हडप्पा संस्कृतीतील उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर एवढय़ा एकाच संदर्भावरून त्याआधीच्या काळात आर्याच्या जीवनात कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या असाव्यात याचा अंदाज बांधता येतो. त्या सगळ्याचा महाभारत काळाशी काही संबंध आहे का, याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.

पुणे विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या आर्यविषयक एका परिसंवादामध्ये काही वर्षांपूर्वी मी सहभागी झालो होतो.  ‘हडप्पा संस्कृतीच्या उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर’ या विषयावर तिथे संशोधनात्मक सादरीकरण केले होते. हा विषय एका अर्थाने नवीन नव्हता. कारण त्यावर सर्वप्रथम डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी एक लेख लिहिला होता. त्यापाठोपाठ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी विषयाचे महत्त्व जाणून भाष्य केले. डॉ. कोसंबी यांना हा विषय एकदम वेगळा वाटला. कारण दफनकुंभावरील मोरांच्या चित्रणामुळे त्यांना महाभारतात वर्णिलेल्या एका प्रसंगाची व त्यातील तपशिलांची त्यांना आठवण झाली. इंद्रपत्नी शचिशी करावयाच्या संभाव्य दुर्वर्तनामुळे आणि पालखी वाहून नेणाऱ्या सप्तर्षीशी केलेल्या माजोरी वागणुकीमुळे नहुषाला अजगर होऊन त्यावेळेस जमिनीवर पडावे लागले. स्वर्गातून पतन होऊन पृथ्वीवर येताना वाटेत अनेक क्रौव्याध (न शिजवलेले मांस खाणाऱ्या) पक्ष्यांनी आणि मयूरांनी त्याच्या शरीरावर चोचा मारून प्रहार केल्याचा उल्लेख येतो. मयूर हा वास्तविक गिधाड किंवा ससाण्यांच्या प्रमाणे क्रौव्याध नसल्यामुळे नहुषाच्या आता दिव्य नसलेल्या शापित शरीरावर त्या प्राण्यांनी प्रहार का केले या प्रश्नामुळे त्यांची उत्सुकता जागृत झालेली होती आणि दफनकुंभावर चित्रित केलेल्या मोरांच्या पोटामध्ये शवप्राय मनुष्याकृती चितारल्यामुळे मरणाशी किंवा मरणोत्तर क्रियाविधींशी तर याचा संबंध नाही ना, अशी शंका त्यांना आली.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

17-lp-mahabharatडॉ. ढवळीकर यांनी पुढे जाऊन त्यावर असे भाष्य केले की मयूर हा दोन दैवतांशी संबंधित प्राणी आहे. मयूराच्या पाचू किंवा इतर अर्धरत्नांमधील प्रतिकृती इ. स. पूर्व तिसऱ्या सहस्रकापासून पश्चिम आशियामध्ये निर्यात केल्या जात होत्या. त्यामुळे हडप्पा संस्कृतीमध्येसुद्धा मोर या प्राण्याला काही प्रतिमात्मक अर्थ व मरणोत्तर क्रियाविधीशी संबंध असावा, अशी  शंका येण्यासारखा पुरावा आहे. त्यांच्या हेही लाक्षात आले की, वैदिक आणि द्राविड संस्कृतीमध्ये प्रत्येकी एक देवता आहे की जिचे वाहन मयूर आहे. त्या देवता म्हणजे दक्षिणेतील मुरुगन अथवा स्कंद आणि विद्य्ोची देवता सरस्वती. डॉ. ढवळीकरांच्या मते त्या दफनकुंभावर मोराच्या आजूबाजूला नदी, त्यातील मासे इत्यादी जलचरांसह म्हणजे प्रत्यक्ष वेदातील सरस्वती हीच चित्रित केलेली आहे. त्या काळापासूनच ती सरस्वती देवी आणि मयुराचा संबंध असला पाहिजे. मुरुगनशी अथवा स्कंदाशी येणारा मोराचा संबंध तो एका मृत्युदेवतेशी असलेला संबंध आहे. आणि साहजिकच दफनकुंभावरील मोराच्या उदरात मानवी शव चितारलेले आढळते. मरणोत्तर जीवन सरस्वती देवीचे वाहन असलेल्या या मोरामुळे जीवन सुखपूर्ण व्हावे अशा प्रकारची आशाच त्यातून प्रकट केलेली दिसते. आणि दोघांच्याही दृष्टीने ययातीचा जसा त्याच्या स्वर्गपतनानंतर मोराचा संबंध आला तसा येऊ नये अशीच अपेक्षा त्यातून व्यक्त केलेली असावी. त्यामुळे हे चित्रण ज्याची प्राचीनता इसवी सन पूर्ण दोन हजापर्यंत जाते ते समकालीन हडप्पा संस्कृतीचा भाग असलेल्या आर्याच्या मरणोत्तर विश्वासांच्यावर प्रकाश टाकते. त्याच दृष्टीने त्यांना अथर्ववेदातील सूर्याच्या रथाशी संबंधित असलेल्या मयूरींना उद्देशून केलेल्या वैदिक अथर्व रचना अर्थपूर्ण वाटतात.

