मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्य या विषयाचा ज्यांनी आयुष्यभर सखोल अभ्यास केला अशा डॉ. गो. बं. देगलूरकर यांची या विषयावरील स्नेहल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली चार पुस्तके.

मूर्ती आणि मंदिरे हे विषय खरेतर सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. परंतु त्यांचा संबंध हा निव्वळ उपासनेपुरताच सामान्य लोकांशी येतो. विशिष्ट देवतेची मूर्ती, त्यांची आयुधे, त्या मूर्तीची विविधता याची सखोल माहिती या पुस्तकांतून मिळते. तसेच मंदिर हे नुसते देवाचे निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे, त्यावर असलेल्या विविध शिल्पातून शिल्पकारांना काही संदेश सामान्य माणसांना द्यायचे असतात, समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे प्रतििबब मंदिरांवर पाहायला मिळते, असा एक नवीन संदेश देगलूरकर यांनी आपल्या या ग्रंथसंपदेमधून दिलेला आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

विष्णूमूत्रे नमस्तुभ्यम्

मूर्तिपूजा हे भारतीय संस्कृतीचे एक ठळक लक्षण होय. श्रीविष्णूच्या विविध मूर्ती म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी, आणि शांती यांचे मूíतमंत प्रतीकच होय. विष्णूचे वाहन गरुड, त्याची पत्नी लक्ष्मी आणि विष्णूचे दशावतार यापलीकडे सर्वसामान्यांना या देवतेविषयी फारशी माहिती असत नाही. फार तर लक्ष्मीकेशव आणि लक्ष्मीनारायण ही नावे आपल्याला माहिती असतात. परंतु प्रस्तुत ग्रंथात विष्णूदेवतेचे प्राचीनत्व, त्याचे अवतार, त्याची आयुधे यांची माहिती तर दिली आहेच, परंतु विष्णूच्या चार हातात असलेल्या शंख-चक्र-गदा-पद्म या आयुधांचा क्रम बदलला की विष्णूच्या मूर्तीची नावे बदलतात. तो रचनाक्रम चोवीस प्रकारचा होतो आणि त्यानुसार विष्णूची केशव, माधव, गोिवद, प्रद्युम्न, अशी चोवीस नावे होतात ही खूपच नवीन माहिती सर्व ग्रांथिक संदर्भासह या पुस्तकात दिलेली आहे. प्रत्येक देवाला दोन पत्नी असतात असा एक सार्वत्रिक समज आहे. हा समज चुकीचा असून देवाला दोन पत्नी नसून एकच पत्नी असते आणि दुसरी त्या देवाची शक्ती असते. शक्ती हा शब्द स्त्रीिलगी असल्यामुळे भाषेमध्ये समजू शकतो, परंतु मूर्तीमध्ये ती शक्ती दाखवताना स्त्रीरूपात दाखवली जाते. त्यामुळे अशी स्त्रीरूपात दाखवलेली मूर्ती ही त्या देवाची पत्नी नसून त्याची शक्ती असते, असे ठाम प्रतिपादन या पुस्तकात केलेले आहे. विष्णूदेवतेच्या या चोवीस प्रकारांच्या चोवीस शक्तींचे मंदिर औरंगाबादजवळील अन्वा या गावी आहे. तिथे असलेल्या मंदिरावर असलेल्या स्त्री प्रतिमांच्या हातात विष्णूचीच आयुधे असून त्यांचा रचनाक्रम हा प्रत्येक मूर्तीनुसार वेगवेगळा आहे. त्यामुळे या सर्व मूर्ती या विष्णूच्या शक्तीच्या मूर्ती आहेत असे सुंदर आणि अत्यंत नावीन्यपूर्ण विवेचन या पुस्तकात केलेले आहे. विष्णूच्या शक्ती आणि त्यांच्या अन्वा मंदिरावर असलेल्या प्रतिमा ही संकल्पना देगलूरकर सरांनी पहिल्यांदा या मंदिराचा र्सवकष अभ्यास करून विद्वानांपुढे मांडली आणि अर्थातच ती सर्वमान्य झाली. विष्णूचे दशावतार एवढीच ओळख आपल्याला असते परंतु त्या अवतारांची संकल्पना कधी आली, ती कशी विकसित होत गेली. कोणकोणते अवतार त्यात समाविष्ट झाले, अथवा कालांतराने कोणते वगळले गेले याचे अत्यंत रोचक विवेचन प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण आणि वासुदेव यांच्या मूर्तीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. शैव आणि वैष्णव या वादावर मूर्तिशास्त्राने उत्तम उपाय सुचवला आहे. तो उपाय म्हणजे या दोन देवतांच्या संयुक्त मूर्ती हा होय. हरिहर, हरिहरपितामहार्क, हरिहरार्क या त्या मूर्ती होत. यांचे बारीकसारीक बारकाव्यासहित सुंदर वर्णन इथे केलेले आहे. विष्णूच्या विविध मूर्तीपकी शेषशायी, योगीश्वर, विश्वरूप, वैकुंठ, अठरा हाताचा विष्णू अनंत या महत्त्वाच्या परंतु अगदी अल्पपरिचित मूर्ती, त्या मूर्ती घडवण्यामागाचे तत्त्वज्ञान, पुराणांमध्ये असलेले त्यांचे संदर्भ आणि तिथे आलेल्या विविध कथा देगलूरकर यांनी आपल्या रसाळ वाणीने या पुस्तकात विशेष करून समाविष्ट केल्या आहेत. विष्णू या देवतेसंबंधी अशी मनोरंजक आणि तितकीच अधिकृत माहिती मूर्तिशास्त्राच्या अंगाने या पुस्तकातून मांडलेली आहे.

