हँडलूमची (हातमाग) कला आणि त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासातली त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते. ‘धागा धागा अखंड विणू या’ म्हणत केलेली अप्रतिम कारिगरी, उत्तम कपडे, रंग अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साडय़ा, वस्त्रे यांची नावं-छायाचित्रं पाहिली तरी अशी साडी आपल्याकडे हवी, हा उद्गार सहज निघून जातो. मात्र तितक्याच सहजतेने हँडलूमचे हे सुंदर कपडे खरेदी करण्याकडे आपली पावलं वळत नाहीत.

आर्थिक विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकताना एकोणिसाव्या शतकात आपण पॉवरलूमला इतकं जवळ केलं की वैभवसंपन्न इतिहास देणाऱ्या हँडलूमला आपण जवळजवळ विसरूनच गेलो होतो, मात्र हँडलूमचे कपडे सुंदर असतात, पण परवडत नाहीत, हे पालुपद कायम मिरवलं जातं. यात अगदीच तथ्य नाही, असं म्हणता येणार नाही. हँडलूमचे कपडे हे नेहमी आपण जे पॉवरलूमचे कपडे वापरतो त्यापेक्षा महाग असतात, मात्र तरीही पुन्हा हँडलूमच्या कपडय़ांकडे वळायचा आग्रह सध्या फॅशन डिझायनर्सकडून धरला जातो आहे. अगदी आजही देशाच्या कानाकोपऱ्यात हँडलूमच्या वेगवेगळ्या साडय़ा आणि फॅ शन डिझायनर्सच्या मदतीने त्याला आधुनिक कपडय़ांचा टच देत ही फॅ शन रूढ करू पाहणाऱ्या कारागिरांचेही हेच म्हणणे आहे. हँडलूमचे कपडे महाग असण्यामागचे कारण त्याच्या निर्मितीला लागणारा वेळ, खर्च, कष्ट यामध्ये दडलं आहे, अशी माहिती मूळचे राजस्थानचे असलेले आणि गेली कित्येक वर्ष हँडलूमसाठी लागणारे कापड विणण्यात, ब्लॉक प्रिंटिंगमध्ये माहीर असलेले कारागीर अनिल कुमार देतात. महागडे कपडे आजची पिढी घेतच नाही असे नाही. अनेकदा ५ ते ६ हजारांच्या सिल्क साडय़ा खरेदी केल्या जातात, मात्र त्या पॉवरलूमच्या आहेत की हँडलूमच्या याबद्दल एक तर अज्ञान असतं. त्याच किमतीत हँडलूममध्ये काही मिळू शकेल की नाही, याची चाचपणी केली जात नाही. दुसरं म्हणजे ‘युज अँड थ्रो’ अशी वृत्ती असलेली ही पिढी एकदा एक साडी नेसल्यानंतर पुन्हा ती कशी नेसायची, या विचारात असते. परिणामी अनेकदा पाच हजारांच्या एका साडीपेक्षा हँडलूमची नक्कल असलेल्या, पण पॉवरलूमवर बनलेल्या अडीच हजारांच्या दोन साडय़ा खरेदी करता येतील, असा विचार केला जातो. मात्र हँडलूमचे कपडे दीर्घकाळ टिकतात. त्याचे सौंदर्य आणि अगदी दहा वर्षांनंतरही तुम्ही ते कपडे घातल्यानंतर मिळणारे समाधान वेगळे असते. टिकाऊपणा आणि सौंदर्य याचाही विचार लोकांनी करायला हवा, असं मत अनिल कुमार आणि त्यांचे सहकारी मांडतात.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

