पोस्टाचे स्टॅम्प गोळा करणं हा लहान मुलांचा छंद म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण प्रत्यक्षात टपाल तिकीट संग्रह म्हणजेच फिलाटेली हा ज्ञानवर्धन, संस्कृती संवर्धन आणि आर्थिक फायद्याकडे नेणारा छंद आहे.

टपाल तिकीट संग्रह किंवा फिलेटेली हा एका छंदात अनेक फायदे असणारा छंद आहे. यामध्ये ज्यांना शक्य आहे ते नवीन तिकिटांचा पूर्ण ब्लॉक खरेदी करून चार तिकिटांचा ब्लॉक ट्रॅफिक लाइट्ससह, किंवा प्रथम दिवस आवरण आणि माहिती घडीपत्रक संग्रहाच्या रूपात करू शकतात. यास टपाल तिकीट संग्रहाच्या भाषेत ‘िमट कलेक्शन’ म्हटले जाते. तर शाळकरी मुले आणि इतर व्यक्ती  अवाढव्य खर्च करू शकत नाहीत. त्यांनी आपल्याकडे किंवा मित्रांकडे येणाऱ्या टपाल तिकिटांमधील स्मारक तिकीटशृंखलेमधील (जी एकदाच छापली जातात) तिकिटे ज्यास कमोमोरेटिव्ह श्रेणीची इंग्रजीत म्हटले जाते, ती किंवा डिफिनेटिव्ह श्रेणी जी वर्षांनुवषे चालतील इतकी छापली जातात, त्यांना काळजीपूर्वक टपालाच्या पाकिटावरून काढून आपल्या तिकीट साठा पुस्तक (स्टॉकबुक) मध्ये ठेवावे. अशा तिकिटांना विनिमय (एक्स्चेंज) आणि संग्रहात ठेवण्यासाठी वापरता येईल.

Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा
upsc preparation Art and culture is an important component in Central Public Service Commission preliminary examination
upsc ची तयारी : कला आणि संस्कृती

lp27
संग्रह नीटनेटका व काबूत ठेवण्यासाठी, नवीन संग्राहकांनी तिकिटांना देशांच्या सीमेमध्ये बांधण्याऐवजी, संग्रहास ‘लक्ष्य’ (थीम) रूपात, त्या थीमच्या पानांवर ठेवावे, साधारण ‘थीम’मध्ये  पर्यावरण, वारसास्थळे, साहस, धर्म, अध्यात्म, परंपरा, संस्कृती इतिहास व पुरातत्त्व, सैनिक इतिहास (ज्यामध्ये जगातील सेनांद्वारा वापरलेली उपकरणे, आयुधे, परिवहन, संचारप्रणाली, हुतात्मा, पदकविजेता) यांची तिकिटे येतात. पर्यावरण या विषयात पर्यावरणाशी निगडित विविध विषय, उपविषय रूपात येतात, तसेच इतर विभागांचे आहे. परंतु जर नंतर पर्यावरणामध्ये एखाद्यास फक्त पक्षी, फळे, फुले, कीटक, फुलपाखरे यांचा संग्रह करायचा असेल तर उपविभागास संग्राहक मुख्य लक्ष्य बनवून एखाद्या देश किंवा जग या रूपात संग्रह करू शकतो. उदा. मी मिलिटरी हिस्ट्री (सैनिकी इतिहास) अंतर्गत सर्व संग्रह एकीकृत करतो, पण परिवहनमध्ये फक्त रेल्वे, नौवहन, याला एकीकृत संग्रह तर पर्यावरणामध्ये फक्त पक्षी विषय असल्याने ‘लक्ष्य’ संग्रह पक्षी म्हणून होतो. आणि पक्षी म्हणून सर्व देशांचे त्यात अंतभूत आहेत, त्यामुळे कुठलाही विषय निवडून एकीकृत संग्रह करून नंतर तो एकीकृत किंवा उपविषयात ‘लक्ष्य’ या रूपात करायचा हे तिकीट संग्राहक न गोंधळता निश्चित करू शकतो; ज्यामुळे संग्रह नियंत्रण, नियोजन, विनिमय सोपा होतो.

