07 December 2019

News Flash

फ्यूजनवाला समर

या सीझनला कॉटन फॅब्रिकसह ग्लिटर एम्बलिशमेंट आणि फ्लोई तसेच पारदर्शक आऊटफिट्स मार्केटमध्ये ट्रेण्डसेटर ठरणार हे नक्की!

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

वर्षांतून दोनदा होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’पैकी या सीझनचा समर / रिसोर्ट २०१९ नुकताच पार पडला. या उन्हाळ्यातील फॅशन काय असेल याची झलक दाखवणाऱ्या या सीझनमध्ये इंडियन आणि वेस्टर्न यांचा मिलाफ असलेले कलेक्शन मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळाले.त्यामुळे या सीझनला कॉटन फॅब्रिकसह ग्लिटर एम्बलिशमेंट आणि फ्लोई तसेच पारदर्शक आऊटफिट्स मार्केटमध्ये ट्रेण्डसेटर ठरणार हे नक्की!

परंपरा आणि आधुनिकता यांचा फॅशनमध्ये संगम झाला कारण यापूर्वी छोटय़ा-मोठय़ा डिझायनर्सनी ट्रॅडिशनल आणि मॉडर्न असे फ्यूजन करण्याचे धाडस दाखवले. सध्या इंडो-वेस्टर्न फ्यूजनचे वेड गल्लीपासून दिल्लीपर्यंत आबालवृद्धांमध्ये पाहायला मिळते. सर्वसामान्यांमध्ये रूढ असणारे हे फॅ शनवेडचयंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ ‘समर/रिसोर्ट २०१९’च्या रॅम्पवर कलेक्शनच्या रूपात उतरलेले पाहायला मिळाले.

समर सीझनला मोकळेढाकळे कपडे घालता यावेत यासाठी स्लिव्हलेस, थोडे लाइट, ट्रान्स्परन्ट, सिंगल फॅ ब्रिक, कमी वजनाचे, ईझी कपडे घालणेच आपण पसंत करतो. या सगळ्या गरजा लक्षात घेऊनच यंदा डिझायनर्सनी इंडियन आणि वेस्टर्न फ्युजन साधत परिपूर्ण लुकच लोकांसमोर ठेवला. वेस्टर्न किंवा मॉडर्न लुक मिक्स करताना भरपूर रंगांची सरमिसळ आणि ओव्हर डिझाइन असलेले कोट्स, शर्ट्स, टी-शर्ट्स, लॉन्ग ब्लेझर टाइप जॅकेटबरोबर प्लेन फॅब्रिकचा आणि सिंगल कलरचा ट्रॅडिशनल लुक अशा पेहरावाचा संगम केला आयुष्यमान मित्राने. मेन्सवेअरमध्ये एका लुकमध्ये त्याने ओव्हर डिझायनर कोट – फुल हातांच्या शर्टखाली ट्रॅडिशनल धोतीसारखी पॅन्ट, पायजमा, जोधपुरी ब्रीच आणि लेंगा अशा स्टाइल्स आणल्या. तर वुमन्सवेअरसाठी लॉन्ग घागरा आणि ट्रॅडिशनल अनारकली लेहेंग्यावर रफल्सच्या रचनेचे ओव्हरसाइज्ड डिझायनर क्रॉप टॉप आणले. ‘वुमन्सवेअर पाहिलेत तर हल्ली मुली वनपीसही घालतात आणि त्याखाली ट्रॅडिशनल पलाझो किंवा कुठल्याही साइजची हॅरम पॅन्ट. त्यामुळे वुमन्सवेअरमध्ये मी एक्सेसिव्ह डिझायनर वनपीस तयार केला. या वनपीसवर चुणीदार किंवा सलवारही जाऊ  शकते. आणि तो लुक ऑड वाटणार नाही कारण तो वनपीस अनारकली कुर्त्यांसारखा वाटेल. आता व्हाइट सुपर लॉन्ग ट्रॅडिशनल स्कर्टवर ओव्हरसाइज्ड टॉप आणि एक दुपट्टा टाकला तर तोही एक वेगळा लुक मिळेल,’ असे ‘बोबो कोलकाता’ या लेबलचा डिझायनर आयुष्यमान मित्राने सांगितले. त्याने ट्रॅडिशनल स्कर्टमध्ये कॉटनचा वापर केला तर ओव्हरसाइज्ड डिझायनर अप्पर वेअरमध्ये भरीव एम्ब्रॉयडरी केली.

