20 March 2019

News Flash

साडी भारताचीच!

आजची स्त्री नेसत असलेल्या डिझायनर साडीच्या इतिहासाचा शोध घेत गेलं तर आपण रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतो.

जागतिक पातळीवर प्राचीन भारतालाच कापसाचे उगमस्थान मानले गेलेले आहे.

शमिका वृषाली

साडी हा वस्त्रप्रकार ग्रीकांकडून भारतात आला असे अनेक वर्ष मानले जात होते, मात्र पुरातत्वीय पुरावे असे सांगतात की प्राचीन ग्रीक आणि रोम संस्कृतीवरच भारतीय वस्त्रव्यवस्थेचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यामुळे आता साडीचे जनकत्व भारतालाच प्राप्त झाले आहे.

जागतिक पातळीवर प्राचीन भारतालाच कापसाचे उगमस्थान मानले गेलेले आहे. म्हणूनच प्रत्यक्षात या कपाशीच्या अस्तित्वाचे पुरावे शोधत असताना अश्मयुगाकडून वैदिक काळाकडे धाव घ्यावी लागते. वेद हे भारतीय संस्कृती समजून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. वेदांमध्ये मात्र कापसाचा उल्लेख सापडत नाही. मग कापसाचे उगमस्थान भारत का असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. म्हणूनच या प्रश्नाची उकल करताना पुरातत्त्वीय पुरावे मदतनीस ठरतात. त्यातून कापसाच्या उगमस्थानाचे उत्तर सापडते ते भारतीयांचा मानिबदू ठरलेल्या हडप्पा संस्कृतीच्या उदरात. या संस्कृतीच्या संदर्भातील अनेक ठिकाणच्या उत्खननात कापसाचे धागे व सूत कातण्याच्या चात्या किंवा टकळीचे अवशेष सापडले आहेत. तर  मेहेरगढम् या आता पाकिस्तानमध्ये असलेल्या ठिकाणी कापसापासून वस्त्रनिर्मितीचे सर्वात प्राचीन अवशेष सापडले आहेत. त्यांचा काळ सुमारे इसवी सनपूर्व ६००० वष्रे इतका मागे जातो. म्हणूनच भारत हाच कपाशीचे मूलस्थान हे संशोधकांनी मान्य केलेले आहे.

म्हणूनच बहुधा अभ्यासक साडीच्या अस्तित्वाची पाळेमुळे हडप्पा संस्कृतीत शोधण्याचा प्रयत्न करतात. हडप्पा संस्कृतीत सर्वागाला गुंडाळलेले कापड असा काहीसा वेश दिसतो. तत्कालीन समाजात शालीसारखे वस्त्र खांद्यावरून घेण्याचा प्रघात होता. हे उत्खननात सापडलेल्या शिल्पकृतींवरून लक्षात येते. म्हणूनच या प्राचीन काळच्या विशिष्ठ पेहरावामधून नंतर साडी विकसित होत गेली असावी असे संशोधक मानतात. त्यामुळे हडप्पा कालीन शिल्पकृती हा साडीच्या अस्तित्वाचा पहिला पुरातत्त्वीय पुरावा मानला जातो.

संपूर्ण लेख वाचण्यासाठी ‘लोकप्रभा’ दिवाळी अंक आपल्या नजीकच्या स्टॉलवर उपलब्ध.

First Published on November 2, 2018 9:00 pm

Web Title: saree