टपाल तिकीट संग्रहामध्ये पोस्टाची स्मारक, नियमित वापराची तिकीटे, पर्फशीटस, मॅक्झीम कार्डस्, प्रथम दिवस आवरण, विशेष आवरण (जे एखाद्या विशेष प्रसंगासाठी काढले जाते, उदा. रौप्य, सुवर्ण महोत्सव, पर्यटन स्थळ समारंभ) परमनंट पिक्टोरिअल कॅन्सलेशन (एखाद्या स्थळाचे महत्त्व दर्शविणारा, नियमित वापराचा शिक्का) स्पेशल कॅन्सलेशन एखाद्या दिवसाच्या विशेष कार्यक्रमासाठी वापरला जाणारा विशेष शिक्का उदा. मातृदिवस, विश्व योग दिवस, पुस्तक प्रकाशन) मेघदूत कार्डस् ही सामग्री स्टेशनरी रूपात छापली जाते. तिचा टपाल तिकीट संग्राहक संग्रह, वापर किंवा विनिमयासाठी करतात. फर्स्ट फ्लाइट कवर्स ही कुठल्याही विमानाच्या नवीन मार्गाच्या उद्घाटनादिवशीच जारी होतात.

टपाल तिकिटांचे संग्रहाबरोबरच शैक्षणिक महत्त्व व ज्ञान महत्त्व असते. कारण प्रत्येक तिकिटाचे विभिन्न पैलू असतात, त्यामुळे विचार, निरीक्षण, एकाग्रता तौलनिक शक्ती वाढते. विद्यार्थ्यांना घरबसल्या जगाबद्दल माहिती, वरिष्ठांना घरबसल्या पर्यटन होते. उदा. ताजमहलचे तिकीट, इतिहास, प्रेमकथा, इमारत बांधणीसामग्री, बांधणी तंत्रज्ञान, पुरातत्त्व महत्त्व, इतिहास आणि  परिस्थितीकी संग्रहालयात पर्यटन महत्त्व वाढवून जाते. एक तिकीट विषय एखादा हाताळते. यात कागदनिर्मिती आणि छपाई तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे ज्ञानाचा प्रसार इतर कुठल्याही माध्यमात इतका संक्षिप्त जागेत मिळणार नाही. बरेच संग्राहक अशा तिकिटांची सर्वागीण लेख रूपात हिस्ट्रीशिट (इतिहासलेख) बनवून प्रदर्शनातसुद्धा ठेवतात. त्यामुळे संग्रहाचे मूल्यवर्धन होते. एक पाच स्क्वेअर सेंटिमीटरचा तुकडा कागदावर जेवढे ज्ञान देऊन जातो ते इतर माध्यमातून मिळणे असंभवच असते, शिवाय जितकी जुनी तितकी किंमत संग्राहकांच्या मागणीप्रमाणे वाढत जाते. इथे िमट किंवा वापरलेली तिकिटे हा प्रश्न गौण असतो. उदा. १९६५ च्या प्रथम दिवस आवरण ज्यावर काही पैशांचे तिकीट लागले आहे तेव्हाची किंमत एक रुपया होती, आज ते ३० रुपयामध्ये विक्री होत आहे, आणि जसजसे जुने होत जाईल तसतशी त्याची किंमत वाढत जाईल. हे आवरण प्रथम राष्ट्रीय जहाज रानी दिनासाठी मुंबई जीपीओने जारी केले होते. तर काही तिकिटे चुकांमुळे टपाल विभाग विक्री थांबवतो, अशी तिकिटे संग्राहकास मागितलेली रक्कम मिळवून देतात. यांना डिफेक्टिव्ह म्हणतात. तिकिटाचा ब्लॉक चार तिकिटांचा किंवा एका तिकिटाचा ट्रॅफिक लाइट्ससह असेल तर त्याचासुद्धा नडलेला संग्राहक मागितलेली किंमत देतो, ट्रॅफिक लाइटस्मध्ये तिकीट तावाच्या कडेला तीन किंवा चार वेगवेगळ्या रंगाचे गोल असतात. ते तिकिटासाठी वापरलेल्या रंगसंगतीची माहिती देतात. बरेच संग्राहक पोस्टात आपला डाक तिकीट संग्रहासाठीचा डिपॉझिट अकाउंट उघडताना ट्रॅफिक लाइट आपल्या आवडी आणि जरुरी म्हणून डिमांड ऑर्डरमध्ये लिहितात.

