News Flash

फिट-नट : अमित भानुशाली

कलाकाराला त्याच्या भूमिकेनुसार अनेकदा आपली देहबोली काही प्रमाणात बदलावी लागते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रियांका वाघुले

कलाकाराला त्याच्या भूमिकेनुसार अनेकदा आपली देहबोली काही प्रमाणात बदलावी लागते. त्यासाठी त्याला अनेकदा आपल्या शरीरयष्टीवर मेहनत घ्यावी लागते. हे बदल सातत्याने करत असताना इतरांप्रमाणेच व्यायाम हा त्यांच्यासाठीही फिट राहण्याचा एकच मार्ग असतो. अनेकदा कामाचा किंवा व्यवसायाचा एक भाग म्हणून फिटनेससाठी कलाकार जीवापाड मेहनत घेत असतात. मात्र केवळ शारीरिक फिटनेससाठीच नाही तर आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका त्याच आत्मियतेने पार पाडण्यासाठी जी जिद्द आवश्यक असते, मानसिक शांतता हवी असते ती मिळवण्यासाठीही व्यायामच महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणूनच इतर कोणापेक्षाही कलाकारांसाठी व्यायाम हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो, असं अभिनेता अमित भानुशाली सांगतो.

सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून अकबराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आलेला अमित फिटनेससाठी वेट लिफ्टिंग आवडीने करत असल्याचं सांगतो. वेट लिफ्टिंगमुळे कॅलरीज आणि कार्ब्स बर्न होतात. केवळ इण्टेन्सिव्ह कार्डिओला तो जास्त प्राधान्य देत नसल्याचं सांगतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण ज्या देशात राहतो तिथे असलेले हवामान हे मुळात दमट असल्याने शरीरातून निघणारे घामाचे प्रमाण अधिक असते, असे तो स्पष्ट करतो.

फिटनेस म्हणजे केवळ जिम नाही, तर आपल्या रोजच्या वेळापत्रकात तो रोज सकाळी प्राणायाम, कपालभारती करत असल्याचे सांगतो आणि जिममध्ये वेट लिफ्टिंग करतो. आणि मग शेवटची दहा मिनिटं कार्डिओला देत असल्याचे तो सांगतो. त्यामध्ये डेडलिफ्टिंग, बेंच प्रेस, ओव्हर हेड प्रेसचा समावेश असतो तर कार्डिओमध्ये ट्रेडमिलवर चालणे आणि सायकलिंग करीत असल्याची माहिती त्याने दिली. ‘इट इज नॉट अबाऊट हाऊ मच यू लिफ्ट, इट इज अबाऊट हाऊ यू लिफ्ट इट’.. फिटनेसचा हा फंडा अनेकांना माहिती असतो. पण माहिती असला तरी तो फॉलो करणे देखील गरजेचे असते. नेमके तिथेच अनेक जण कमी पडतात, असं तो म्हणतो. भराभर वजन कमी करण्याच्या नादात व्यायाम रिपीट जास्त करण्यावर भर दिला जातो. मात्र त्या नादात कित्येकदा फॉर्म चुकत जातो आणि त्याचा फिट राहण्यावर मोठा परिणाम होतो. कारण त्यामुळे नको ते दुखणे उद्भवते. त्यामुळे आपण व्यायाम कसा करतो आहोत, हेही काळजीपूर्वक तपासून पाहिले पाहिजे, याकडे अमितने लक्ष वेधले.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:07 am

Web Title: amit bhanushali fit artist abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : बांधणी स्वप्नांच्यामनोऱ्याची
2 अराऊंड द फॅशन : स्ट्रीट फॅशन
3 शेफखाना : हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नवीन संधी
Just Now!
X