असतात तर काहींना नुसते ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट छायाचित्र काढून हवे असते, काहींना अख्खं वेिडग, रिसेप्शन, प्री-वेिडग शूट व्हिंटेज छायाचित्रातून हवे असते तर तरुणाईलाही पारंपरिक पद्धतीचे जुने पोट्र्रेट्स हवे असतात. त्यामुळे त्याप्रमाणे मेकअप आणि एडिटिंगमध्ये बदल होतो.

फायनल अल्बम बनतो तोही अर्थातच जुन्या अल्बमप्रमाणे काळ्या कार्ड पेपरवर ग्लोसी िपट्रने चिटकवलेल्या छायाचित्रासह आणि त्यावरचे मॉइश्चर उडू नये म्हणून बटर पेपरने झाकलेला. तर कॅनव्हासवरही छायाचित्र िपट्र केले जाते. या करामतीसाठी लोक हजारांच्या घरात रुपये मोजतात आणि पुढे सोशल मीडियावर टाकतात. त्याला मित्रमंडळींकडून लाइक्स मिळायला सुरुवात झाल्यावर जो आनंद, जे समाधान असते, त्याला जगात कशाचीच सर येऊ शकत नाही.

जुन्या पद्धतीची छायाचित्रे लोकांसाठी आरशासारखे असतात. जुन्या काळातले कपडे आणून लोक त्यात आवर्जून छायाचित्रे काढून घेतात. मी जुन्या काळातल्या लोकांप्रमाणे छायाचित्रातून कसा दिसेन हे पाहायचं असा लोकांचा हट्टच असतो. तशाच कपडय़ांमध्ये नदी किनारी, कोकणात, गावातही जाऊन छायाचित्रं काढली जातात.

– तृषांत तेली, छायाचित्रकार

आज एक तर लोकांमध्ये संवाद नाही. दुसरीकडे जुन्या पद्धतीच्या साडय़ा, कपडे, दागिने, वस्तू यांचं महत्त्व आजच्या पिढीला माहिती नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलली आणि त्यातून कुटुंबातील मंडळी जवळ आली तर मजा येईल, या विचाराने िवंटेज छायाचित्रांचा घाट घालण्यात आला. एक-दोन तासांसाठी ही मंडळी एकत्र येतील आणि त्याचबरोबर या निमित्ताने आपली संस्कृतीही जुने दागिने, जुन्या पद्धतीच्या साडय़ा, कपडे घालून जपली जाईल. हा विचार लोकांना खूप आवडला. आम्ही हजारोंच्या संख्येने कुटुंबांचे िवटेज फोटो काढले आहेत.

– शिरीष कराळे, छायाचित्रकार, आर्टस्टि.

‘‘लोक आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचा मेकअप करतो, कपडे घालतो, साडय़ा नेसवतो, दागिने घालतो. आपल्याला कुणीतरी इतका मान आणि आदर देतंय ही कल्पनाच त्यांच्यासाठी खूप मोठी असते. हे सर्व जरी िवटेज छायाचित्रांच्या शूटसाठी चाललं असलं तरी त्यासाठी आपण इतके सुंदर दिसतोय ही भावनाच खूप वेगळी आहे. परंपरा, सौंदर्य आणि त्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे.’’

– वर्षां कराळे, कला दिग्दर्शक हेमांगी

वेधक प्रवासवर्णने, कथा-कादंबरीचे अंश, शताब्दी स्मरण, अर्थ, चित्रपट, आरोग्यविषयक लेख आणि विनोदी कथा, कविता यांनी भरगच्च असा हा अंक आहे. स्पर्धा परीक्षांचे मायाजाल, विवेकानंद विद्यापीठ, उपेक्षित प्रतिभावंत स्त्रिया, इस्मत चुगताई अशा विषयांवरील लेख आवर्जून वाचावेत असे आहेत. देशातील सध्याच्या अर्थकारणातील खाचखळगे रुपा रेगे नित्सुरे यांनी उलगडले आहेत. रामदास भटकळ यांनी महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेला ‘आतला आवाज’ हा लेख वाचनीय आहे. संजीवनी खेर यांनी इस्मत चुगताई यांच्या कारकीर्दीवर वेगळा प्रकाश टाकला आहे. ज्यूंचा नरसंहार यावरील चित्रपटांची वेगळी ओळख उदय कुलकर्णी यांच्या लेखातून होते.