प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पोट्र्रेट आर्टिस्ट ग्रुप’ या नवोदित चित्रकारांसाठीच्या फेसबुक ग्रुपचा दुसरा वार्षिकोत्सव नुकताच मुंबईत बोरिवली येथे झाला.
‘‘आपली प्रिय मातृभूमी परसत्तेच्या मगरमिठीतून मुक्त होऊन आता स्वतंत्र झाली आहे. आज आपली संस्कृती आणि कला यांचे मर्म सहानुभूतीपूर्वक परिशीलन केले जाणे अवश्य असून आपल्या कलेचे वैशिष्टय़ काय आहे आणि आजच्या परिस्थितीत ते कसे पुनरुज्जीवित करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपली स्वतंत्र कलापद्धती निर्माण करून कालानुरूप आपले अस्तित्व कलेच्या इतिहासात कलारूपाने ठेवावयाचे आहे.’
– गुणवंत हणमंत नगरकर, १५ ऑगस्ट १९४७.
penting-1असे विचार अनेक विचारवंतांनी आणि कलाकारांनी पूर्वीही मांडले आणि आजही मांडले जातात. परंतु याची प्रत्यक्ष प्रचीती कलेच्या अभिव्यक्तीमधून किंवा प्रस्तुतीमधून मूर्त स्वरूपात प्रकट आली तरच ते प्रमाण ठरते. त्याकरिता योग्य पायाभूत असा अभ्यासक्रमही आखून द्यावा लागतो. काही प्रमाणात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तसा प्रयत्न झालेला आहे. परंतु आपल्याकडे अजून निश्चित सांस्कृतिक धोरणच नक्की न झाल्याने सांस्कृतिक प्रतििबब प्रकट करणाऱ्या दृश्यकलेचा अभ्यासक्रम आखला जाऊ शकला नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्याकडे पाश्चात्त्य संस्कृतीशी संपर्क होण्यापूर्वी अस्तित्वात असलेली चित्रकला आणि शिल्पकला ज्या रूपाने साकार होत होती त्यात पाश्चात्त्य वास्तववादी शैलीचा स्पर्श होत होता. बाह्य रूपाच्या दृश्य अचूकपणाचे आकर्षण कलाकारांना वाटू लागले आणि वास्तववादी शैली येथे रुजू होऊ लागली. त्यामुळे साहजिकच त्या अनुरूप अभ्यासक्रमातून बदल होऊ लागला. परंपरेने चालत आलेली कला ‘संस्थात्मक’ अभ्यासक्रमातून प्रवाहित होऊ लागली. या अभ्यासक्रमाला भारतातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टद्वारे प्राधान्य देण्यात आले.
हा कालावधी सन १८५७ पर्यंत मागे जातो. स्थिर वस्तुचित्रण, निसर्गचित्रण आणि व्यक्तिचित्रण या वास्तववादी कलानिर्मितीचे प्रावीण्य मिळवून देणारा अभ्यासक्रम इथे राबवला गेला. या कलाप्रकारातील तांत्रिक शैली आणि माध्यमाचा वापर करण्याची पद्धती पाश्चात्त्य असली तरी गíभत विषय पूर्णपणे भारतीय असल्याने या अभ्यासक्रमातून होणारी चित्रनिर्मिती किंवा शिल्पे इथला सांस्कृतिक प्रवाहापासून भिन्न होत नव्हती. यापूर्वी गत इतिहासकाळातील कलानिर्मिती ही कुणा एका कलाकाराची न वाटता त्याला सांघिक निर्मितीचे स्वरूप होते. परंतु पुढे पुढे कलाकार वैयक्तिक कलासाधनेतून आपल्या प्रस्तुतीचे वेगळेपण दाखवू लागला.
penting2
आज केवलाकारी अमूर्तवादाकडे नेणाऱ्या अनेक पाश्च्यात्त्य कलासंकल्पना प्रतिष्ठा पावू लागल्या आणि भारतीय विषयांना प्राधान्य देऊन होणारी कलानिर्मिती जुनाट व केवळ कारागिरीची प्रतिगामी अवस्था अशी संभावना होऊ लागली.
