18 February 2019

News Flash

चविष्ट सूप

जेवणाच्या आधी अ‍ॅपेटायझर म्हणून सूप घेण्याची पाश्चात्त्य पद्धत अलीकडे आपल्याकडेही अंगवळणी पडायला लागली आहे.

आपल्याकडे केल्या जाणाऱ्या सार या पेयाचा हा भाऊबंद चव आणि वैविध्य यात आपलं वैशिष्टय़ राखून आहे.

रुचकर विशेष
सोनाली निखाले
जेवणाच्या आधी अ‍ॅपेटायझर म्हणून सूप घेण्याची पाश्चात्त्य पद्धत अलीकडे आपल्याकडेही अंगवळणी पडायला लागली आहे. आपल्याकडे केल्या जाणाऱ्या सार या पेयाचा हा भाऊबंद चव आणि वैविध्य यात आपलं वैशिष्टय़ राखून आहे.

बीटाचे पौष्टिक सूप

साहित्य :

दोन बीट

लसूण पेस्ट एक चमचा

एक चमचा गव्हाचं पीठ

साजूक तूप एक चमचा

साय काढलेलं एक वाटी दूध

मीठ चवीनुसार

काळीमिरी पावडर एक छोटा चमचा.

कृती :

प्रथम बीट कुकरमध्ये पाणी घालून  शिजवून घ्यावे. नंतर त्याची साल काढून मिक्सरमध्ये पाणी घालून पेस्ट करा. एका कढईत एक चमचा साजूक तूप घाला. त्यात गव्हाचा एक चमचा पीठ घालून छान खमंग परता. नंतर त्यात लसूण पेस्ट व साय काढलेलं दूध घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्या. ( पौष्टिकता टिकवण्यासाठी हे सूप करताना कॉर्न स्टार्च किंवा मदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे.) नंतर त्यात बीट पेस्ट टाकून छान ढवळा. त्यात थोडे पाणी, चवीनुसार मीठ व काळीमिरी पावडर घाला. सजवण्यासाठी क्रीमचा थोडा वापर  करू शकता. गरमागरम सव्‍‌र्ह करा.

पालक सूप

साहित्य :

एक जुडी पालक

एक उभा चिरलेला कांदा

चार लसूण पाकळ्या

एक छोटा चमचा आले

अर्धी वाटी नारळाचं दूध

साजूक तूप एक चमचा

चार काळीमिरी.

कृती :

प्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात सोबत दिलेले साहित्य घालून छान मऊ शिजवा. हे सगळे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता एका कढईत एक चमचा साजूक तूप घालून त्यात वरील मिश्रण व अर्धी वाटी नारळाचं दूध घालून छान उकळा. गरज असल्यास पाणी घाला.(जाड-पातळ सूप आपल्या आवडीनुसार करा.)

मसूर-मुगडाळ सूप

साहित्य :

अर्धी वाटी मसूर डाळ     ९ अर्धी वाटी मुगडाळ (मूग मोगर)

चिमूटभर िहग  ९ किसलेलं आलं अर्धा चमचा

३ लसूण पाकळ्या ९ एक मिरची

मीठ, हळद चवीनुसार    ९ अर्धा चमचा काळीमिरी पावडर.

एक छोटा चमचा तूप

 

कृती :

प्रथम मूग आणि मसूर डाळ अर्धा तास भिजत घाला. नंतर दोन्ही डाळी िहग व हळद घालून छान शिजवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घाला. त्यात लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून परता. नंतर त्यात डाळीचे मिश्रण घाला. थोडे पाणी घालून उकळवा. (पाणी गरजेनुसार) उकळवताना त्यात मीठ व काळीमिरी पावडर घाला.

सूप सव्‍‌र्ह करताना िलबाची फोड द्या.

ब्रोकोली सूप

साहित्य :

दोन छोटय़ा ब्रोकोली    ९ साजूक तूप किंवा तेल

एक कप दूध  ९ एक छोटा बारीक चिरलेला कांदा

एक चमचा बारीक चिरलेला लसूण

एक चमचा कुटलेली काळीमिरी

मीठ चवीनुसार ९ क्रीम गरजेनुसार किंवा सजावटीसाठी.

कृती :

प्रथम ब्रोकोली स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे काप करा. नंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालून गरम करा. (तुपाचा वापर केल्यास सुपाला चव छान येते) नंतर त्यात चिरलेला कांदा व एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालून छान परतवा. नंतर त्यात ब्रोकोली घालून परतवा. त्यात दोन कप पाणी टाकून छान शिजवा. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर चाळणीतून गाळून घ्या. चाळल्यावर उरलेले पाणी बाजूला ठेवा. नंतर गाळलेले मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर याच पॅनमध्ये वरील मिश्रण व उरलेले पाणी घालून उकळी आणा. नंतर त्यात एक कप दूध, एक छोटा चमचा कुटलेली काळीमिरी, एक चमचा क्रीम व चवीनुसार मीठ घालून उकळा. तुमचं गरमागरम ब्रोकोली सूप पिण्यासाठी तयार..