शिवमूर्तये नम:

शिवशंकर म्हणजे तिसरा डोळा उघडून सर्व चराचर भस्मसात करणारी देवता, परंतु तितकाच भोळा, कृपाळू. आसेतुहिमाचल सर्वत्र अत्यंत लोकप्रिय असलेला देव म्हणजे शंकर. मूर्तिकारांना त्याची भुरळ पडली नसती तरच नवल. शिवदेवतेची विविध रूपे, त्याच्या कथा, पुराणांमध्ये केलेले त्याचे वर्णन या सर्व गोष्टींचे प्रतििबब भारतीय मूíतकलेमधे मोठय़ा प्रमाणात उमटलेले दिसते. शिवाच्या या सर्व महतीचे मूर्तिशास्त्राच्या आधारे  ओळख करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. शिवाच्या इतक्या विविध मूर्ती अन्य कोणत्या देवाच्या असतील असे वाटत नाही. वेदांमधील रुद्र या देवतेचे शिव या देवतेमध्ये झालेले रूपांतर, शिविलगापासून विकसित होत होत विविध मूर्तीमध्ये या देवतेचे झालेले परिवर्तन या गोष्टी आकर्षक तर आहेतच, परंतु विशेष परिचित मात्र नाहीत. मंदिरे, लेणी यावर शिवाच्या मूर्तीची विविधता आपल्याला वारंवार दिसून येते, परंतु त्या संबंधीची माहिती मात्र अगदी अभावानेच आढळते. इंग्रजी भाषेत यावर अभ्यासपूर्ण अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत, परंतु मराठीमध्ये मात्र आतापर्यंत नव्हते. डॉ. देगलूरकर सरांच्या शिवमूर्तये नम: या पुस्तकाने ही उणीव भरून काढली आहे.