आज अनेक फॅशन डिझाईनर हँडलूम कपडय़ांकडे वळले आहेत, मात्र कारागिरांना शहरात आणून त्यांच्याकडून काम करून घेण्यात यात ट्रान्सपोर्टपासून अनेक खर्च असतात. एका कपडय़ामागे २० लोकांचे कष्ट असतात. हा खर्च आणि वेळेचे गणित, त्या तुलनेत होणारी विक्री कमी असल्याने निवडक फॅशन डिझाईनर आणि एका ठरावीक वर्गाला समोर ठेवून कपडे डिझाईन करण्याचे त्यांचे प्रयत्न यामुळे मागणी असूनही हँडलूम उद्योग वेगाने वाढत नसल्याचे त्यांनी सांगितले. ३५,००० रुपयांची हँडलूमवरची पैठणी घेण्यापेक्षा त्याची नक्कलच खरेदी केली जाते; पण त्यामुळे अनेक कपडे नामशेष झाले आहेत. महाराष्ट्रातील कर्वती साडी आज बनवणं बंद झालंय. याचे कारण म्हणजे या साडीला बनवायला खूप पैसा व वेळ लागतो, तो आत्ता द्यायला कोणी तरुण डिझायनर पटकन तयार होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मात्र तरुण मुलं-मुली ही चळवळ पुढे नेऊ शकतात, अशी (पान ३ वर) (पान १ वरून) अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हँडलूमची एक तरी गोष्ट खरेदी करायला हवी, कारण त्यावर देशाचे खूप मोठे अर्थशास्त्र अवलंबून आहे. एक हँडलूम साडी खरेदी केल्यावर तुम्ही १५ कारागिरांना प्रत्यक्षरीत्या रोजगार देता आणि अप्रत्यक्ष फायदा म्हणजे ती तुमच्याकडे दीर्घकाळ टिकते, असं अनिल कुमार सांगतात.

हल्ली अनेक मोठमोठे फॅशन डिझायनर त्यांच्या कलेक्शनमध्ये आवर्जून हातमागावर बनवलेल्या कापडाचा वापर करतात, तर काही फॅशन डिझायनर फक्त हातमागावरचंच कापड वापरून कपडे बनवण्यासाठी लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय फॅशन डिझायनर म्हणजे रीना सिंग (‘एका’ ब्रॅन्ड). रीना सिंग यांच्या मते, तरुणांसाठी हँडलूम इंडस्ट्रीत संधी आहेत; पण त्याचबरोबरीने आव्हानेही आहे. आपण हँडलूमकडे का वळायला हवं हे तरुण फॅशन डिझायनर्स आणि तरुण ग्राहक दोघांनीही विचार करायला हवा. हँडलूम कपडे ही भारताची ओळख आहे, मात्र सध्या परंपरा म्हणून नव्हे, तर फॅ शन ट्रेंड म्हणून अनेकांनी मोर्चा याकडे वळवला आहे. मात्र या डिझायनर्सना त्यासाठी माल कुठून घ्यावा, कारागीर कुठे शोधावे याची माहिती नसते तसेच हॅन्डलूमवर कपडे बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारे उत्पन्न या प्रक्रियेला काही एक वेळ लागतो. हे सगळे समजावून घेऊन त्या पद्धतीने हँडलूम फॅशन पुढे नेणं गरजेचं आहे, असं ती म्हणते. नायलॉन किंवा केमिकल न वापरता अस्सल धागा, हँडलूमचे कापड वापरून कलेक्शन डिझाईन करण्यावर तरुण फॅशन डिझायनर्सनी भर द्यायला हवा, असा मुद्दा रीनाने मांडला. हँडलूमचा १६ हजारांचा कुर्ता फक्त दहा जण वापरतील; पण त्याची माहिती झाल्यावर हाच आकडा हळूहळू वाढत जाईल. फक्त त्यासाठी डिझायनर्सनी ग्राहकांच्या आर्थिक क्षमतांनुसार हँडलूममधला एथनिकनेस जपत, कारागिरांशी योग्य नातं टिकवून प्रामाणिकपणे ही इंडस्ट्री वाढवायला हवी. ग्राहकांना हॅन्डलूम कलेक्शन जसजसं उपलब्ध होत जाईल तशी खरेदी वाढेल आणि मग किमतीही हळूहळू कमी होतील, असं रीना आवर्जून सांगते.

मार्केट रेट कसा ठरतो?

