पूर्वीच्या मोठय़ा न्हाणीघरांमधले पाणी तापवायच्या वैशिष्टय़पूर्ण बंबांची जागा बघताबघता वॉटर हीटरने घेतली. सुरुवातीच्या काळात वीज जास्त लागते म्हणून वॉटर हीटरचा वापर खूप जपून केला जायचा. पण नंतर नंतर इलेक्ट्रिकच्या वॉटर हीटरला गॅस गीझर, सोलर गीझर हे पर्याय आले आणि बाथरूममधला नळ सोडला की गरमगरम पाणी या सुविधेची लोकांना सवय झाली.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात बाजारपेठेचा आकारही मोठा आहे. त्यामुळे वॉटर हीटरच्या बाजारपेठेत वेगवेगळे उत्पादक आहेत. त्यांच्यात ‘राकोल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड’ हे एक महत्त्वाचे नाव आहे. जगात जिथे जिथे गरम पाण्याची गरज असेल तिथे तिथे आम्ही असू, या ठामपणे राकोल्डने जगभर आपला पसारा नेला असून भारतातही पाय रोवले आहेत. भारतात इलेक्ट्रिकवरचे वेगवेगळ्या श्रेणींमधले वॉटर हीटर आणि आता नव्यानेच लॉन्च केलेला सौर ऊर्जेवरचा वॉटर हीटर ही कंपनीची महत्त्वाची उत्पादने आहेत. कंपनीच्या पुणे-मुंबई रस्त्यावर चाकण येथे असलेल्या प्लान्टवर ही उत्पादने तयार होतात आणि देशात तसेच देशाबाहेर वितरित केली जातात.

घरगुती पातळीवर वापरल्या जाणाऱ्या छोटय़ा आकाराच्या वॉटर हीटरपासून ते हॉटेल्स, हॉस्पिटल्स अशा मोठय़ा आस्थापनांना लागणाऱ्या वॉटर हीटपर्यंत वेगवेगळ्या आकाराचे वॉटर हीटर राकोल्डमार्फत तयार केले जातात.

राकोल्डने ‘अल्फा प्रो’ ही सौर ऊर्जेवरील वॉटर हीटर्सची नवी श्रेणी सादर केली आहे. अल्फा प्रो सौर वॉटर हीटर्समध्ये ‘स्मार्ट फ्लोट’ हे अभिनव वैशिष्टय़ समाविष्ट करण्यात आले असून जगातील अशा प्रकारचे पहिलेच (यासाठीचे पेटंट प्रलंबित आहे) वैशिष्टय़ आहे. सौर वॉटर हीटिंगमध्ये करण्यात आलेल्या नावीन्यामुळे देखभालीचा खर्च कमी येतो, ते अधिक सुरक्षित आणि दिसायलाही चांगले आहे.

२०० लिटर्स प्रति दिन अल्फा प्रो सहा ते आठ जणांच्या कुटुंबासाठी योग्य असून ते दरवर्षांला विजेच्या तीन हजार युनिट्सची बचत करते. यामुळे आर्थिक बचत होतेच, शिवाय कार्बन उत्सर्जन कमी होऊन भारत अधिक स्वच्छ आणि हरित राहण्यास मदत होईल.

अल्फा प्रो वॉटर हीटर इव्हॅक्युएटेड टय़ूब कलेक्टर्स (ईटीसी) विभागात मोडणारे असून प्रतिदिन १०० ते ५०० लिटर्स क्षमतेच्या प्रकारात उपलब्ध आहे. यात उच्च क्षमतेच्या इव्हॅक्युएटेड टय़ूब बसवण्यात आल्या आहेत. पाणी साठवणारी टाकी फूड ग्रेड एसएस ३०४ एलपासून (स्टेप टाइप मायक्रोस्ट्रर) बनवण्यात आली आहे. उच्च प्रतीची घनता असलेल्या पॉलीयुरेथिन फोममुळे (पीयूएफ) जास्तीत जास्त उष्णता साठवली जाते. झिंक अल्युमने बनवलेल्या बाह्य़ आवरणामुळे उत्पादन गंजत नाही आणि दीर्घकाळ सुरक्षित राहते. पर्यायने सौर वॉटर हीटरचे आयुष्यही वाढते.

दर वर्षी विजेचा दर दहा टक्क्यांनी वाढत असल्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता ‘अल्फा प्रो’ दोन वर्षांत त्याची किंमत पूर्ण वसूल होऊ शकते. अल्फा प्रो वॉटर हीटर निवासी तसेच हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर आणि औद्योगिक कामे अशा व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, राकोल्ड नावीन्यावर भर देऊन, तसेच भारतीय स्थिती विचारात घेऊन, उत्पादनाचे सौंदर्य, गुणवत्ता, टिकाऊपणा, सुरक्षितता व कामगिरी यावर लक्ष केंद्रित करत आहे. देशांतर्गत, व्यावसायिक व औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांना वॉटर हीटिंग सुविधा देणाऱ्या राकोल्डकडे इलेक्ट्रिकल, गॅस व सोलार वॉटर हीटर आणि हीट पम्पची विविध उत्पादने आहेत.

राकोल्डला ‘ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हॉयजरी’ या भारतातील संशोधन संस्थेकडून ‘मोस्ट ट्रस्टेड वॉटर हीटर ब्रँड २०१६’ म्हणून गौरविण्यात आले आहे. ही पाहणी १६ शहरांत, वीस हजार ब्रण्ड्समध्ये, २६७ श्रेणींमध्ये करण्यात आली. त्याबरोबर राकोल्ड थर्मोला सलग सहाव्या वर्षी, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीतर्फे (बीईई) नॅशनल एनर्जी कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅवॉर्ड (एनईसीए) या पुरस्काराने गौरवण्यात आले. सलग सहा वेळा हा पुरस्कार जिंकणारी राकोल्ड ही एकमेव कंपनी आहे.

राकोल्डच्या अंतर्गत पाहणीनुसार, घराच्या वीज बिलामध्ये वॉटर हीटर्सचे प्रमाण अंदाजे ३० टक्के असते. वीज वाचवणाऱ्या वॉटर हीटरचा वापर केल्यास विजेवरील ताण मोठय़ा प्रमाणात कमी होईल.

राकोल्ड थर्मोने भारतात आंघोळ कशी केली जाते आणि भारतीयांना वॉटर हीटर कशा रीतीने उपयोगी पडू शकतो, हे अभ्यासण्यासाठी वॉटर हीटर वापरणाऱ्या ग्राहकांचे सखोल संशोधन केले. या संशोधनात लक्षात आले की ७० टक्के लोकांना बादली वापरून, तर ३० टक्के जणांना शॉवर वापरून आंघोळ करायला आवडते.

हे लक्षात घेऊन राकोल्ड थर्मोने ‘स्मार्ट लॉजिक बाथ’ नावाची संकल्पना लाँच केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आंघोळीच्या पसंतीप्रमाणे वॉटर हीटरचे सेटिंग निवडता येते आणि ४० टक्क्यांपर्यंत वीज वाचवता येते. या संकल्पनेमुळे तापमानाच्या नियमनात बदल करून ते योग्य तापमान, योग्य प्रमाण आणि आंघोळीच्या पसंतीप्रमाणे (शॉवर किंवा बादली) स्थिर करता येते.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com