पूर्वीपासून चालत आलेला वास्तवदर्शी भारतीय व्यक्तिचित्रणाचा आणि शिल्पांचा हा गौरवशाली वारसा सतत प्रवाहित राहावा, नवोन्मेषशाली राहावा यासाठी ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी सुरू केलेल्या एका कलाचळवळीच्या दुसऱ्या वार्षकिोत्सवाच्या निमित्ताने या साऱ्याचे स्मरण झाले.
वर्ष होतं २००६. वृत्तपत्रांत ठसठशीतपणे वृत्त प्रकाशित झालं होतं की व्यक्तिचित्रांच्या जागतिक स्पध्रेत वासुदेव कामत यांच्या चित्रकृतीला प्रथम पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. आणि तेव्हापासून वासुदेव कामतांबरोबरच ‘व्यक्तिचित्र’ अर्थात पोट्र्रेट या कलाप्रकाराकडे पुन्हा एकदा कलाजगताचे लक्ष आकर्षति झाले. त्या स्पध्रेचे आयोजन अमेरिकन पोट्र्रेट सोसायटीने केले होते. आणि सर्व जगातून मोठय़ा संख्येने मान्यवर चित्रकार त्यात सहभागी झाले होते. वासुदेव कामत त्याआधीपासूनच वास्तवदर्शी चित्रशैलीत व्यक्तिचित्र, प्रसंगचित्र, संकल्पना, चित्रमालिका यांत काम करीत होते. आपल्याकडील चित्रकला समीक्षकांनी आधी खूप उपेक्षिलेल्या या शैलीविषयी याच काळात ज्येष्ठ चित्रकार आणि कलासंरक्षक – समीक्षक सुहास बहुळकर, स्वत: वासुदेव कामत यांचे लेखनही प्रकाशित होत होते. ‘दृश्यकला कोश’ प्रकाशित झाला. एकूणच अस्सल भारतीय वास्तवदर्शी चित्रशैलीविषयी कलावंत, रसिकजन, ग्रंथ प्रकाशक अशा विविध संबंधित घटकांत अपार औत्सुक्य आणि आस्था, अपेक्षाही निर्माण झाल्या. ‘संस्कार भारती’ या कलाक्षेत्रातील संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वासुदेव कामतांची निवड झाली आणि त्या मार्गानेही चित्रकला या कलाविधेत विशेष उपक्रमांचे आयोजन होऊ लागले.
अशा काहीशा अनुकूल स्थितीतून प्रत्यक्ष कृतिप्रवणतेकडे नेणारी एक संकल्पना वासुदेव कामतांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी आकाराला आली. ती होती ‘पोट्र्रेट आर्टस्टि ग्रुप’ या फेसबुकवरील समूहाची स्थापना. वास्तवदर्शी व्यक्तिचित्रशैलीत अनेकानेक तरुण चित्रकारांनी काम करावे, यांतील प्रयोगशीलतेचे, संभावनांचे क्षितिज विस्तारावे, आविष्कारांना लोकस्वीकृती, लोकप्रतिष्ठा मिळावी, कलाजगतातील चिंतकांचे, समीक्षकांचे पाठबळ मिळावे यासाठी चाललेल्या ध्यासाचेच दुसरे नाव होते..‘पोट्र्रेट आर्टस्टि ग्रुप’ !
penting3
२०१३/२०१४ च्या कालावधीत फेसबुकवर १२ महिने मासिक पोट्र्रेटची ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली, त्या वेळी विजेत्या ठरलेल्या १२ कलाकारांची प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण स्पर्धा ३०-३१ डिसेंबर २०१४ रोजी सर जे. जे. कला महाविद्यालयात घेण्यात आली. त्यात मनोज साकले यांना पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन विजेतेपद बहाल केले गेले. हा पोट्र्रेट आर्टस्टि ग्रुपचा पहिला वार्षकि महोत्सव होता.
त्यानंतर पुढील स्पध्रेसाठी मार्गदर्शन म्हणून ८ मार्च २०१५ व ८ ऑक्टोबर २०१५ रोजी वासुदेव कामत आणि विजय आचरेकर यांची आउटडोअर पोटर्र्ेट पेंटिंगची प्रात्यक्षिके झाली.
