News Flash

नेट कट्टा : आजही विवेकानंद हेच आदर्श

युवा पिढीची सोशल साइट्सवर रंगणारी चर्चा वाचायला मिळणार आहे ‘नेट कट्टा’ या नव्या सदरातून.

आजची तरुणाई सगळ्यात जास्त भेटते ती सोशल साइट्सवर. युवा पिढीची सोशल साइट्सवर रंगणारी चर्चा वाचायला मिळणार आहे ‘नेट कट्टा’ या नव्या सदरातून.

Tejal
January 4 at 8:50 pm

Guys, कोणी मला सांगू शकेल का नीट, की स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो?

Like · Comment · Seen by 6

 

Tejali  : भारत सरकारने १९८५ पासून १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी ‘युवक दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. स्वामी विवेकानंद एक थोर तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक होते हे सगळ्यांना माहितीच आहे, परंतु त्यांच्या विचारापासून, कृतींपासून प्रेरणा घेऊन युवा वर्गाने आयुष्यात चांगल्या मार्गावरून वाटचाल करावी, त्यांची तत्त्वं समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा; हा युवक दिन साजरा करण्यामागे मूळ हेतू होता. बरेचदा आपण विवेकानंदांचे विचार (quotes) वाचतो, लेख वाचतो, भाषणं ऐकतो तेव्हा आपल्या हेच लक्षात येतं की, युवकांना आयुष्याची दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे, ध्येयापर्यंत पोहोचण्याचे बळ देणारे त्यांचे विचार नवी प्रेरणा देतात, कष्ट करण्याची नवी ताकद देतात. त्यामुळे आजही युवा पिढीकडे अशा महान व्यक्तीला आदर्श मानून त्यांच्या विचारांमधून शिकण्यासारखे खूप काही आहे!!

परंतु, जसा प्रतिसाद ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेण्डशिप डे’ला देताना युवा पिढी दिसते, तसा प्रतिसाद ‘युवक दिनाला’ देताना मात्र दिसत नाही; किंबहुना कित्येकांना युवक दिन कधी असतो, त्याचा विवेकानंदांशी काय संबंध हेच माहीत नसते. त्यामुळे त्यांचे विचार वाचून आचरणात आणण्याची बातच छोडो!! माझा प्रश्न असा आहे की, असा ‘युवक दिन’ साजरा करण्यात कितपत तथ्य आहे? त्यामुळे खरंच समाजात बदल घडेल असं वाटतं का? आणि साजरा करायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार जास्तीत जास्त तरुण पिढीकडे पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ  शकतं?

Like · Reply · 1 · 16 hrs

 

Rutuja : आता प्रश्न आहे तो म्हणजे हा युवा दिन लोकांपर्यंत पोहोचवण्याची. तर आपण सोशल नेटवर्किंग साइट्स चा जास्तीत जास्त वापर करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे अशी काही तरी आकर्षक टेक्निक्स वापरली गेली पाहिजे. मार्केटिंग स्टाइलमध्ये. असं मला वाटतं.

Like · Reply · 16 hrs

Tejal : थँक्स तेजाली. युवा दिनाबद्दल छान समजावून सांगितलंस. हे खरंय की, युवा दिन व्हॅलेंटाइन डे किंवा इतर दिनांप्रमाणे साजरा होत नाही, कारण असा काही दिवस असतो हेच मुळात कोणाला माहीत नाही. कारण त्याबद्दल बोललंच जात नाही.

ऋतुजा, मला असं नाही वाटत, विवेकानंद सगळ्यांना माहीत आहेत आणि त्यांचे विचारसुद्धा थोडेफार परिचयाचे आहेत, पण त्यांचा युवा दिनाशी संबंध आहे हेच मुळात कोणाला माहीत नाही. तर त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, युवा दिनाचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यानिमित्ताने विवेकानंदांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. ते महत्त्व जर कळले तर तरुण मोठय़ा उत्साहात युवा दिन साजरा करतील असे मला वाटते.

