आपल्या देशातील जनतेच्या रोजच्या आहारात डाळीस स्थान आहे. एक वेळ भाजी नसली तरी चालेल पण डाळीचे कालवण हवेच. डाळीचा आहारातील समावेश तिच्या पोषणमूल्यामुळे केलेला आहे. डाळ हे द्विदलवर्गीय असून वाळल्यावर त्याचे टरफल काढून दोन दले वेगळी केली जातात. यात प्रामुख्याने तूर डाळीचा अंतर्भाव होतो. तूर डाळीमुळे देशात जी राजकीय उलथापालथ झाली ती विदितच आहे. याबरोबरच मूग, मसूर, उडीद, हरभरा या डाळींचा आहारात समावेश आहे. याशिवाय पावटा/वरणा, वाटाणा या डाळींचा पण कालवणासाठी वापर होतो. आहारातील डाळीचे हे महत्त्व लक्षात धरून संयुक्त राष्ट्र संघाने २०१६ हे आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष म्हणून आपल्या ६८व्या आमसभेत घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या संलग्न संघटनेने म्हणजे अन्न आणि कृषी संघटनेने हे वर्ष साजरे करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. वर्ष साजरे करण्याचा उद्देश आहे, अन्न व्यवस्थेत डाळीचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता यासंबंधीचा प्रचार- प्रसार करून जनजागृती करणे. शाश्वत शेती आणि दैनंदिन आहारातील पोषणमूल्यांबाबतचे डाळीचे महत्त्व याविषयी नागरिकांत जागरूकता वाढविणे. डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक स्तरावर योगदान देणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देणे. अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांच्या संशोधनास उत्तेजन देणे. पीक फेरपालटामध्ये कडधान्याचा चांगला उपयोग कसा करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि डाळींचा व्यापार हे एक आव्हान समजून योजनाबद्ध पद्धतीने कार्यरत होण्यास सजगता निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. डाळ वर्ष साजरे करण्यामागे अन्नसुरक्षा आणि त्याचे पोषणमूल्य याबाबत सर्वसामान्य जनतेस जाणीव करून देण्याचे तसेच डाळीचा पोषणविषयक लाभ, त्याचे उत्पादन याबाबत समाजास जागृत करणे हा उद्देश आहे. हे वर्ष साजरे करण्यात एकमेव संधी प्राप्त झाली आहे ती अन्नसाखळीतील जोडात डाळीतील प्रथिनांचा वापर, जागतिक स्तरावर डाळीच्या उत्पादनात वृद्धी करणे पीक पद्धतीत परिभ्रमण आणि डाळीच्या व्यापारास येणारी आवाहने याबाबत विचारमंथन करणे.

डाळ म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व डाळवर्गीय पीक हे वार्षकि शेंगेच्या रूपात द्विदल धान्य प्रकारात येते. विविध आकारातील शेंगांत एक ते १२ इतक्या बिया असतात. डाळ या शब्दात सुक्या दाण्याच्या स्वरूपात पिकाची मळणी केली जाते. यातील हिरव्या वनस्पती भाजी स्वरूपात येतात. चवळीच्या ओल्या शेंगा, मटार, सोलाणा (हिरवा हरभरा) इ. ज्यापासून तेल काढले जाते त्यांचा डाळीत समावेश होत नाही. आपला आहार चौरस आणि आरोग्यदायी आहे आणि त्यात डाळ (कडधान्यास) ही केंद्रस्थानी आहे. यामध्ये तूर, उडीद (ब्लॅक ग्रम), मूग (ग्रीन ग्रम/ गोल्डन ग्रम), चवळी (काऊ पी), हरभरा, सोयाबीन, मटकी, वाल/वरण्या, कुळीथ (हुलगा), मसूर (लेन्टिल) राजमा, श्रावणघेवडा (फ्रेंच बीन्स) पावटा, मटार, वाटाणा (गार्डन पी), खेमारी/ लाखोळी/ लाखोरे/ लाखी डाळ इत्यादींचा समावेश होतो. या डाळींमधून प्रथिनांबरोबरच कॅल्शियम, फॉस्फरस, नायसिन ही जीवनसत्त्व आणि इतर पोषक घटक मिळतात. आपल्या रोजच्या आहारात प्रत्येकी किमान ७५ ग्रम कडधान्ये असावीत असे आहारतज्ज्ञ सांगतात. बालकांतील कुपोषण टाळण्यासाठी कडधान्य उपयुक्त आहेत. कडधान्यांमध्ये अ‍ॅमिनो आम्ले, वनस्पतीजन्य प्रथिने आणि इतर आवश्यक पोषणमूल्य विपुल प्रमाणात आढळतात, लठ्ठपणा आणि जुनाट आजार यांच्या प्रतिबंधासाठी कडधान्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कडधान्यांमध्ये नत्र स्थिरीकरणाचा गुण असल्याने कडधान्ये जमिनीची सुपीकता सुधारण्यास हातभार लावतात. आपल्या आहारात डाळी आणि मोड आलेल्या कडधान्यांना मध्यवर्ती स्थान आहे. या कडधान्य / डाळ वर्षांच्या निमित्ताने आपण त्याचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन देऊ या.
विजय देवधर – response.lokprabha@expressindia.com

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा
Shukra And Rahu Yuti
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १८ वर्षांनंतर २ ग्रहांची होतेय ‘महायुती’; लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी