News Flash

बदलांचे स्वागत..

मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये झालेल्या बदलांबद्दल तरुणाईत चर्चेची झोड उठली होती.

गायत्री हसबनीस

विविध प्रकारच्या अ‍ॅप्सकडे पाहिल्यावर समजतं की बरेचसे अ‍ॅप्स हे फोटो, व्हिडीओ आणि चॅटिंगच्या बाबतीत नवनवे बदल करत आहेत, त्यापैकी काही वैशिष्टय़पूर्ण बदल सांगायचे झाले तर धोरणं, सुरक्षा, प्रायव्हसी, कार्यालयीन कामकाज आणि मनोरंजन या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे बदल के ले जात आहेत. अ‍ॅप्समधील हे बदल सगळ्याच स्तरातील ऑनलाइन युजर्सना लक्षात ठेवून के ले असले तरी खासकरून तरुणाईला ते जास्त आकर्षित करणारे आहेत.

परवाच एका नामांकित कंपनीचा अहवाल वाचला. सांख्यिकी माहितीच्या आधारे तरुण पिढी नवेनवे अ‍ॅप्स कसे आणि का अंगीकारते?, यावर आधारित हा अहवाल होता.  या अहवालात तरुण पिढीचे अ‍ॅप्सकडे आकर्षित होण्यामागची कारणे स्पष्ट के ली होती. त्यातील मुख्य कारण होते ते नाना तऱ्हेच्या अ‍ॅप्समध्ये दरवेळी होणारे नवनवीन बदल. हे बदल प्रामुख्याने तरुणाईला विशेष आकर्षित करतात, असा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला होता. सध्या दररोज येणारे नवनवीन अ‍ॅप्स, जुन्या अ‍ॅप्समध्ये सातत्याने के ले जाणारे बदल आणि हे बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लढवले जाणारे मार्के टिंग फं डे लक्षात घेतले तर वर नमूद के लेल्या अहवालातील निरीक्षण योग्य असल्याचे लक्षात येते. विविध प्रकारच्या अ‍ॅप्सकडे पाहिल्यावर समजतं की बरेचसे अ‍ॅप्स हे फोटो, व्हिडीओ आणि चॅटिंगच्या बाबतीत नवनवे बदल करत आहेत, त्यापैकी काही वैशिष्टय़पूर्ण बदल सांगायचे झाले तर धोरणं, सुरक्षा, प्रायव्हसी, कार्यालयीन कामकाज आणि मनोरंजन या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे बदल के ले जात आहेत. अ‍ॅप्समधील हे बदल सगळ्याच स्तरातील ऑनलाइन युजर्सना लक्षात ठेवून के ले असले तरी खासकरून तरुणाईला ते जास्त आकर्षित करणारे आहेत.

मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये झालेल्या बदलांबद्दल तरुणाईत चर्चेची झोड उठली होती. सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये सतत होणारे बदल हे काही आजच्या पिढीला नवीन राहिलेले नाहीत, किंबहुना बदल हा कायम असतो याची प्रचीती इथेच जास्त येते. सोशल मीडियाच नाही तर अन्य विविध अ‍ॅप्समध्येही होणारे बदल सध्या चर्चेचा विषय आहेत. आजच्या घडीला अनेक नामांकित अ‍ॅप्स नवनवीन धोरणं आखताना दिसतात.  जेव्हा तुम्ही कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करता किंवा अपडेट करता त्या त्या अ‍ॅप्सच्या धोरणानुसार त्यातील अटी आणि नियम मान्य करण्यासाठी आपल्याला ‘अ‍ॅग्री’ या बटणावर क्लिक करण्याचा पर्याय आपल्यासमोर येतो. सोशल मीडियाच्या धोरणांमध्ये जेव्हा नवीन बदल येतात तेव्हा ते प्रामुख्याने विषय आणि आशयाला म्हणजे कॉन्टेन्टला धरून असतात. फेसबुक गेल्या काही महिन्यांपासून अशा बदलांवर भर देत आहे. गूगल ही कंपनीही अशा धोरणांवर अधिक भर देत आहे याचे महत्त्वाचे कारण गुगल या कंपनीच्या अ‍ॅप्सचा व्याप हा सर्वत्र पसरलेला आहे. आणि तो मुख्यत्वे बिझनेस व आयटी क्षेत्रात अधिक असल्याने त्यांचे अ‍ॅप्स हे त्या अनुषंगाने नवीन बदल बाजारात आणत असतात. ‘गूगल लेन्स’, ‘गूगल करंट्स’ असे नवीन अ‍ॅप्स हे गूगलनेच आणले आहेत. ‘गूगल करंट्स’ या अ‍ॅपचे नाव आधी ‘गूगल प्लस’ असे होते ते नंतर ‘गूगल करंट्स’ किंवा फक्त ‘करंट्स’ असे करण्यात आले. हे अ‍ॅप खास कार्यालयीन कामकाजांकरिता तयार केलेले आहे.

