16 October 2019

News Flash

नया है यह : रंगीबेरंगी जुल्फे..

हेअरस्टाइलमध्ये जेव्हा कर्ली, स्ट्रेट, बाउन्सी या केशरचनांचा विचार आपण करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

हेअरस्टाइलमध्ये जेव्हा कर्ली, स्ट्रेट, बाउन्सी या केशरचनांचा विचार आपण करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो. पण जर हेअरकलर करून त्यात ट्विस्ट आणला तर त्या हेअरस्टाइलकडे आपोआपच लक्ष वेधले जाते. केसांचा रंग लावण्याच्या पद्धती अनेक आहेत आणि त्याचबरोबर डिझाइन्सही पुष्कळ वाढल्या आहेत. बाजारात दाखल झालेले विविध ब्रॅण्डचे काही विशेष हेअरकलर प्रॉडक्ट या सीझनला पाहायला मिळतील. यात सॅशे, पॅकेट्स, टय़ूब आणि बाऊल पॅक्सही मिळतील. या वेळी टय़ूब्स जास्त प्रमाणात बाजारात उपलब्ध झाले आहेत. यात टेम्पररी, सेमी परमनंट, डेमी पर्मनंट आणि पर्मनंट अशा विविध वैशिष्टय़ांसह ४०० पासून ते १,००० रुपयांपर्यंत हेअरकलर पॅक्स आणि टय़ूब्स उपलब्ध आहेत. हेअरकलरमध्येही ‘ऑफ स्कॅल्प’ आणि ‘ऑन स्कॅल्प’ अशा दोन पद्धती आहेत. ज्यात बऱ्याच मुली ‘ऑफ स्कॅल्प’ पद्धत पसंत करतात. त्यात ‘हायलाइटिंग’ आणि ‘लो लायटिंग’ या दोन पद्धती आहेत. हायलाइट करण्यासाठी तुम्हाला स्पेशली ब्युटीपार्लरमध्येच जावे लागले तर लोलाइट तुम्ही घरीही करू शकता.

* लॉरियल पॅरिस हा ब्रॅण्ड तसा हायलाइट करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे या ब्रॅण्डच्या प्रॉडक्ट्सना जास्त प्राधान्य देता येईल. ‘मिजिरल’ हे प्रॉडक्ट केसांना ‘ब्राऊन कलर’ देतो. त्याची किंमत ३१० रुपये एवढी आहे. यातून सेमी पर्मनंट लेवलवर हा रंग राहतो. पर्मनंट हेअर कलर ठेवायचा असल्यास ‘हरबाटिन्ट’ या ब्रॅण्डकडून पर्मनंट हेअरकलर जेल हे प्रॉडक्ट घेता येईल. ९१६ रुपये एवढय़ा किमतीत ते मिळेल. पर्मनंट हेअरकलर ठेवण्यासाठी खरंतर ग्रे केस कव्हर व्हावेत म्हणून त्यांचा उपयोग होतो. यात बरेच हर्बल प्रॉडक्ट्सही आहेत. त्यामुळे विविध हेअरकलर पर्मनंट ठेवण्यासाठी हवे असतील तर ‘रिव्लॉन’चा ‘कलर अ‍ॅन्ड केअर गोल्डन ब्राऊन कलर क्रीम’ ३८० रुपयांत मिळेल. यात कोकोनट ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल आहे. ‘स्ट्रिक्स’ या ब्रॅण्डचा ब्राऊन कलर पावडरमध्ये मिळेल. ज्याची किंमत २७० रुपये एवढी आहे. तर स्ट्रिक्सचाच रेडिश ब्राऊन हेअरकलर १३५ रुपयांत मिळेल. लॉरियल पॅरिसचा एक्सलन्स हनी ब्लोन्ड कलर ७०० रुपयांपासून मिळेल. यात कॅरेमल ब्राऊन हाही कलर आहे. जर डय़ुएल कॉम्बो पॅक घेतले तर ३५० रुपयात कॅ रेमल ब्राऊन आणि ३५० रुपये एवढय़ा किमतीत हनी ब्लोन्ड हा रंग मिळेल.