डिझायनर वरुण बेहलने समर सीझनच्या अनुषंगाने स्लिम लुक आणलाय. मुळात साडी म्हटले की, ब्लाऊजची फॅशन कोणाला नाही करायला आवडणार? याच विचाराने वरुणने ब्लूसोन टॉप्स आणले. सिंपल ट्रॅडिशनल ऑरगंजा साडीवर त्याने कॅज्युअल ब्लूसोन टॉप ब्लाऊज म्हणून आणले. गोल्डन फॉइल बॉर्डर सिल्कच्या ट्रॅडिशनल पलाझो पॅन्टवरती कॉटनचे वेस्टर्न ब्लूसोन टॉप आणि त्यावर जॅके ट असा लुक त्याने ठेवला. ट्रॅडिशनल सिल्व्हर फोइल डिझायनर कुर्ता आणि कॉटन पलाझोवर वेस्टर्न बेले स्लिव्हचे जॅकेट देत त्याने केलेला लुक सिंपली इन्डो-वेस्टर्न म्हणून परफेक्ट ठरला. मेन्सवेअरमध्ये रोहित बालने जयपुरी आणि जोधपुरी पॅन्टसह ब्लेझर जॅकेट्स आणले. थोडक्यात एका कम्प्लीट लुकसाठी राजस्थानी अंगरखा आणि गुजराती केडिया, त्याखाली जयपुरी पॅन्ट तर गुजराती केडियावर ब्लेझर जॅकेट्सचा लुक त्याने दिला. सौमित्र मोडल याने पेटीकोटवर चिकनकारी कुर्ता आणि स्निकर्स असा लुक डिझाइन केला. इनर्सवर सेमी लाइन / शॉर्ट आणि लॉन्ग ट्रॅडिशनल कुर्ता अशीही फॅशन ठेवली. पलाझो आणि त्यावर व्हाइट इनर विथ लॉन्ग लाइन /लेन्थ कुर्ता असा फंडा वापरत त्याखाली स्निकर्स ठेवले. अनिता डोंगरेनेदेखील भरीव फ्लोरल डिझाइनर लेहेंग्यावर पॅडेड ब्रा आणि फ्लोई दुपट्टा असा लुक डिझाइन केला. त्यामुळे अतिशय कमी वजनाचे अप्पर गार्मेट तर तिने आणलेच पण त्यासोबतच लेहेंग्यावर फुल स्लिव्ह ब्लाऊज, चोली किंवा हेवी एम्बलिशमेंट बॉर्डरही न आणता पॅडेड ब्रा आणि खाली हाताने विणलेल्या लेहेंगाचा कम्फर्टेबल लुक तिने दिला आहे.