दोन वर्षांत विविध उपक्रमांतून हाच ध्यास प्रकट होत गेला. शेकडो तरुण चित्रकार त्यात सहभागी होत गेले. आपापली कलाकृती ते या फेसबुक समूहात प्रदíशत करु लागले. त्यांवर चर्चा, मान्यवरांची मतप्रदर्शने, कला-बोध, दृष्टिकोन अशा अंगाने वास्तवदर्शी व्यक्तिचित्र शैलीवर एक महामंथनच सुरू झाले. कोणत्याही कलेच्या विकसनासाठी नेमके हेच हवे असते. ती केंद्रस्थानी ठेवून संबंधित घटकांनी तिचे निरीक्षण करणे हितकारी असते; तेच इथे होत होते.
या वर्षीही अशा द्वैमासिक स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांची स्पर्धा दि. ५ आणि ६ मार्च या दोन दिवसांत बोरिवली पश्चिमेतील बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्या वनविहार उद्यानात आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षकिोत्सवात घेतली गेली. या दोन दिवसांतील कार्यक्रमांची रचना अत्यंत वैशिष्टय़पूर्ण होती. प्रथम दिनी सकाळी चार मान्यवरांची व्यक्तिचित्र प्रात्यक्षिके आणि दुपारनंतर त्या चित्रांवर त्यांचे भाष्य, वासुदेव कामतांबरोबर प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम झाला. स्वत: वासुदेव कामत (जलरंग), बनारस िहदू विश्वविद्यालयातील प्रा. एस. प्रणाम सिंह (पेस्टल), मनोज साकले (तलरंग) आणि चंद्रजित यादव (मातीचे उठीवशिल्प) अशा चार विविध माध्यमांत काम करणारे मान्यवर चित्रकार त्या मोकळ्या उद्यानातील एका भागात चार बाजूला आपापली चित्रनिर्मिती करीत होते आणि मध्यभागी उभा असलेला एक तरुण त्यांचा चित्रविषय होता. पण आणखीही एक वैशिष्टय़ मुद्दाम सांगायला हवे. हा तरुण गोपाळाच्या वेशात होता आणि त्याच्या शेजारी एक जिवंत गाय आणि तिचे वासरूही होते. माणसाच्या जगण्यात साहचर्य देणारे हे असे घटक त्याचं जीवन, चरित्र घडवतात. कदाचित चित्रही..! व्यक्तिचित्र शैलीतील कलाविष्काराच्या किती वेगवेगळ्या कक्षांचा एका अर्थी विस्तार इथे पाहायला, अनुभवायला मिळत होता. उघडी..मोकळी जागा, लहरी उन्हाच्या प्रतिक्षणी बदलत्या छटा, सावल्यांचे चंचल नर्तन, प्रकाशाचे बदलते पोत, चढत्या उन्हात उभ्या गोपाळवेशधारी तरुणाचे प्रतिकूलता सोसणे आणि भरीस भर म्हणून स्थिर राहा असे सांगणेच गर ठरविणारी गायवासरांची जोडी. अशा चल घटकांना चित्रफलकावर स्थिर होताना पाहणं हा खरंच वेगळा अनुभव होता..मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या तरुण कलावंत अन् सार्ववयीन रसिकांसाठीही.
या महानुभवात गोपवेशात सहभागी झालेला साताऱ्याचा विठ्ठल कल्लूर हा तरुण स्वत: उत्तम चित्रकार आहे. त्या यमुना गाय अन् तिच्या बछडय़ाला मात्र आपण सर्वाच्या आस्थेचा ..आकर्षणाचा विषय आहोत हे कळले असेल… अन्यथा माणसांहूनही थोडा अधिक शहाणपणा दाखवीत अपरिचित गोपाळाबरोबरची स्नेहयुक्त जवळीक त्यांनी सहन केलीच नसती.
संध्याकाळी या मान्यवरांनी आपापल्या कलाकृतीविषयी केलेल्या भाष्यांतून उपस्थित तरुण कलावंत आणि कलारसिकांचे प्रबोधनच झाले. वासुदेव कामतांना अनेक प्रश्न विचारून या अनोख्या प्रयोगात अधिकाधिक उपस्थितांनी आपला सहभाग नोंदविला. चित्र कसे पाहावे? या प्रश्नाच्या उत्तरातून चित्रवाचन, चित्रसाक्षरतेचा पाठच समोर उलगडत गेला.