सर रोलॅण्ड हिल हे डाक तिकीट संग्रहण छंदाचे जनक मानले जातात, आणि आज टपाल खात्याद्वारे नियंत्रित शालेय डाक तिकीट संग्रह मंडळांना त्यांचे नाव दिलेले असते.

lp26भारताच्या बऱ्याच भागात शाळकरी विद्यार्थी, तिकीट संग्रहात रुची घेतात, पण महाराष्ट्रात मोठी शहरे आणि काही मोठमोठाली माणसे यांचीच या क्षेत्रात मक्तेदारी दिसते. याचे मुख्य कारण याच्या छंद दृष्टिकोनातून, सेवाभावनेतून या छंदातील प्रतिष्ठितांनी स्वत:स फक्त, लेखन, व्याख्याने आणि सामग्री विक्री एवढय़ापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अर्थात अपवादात्मक रूपात काही व्यक्तींनी बरेच काही केले आहे, तसेच या छंदाचे शैक्षणिक महत्त्व ओळखून शाळा, प्रसारमाध्यमे यांनी मंडळ स्थापना किंवा लेखमाला छापण्यात भीषण अनास्था दाखविली आहे.

शालेय मुले आपल्या खाऊच्या पैशातून काही टक्के रक्कम मासिक गुंतवणूक या रूपात करू शकतात, जी अडीअडचणीस त्याच किंवा थोडय़ा जास्त रकमेस परत घेता येऊ शकते, परंतु यासाठी कोऱ्या (मिंट) तिकिटांचा संग्रह करणे जरूर असते. ही दरमहा काही रुपयांची गुंतवणूक काही वर्षांनी काही हजार रुपये देऊ शकते. अर्थात यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त तिकीट संग्रह मंडळाचे सदस्य बनणे चांगले म्हणजे बदलत्या स्थितीची माहिती वापरण्यासाठी उपयोगी पडू शकते. संग्रहाची त्यावेळची किंमत कळू शकते. साधारणपणे १०० रुपये मासिक  १२० महिने, मूळ रकमेवर ५० टक्के पर्यंत परतावा देऊ शकेल, कारण नवीन नवीन संग्राहक बनत राहतील, ते जुनी जुनी तिकिटे शोधत राहतील. त्यांना संग्राहक किंवा विक्रेता संग्राहकाशिवाय पर्याय नसेल. टपाल विभाग सहा महिन्यांच्या नंतर स्मारक तिकिटांचा आरक्षित स्टॉक ठेवून बाकी संपवून टाकतो, आरक्षित स्टॉक स्पेशल कव्हर्स वर वापरण्यासाठी, किंवा प्रदर्शनात प्रचार प्रसारासाठी त्याच्या निर्धारित मुखमूल्यानुसार वापरला जातो. त्यामुळे संग्राहकच दाता असू शकतात. आज विविध प्रकारच्या क्लब चालवणाऱ्या शाळांत दुर्दैवाने टपाल तिकीट संग्रहण क्लब अस्तित्वात नसतो. तो त्यांनी पोस्टाच्या फिलेटेली विभागांशी संपर्क करून सुरू करावा. तसेच राज्याशी संबधित वारसा, पर्यावरण, साहस, धर्म, परंपरा, अध्यात्म या विषयांशी जुडलेल्या ‘लक्ष्य’ विषयांवर नवीन विषयांवर विशेष, नियमित सचित्र टपाल शिक्के स्पेशल कव्हर्स काढण्यावर जोर द्यावा. विशेष आवरण संस्थेच्या प्रसार, प्रचाराबरोबरच स्मारक वस्तू विक्री रूपात संस्थेला आर्थिक महसूल मिळवून देऊ शकतील. महाराष्ट्राशी निगडित परंतु फिलेटेली मध्ये नसणारे पंढरीची वारी, गणेश, उत्सव, गोविंदा, किल्ले, युग, राज, समाजपुरुष, युद्ध इतिहास, ऐतिहासिक, आधुनिक व वर्तमान, सह्य़ाद्री/ सातपुडा/ बालाघाट पर्वत शृंखला, जैवविविधता, जुनी मंदिरे, महाराष्ट्रात रामायण विषयांची संबंधित स्थळे अशा किती तरी गोष्टींना या माध्यमातून जगासमोर ठेवता येऊ शकते, सांस्कृतिक पर्यटन, जनसंपर्क मंत्रालयाद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कोनाला जगासमोर आणणे जरुरी आहे. यासाठी संस्कृती मंडळाने फिलेटेलीद्वारा महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगासमोर ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमासाठी शाळा, कॉलेजेस, एनजीओना आर्थिक सहयोग देणे जरुरी आहे. यासाठी छापल्या जाणाऱ्या पाकिटांना सांस्कृतिक/ पर्यटनविषयक महत्त्वाची माहिती असलेली जाहिरात देता येऊ शकते, ज्यामुळे बहुकोनी लाभ होईल. फक्त समारंभ, व्याख्याने, प्रदर्शने, साहित्य प्रकाशन आणि वशिलेबाजीने आर्थिक सहयोग या चाकोरीतून बाहेर पडून फिलेटेलीलासुद्धा प्रचार अंग रूपात स्वीकारले पाहिजे.
lp23