अ‍ॅनविला मिश्राचा प्रयोग आणखी वेगळा होता. साडीची लांबी मला जास्त आकर्षित करते. साडी ड्रेप केली तर आपण त्यात वेगळे दिसतो आणि फोल्ड करत गेलो तर अगदीच वेगळा लुक मिळतो, असे सांगत तिने, सध्या भारतीय साडीवर क्रॅप टॉप, टय़ूनिक, कोल्ड शोल्डर असे ब्लाऊज म्हणून सर्रास घालतात तर साडीलाच त्या पद्धतीने क्राफ्ट करत एक वेगळा लुक दिला. साडीला अंगावर फोल्ड करत मी क्राफ्टिंग केले आणि वेअरेबल वनपीसप्रमाणे लुक दिला जो कधीही हॉलिडे्जना घालता येतो, असे तिने सांगितले. पायल सिएगलने कफ्तान स्टाइल घागरा-चोली आणि लेहेंग्यावर वन साइड शोल्डर / हॅण्ड बॅग असा लुक डिझाइन केला. रिच मेटल्सच्या ‘कप्रिसी’ बॅग्ससोबत मुघल एम्ब्रॉयडरी डिझाइन आणि वेलवेटचा वापर तिने केला. निलंजन घोष आणि कनिका सचदेव यांनी फॉर्मल फुल स्लीव्ह कॉटन शर्ट आणि त्यावर मेगा स्लीव्हलेस झीपर क्रॉप जॅकेटचा ब्लाऊज आणि त्यावर प्रिंटेड कॉटन – जरदोसी लाइनर बॉर्डर असलेली ट्रॅडिशनल साडी असा लुक पेश केला. तिने त्यावर ब्लॅक स्कार्फही ठेवला आहे जेणेकरून हेवी सनशाइन असेल आणि तुम्ही कुठल्याही लग्नसमारंभात असाल तर ट्रॅडिशनल-फॉर्मल-आधुनिक असा पूर्ण वेगळा लुक तुम्हाला मिळतो.

कॉलर, वेस्ट बटण्स, कफ आणि हेम या शर्टवरील मोटिव्ह्जना ट्रॅडिशनल प्रिंट आणि कुर्ता, पायजमा, सलवार, शेरवानी, ओढणी यांसोबत मिक्स करून डिझायनर महम्मद मझरने ए-सिमेट्रिकल लुक समोर ठेवला. सलवार आणि कुर्ता असल्यास कुर्त्यांवर हेम्स, मनगटावर कफ्स आणि गळ्याभोवती कॉलर असा लुक त्याने ठेवला. सलवार कमीजवर जॅकेट ठेवल्यासारखे त्याने चुणीदार आणि कमीजवर मेन्सवेअरसाठी कोट्स आणि कार्डिगन आणले. तर वुमेन्सवेअरमध्ये ए-सिमेट्रिकल कफ्तान स्टाइल वनपीसवर रेशमी फ्लोरल एम्ब्रॉयडरीची स्काय ब्ल्यू रंगाची ओढणी घडीप्रमाणे दोन्ही बाजूंना (सलवार-कमीजवर ओढणी घेतात) ठेवली. ‘कुर्ता आणि शर्टचा मिलाफ केला तेव्हा त्याखाली मला फक्त चुणीदार किंवा त्यावर प्लेन वेस्टर्न वेअर ठेवायचा नव्हता. त्यामुळे त्यावर प्रिंट आणि हॅण्डमेड डिझायनर कोट – जॅकेटचा पॅटर्न दिला. नुसताच कुर्ता असेल तर त्यावर स्ट्राइप्स, चेक्स, बलून स्प्रेड राऊंड डिझाइन असे प्रिंटही ठेवले,’ असे मझरने सांगितले.

पारंपरिक कपडे हीच ओळख असलेल्या डिझायनर्सनीसुद्धा वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल फ्युजनचा नाद सोडला नाही. डिझायनर शैलेश सिंघानिया यांनी चंदेरी एम्ब्रॉयडरी आणि अस्सल भारतीय सिल्कच्या (हातमाग) फॅब्रिकचा वापर केला तो डिझायनर वेस्ट कोस्ट मिनी शर्टवर आणि त्याखाली त्याने आणलेल्या सिल्क आणि ट्रान्स्परन्ट कॉटन असलेल्या आऊटर लेयर्ड स्कर्टवर. त्यामुळे त्याचा लुक समर सीझनसाठी योग्य ठरला. डिझायनर नेहा अग्रवालनेही ट्रॅडिशनल गाऊन, अनारकली, लेहेंगा आणि शरारा यांचा लुक किमोनो/ हाईडेड लॉन्गलाइन श्रग अशा पद्धतीने मांडला. ‘हा लुक पूर्ण असला तरी तो आणखी वेगळा होऊ  शकतो. मला ब्लॉक प्रिंट्स आवडतात, मग तो मोटिव्ह आणि इंडिगो लुक मी ठेवला त्यामुळे अगदी सहज आरामात आपण कुठेही फिरू शकतो. थंडावा देणारा रंग आणि सुटसुटीत डिझाइनमुळे समर सीझन आपोआप कूल जाईल,’ असे ती म्हणते.