डॉ. धर्मानंद कोसंबी आणि डॉ. ढवळीकर यांनी उल्लेखिलेल्या सूर्यरथाशी संबंधित असलेल्या २१ मयूरींचा अथर्व कवनातून अधिक मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात येते की, त्यांना आवाहन यासाठी केले आहे की, त्यांनी संबंधित मानवाला सूर्यदेवतेशी संबंधित असलेले अमृतत्त्व प्राप्त करून द्यावे. या संदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की, हडप्पा येथील दफनकुंभावरच मयूरांचे चित्रण आहे, असे नाही तर हडप्पोत्तरकालीन मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन समकालीन दफनकुंभांच्यावर मयूरांचे चित्रण आढळते. मध्य प्रदेशातील माळवा येथील नर्मदेकाठच्या नावडाटोली येथे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील माळवा व जोरवे येथे मृदभांडय़ांवर त्याचे चित्रण आढळते. एका चित्रणात तर सूर्य आणि कुत्रा यांचेही चित्रण आढळते. वर अथर्ववेदातील कवनात वर्णिलेला सूर्याचा आणि मोराचा अमृतत्त्वाशी असलेले लागेबांधा तर या चित्रात चित्रित केलेले नाहीत ना, असे वाटण्याइतपत हे चित्रण प्रभावकारी आहे.

या ठिकाणी सारमेयाचे सरमापुत्र कुक्कुराचे चित्रण का, अशी शंका मनात आल्यास एक संदर्भ असा लक्षात येतो की, महाभारतातील मोक्षधर्मपर्वात स्वर्गात सदेह जाणाऱ्या युधिष्ठिराबरोबर फक्त कुत्राच असतो.  या प्रयत्नांत मानवी दोषांनी कलंकित झालेले त्याचे भाऊ आणि पत्नी द्रौपदीसुद्धा त्याची साथ देऊ शकत नाहीत. साथ देतो तो फक्त कुत्राच आणि त्यामुळे व्यास आपल्याला समजावून सांगतात की, हा कुत्रा दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष धर्मराजच आहे म्हणजे यमधर्मच आहे. अशा रीतीने कुत्र्याचा आणि निर्मल धार्मिक आचरणाचा संबंध आहे.

16-lp-mahabharatयावरून असाही अंदाज काढता येतो की, हडप्पा संस्कृतीच्या विलयानंतर सिंध पंजाबमधील दुष्काळी हवामानामुळे पडलेले आणि बंगाल, उत्तर प्रदेश, माळवा आणि महाराष्ट्र आणि पश्चिमेला असलेल्या काही इराणी प्रदेशात गेलेले हडप्पावासी आर्यच होते. या प्रमेयाची मीमांसा करताना हेही लक्षात येते की, ज्या प्रदेशामध्ये इसवी सन पूर्व २३०० नंतरच्या काळामध्ये हडप्पावासी हे कुरुक्षेत्र आणि सप्तसिंधूंच्या प्रदेशातून बाहेर पडून स्थायिक झाले त्याच प्रदेशात आजच्या काळातही आर्य-भारतीय (इंडो- आर्यन) भाषाच उदाहरणार्थ बंगाली, िहदी, गुजराती, मराठी या भाषा बोलल्या जातात. अधिक बारकाईने विचार केला तर महाराष्ट्रात मराठी भाषक प्रदेशाच्या पलीकडे दक्षिणेत कानडी, विदर्भाच्या पलीकडे गोंडी आणि बंगालच्या दक्षिणेस ऑस्ट्रो- आशियाई किंवा द्राविड भाषा बोलणारे आदिवासी आहेत. समकालीन पुरातत्त्वाच्या दिशेने पाहिल्यास महाराष्ट्रापुरते तरी निश्चित सांगता येईल की, अकोला अमरावतीच्या जवळ असलेली तुळजापूर गढी ही ताम्रपाषाण युगीन आहे तर त्या पलीकडे विदर्भात सगळीकडे बहद्अश्मयुगीन संस्कृती आहे. या उदाहरणांवरून स्पष्ट दिसते की, हडप्पा संस्कृतीतून बाहेर पडलेला आणि या प्रांतात स्थिर झालेला समाज हा भारतीय- आर्य (इंडो- आर्यन) भाषिक होता. त्यामुळेच या आधुनिक प्रांतांमध्ये आर्य- भारतीय भाषा दिसतात. (इंडो आर्यन).