* हायलाइट्साठी लॉरियल पॅरिसच्या ‘एक्सलन्स क्रीम’मध्ये महोग्नी ब्राऊन, ऐश्वर्या (ऐश्वर्या बच्चनचे नाव रंगाला देण्यात आले आहे.) ब्राऊन, डीप प्लाम, नॅचरल डार्के स्ट ब्राऊन, ब्लॅक आणि बरगंडी असे रंग आहेत. यांची किंमत ५९० रुपये एवढी आहे. याच ब्रॅण्डकडून कास्टिंग क्रीम ग्लॉसी हेअर कलर या प्रॉडक्टअंतर्गत बरगंडी, इबोनी, पॅरेलाइन ब्राऊ न, डार्क ब्राऊन, सोनमस् (सोनम कपूर) डार्क  चॉकलेट, महोग्नी, आइस्ड चॉकलेट, ब्लॅक चेरी असे नानाविध रंग असून ५५० रुपये एवढय़ा किमतीत हे सर्व रंग मिळतील. ‘बी-ब्लन्ट’ या ब्रॅण्डकडून मेलॉन सिक्रेट हाय शाइन क्रीम हेअरकलर हे प्रॉडक्ट आहे. ज्यात डीप बरगंडी, रेडिश ब्राऊन, हनी गोल्डन ब्राऊन, चॉकलेट डर्क ब्राऊन, कॉफी नॅचरल ब्राऊन असे रंग आहेत. १८५ रुपये एवढय़ा किमतीत हे रंग सहज उपलब्ध आहेत. त्यांचाच वन नाइट टेम्पररी हेअरकलर आहे. ज्यात तुम्हाला ब्ल्यू वेल्वेट, ब्लॅश पिंक, ब्रान्झ आणि कॉपर असे रंग आहेत. याची किंमत ३५० रुपये आहे. ‘गार्निअर’कडून कलर नॅचरल्स क्रीम रिच या प्रॉडक्टअंतर्गत ८० रुपयांत लाइट ब्राऊन, कॅरेमल ब्राऊन, बरगंडी, वाईन बरंगडी, इन्टेन्स रेड असे हटके रंग उपलब्ध आहेत.

ड्ट सेमी पर्मनंट हेअर कलर हवे असतील तर ‘श्वर्झकोप्फ प्लॅटेट’ (schwarzkopf) या ब्रॅण्डकडून डय़ूलेस हेअर ऑइल कलर्स आहेत. यामधला चॉकलेट ब्राऊन ६५० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल तर लाइट ब्राऊन ३२५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘न्युट्रिजिन’चा पर्मनंट कॉपर कलर १,३७८ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. ‘रिव्लॉन’चा हेअरकलर कलरसिल्क रेड ३३१ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. गार्निअरचा ओलिया हा पर्मनंट हेअरकलर ४,०९६ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. लॉरियल पॅरिसचा इओना हा हेअरकलर ४१० रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. तर गोदरेज या ब्रॅण्डकडून १७० रुपयांपासून बरंगडी, नॅचरल ब्राऊन, सिनामन रेड, ब्लॅक ब्राऊन, नॅचरल ब्लॅक आणि डार्क ब्राऊन असे रंग मिळतील. हे रंग जेल, क्रीम आणि पावडरमध्ये उपलब्ध असून हर्बल आणि नॅचरल प्रॉडक्ट्स यांना पसंती देणे योग्य ठरेल. वरील सर्व ब्रॅण्ड्स हे अमोनियामुक्त आहेत. ऑलिव्ह, कोकोनट आणि मिल्क प्रोटिन असे गुणधर्म असलेले हे कलर नक्की अजमावून पाहा..

viva@expressindia.com

First Published on January 11, 2019 1:12 am

Web Title: article about colorful hairstyle