टाइम स्क्वेअरवर दिवाळी साजरी करणाऱ्या पर्यटन धोरणापेक्षा सांस्कृतिक रूपात, फिलेटेलीस सहयोग जरुरी आहे. आर्थिक कोनातून हजार विशेष आवरणे कॅन्सलेशनसाठी, पोस्ट तिकीट खर्च (आजच्या हिशेबाने) पाच हजार, दहा हजार पाकिटांचा छपाई खर्च दहा हजार किंवा प्रायोजक घेतल्यास शून्य किंवा पाच हजार, पोस्टाचा खर्च पाच हजार, समारंभाचा खर्च प्रायोजक घेऊन म्हणजे शून्य, आता कॅन्सल्ड स्पेशल कव्हर्स प्रत्येकी दहा रुपये म्हणजे रुपये दहा हजार रुपये + साधी पाकिटे रुपये पाच म्हणजे पन्नास हजार रुपये महसूल मिळाला तर. २१ हजाराच्या जवळपास प्रायोजक घेतला तर खर्च फक्त दहा हजार रुपये. महसूल साठ हजार म्हणजे रुपये ५० हजार त्या संस्थेस मिळू शकतात, व दरवर्षी कॅन्सलेशनची बढोत्तरी होत राहिली तर महसूल वाढेल.

विविध संस्थांनी महाराष्ट्राशी निगडित विविध विषयांना घेऊन त्या विषयाचे ‘लक्ष्य’ प्रकार सुरू करता येईल. उदा. विविध शिवप्रेमी संस्थांनी आपसी समन्वय साधून स्पेशल कव्हर्सच्या रूपाने पुनरावृत्ती न करता शिवचरित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शिवचरित्र फिलेटेली हा आजपर्यंत फक्त पुस्तके लेखन, भाषणांपुरता मर्यादित विषय टपाल कवर्सद्वारा सुरू करता येईल, तसेच वारीवर विशेष आवरण प्रत्येक मुक्कामाजागी जारी करता येईल ते कदाचित आवरण खपाचे विश्व रेकॉर्ड बनवू शकेल. परंतु जरुरी आहे, शाळा, कॉलेज, संस्था, सरकार, प्रायोजक यांच्या मानसिकता बदलाची. फक्त मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळून, महाराष्ट्र जगासमोर जाणार नाही. त्याला जरूर आहे अशा ‘दृक्’ माध्यमाची. मराठी मानसिकता अशा सशक्त माध्यमांचा उपयोग न करणारी निद्रिस्त मानसिकता आहे. आता गरज आहे त्या मानसिकतेला सोडून जागे होण्याची. केरळचा कलारी पट्टा युनेस्कोच्या सूचीत आहे. त्यांचे संगीत सूचीत आहे, आपली कला, संस्कृती, दांडपट्टा, गीतरामायण कुठे आहे? फक्त त्याला समर्पित लोकांच्या अहंकार मनोऱ्यावर, आपण गीतांजली एक्स्प्रेसला- गीतरामायणाचे उत्तर देऊ शकत नाही? गीत गोविंदवर पोस्ट तिकीट मालिका निघते, पण गीतरामायण, गीतारहस्य, ज्ञानेश्वरीचे तिकीट काढण्यात आपण मागे पडतो. वल्लभभाई पटेल, गांधी, नेहरूंचे शिक्के त्यांच्या जन्मगावी आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा एकाही मराठी भारतरत्नचा पोष्टाचा शिक्का नाही. आज कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि इतर राज्यांत पोस्टाचे नियमित वापरासाठी चित्रांकित १० ते ४० शिक्के आहेत. महाराष्ट्रात फक्त आठ आहेत. त्यातील अमरावतीचा अंबामातेचा आणि पंढरपूरचा कळसाचा शिक्का गायब आहे. जे राज्य विठ्ठलाची पूजा करून विठ्ठलास गायब करते ते कसे यशस्वी होणार?

