प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो तेव्हा आपण म्हणतो, ‘हे सगळं माझ्याबरोबर का घडलं, मीच का?’ या तीन अक्षरांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र एकाही अक्षरात देता येत नाही. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक जण वाईट काही घडलं की हा प्रश्न किमान स्वत:ला विचारतो, अनपेक्षितपणे काही चांगलं घडलं तर मात्र आपण म्हणत नाही मीच का?

माझ्याबरोबर जे घडलं तसं आणखी कोणाबरोबर घडू नये हीच इच्छा. मी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. आई शाळेत शिक्षिका तर वडील कॉलेजमध्ये प्रोफेसर, यामुळे एकंदरीत घरचं वातावरण शैक्षणिक. शाळेतल्या पहिल्या इयत्तेपासून ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षांपर्यंत पहिल्या तीन नंबरपैकी एक नंबर माझा ठरलेला. एम टेक करून एकीकडे  एका नामांकित कंपनीत नोकरीला लागलो आणि आई बाबांनी माझे लग्न करण्याच्या चंग बांधला.

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
Vishwajeet Kadam vishal patil kc venugopal
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू; पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाले, “शेवटचा पर्याय म्हणून आम्ही…”

आईने एका विवाह संस्थेत नाव नोंदणी केलेली, तिथेच माझी आणि कविताची तोंडओळख झाली असं म्हणायला काही हरकत नाही. शेकडोने स्थळांची माहिती उपलब्ध असताना त्यातील आपल्या निष्कर्षांत बसणारी स्थळ निवडा. खरं सांगायचं तर असं माहिती आणि फोटो बघून पुढचं पाऊल टाकणं म्हणजे कठीण काम. कवितासारख्या आणखीन काही मुली माझ्या निष्कर्षांत बसणाऱ्या होत्या पण पहिल्यांदा भेटण्याची पसंती मात्र मी कविताला दिली, आज मागे वळून बघताना मी तेव्हा असं मी का केलं हा प्रश्न पडतो.

मी आणि कविता मस्त एका कॅफेमध्ये भेटलो, पहिल्या भेटीचं आमच्या दोघांवर दडपण होतंच. काही तासांच्या या भेटीत आधी आपला  भूतकाळ सांगा, मग वतर्मान काळ सांगा आणि त्यावर दोघांनी भविष्य ठरवा. खरं तर फॉर्मवर वाचलेली एका वाक्यातील उत्तर जास्तीत जास्त स्पष्टीकरणासह  एकमेकांना सांगा. एकीकडे आमच्या अशा भेटीगाठी सुरू होत्या तर दुसरीकडे आमच्या आई-बाबांनी  आमच्या भेटण्याच्या आधीपासून सुरू केलेलं आमच्याबद्दलच माहिती संशोधन सुरूच होतं. आणि ह्य सगळ्याचा निकाल म्हणजे अर्थात आमचं लग्न.

कविताच्या घरी ती, आई-वडील आणि तिचा धाकटा भाऊ . आजकाल उच्च मध्यम वर्गीय म्हणतात तशा घरातून ती आलेली. ती बी. ई. असूनसुद्धा नोकरी करत नव्हती. कारण नोकरी करणं तिची गरज नव्हती. वडील कापडाचे व्यापारी, घरी नोकर-चाकराची काही कमी नव्हती. एकंदरीत सगळं आरामात होतं.

कविता लग्न होऊन आमच्या घरी आली आणि त्रिकोणी कुटुंबाचा चौकोन झाला. आमच्या घरचं वातावरण आणि तिच्या घरचं वातावरण ह्यामध्ये फरक होता, काही छोटय़ा छोटय़ा तक्रारी असल्या तरी कविताने आमच्या घरात जुळवून घेतलं.

कविताला जीवनसाथीदार म्हणून मी मनापासून स्वीकारलं होतं. तशी कुठलीही जबाबदारी तिच्यावर नव्हती, कुठल्याही प्रकारचं बंधन तिच्यावर नव्हतं. लग्न झाल्यानंतरही तिला तिचं स्वातंत्र्य होतंच. असं असलं तरी काही वेळा माझं वागणं तिला सक्तीचं वाटे. खरं सांगायचं तर ज्याला ती सक्ती म्हणत होती तो माझा आग्रह होता. माझी इच्छा होती तिने नोकरी करावी, गरज म्हणून नव्हे तर असलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा यासाठी तरी ती तयार व्हावी असंच वाटत होतं.

लग्न होण्यापूर्वी ती लग्नानंतर  काय करणार आहे यावर आमचं बोलणं झालं होतं तेव्हा तर तिने पुढे शिकण्याची, नोकरी करण्याची इच्छा आहे असंच सांगितलं होतं. तिचा एमबीए करण्याचा विचार होता. पण लग्न होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला तरी तिने स्वत:हून त्या गोष्टीचा विचार केलाच नाही. मीच पुढाकार घेऊन एमबीएसाठी क्लासेसची चौकशी करून आलो, त्याच दिवशी माझं आणि तिचं पहिलं भांडण झालं.