दुधीचं पौष्टिक सूप

साहित्य :

एक मध्यम आकाराची दुधी

अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची (सिमला मिरचीचा प्रयोग चांगला रंग व चव येण्यासाठी केला आहे)

अर्धा कांद्याच्या मध्यम फोडी     ९ अर्धा चमचा आले, मीठ

साजूक तूप      ९ अर्धा चमचा जिरे.

कृती :

प्रथम दुधीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घालून त्यामध्ये वरील साहित्य घाला. नंतर गरजेनुसार पाणी घालून चांगले शिजवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर मिश्रण चाळणीतून गाळून घ्या. नंतर एका गरम कढईत छोटा चमचा साजूक तूप, जिरे घालून मिश्रण उकळून घ्या. पाणी गरजेनुसार घाला. तूप आणि जिऱ्याच्या फोडणीने छान चव येते..

कोिथबीर िलबू सूप

साहित्य :

दोन वाटी कोिथबीर

एक िलबू

एक चमचा जिरं

एक चमचा साजूक तूप   ९ थोडय़ाशा कोवळ्या कोिथबिरीच्या काडय़ा

काळीमिरी पावडर एक चमचा

मीठ चवीनुसार

एक चमचा बारीक चिरलेला लसूण

एक चमचा कॉर्नफ्लॉवर

एक चमचा अद्रक मिरची पेस्ट.

कृती :

प्रथम कोिथबीर व कोिथबिरीच्या काडय़ा स्वच्छ धुवून घ्या. नंतर दोन कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. (गाळून घ्यायचं असेल तर घेऊन शकता) एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून गरम करा. त्यात एक चमचा जिरे, एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालून परतवा. नंतर त्यात आलं-मिरची पेस्ट घाला. (तिखट आवडीनुसार) कोिथबिरीचे मिश्रण घालून छान उकळा. नंतर त्यात एक चमचा कॉर्न फ्लॉवरचं पाणी घाला. चवीनुसार मीठ, एक िलबाचा रस (आंबटपणा तुमच्या आवडीनुसार) घालून उकळा.

गरमागरम सव्‍‌र्ह करा.

लाल चणा सूप

साहित्य :

एक वाटी उकडलेले चणे

एक छोटा चमचा जिरे

चिमूटभर िहग

मीठ चवीनुसार

तीन ते चार काळीमिरी जाडसर कुटलेली

एक छोटा चमचा िलबाचा रस (आवडत असल्यास)

एक छोटा चमचा तूप

कृती :

प्रथम चणे कुकरमधे छान शिजवून घ्यावेत. त्यातील थोडे चणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. (पेस्ट करावी) नंतर एका कढईत एक छोटा चमचा साजूक तूप घाला. नंतर िहग, जिरे व चण्याची पेस्ट घाला. छान परतवून घेऊन त्यात चणे शिजवल्यावर जे उरलेले पाणी असते ते घाला. नंतर त्यात कुटलेली काळीमिरी, मीठ व िलबाचा रस घालून एक उकळी आणा. गरमागरम लाल चणा सूप तयार.

हिरवा वाटाणा (ओला) सूप

साहित्य :

हिरवा वाटाणा एक वाटी   ९ पाच-सहा पुदिन्याची पाने      ९ अर्धा तुकडा दालचिनी

चार ते पाच काळीमिरी    ९ अर्धा कांदा बारीक चिरलेला      ९ एक हिरवी मिरची

मीठ चवीनुसार   ९ एक चमचा िलबाचा रस       ९ साखर आवडीनुसार

तेल किंवा तूप एक चमचा.

कृती :

प्रथम एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालून त्यात दालचिनी, काळीमिरी, कांदा चांगला परतवून घ्या. नंतर त्यात वाटाणा घालून परता. पुदिन्याची पाने, दोन वाटय़ा पाणी घालून छान मऊ शिजवून घ्या. नंतर शिजलेल्या मिश्रणातून दालचिनी काढून बाकीचं मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका कढईमध्ये गरजेपुरते पाणी घालून उकळून घ्या. नंतर त्यात मीठ व चिमूटभर साखर घाला. गरमागरम हिरवा वाटाणा सूप पिण्यासाठी तयार.

गाजर सूप

साहित्य :

चार ते पाच गाजरं स्वच्छ धुवून मध्यम आकाराचे तुकडे करावेत

एक चमचा साजूक तूप

एक मोठा चमचा किसलेले आले

अर्धा कांदा बारीक चिरलेला

एक बारीक चिरलेला लसूण

तीन ते चार काळीमिरी

मीठ चवीनुसार

क्रीम आवड असल्यास.