फिलेटेली हा विषय शिक्षण, सामान्य ज्ञानाबरोबरच वारसा, पर्यावरण, साहस, धर्म, परंपरा, अध्यात्माशी जोडण्यासाठी नव्या सरकार व संस्कृती मंत्रालयाने पुढाकार घेतला पाहिजे.

lp25महाराष्ट्रात विशेष आवरण जारी करण्यात फक्त जैनपंथीय, कॅथलिक धर्मीय तसंच सशस्त्र सेनांची विविध युनिट्स सक्रिय आहेत. सैन्यांशी संबंधित विशेष आवरणे आर्मी पोस्ट ऑफिस जारी करत असल्याने जास्तीत जास्त आवरणे त्यांच्या फिलेटेली ब्युरोजद्वारा नागरी फिलेटेलिक ब्यूरोज्ना पाठवली जातात. महाराष्ट्रातील विविध समाजांनीही सजग होऊन अशी आवरणे जारी करणे जरुरी आहे. त्यामुळे उत्सवाचे, परंपरेचे अधिकृत डॉक्युमेंटेशन होईल. अस्मितेसाठी अनुदान न मागता स्वत:च्या खिशातील रकमेस वाट मोकळी करून देण्याची वेळ आली आहे. यात महाराष्ट्रस्थित अष्टविनायक, ज्योतिर्लिग, महत्त्वाची मंदिरे धार्मिक फिलेटेलीत महाराष्ट्रास जगासमोर नेण्यासाठी स्मारक वस्तू रूपात खरेदी करतीलच. पाकिटांचा खर्च भक्त प्रायोजित करू शकतील.

अशा आवरण, स्पेशल कॅन्सलेशन, परमनेंट पिक्टोरियल कॅन्सलेशनच्या परवानगीसाठी ‘सीपीएमजी, महाराष्ट्र, जीपीओ बिल्डिंग, मुंबई-४००००१’ यांना कॅन्सलेशनच्या दिवसाच्या १२ आठवडे आधी अर्ज, नमुना कॅन्सलेशन, विशेष आवरण, स्थळ, संस्था, व्यक्ती महत्त्व दस्तऐवजासकट देणे जरुरी असते. स्वीकृत झाल्यावर पोस्ट तिकीट रक्कम, कॅन्सलेशन शुल्क भरावे लागते. जीएसम टपालखाते सांगते ती कव्हर्स छापून द्यावी लागतात.

lp22
सर्व कव्हर्स बायबॅक (सर्व कव्हर्स जारीकर्त्यांकडे परत) किंवा पोस्टाच्या फिलेटेलिक काउंटर्सद्वारा भारतभर विक्रीचे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस ठरावीक मुदतीनंतर राहिलेली कव्हर्स व विक्रीतून आलेला महसूल नियमांप्रमाणे जारी कर्त्यांस देते. महाराष्ट्रातील विविध उत्सव मंडळे,  आपल्या देणगी, पावत्या ए-४ साइजच्या आर्टपेपरवर छापतात, त्यांनी त्या खर्चात काटकसर करून ही स्पेशल कव्हर कॅन्सलेशन, किंवा स्पेशल कॅन्सलेशनची संकल्पना स्वीकारून आपल्या उत्सवांचे मूल्यवर्धन करून इतिहास घडवून जपणे जरुरी आहे.

lp24अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्राच्या फिलेटेलिक ब्युरोशी संपर्क करता येईल.

’ विदर्भ : जीपीओ- नागपूर ४४०००१

’ मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी : जीपीओ- मुंबई-४००००१

’ नाशिक, खानदेश : हेडपोस्ट ऑफिस, नाशिक- ४२२१०१

’ सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सांगलीचा हिस्सा : पणजी-४०३००१

’ मराठवाडा : औरंगाबाद जीपीओ-४३१००१

’ पुणे, सातारा, सोलापूर :

नगर जीपीओ, पुणे-४११००१

हे ब्युरोज् सोमवार ते शनिवार १० ते दुपारी ४ पर्यंत कार्य करतात.

’ पीएमजी गोवा पणजी, पुणे, औरंगाबाद.

’ मुंबई हे सक्षम अधिकारी, स्वीकृतीसाठी अधिकृत आहेत. तेव्हा महाराष्ट्रास जास्तीत जास्त जगापुढे नेण्याचा प्रयत्न करावा. indiaposts.nic.in या संकेतस्थळावरसुद्धा संपूर्ण माहिती मिळू शकते.

संजयंत सहस्रबुद्धे – response.lokprabha@expressindia.com