‘‘तू लग्न काय माझ्याबरोबर माझ्या मास्टर्ससाठी केलंस? सारखा माझ्या मागे नोकरी आणि एमबीए क्लासेस कर म्हणून मागे का लागतोस? लग्नाला सहाच महिने झालेत, मी कुठेही पळून जात नाही.’’ मलाही त्या दिवशी तिच्या बोलण्याचा राग आलाच होता. काही दिवस मी हा विषय काढला नाही. हा एक विषय सोडल्यास आमच्यामध्ये वाद होण्याचं कारण नव्हतं. पण जेव्हा जेव्हा मी नोकरीचा, शिक्षणाचा विषय काढला तेव्हा ती प्रत्येक वेळेला विषय टाळत होती. आणि आमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण करणारी ही गोष्ट ठरत होती. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात कुठल्या ही प्रकारचा तणाव मला नको होता म्हणूनच मी तो विषय तिथेच सोडून दिला, पण या सगळ्यामध्ये कविता बोलल्याप्रमाणे वागली नाही म्हणून मी मात्र दुखावलो गेलो. ही गोष्ट सोडल्यास कवितामध्ये काही माझ्या दृष्टीने कमी नव्हतं.

असं असलं तरी लग्नाचं वर्ष-दीड वर्ष मात्र चांगलं गेलं, पण पुढे नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. पुढे आर्थिक मंदीमुळे काही काळापुरतं मला कामावरून कमी करण्यात आलं, माझ्यासाठी हा धक्का होता, या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न मी करत होतो, यामध्ये खरी साथ हवी होती ती कविताची, या काळात आमचं नातं अधिक सक्षम होण्यापेक्षा आमचं नातं संतुष्टात होण्याच्या मार्गावर होतं.

नोकरी काही कायमची गेली नव्हती, पण पुन्हा नोकरीवर रुजू कधी होणार याबद्दल नक्की नव्हतं. काही काम न करता नुसतं बसून राहणं माझ्या रक्तात नव्हतं. मी कोचिंग क्लासेसच्या नोकरीसाठी अर्ज करण्याच्या विचारात होतो, फक्त या वेळी कवितानेसुद्धा नोकरी करावी अशी माझी अपेक्षा होती आणि हा विषय पुन्हा आमच्यामध्ये झाला, पण अनपेक्षितपणे आमच्यामध्ये पुन्हा वाद झाला, त्या दिवशीच कविताचं रूप बघून मला धक्काच बसला, ती चिडून बोलली, ‘‘विशाल, मी नोकरी करणार नाही हे तुला आधी सांगितलं असताना तू तोच तोच विषय काढून मला त्रास का देतोस.’’

‘‘कविता, मी तुला त्रास देतो? लग्न झाल्या नंतर तुझ्या मनाविरुद्ध मी जरा ही घडू दिल नाही, तुझा एमबीए करण्याचा विचार तर तू केव्हाच सोडून दिलास, तुला तेव्हा नोकरी करायची नव्हती तेसुद्धा मी मान्य केलं. तुला हवं तसं जगत आली आहेस पण आताच्या या परिस्थितीत तू मला साथ द्यायची सोडून माझ्या बरोबर वाद घालतेस.’’ मी  शक्यतितक्या शांतपणे तिच्याशी बोलत होतो.

‘‘मी नोकरी नाही करणार हा माझा शेवटचा निर्णय आहे,’’ कविता चिडूनच बोलली.

कविताचं वागणं माझ्या समजण्याच्या पलीकडच होतं, कविता तिच्या निर्णयावर ठाम होती. कविताच्या वडिलांकडून मदत घेणं हे माझ्या तत्त्वात बसणार नव्हतं. कवितासमोर नोकरीचा विषय काढण्याची सोय राहिली नव्हती, त्या विषयावरून दरी वाढतच होती. कविता नोकरी का करत नाही याबद्दल तिच्याकडे किंवा तिच्या आई-वडिलांकडे ठोस उत्तर नव्हत, तिचे आई वडील तिलाच साथ देत होते, कुठे तरी काही तरी चुकत आहे याची शंका मला आली, खरं कारण शोधताना जे काही समजलं त्यामुळे मी  पूर्णपणे कोलमडून गेलो खरा पण स्वत:ला सावरून  तिला जाब विचारला,

