पूजा सामंत
लोकप्रभा दिवाळी २०२०

गेल्या काही महिन्यांत चित्रपट क्षेत्रातल्या घराणेशाहीवरून कोण गहजब झाला. तापसीही बाहेरून आलेल्यांपैकीच एक! पण या आकांडतांडवाचा भाग होण्याऐवजी तिने उत्तमोत्तम भूमिका मिळवण्यावर आणि त्या पूर्ण ताकदीने साकारण्यावर भर दिला. थप्पड, बदला, सांड की आँख, मनमर्जियाँ, िपक, नाम शबाना.. तिने केलेल्या प्रत्येक चित्रपटात तिची भूमिका व्यापून उरलेली दिसते. तिचं हे वेगळेपण उलगडण्याचा प्रयत्न.. करोनाने मनोरंजन क्षेत्राला अभूतपूर्व हादरे दिले. चित्रपट, मालिका, नाटक सारं काही बंद पडलेलं असताना या क्षेत्राला तारून नेलं ते ओटीटी या तुलनेने नव्या माध्यमाने. या माध्यमातील ट्रेण्डविषयी..

‘ज्यांना बॉलीवूडची पाश्र्वभूमी नाही, त्यांच्यासाठी सुरुवातीचा काळ खडतर असतो, पण माझ्यासाठी हा चावून चोथा झालेला विषय आहे. अब नेपोटिझम भी कम होता जा रहा है. जिसके पास टॅलेंट है वही टिकेगा. हाँ, बशर्ते किस्मत भी साथ दे. अगर नेपोटिझम होता, तो मैं यहाँ कैसे टिक पाती? विद्याजी (विद्या बालन), दीपिका, प्रियंका, अनुष्का सभी आउटसाइडर्स है यहाँ. लेकिन अपनी टॅलेंट के बलबूते पर अपना मकाम बनाएं हुए है. नवाजुद्दीन, इरफान, मनोज बाजपेयी एवढंच नव्हे तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे आघाडीचे स्टार्सदेखील चित्रपट क्षेत्राची कोणतीही पाश्र्वभूमी नसतानाही इथे यशस्वी झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मने तर अनेक उत्तमोत्तम कलाकारांना संधी दिली आहे. ते सगळेच आऊटसाइडर्स आहेत. शेवटी आपले कौशल्य कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. चित्रपट क्षेत्राची पाश्र्वभूमी नसताना आणि डोक्यावर कोणाचाही वरदहस्त नसताना मी इथे टिकले हे एक आश्चर्यच. मला आजवर बडय़ा बॅनरकडून ऑफर आल्या नाहीत, पण त्यांचं काम, त्यांचे चित्रपट माझ्यावाचून अडले नाहीत, माझंही काम सुरू राहिलं. मी सातत्याने नायिकाप्रधान चित्रपट केले आणि ते हिट झाले. ते देखील मला चित्रपटाची पाश्र्वभूमी नसताना. मला हे माझं स्वतचं यश वाटतं. किसी को लगे, या न लगे. की फर्क पेंदा?’

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)