िलगपूजेपासून शिव या देवतेची उपासना सुरू झालेली दिसते. त्यानंतर कालांतराने शिविलगापासून शिवाच्या विविध मूर्ती घडत गेल्या. ते स्थित्यंतर कसे झाले याचे विस्ताराने विवेचन या ग्रंथात केलेले आहे. शिवाच्या मूर्तीचे ढोबळमानाने सामान्य मूर्ती, संहार मूर्ती, अनुग्रह मूर्ती, विशेष मूर्ती, दक्षिणामूर्ती असे ठळक प्रकार असून प्रत्येक प्रकारामध्ये समाविष्ट होणाऱ्या मूर्ती, त्यांच्याशी निगडित असलेल्या विविध कथा, त्या मूर्ती तयार करण्यासाठी प्राचीन ग्रंथांमधून दिलेले निर्देश आणि त्या मूर्तीचा भारतातील विविध मंदिरांवर असलेला आढळ असा एक मोठा आणि सुंदर प्रवास देगलूरकर वाचकाला करून आणतात. नुसत्या शिविलगाचे एकमुखिलग, त्रिमुखिलग, चतुर्मुख-पंचमुख िलग, अष्टमुखिलग, कायिलग एवढे प्रकार असतात हे ज्ञान हे पुस्तक वाचल्यावरच होते. हे झाले फक्त शिविलगाचे प्रकार. शिवाच्या विविध मूर्तीचे असेच मनोरंजक आणि शास्त्रोक्त वर्णन इथे वाचायला मिळते. शैव संप्रदाय, त्यातील पाशुपत पंथ यांचे जे तत्त्वज्ञान आहे ते मूर्तीच्याद्वारे प्रकट होते, असे डॉ. देगलूरकर आपल्या या ग्रंथामधे स्पष्ट करतात. हे तत्त्वज्ञान मूर्तरूपात आपल्यासमोर आणण्यासाठी तात्कालीन मूर्तिकरांनी सदाशिव, लकुलीश, अर्धनारी, चतुष्पाद विलक्षण सदाशिव अशा एकाहून एक सरस मूर्ती मंदिरांवर आणि लेणींमध्ये शिल्पांकित केलेल्या आहेत. ही नावेसुद्धा अनेकांनी पहिल्यांदाच ऐकली असतील. या मूर्ती कोणत्या मंदिरांवर आहेत, त्यांच्या मागे काय तत्त्वज्ञान दडले आहे याचे सविस्तर विवेचन या ग्रंथामध्ये केलेले आहे. ‘िबबब्रह्म’ ही संकल्पना स्वत डॉ. देगलूरकर यांनी पहिल्यांदा मांडली. िबब म्हणजे मूर्ती. मूर्तीद्वारे ब्रह्मतत्त्वाचा शोध कसा घेतला जाऊ शकतो याचे विवेचन करताना देगलूरकर  या वर उल्लेखिलेल्या मूर्तीचे दाखले देतात. या सर्व गोष्टी एकमेकांत कशा गुंफल्या गेल्या आहेत आणि मूर्तीद्वारे हे सर्व तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांपुढे कसे सहजगत्या मांडले जाते हे या ग्रंथात मांडले आहे. शिव-पार्वतीच्या मूर्ती सर्वत्र आढळतात, परंतु अशा मूर्तीच्या पायाशी जर घोरपड शिल्पित केलेली असेल तर यांना शिव-पर्वती न म्हणता हरगौरी म्हटले पाहिजे, असे देगलूरकर या ठिकाणी सांगतात. घोरपडीचा चिवट स्वभाव आणि पार्वती यांचा संबंध थेट विवाहप्रसंगी मुली गौरीहराची जी पूजा करतात त्याच्याशी कसा जोडला गेलेला आहे याचे सुरेख स्पष्टीकरण देताना ते, त्या मूर्ती आणि त्यांच्याशी निगडित असलेले तत्त्वज्ञान उलगडून दाखवतात.

या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्या त्या मूर्तीची प्रकाशचित्रे (फोटोज). आणि त्याचबरोबर एक नवीन कल्पनासुद्धा इथे मांडलेली दिसते. पुस्तकाच्या उजव्या बाजूच्या प्रत्येक पानावर शिवाच्या विविध मुद्रा, आयुधे, वैशिष्टय़पूर्ण मूर्ती यांचे रेखांकन (स्केचेस) करून एक उभी पट्टी तयार केली आहे.