कृती :

प्रथम एका कढईत एक चमचा साजूक तूप घालून त्यामध्ये चिरलेला कांदा, आले व लसूण घालून छान परता. नंतर त्यात गाजर, काळीमिरी, मीठ व गरजेपुरते पाणी घालून छान मऊ शिजवा. हे शिजवलेले मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटलेले मिश्रण गाळून घ्या. गाळून घेतलेले मिश्रण एका पॅनमध्ये पाणी घालून उकळा. (सूप किती जाड वा पातळ आहे त्या अंदाजाने पाणी घाला.) थोडेसे क्रीम घालून गरमागरम सव्‍‌र्ह करा.

सूचना : गाजर हे थोडेसे चवीला गोड असते त्यामुळे आले घालून त्याची चव खूप छान होते.

मक्याचे भाज्या घालून सूप

साहित्य :

एक वाटी उकळून घेतलेले मक्याचे दाणे

मूठभर दाणे बाजूला काढून ठेवा.

दीड चमचा कॉर्नफ्लोअर

गाजर, फरसबी, पातीचा कांदा बारीक चिरलेला (भाज्या आणि भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार)

एक छोटा चमचा साखर ९ मीठ चवीनुसार

थोडीशी कुटलेली काळीमिरी.

कृती :

प्रथम मक्याचे दाणे मिक्सरमधून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मक्याचे दाणे उकळून घेतल्यावर जे पाणी उरले ते घाला. त्यात वरील सर्व भाज्या, मीठ, साखर, कुटलेली काळीमिरी (काळीमिरी अगदी थोडी असावी) व मक्याचे दाणे गाळून घेतलेले मिश्रण घाला. छान उकळी आल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर घाला. (कॉर्नफ्लोअरचे पाणी घालून केलेले मिश्रण) व चांगले ढवळत राहा. कॉर्नफ्लोअर घातल्यावर सूप घट्ट वाटत असल्यास थोडेसे पाणी घाला.

टोमॅटो सूप

साहित्य :

चार माध्यम आकाराचे टोमॅटो     ९ एक कांदा     ९ ३ लसूण पाकळ्या

९ १ तेजपत्ता   ९ एक तुकडा दालचिनी

९ मीठ आणि साखर चवीनुसार    ९ पाच-सहा पुदिन्याची पाने.

काळीमिरी पावडर, क्रीम (आवडत असेल तर)

एक टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप

 

कृती :

एका पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप घालून त्यात एक तुकडा दालचिनी, एक तेजपत्ता घाला, नंतर बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. त्यात ठेचलेला लसूण छान परतवून घ्या. नंतर टोमॅटोचे मध्यम तुकडे करून पॅनमध्ये चांगले शिजवून घ्या. पॅनवर झाकण ठेवून मऊ शिजवा. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात पुदिन्याची पाने घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. नंतर एका चाळणीमध्ये वरील मिश्रण छान गाळून घ्या. गाळून घेतलेलं टोमॅटोचं मिश्रण एका पॅनमध्ये पाणी (गरजेपुरतं, सूप किती जाड पातळ हवं) घालून शिजवा. त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. साधारण एक चमचा क्रीम घालून उकळी येऊ द्या. तुमचं टोमॅटो सूप पिण्यासाठी तयार झालं.

मिश्र भाज्यांचे कोिथबीर, िलबू घातलेले सूप

साहित्य :

एक छोटी वाटी बारीक चिरलेला कोबी

अर्धी वाटी गाजराचे बारीक तुकडे

अर्धी वाटी फरसबीची बारीक चिरलेली भाजी

अर्धी वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा

अर्धी वाटी बारीक चिरलेली कोिथबीर

दोन िलबाचा रस

मीठ, साखर

दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

दोन लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या

एक चमचा आलं

एक चमचा जाडसर कुटलेली काळीमिरी

कॉर्न स्टार्च दोन चमचे

अर्धी वाटी चिरलेला कांदा.

एक टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप

कृती :

प्रथम एका कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घाला. (साजूक तूप घातलं तर उत्तम) तेल गरम झाल्यावर त्यात लसूण व आलं घालून परता. नंतर हिरवी मिरची घाला. (तिखट तुमच्या आवडीप्रमाणे) सर्व साहित्य चांगलं परतवून घ्या. नंतर वरील सर्व भाज्या घालून छान परता. दुप्पट पाणी घालून शिजवा. साधारण शिजत आल्यावर त्यात मीठ व काळीमिरी पावडर घाला. चिरलेली कोिथबीर व िलबाचा रस घाला. दोन चमचे कॉर्न स्टार्च घेऊन तेवढंच पाणी घालून मिश्रण बनवून कढईत घाला. छान मऊसूत शिजल्यावर तुमचं सूप तयार.

सूचना : कॉर्न स्टार्च वा वापर करायचा नसेल तरीही हे सूप छान लागतं.

First Published on August 3, 2018 1:02 am

Web Title: soup recipes