तसं पाहायला गेलं तर सातत्याने बदल करण्यात गूगल, फेसबुक या मोठय़ा नामवंत कंपन्या अग्रेसर असतात. आणि हे बदल फारसे ई—कॉमर्स क्षेत्रात न होता ते नेटवर्किंग क्षेत्रात जास्त होतात. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार फेसबुक १३ वर्षांपर्यंतच्या मुलांकरता खास इन्स्टाग्राम अ‍ॅप तयार करतंय. या पद्धतीनुसार अ‍ॅप तयार करताना सुरक्षेवर भर देत अ‍ॅप्स युजर्सच्या गरजेनुसार बदल करणे आवश्यक ठरते. कुठल्याही कंपनीचे नवीन अ‍ॅप विकसित होत असेल किंवा त्यात बदल होत असतील तर कंपनीची मूळ उद्दिष्टे ही व्यावसायिकच असतात, परंतु धोरणांमध्ये बऱ्याचदा सुरक्षा आणि वापरकर्त्यांचे हितच महत्त्वाचे असते. सध्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दोन विशेष बदल आले आहेत. एक म्हणजे इन्स्टाग्राममध्ये ‘व्हॅनिश मोड’ तर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘हॉलिडे मोड’ हे नवीन प्रकार आले आहेत. हॉलिडे मोडमध्ये तुम्ही कुठे व्हेकेशनला किंवा फिरायला जात असाल तर तुमचे सगळे चॅटिंग नोटिफिकेशन आपोआप म्यूट होतील. काही काळ संभाषण आणि ग्रुप चॅट्स बंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सध्या व्हेकेशन मोड किंवा हॉलिडे मोड विकसित करत आहे. ही गरज उद्भवली, कारण बऱ्याच वापरकर्त्यांना सुट्टीवर असताना किं वा बाहेरगावी फिरण्यासाठी गेले असताना संभाषणात भाग घेण्याची इच्छा नसते. या जागी सध्या आपण म्यूट नोटिफिकेशन्स हा पर्याय वापरतो आहोत. इन्स्टाग्रामधील व्हॅनिश मोड हा प्रकार इन्स्टंट इन्स्टाग्राम चॅटिंग डिलीट करता यावेत म्हणून दिला गेलेला आहे. एकंदरीत हे सर्व अ‍ॅप्स पाहिले आणि त्यातील (आलेले आणि येऊ घातलेले) बदल पाहिले की लक्षात येतं ते म्हणजे नेटवर्किं ग अ‍ॅप्समध्ये युजर्सची प्रायव्हसी राखण्याच्या दृष्टीने या बदलांवर भर दिला जातो आहे.

सोशल मीडिया किं वा नेटवर्किं ग अ‍ॅप्समध्ये प्रायव्हसी वाढवण्याच्या दृष्टीने के लेले बदल असोत वा अ‍ॅप्सच्या लुकपासून ते हाताळण्याच्या बाबतीतील बदल असोत इतर कोणाहीपेक्षा तरुण पिढी हे बदल चटकन स्वीकारते. सध्या तरुण पिढी आपल्या सोशल मीडिया किं वा नेटवर्किं गवरील  प्रायव्हेट लाइफच्या बाबतीत खूप सावधही झाली आहे आणि ते वापरण्याच्या बाबतीतही त्यांच्यात एक शिस्त आली आहे. हे या बदलांचे फलित आहे की तरुण पिढीच्या गरजांनुसार हे बदल झाले आहेत हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. मात्र बदल कु ठल्याही बाजूने असले तरी ते स्वागतार्हच ठरत आहेत यात शंका नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:46 am

Web Title: article about making changes in apps to attract youth zws 70
Next Stories
1 धुळवडीचा रंग पांढरा
2 वस्त्रान्वेषी : पगडबंद आठवणी
3 संशोधनाची वाढती मात्रा
Just Now!
X