मरकडादेव मंदिर, गडचिरोली</strong>

देखण्या मंदिरांमध्ये महाराष्ट्रसुद्धा अजिबात मागे नाही.  विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात असेच एक देखणे स्थापत्य लेणे आज उभे आहे. अंदाजे इ.स. च्या अकराव्या शतकात बांधलेले इथले मरकडा मंदिर आणि त्यावर असणारी अद्भुत आणि अत्यंत दुर्मीळ शिल्पे डॉ. देगलूरकर यांनी आपल्या मरकडादेव या पुस्तकातून आपल्या समोर आणली आहेत.

गडचिरोली जिल्ह्य़ात वैनगंगा नदीच्या काठावर मरकडी नावाच्याच छोटय़ाशा गावात हा मंदिरसमूह वसलेला आहे. सर्वात प्रथम लॉर्ड किनगहॅम यांनी इ.स. १८७३-७५ मध्ये या मंदिरांकडे जगाचे लक्ष वेधले. पुढे हेन्री कझिन्सने याचा अजून अभ्यास केला. त्या मंदिरावर असलेल्या सर्व शिल्पांचे बारीकसारीक तपशिलासह विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते. पुराणामध्ये उल्लेख आलेला मरकडेय आणि या ठिकाणाचा संबंध त्यांनी सुरुवातीलाच विशद करून सांगितला आहे.

मंदिराची माहिती इथे स्थापत्यशास्त्रानुसार दिलेली आहे. त्यात काही विशिष्ट तांत्रिक शब्दांचा वापरसुद्धा दिसतो परंतु त्याचा अर्थ लगेचच दिलेला असल्यामुळे ते अगदी सहजगत्या समजले जाते. मरकडी हा एक मंदिरसमूह असून इथे मरकडेय मंदिराशिवाय नंदिकेश्वर, यमधर्म, श्री विठ्ठल-रुख्मिणी, मृत्युंजय, उमाशंकर, शक्तिदेवी, श्रीगणेश, विश्वेश्वर अशी छोटीमोठी देवालयेसुद्धा आजमितीला पाहायला मिळतात. या पुस्तकात या प्रत्येक देवालयाचे वर्णन, त्यातील देवतेचे वर्णन, त्यांचे स्थापत्य याचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. मरकडादेव इथल्या मंदिरस्थापत्याचा साकल्याने अभ्यास झाल्यावर या मंदिरांवर असलेल्या मूर्तीचा विचार होणे हे ओघाने आलेच. किंबहुना या मंदिरावर असणाऱ्या विविध आणि अत्यंत वैशिष्टय़पूर्ण अशा देखण्या मूर्ती हेच खरे या मंदिराचे वैभव आहे.  सदर पुस्तकात इथल्या प्रत्येक मूर्तीचे साकल्याने वर्णन केले असून त्यांचे निराळेपण मुद्दाम सांगून अधोरेखित केलेले आहे.