‘‘बी. ई.ची डिग्री तुझ्याजवळ नसताना, असं फसवताना काहीच कसं वाटलं नाही?’’ माझ्या अचानक ओरडण्याने ती रडायला लागली पण तिच्या रडण्याचा काही परिणाम माझ्यावर होणार नव्हता. मला खरं काय ते तिच्या तोंडून ऐकायचं होतं. शेवटी हुंदके आवरत कशीबशी बोलली, ‘‘खरं तर बी.ई करायची माझ्या मनाची तयारी नव्हती, पण आई-बाबांनी मला बी.ई.ला अ‍ॅडमिशन घ्यायला भाग पाडलं, पहिली दोन र्वष कशी तरी निभवली, पण नंतरची र्वष मला कठीण जात होती, प्रत्येक सेमिस्टरला मला एटीकेटी लागत गेली, आणि बीईची डिग्री मिळवणं कठीण होत गेलं. मी बीई सोडण्याचा निर्णय घेतला. शिक्षण सोडल्यामुळे आई आणि बाबा नाराज होते. काही नाही तर लग्न कर, म्हणून माझ्या मागे होते. मी शिक्षण सोडलं हे आमच्या चौघांव्यतिरिक्त कोणाला कळणार नाही याची खबरदारी घेत होतो, जर बाहेर समजलं तर बदनामी होईल याची भीती आई बाबांना होती, लग्न जमवताना ही गोष्टसुद्धा लपवून ठेवली, सुरुवातीला मला ही गोष्ट मान्य नव्हती पण आई-बाबांसमोर माझं काही चालत नव्हतं, शिक्षण सोडलेल्या मुलीबरोबर कोण लग्न करणार याची त्यांना भीती वाटत होती. आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना शिकलेला जावई हवा होता. त्याच्या मते लग्नात जन्मकुंडलीला (प्रत्रिकेला) महत्त्व देतात, कोणीही मार्कशीट बघत नाही, सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. माहिती सांगणारेसुद्धा सगळं चांगलं आहे असंच सांगतात, फार कोणी खोलात जाऊन चौकशी करत नाही. प्रत्येक वेळेला आई-बाबा सांगत होते त्याप्रमाणे वागत गेले. तुला मी फसवत आहे याची जाणीव मला होती, जेव्हा नोकरीचा, शिक्षणाचा विषय निघायचा तेव्हा माझी चिडचिड होयची, मी तुझ्या स्वभावाचा फायदा घेत आले, माझं मन मला खात असे पण खरं सांगण्याची हिम्मत मला कधी झाली नाही.’’ कविताने मोकळेपणाने सगळं सांगितलं पण फार उशीर झाला होता. खरं सांगून तिने तिच्या मनाचा भार कमी केला होता पण माझ्या मनाची अस्वस्थता अधिक वाढली होती. तिचा चेहरासुद्धा बघायची इच्छा नव्हती, ती विनंत्या करून माझी माफी मागत होती. मी सोडून देईन याची तिला भीती वाटत होती. आता माझा प्रत्येक निर्णय तिला मान्य होता. तिला एक संधी हवी होती, चूक सुधारण्यासाठी काही तरी करून दाखवण्यासाठी.

माझ्यासाठी हा फार बिकट प्रसंग आहे, काय निर्णय घ्यावा याबद्दल विचार करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली, एक-दीड वर्षांच्या सहवासानंतर कविताला सोडून देण्याचा निर्णय घेण माझ्यासाठी फार अवघड आहे, जिवापाड प्रेम करतो एकमेकांवर पण तिने जो विश्वासघात केला आहे त्यामुळे मी मात्र कायमचा दुखावलो गेलो, त्यासाठी मी तिला कधी माफ करणार नाही. माझं काय चुकलं, सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवला, लग्न जमवताना जन्मपत्रिकेच्या बाबतीत आपण इतके आग्रही असतो मग आरोग्याच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या बाबतीत आपण सतर्क का नाही राहत? मुळातच असं फसवून काय साध्य होतं. दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ  शकतं.

कविताच्या घरच्यांनी माझा, माझ्या आई-वडिलांचा विश्वासघात केला, असं असताना कविताला एक संधी हवी होती चूक सुधारण्याची. पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवून तिला एक संधी देणं योग्य आहे का? माझी नोकरी गेली नसती तर हे सगळं माझ्यापासून लपून राहिलं असतं का? या गोष्टीचा विचार करू की तिच्याबरोबरच्या दीड वर्षांच्या सहवासात तिने खूप चांगल्यारीत्या माझं घर संभाळ आहे, ती उत्तम गृहलक्ष्मी आहे. ती जबाबदारी तिने खूप चांगली संभाळली. या सगळ्याचा विचार करून निर्णय घेऊ. एका क्षणात सगळं विसरणं शक्य नाही. या गोष्टीपासून होणाऱ्या मानसिक त्रासातून बाहेर पडायला मला वेळ लागेल, हे सहन करण्याची माझी तयारी आहे. माझ्या एका निणर्यमुळे दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून सावरण्यास मदत होणार असेल तर तिला संधी द्यायला माझी ना नाही. आज मी दिलेल्या संधीचं ती सोनं करेल हा विश्वास मला आहे, त्यासाठी तिला पूर्ण सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. कारण कुठलंही नातं विश्वासावर जोडताना विश्वासाचा धागा निर्माण करणं आणि तो धागा तेवढाच परिपक्व करणं गेरजेचं असतं.  खरं तर जगण्यासाठी श्वास घेण जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक विश्वास असणं आहे. मग तो स्वत:मधला असलेला आत्मविश्वस असो, किंवा दुसऱ्यावर दाखवलेला विश्वास असो.

response.lokprabha@expressindia.com