हँडलूम बनवण्याच्या सुरुवातीच्या प्रक्रियेपासून तसेच कारागिरांना त्यावर किती काम करावे लागेल व किती दिवसांत ते पूर्ण होईल यावरून त्या त्या हँडलूम डिझायनर कपडय़ाचा भाव ठरतो. उदा. एका कापड यार्नाची किंमत ५००० रुपये ते ५५०० रुपये प्रति किलो असते. मग त्यावरून त्यातून निघणाऱ्या कापडावर किती एम्ब्रॉयडरी आहे? किती कुंदन, चांदी, सोनं वगैरे आहे? यावरून त्याचा मार्केट रेट ठरतो. त्यावर कारागिरांचे ग्रॅन्ड्स असतात. ही बाब तरुणांनाही माहिती करून घेतली पाहिजे. जर कोणत्याही साडीवर अथवा कपडय़ावर डिझाईन नसेल तर त्याची किंमत मार्केट रेटप्रमाणे साडेतीन हजार रुपयांच्या आसपास असते. यात त्यावर खर्ची केलेला वेळ, हातमागावरचे काम याचा समावेश असतो. सध्या जूट खूप महाग आहे. त्यामुळे डिझायनर जूटकडे वळताना घाबरतात. ‘फॅब इंडिया’कडे तरुण पिढी आकर्षिली जाते, कारण तिथे त्यांना हँडलूमचे कपडे वेगळे रंग, डिझाईन, क्वॉलिटी मिळते. शिवाय ब्रँडची ओळख असल्याने त्याचा ठरलेला ग्राहकवर्ग आहे. मात्र ब्रँडेड कपडे महाग असल्याने अन्य ग्राहक हे सबसिडाइज्ड मार्केट किंवा प्रदर्शनांवर अवलंबून असतात. महाराष्ट्रात भंडारा, नागपूर, पैठण, विदर्भ या ठिकाणीच प्युअर हँडलूमचे कारागीर व त्यांची दुकानं आहेत.

नवं काय?

हँडलूममध्ये फॅ शनच्या प्रांतात दिवसागणिक नवे प्रयोग होत आहेत. तुम्हाला दोन वेगळ्या प्रांतांच्या डिझाईन सध्या एकाच साडीमध्ये गुंफलेल्या दिसतील. तरुण पिढीच्या आवडीनुसार स्कर्ट, ब्लाऊ ज, स्ट्रिप टॉप, गाऊ न असेही कपडे हँडलूममध्ये मिळतात. कुर्त्यांमध्येही अनेक बदल केलेले दिसतात. खणाच्या कापडापासून बनवलेल्या कुर्ती मुलींमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. त्याच खणाच्या कापडापासून बोल्ड नेकलाइन असलेले वेस्टर्न डिझाईनचे टॉप मोठय़ा दुकानापासून ते लोकल स्ट्रीट दुकानातही उपलब्ध आहेत. अगदी पूर्ण कपडा हँडलूमचा नसला तरी साडीची बॉर्डर, ड्रेस, लेहेंगा, कुर्तीची बॉर्डर ते अगदी एखाद्या पर्सवरतीही तुम्हाला हातमागावर बनवलेली लेस किंवा बॉर्डर लावलेली दिसेल.

ओळखायचं कसं ?

निव्वळ हँडलूमचे कपडे ओळखता येत नाहीत म्हणून खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. हॅन्डलूम ओळखणं काही अंशी सोप्पं असतं. हँडलूम कपडय़ांची खरेदी करताना किमतीच्या टॅगप्रमाणे सरकारचा हँडलूमचा टॅग आहे की नाही हे बघा. खादीचं कोणतंही प्रॉडक्ट असेल तर त्यावर सरकारच्या  के.व्ही.आय.सी. या संस्थेचा लोगो आणि के .व्ही.आय.सी. असं लिहिलेलं दिसेल. तर सिल्कच्या मूळ कपडय़ावरही सिल्कमार्क दिसेल. या टॅग्जव्यतिरिक्त तुम्ही अजूनही काही गोष्टी सहज ओळखू शकता. हँडब्लॉक प्रिंटिंगची कोणतीही गोष्ट ओरिजनल आहे की नाही हे तपासायचे असेल तर या प्रिंट एकसारख्या दिसत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यात कुठे तरी डिझाईन थोडी वर-खाली झाली आहे किंवा डिझाईन-रंगसंगतीत एक सुसंगती नसते. अशा वेळी ती प्रिंट ओरिजनल ब्लॉक प्रिंट आहे हे समजावं. हँडलूमवरची पैठणी तुम्ही साडीच्या पाठच्या बाजूला बघून ओळखू शकता. खरी पैठणी आणि सेमी-पैठणीमधला फरक म्हणजे खरी हँडलूमवर विणलेल्या साडीची बॉर्डर मागे-पुढे म्हणजेच दोन्ही बाजूंनी सारखीच दिसते, तर सेमी-पैठणीमध्ये पाठच्या बाजूला जाळी जाळी दिसते.