मरकडी मंदिरावर असलेल्या शिवाच्या विविध मूर्तीचे दर्शन या पुस्तकात आपल्याला होतेच. परंतु इथे असलेली एक अद्वितीय मूर्ती म्हणजे ब्रrोशानजनार्दनार्कची! ब्रह्मा-विष्णू-महेश आणि सूर्याची संयुक्त मूर्ती इथे या मंदिरावर आहे. अत्यंत दुर्मीळ अशी ही मूर्ती इथे का आहे, त्याचे प्रयोजन काय असते आणि त्या मूर्तीची वैशिष्टय़े काय असतात, अशा अनेक विषयांचा ऊहापोह या पुस्तकात करून दिला आहे. ते वाचून आपल्या पूर्वजाची प्रगल्भता आणि मूर्ती घडवण्याचे कसब किती पुढारलेले होते हे लक्षात येते. सुरसुंदरी हा सुद्धा डॉ. देगलूरकर यांचा आवडीचा विषय. मंदिरावर असलेल्या अप्सरांच्या मूर्तीना सुरसुंदरी म्हटले जाते. देगलूरकर यांनी या विषयावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलेले आहे. मरकडी मंदिरावर असलेल्या सुरसुंदरी, त्यांची चेहरेपट्टी, त्यांचे सौष्ठव हे काहीसे निराळे आणि निश्चितच वाखाणण्याजोगे आहे, त्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात वाचायला मिळते.  एका प्राण्याचे शिर आणि दुसऱ्या प्राण्याचे धड असा हा काल्पनिक प्राणी म्हणजे व्याल. अशा अनेक व्यालांचे शिल्पांकन या मरकडी मंदिरावर आढळते. गजव्याल, गणेशव्याल, नरव्याल, अश्वव्याल असे विविध व्याल या मंदिरावर मिळतात. अष्टवसू म्हणजे कोण, त्यांचे मंदिरावर प्रयोजन काय याचे विवेचन इथे केलेले दिसते. अष्टवसू त्यांच्या पत्नींसह या मंदिरावर शिल्पांकित केलेले आहेत. या आणि अशा विलक्षण नवीन मूर्ती या मंदिरावर पाहायला मिळतात. पुस्तकाच्या शेवटी हे पुस्तक हातात घेऊन मंदिरावरील मूर्ती ओळखण्यासाठी, पाहण्यासाठी त्या मंदिराच्या दिशेनुसार प्रत्येक िभतीवर असलेल्या मूर्तीचा एक सुरेख तक्ता जोडला आहे. अभ्यासकांना आणि सामान्य व्यक्तीलाही मंदिर पाहताना त्याचा मोठाच उपयोग होईल.

शैव संप्रदाय किती मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी विकसित झालेला होता याचे ज्ञान इथे असलेल्या ‘चतुष्पाद विलक्षण सदाशिव’ या मूर्तीद्वारे आपल्याला होते. या मूर्तीचे देगलूरकर यांनी केलेले वर्णन म्हणजे या पुस्तकाचा गाभाच मानायला हवा. चार पायांवर म्हणजेच चार तत्त्वांवर आधारलेला शैव संप्रदाय आणि त्यामुळे त्याचे यथोचित मूर्तिरूपात केलेले वर्णन म्हणजे ही चार पायांच्या शिवाची मूर्ती होय! अत्यंत दुर्मीळ आणि अतिशय महत्त्वाची अशी ही मूर्ती मरकडी इथल्या मंदिरावर आहे. त्या मूर्तीचे स्पष्टीकरण देताना देगलूरकर यांची या विषयातली तपश्चर्या प्रकर्षांने जाणवते.