Like · Reply · 13 hrs

 

Tejali  : युवा दिनाच्या निमित्ताने कोणते कार्यक्रम करता येतील असं तुम्हाला वाटतं, ज्यामुळे आजची तरुणाई त्यात जास्त सहभाग घेईल?

आपणसुद्धा इथे एक प्रकारे विवेकानंदांचे विचार एकमेकांबरोबर शेअर करू शकतो. सगळ्यांनी तरुणाईशी निगडित असलेला आणि तुम्हाला आवडणारा विवेकानंदांचा एक quote शेअर करू या..

Like · Reply · 12 hrs

Tejal : Condemn none: if you can stretch out a helping hand, do so. If you cannot, fold your hands, bless your brothers, and let them go their own way. अर्थात.. कोणाला दोष देऊ  नका: मदत करण्यासाठी हात पुढे करा. ते जमत नसेल तर हाताची घडी घाला, आपल्या भावंडांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या परीने जगू द्या.       – स्वामी विवेकानंद.

आपल्या मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन या दिवशी एकदिवसीय सामाजिक उपक्रम राबवता येऊ  शकतात किंवा नवीन दीर्घकाल चालणाऱ्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करता येऊ  शकते.

Unlike · Reply · 1 · 12 hrs

Sanket  : स्वामी विवेकानंदांची मला आवडलेली शिकवण:

आपल्यातील उणिवांचा न्यूनगंड न बाळगता, आपल्या बलस्थानांचा सुयोग्य व पुरेपूर वापर करावा. अर्थात उणिवांना स्वीकारून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असावे.

“The remedy for weakness is not brooding over weakness, but thinking of strength”
Like · Reply · 6 hrs

Greeshma  : तेजल, मला असं वाटतंय की, स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या शिकवणी त्यांच्या जन्म दिवशी म्हणजेच युवक दिनापासून प्रत्यक्षात उतरवू शकतो. तसं तर त्या शिकवणीप्रमाणे आचरण आपण नेहमीच करायला हवे, पण नुसतं ठरवून बऱ्याचदा त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. युवक दिनाचं औचित्य साधून श्री गणेशा करू शकतो.

Unlike · Reply · 1 · 1 hr

Tejali : युवक दिनी तरुणांनी एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणं, विवेकानंदांच्या आणि इतर थोर व्यक्तींच्या पुस्तकाचे एकत्रित वाचन, समाजोपयोगी प्रकल्पाला सुरुवात करणं- अशा बऱ्याच गोष्टी करता येऊ  शकतील, जेणेकरून युवक दिन फक्त दिनदर्शिकेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात त्यामागील हेतू साध्य होऊ शकेल आणि जसं ग्रीष्मा म्हणाली त्याप्रमाणे, नेहमीच चांगले विचार आचरणात आणायला हवे हे बरोबर असलं तरी त्याची उजळणी, सुरुवात युवक दिनाचे औचित्य साधून करता येऊ  शकते!!  विवेकानंदांच्याच शब्दात सांगायचं तर- ‘Arise, awake and do not stop until the goal is reached’ हे तरुणाईला ध्येयापर्यंत पोहोचण्याची ताकद देण्यासाठी उद्युक्त करतं!!

(चर्चा सहभाग : तेजल शृंगारपुरे, तेजाली कुंटे, संकेत पाटोळे, ऋतुजा फडके आणि ग्रीष्मा जोग-बेहेरे)
टीम युथफुल – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 1:18 am

Web Title: swami vivekananda 2
टॅग : Swami Vivekananda
Next Stories
1 स्टार्ट अप : ईकॉमर्स स्टार्ट अप्सचं जाळं
2 नाटक : पुढचं स्टेशन..!!!
3 मनस्वी : आयुष्यातले  ‘crush’
Just Now!
X