अशाच काही कारणांमुळे आणि पुराणामधील पुराव्यांमुळे गेल्या पिढीतील आर्य- भारतीय भाषांचा आणि द्राविड भाषांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी असा निष्कर्ष काढला आहे की, वेदांच्या बरोबरच त्या काळचा बहुजन समाज ज्या आधुनिक आर्य भाषांच्या जननी असलेल्या प्राकृत भाषा (मागधी, शौरसेनी, महाराष्ट्री) व यांची जननी असेल अशी प्राकृत भाषा बोलत असावेत.  कदाचित, पार्जीटर आणि इतर विद्वानांच्या मध्ये, अशा वेद समकालीन प्राकृत भाषेतच सुतांनी ग्रंथित केलेली पुराणे लिहिली असावीत. इसवी सनाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात अभिजात संस्कृतला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे हे रूपांतर झाले असावे. अधिक खोलात न जाता हे नक्कीच म्हणता येते की, ऋग्वेदातील ऋचांची संस्कृत भाषा ही क्षत्रिय ब्राह्मणादी अभिजात वर्गात प्रचलित असेल तर जनसामान्य एक सर्व प्राकृत भाषांची जननी असलेली दुसरी एक प्राकृत भाषा असणार आणि माझ्या मते ती आणखी एक न उल्लेखिलेली व वायव्य सरहद्द प्रांतात प्रचलित असलेली गांधारी ही प्राकृत भाषा आणि अवेस्तातील गाथांची अभिजात भाषा, वेदांची संस्कृत भाषा या तिघींना व इतर प्राकृत भाषांना जवळ असणारी एखादी प्राकृत भाषा असावी. असे विधान करण्यामागे कारण असे की, आजही संस्कृत आणि अवेस्तातील गांथांच्या भाषांमध्ये परस्पर विनिमयाचे संबंध दर्शविणारे काही निकष सौराष््रठातील कच्छी भाषेत आढळतात. उदाहरणार्थ स चा ह होणे. सरस्वतीचा पहेलवीमध्ये प्रतिशब्द हरकवैती असा होतो. सरयूचा हरयू असा होता. अजूनही कच्छी भाषेत सप्ताह हप्ताह होता. या विषयातील अंतिम मत हे निरनिराळ्या आज उपलब्ध असलेल्या प्राकृत भाषा आणि तुलनेने कमी ज्ञात असलेल्या पशाची गांधारी यांच्या तसेच अफगाणिस्तानातील अर्वाचीन भारतीय भाषांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच देता येईल.

हडप्पा संस्कृतीशी आर्याचा कितपत संबंध होता, तो कसा संबंध होता , हडप्पा संस्कृतीचे जनक हे भारतीय- इराणी (इंडो- इराणीयन) भाषकच होते इत्यादी प्रश्नांची उकल अशा प्रकारचे संशोधन नंतर होईल, अशी आशा वाटते.

या संदर्भामध्ये डॉ. ढवळीकर यांनी हडप्पा संस्कृतीच्या विलयानंतर झालेली सप्तसिंधू प्रांतातील आर्य भाषिक जनांची सुरू झालेली नवीन वाटचाल म्हणजेच सांप्रतच्या कलियुगाची सुरुवात म्हणजेच पुराणातील कलियुगाची सुरुवात असा मांडलेल्या अभ्युपगमाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे हे वर चíचत केलेल्या मयूर प्रतिमेतील आशय प्राकृत भाषांच्या उद्गमासंबंधिची प्राच्य विद्वांनांची चिंतने आणि भाषा शास्त्राच्या साहाय्याने आजच्या अफगाणिस्तान पाकिस्तानातील आर्य भाषांचा अभ्यास यांच्या साहाय्याने ही संशोधनाची वाटचाल अधिक सुकर होईल, हे सहज लक्षात येते. एकूणच पुरातत्त्वीय अभ्यास आणि या भाषांच्या भाषाशास्त्रीय अभ्यासानुसार, सध्या डॉ. ढवळीकर यांनी काढलेला मनु व महाभारताचा कालखंड पुराव्यानिशी जुळणारा आहे, असे म्हणता येईल. अर्थात त्याची खातरजमा करण्यासाठी या सर्वच विद्यांचा महाभारताच्या अनुषंगाने अधिक खोलात जाऊन एकत्र अभ्यास करण्याची गरज आहे.
डॉ. अरिवद जामखेडकर
शब्दांकन : विनायक परब – response.lokprabha@expressindia.com