25 April 2019

News Flash

फिट-नट : सुव्रत जोशी

कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्यावरच हातून घडते. पण तोपर्यंत कधी कधी उशीरही झालेला असतो.

सुव्रत जोशी

प्रियंका वाघुले

पार्टी’, ‘शिकारी’ या सिनेमातून आणि विशेषत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला सुजय साठे. म्हणजेच घरातला एकमेव स्कॉलर विद्यार्थी , आणि तरी आपल्या मित्रांसोबत धिंगाण्यात उशिरा का होईना सहभागी होणारा. स्कॉलर सुजयच्या भूमिकेत अभिनेता सुव्रत जोशी स्कॉलर म्हणून प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. सुव्रत गेल्या वर्षभरापासून आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित केल्याचं सांगतो.

कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्यावरच हातून घडते. पण तोपर्यंत कधी कधी उशीरही झालेला असतो. त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार प्रत्येकाने आपापल्या परीने करणं गरजेचं असल्याचं तो म्हणतो.

सुरुवातीला काही प्रमाणात योगा करणाऱ्या सुव्रतने गेल्या वर्षभरापासून मात्र आपल्या फिटनेसच्या बाबतीत जाणीवपूर्वक बदल केले आहेत. फिटनेसबद्दल आधीचा दृष्टिकोन आणि आताचा यात खूप फरक झाल्याचं त्याने सांगितलं. एखादी गोष्ट आवडल्यावर त्याचं व्यसन चांगल्या अर्थाने आपोआपच त्याला लागतं, असं तो सांगतो. पूर्वी कधीही व्यायामाला त्याने विशेष महत्त्व दिलं नव्हतं. तरी आता मात्र तो नित्यनेमाने व्यायाम करतो. व्यायाम केल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखं त्याला वाटतच नाही. आणि असं वाटणं हीच खरी फिटनेससाठी लागणारा उत्साह, ऊर्जा आहे असं तो म्हणतो. नियमित जिममध्ये जाऊन व्यायाम करून शरीर आणि मन उत्साही राहायला मदत होते, असा त्याचा अनुभवही तो सांगतो.

दररोज व्यायाम करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळात ‘सिक्स पॅक असलेले हिरो’ ही कल्पना मागे सारून सर्वसामान्यांसारखा दिसणारा हिरो प्रत्येक सीरियलमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे लीनबॉडी स्ट्रक्चर साकारणंही त्याला तेवढंच महत्त्वाचं वाटतं. या लुकसाठी केवळ व्यायामच नाही तर स्वतच्या आहारावरही तितकंच लक्ष ठेवावं लागते. वेगवेगळ्या माग्रे प्रोटीन घेण्याऐवजी आहारातून मिळणाऱ्या प्रोटीनवर तो जास्त भर देतो. चिकन, अंडं, टोफू, पनीर असे पदार्थ तो नियमित खाण्यात सामाविष्ट करतो. खाण्याबरोबरच जिममधले रोजचे वर्कआऊट हे त्याचे फिटनेसचे समीकरण असल्याचे त्याने सांगितलं.

First Published on February 1, 2019 1:16 am

Web Title: article about fit actress suvrat joshi