कोप्पेश्वर खिद्रापूरचा

हंपी-बदामीची मंदिरे पाहायला महाराष्ट्रातून अनेक लोक आवर्जून जात असतात. तिथली मंदिरे निश्चितच सुंदर देखणी आहेत. परंतु तेवढय़ाच ताकदीचे मंदिर आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात असल्याचे आपल्याला माहिती नसते. भारतातील काही अप्रतिम मंदिरांच्या रांगेत बसण्याचा मान असलेले मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोप्पेश्वर महादेवाचे मंदिर. मंदिर स्थापत्यातला एक अनमोल दागिना असे ज्याचे वर्णन करता येईल ते म्हणजे हे कोप्पेश्वर मंदिर. डॉ. देगलूरकर यांचे या मंदिरावरचे पुस्तक म्हणजे अभ्यासक, शिल्पकार, कलारसिक आणि सामान्य जनांना खरोखर एक पर्वणी आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या शिरोळ तालुक्यात कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र म्हणजे खरे तर तीर्थक्षेत्रच म्हणायला हवे. प्राचीन काळी या गावचे नाव कोप्पम असे होते. पुढे मध्ययुगात याचे नाव खिद्रापूर असे झाले. मंदिरासाठी नव्हे तर ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा हे गाव महत्त्वाचे होते. इथे दोन मोठय़ा लढाया झाल्या होत्या. त्यांची नोंद आपल्याला इथे असलेल्या शिलालेखांवरून मिळते. पहिली लढाई इ.स. १०५८ मधे अहवमल्ल चालुक्य आणि राजेंद्र चोल यांच्यात झाली त्यात राजेंद्र चोलाचा मृत्यू झाला. तर दुसरी लढाई शिलाहारांचा राजा द्वितीय भोज आणि यादव राजा सिंघण यांच्यात झाली. एवढे मोठे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी शिलाहारांचा राजा गंडरादित्याने हे मंदिर बांधल्याचे सांगतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये हे मंदिर सर्वोत्कृष्ट असल्याचे डॉ. देगलूरकर सुरुवातीलाच सांगतात.   सुरुवातीला मंदिराच्या स्थापत्यासंबंधीची विस्ताराने माहिती येते. एकमेवाद्वितीय असलेल्या स्वर्गमंडपाची रचना हे या मंदिराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशी गोष्ट इतर कुठल्याही मंदिरात आढळत नाही ती या कोप्पेश्वर मंदिरात पाहायला मिळते. त्याचे वर्णन, त्याचे प्रयोजन या संबंधीची विस्तृत माहिती सुरुवातीलाच इथे आली आहे. मंदिर स्थापत्यासोबत या मंदिरावर असलेल्या असंख्य मूर्ती यासुद्धा पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. अभ्यासकांसाठी हे मंदिर म्हणजे एक प्रचंड खजिनाच आहे, परंतु सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा भुरळ पडेल असे या मंदिरावरील मूíतकाम आहे. या मंदिरावर असलेला गजथर हा एक आश्चर्यकारक नमुना वेरूळच्या कैलास लेण्यानंतर इथेच पाहायला मिळतो. जवळपास ९२ हत्ती या गजथरावर कोरलेले आहेत. आणि या हत्तींवर विविध देवदेवता आपल्या आयुधांसह बसलेल्या दिसतात. त्यांची माहिती देताना कोणत्या क्रमांकाच्या हत्तीवर कोणती देवता आहे याचे बारीकसारीक तपशीलवार वर्णन या पुस्तकात दिलेले आहे. त्याचसोबत मंदिरासमोर उभे राहिले की प्रदक्षिणामार्गाने म्हणजे मंदिर उजवीकडे ठेवून आपण जर प्रदक्षिणा घालू लागलो तर त्या दिशेने मंदिरावर कुठे कुठे कोणती मूर्ती आहे हे या पुस्तकात त्या मूर्तीच्या क्रमांकासहित वर्णन करून सांगितले आहे. नवख्या माणसालासुद्धा हे सर्व शिल्पवैभव पाहताना कुठे काही अडचण येऊ नये याची किती काळजी त्यांनी घेतली आहे, याची जाणीव हे पुस्तक वाचताना प्रकर्षांने होते.

या मंदिरावर असलेले अष्टदिक्पाल हे त्यांच्या पत्नीसमवेत आणि त्यांच्या वाहनांवर शिल्पांकित केलेले आहेत. त्यांच्या दिशा आणि त्यांच्या पत्नीसमवेत त्यांची नावे या पुस्तकात वाचायला मिळतात. नेहेमीच्या मूर्तीशिवाय धन्वंतरी या देवतेची अगदी दुर्मीळ मूर्ती या मंदिरावर शिल्पांकित केलेली आहे.   हे मंदिर लेखकाच्या लेखी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मंदिर असल्यामुळे त्याच्या सौंदर्याबद्दल लिहिताना त्यांची शैली विशेष बहरलेली जाणवते. पुस्तकाच्या शेवटी अभ्यासकांसाठी मंदिराचे आरेखन (प्लॅन) सुद्धा आवर्जून दिलेला आहे. हे मंदिर प्रत्येकाने आवर्जून पाहावे हाच लेखाचा उद्देश आहे आणि ते पाहायला जाताना त्या व्यक्तीच्या मनात कोणतीही शंका राहू नये याची खबरदारी घेतल्याचे हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते.

(कोप्पेश्वर या पुस्तकाचे प्रकाशन ऑगस्ट महिन्यात होते आहे.)
आशुतोष बापट