पांढऱ्या रंगाचा ट्रेण्ड –

‘बूनॉन’ या लेबलअंतर्गत सौमित्र मोंडल या डिझायनरने खादी फॅ ब्रिक रॅम्पवर आणताना संपूर्ण कलेक्शन पांढऱ्या रंगात आणले. ज्यात जॅकटे्स, ट्राऊ झर्स, वनपीस, कुर्ता, पायजमा, लॉन्ग स्कर्ट्स असे आऊ टफिट्स होते. कुणाल रावल डीप डार्क रंग आणि पांढऱ्या रंगाला कधीच सोडत नाही त्यामुळे यंदाही मेन्सवेअरमध्ये कु र्ता, जॅकेट आणि चुणीदार पॅन्टसाठी पांढऱ्या रंगाचा वापर त्याने केला. डिझायनर महम्मद मझरने पांढरा रंग त्याच्या संपूर्ण कलेक्शनमध्ये वापरला. पांढऱ्या रंगावर ब्ल्यू प्रिंटचा डिझायनर फॅक्टर देत मेन्सवेअर आणि वुमन्सवेअरमध्ये आऊ टफिट्स आणले. पूजा गुप्ताने ‘डोअर ऑफ माई’ या लेबलअंतर्गत पांढऱ्या रंगाचा वापर वेस्टर्न कलेक्शनमध्ये केला. गजल मिश्रानेही पांढऱ्या रंगाच्या फॅ ब्रिकवरमल्टिकलर एम्ब्रॉयडरी आणून सिंपल आणि कम्फर्टेबल ट्रॅडिशनल अनारकली, लेहेंगा, घागरा-स्कर्ट, चुणीदार, दुपट्टा आणला. रीना सिंगने तिच्या ट्रान्स्परन्ट मोटिव्ह्जसाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला. समर सीझनमध्ये परंपरागत वापरला जाणारा पांढरा रंग इंडो-वेस्टर्न लुकमध्येही प्रामुख्याने वापरला गेलेला पाहायला मिळला.

‘लॅक्मे फॅशन वीक’चा सप्तरंग

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या दरम्यान नेहमी एलएफडब्ल्यू या शॉट फॉर्मचे एक आर्टवर्क प्रवेशद्वारावर ठेवण्यात येते. दर सीझनला त्यावर नवीन कलाकुसर केली जाते. या सीझनला एलएफडब्ल्यू ही तिन्ही अक्षरे सप्तरंगांत पाहायला मिळाली. याच सप्तरंगांच्या शेड्सही बऱ्याच फॅशन डिझायनर्सनी आपल्या कलेक्शनमधून आणल्या. डिझायनर कनिका गोयल, नरेंद्र कुमार आणि आशीष सोनी यांनी त्यांच्या संपूर्ण कलेक्शनमध्ये सप्तरंगांच्या छटा वापरल्या. कनिका गोयलने हिरवा, पिवळा, लाल, जांभळा या रंगाच्या शेड्स तर आशीष सोनीने केशरी, लाल, जांभळा, पिवळा असे रंग आणले. नरेंद्र कुमारने स्पोर्ट्स फॅशनमध्ये हे रंग वापरत रॅम्पवर कलेक्शन आणले.

First Published on February 8, 2019 1:32 am

Web Title: article about fusion summer fashion
Just Now!
X