दुसरा दिवस हा स्पर्धायुक्त प्रात्यक्षिकांचा होता. गत वर्षांतील द्वैमासिक स्पर्धातील विजेते सहा प्रतिभावंत चित्रकार आपापल्या चित्रविषय असणाऱ्या व्यक्तींसह वनविहार उद्यानात उपस्थित होते. स्पध्रेमुळे सर्वत्र काहीसं औत्सुक्य आणि काहीसा तणाव असं संमिश्र वातावरण तिथे मोठय़ा संख्येने उपस्थित असलेला कलारसिकांचा समुदाय अनुभवीत होता. अजय देशपांडे (यवतमाळ), राजेश सावंत (नाशिक), स्नेहल पागे (पुणे), अक्षय प (मुंबई), नानासाहेब येवले (संभाजीनगर) आणि अमित धाने (पुणे) असे सहा गुणवंत चित्रफलक आणि चित्रविषय असलेल्या व्यक्तींसह सिद्धता करीत होते. ठीक साडेनऊ वाजता पहिला िबदू, पहिली रेषा सहा फलकांवर उमटली आणि पुढचे चारेक तास फलक सचित्र होत गेले. चित्ररसिकांच्या डोळ्यांसमोर लखलखत उमटणाऱ्या रेषांचे नर्तन, कळत-नकळत प्रकट होणारे आकार..कधी खरे कधी भासमान, जाणवावे एक आणि अवचित साकार व्हावे भलतेच अशी होणारी सुखद फसगत..अशा खेळातून फलकावर घडणाऱ्या चित्रासोबतच चित्ररसिकही घडत होता. चित्रकार अमित आणि नानासाहेब जलरंगात, तर अन्य चौघे तलरंगात काम करीत होते. वेगळी माध्यमे, वेगळ्या शैली, वेगळा चित्रविचार यांतून हा आनंददायी शिक्षणानुभव बहुपेडी होत गेला.
दुपापर्यंत चित्रे पूर्ण झाली. प्रणाम सिंहजी, विजय आचरेकर, प्रकाश, गतविजेता मनोज साकळे आणि वासुदेव कामत यांनी पांचामुखी चित्रपरीक्षण केले आणि एकमुखी निर्णय केला. पुण्याच्या स्नेहल पागे या एकमेव स्पर्धक चित्रकर्तीला ७५ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार आणि वासुदेव कामत ग्रँड ट्रॉफी प्रदान करण्यात आली. अक्षय प ५० हजार रुपयांच्या द्वितीय आणि नानासाहेब येवले २५ हजार रुपयांच्या तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. तर अन्य तिन्ही सहभागी चित्रकारांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे सहभागिता पुरस्कार देण्यात आले.
penting-4याशिवाय कोकुयो कॅम्लीन या रंगसाहित्य निर्मितीत अनेक दशके सक्रिय कंपनीच्या वतीने प्रत्येक चित्रकार स्पर्धकाला पुरस्काररूपात देण्यात आलेला कोरा कॅनव्हास आणि रंगसाहित्य भविष्यकाळात रूपबद्ध व्हाव्यात अशा कलाकृतींच्या निर्मितीचा ‘सुंदर चित्रे तयात रेखा’ असा संकेत देत होते.
नागपूरचे जवाहरलाल दर्डा फाउंडेशन, दिल्लीतील अमितजी गोयलसारखे दानशूर रसिक, बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे विनोद घेडिया, जनसेवा केंद्र आणि अशा अन्य काही सुहृदांनी हा नवनिर्मितीचा िहदोळा हलता केला आणि त्यामुळेच पोट्र्रेट आर्टस्टि ग्रुपचा हा अनुपम चित्रसोहळा सुफळ संपूर्ण झाला.
आता तर या समूहाचे संकेतस्थळही निर्माण झाले आहे, ज्याचे इथेच उद्घाटन झाले. पुन्हा या नव्या वर्षांच्या स्पर्धाचे विषय, कालावधी, नियम प्रसिद्ध होतील आणि नव्या व्यक्तिचित्रांचे चांदणे आपल्या कलांगणात चमचमू लागेल. त्याच्याच प्रतीक्षेत निघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात बोरकरांचे शब्द रुणझुणत आहेत..
‘घाटामध्ये शिरली गाडी,
अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा,
अजून करिते दिडदा दिडदा..’

response.lokprabha@expressindia.com

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…