तेजश्री गायकवाड

पांढरा किंवा काळा रंग कधी नखावर चढेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. आता मात्र हे सगळेच समज-गैरसमज नेल पॉलिश आणि त्यांच्या रंगांच्या बाबतीत आसपासही फिरकू शकणार नाहीत इतक्या वेगाने गायब झाले आहेत. उलट नेल आर्ट नावाचं हे जग इतकं भरभर रंग बदलतंय की आपलं मन हरखून जावं..

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

काही वर्षांपूर्वी नखावर रंग लावणे आणि त्याला सुशोभित करणे यापलीकडे नेल आर्ट अस्तित्वातच नव्हते. काही मोजक्या कार्यक्रमांसाठी तयार होतानाच नखांवर रंग चढवण्यासाठी तेवढा नेल पॉलिशचा वापर व्हायचा. ज्या रंगाचा ड्रेस घातला आहे अगदी त्याच रंगाचे नेल पॉलिश लावायचे असा अट्टहास असायचा. जेव्हा मोठय़ा आणि महत्त्वाच्या दिवसांसाठी खरेदी केली जाई तेव्हा आवर्जून विकत घेतलेल्या ड्रेसच्या रंगाचेच नेल पॉलिश घेतले जाई. काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी त्याचे काही रंगही ठरलेले असायचे. म्हणजे नववधूच्या नखांवर लालच रंगाचे नेलपेंट लावले जायचे. तिथे काळ्या रंगाची अशुभ म्हणून वर्णी लागायची. पांढरा किंवा काळा रंग कधी नखावर चढेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. आता मात्र हे सगळेच समज-गैरसमज नेल पॉलिश आणि त्यांच्या रंगांच्या बाबतीत आसपासही फिरकू शकणार नाहीत इतक्या वेगाने गायब झाले आहेत. उलट नेल आर्ट नावाचं हे जग इतकं भरभर रंग बदलतंय की आपलं मन हरखून जावं..

नेलपेंट फक्त नखावर प्लेन पद्धतीने लावणं किंवा नेल पॉलिशचा एकच कोट नखांवर लावणं हे फार जुनं झालं. कपडे, हेअरस्टाइल्स, अ‍ॅक्सेसरीज, मेकअप मुलींच्या एकूण स्टायलिंग स्टेटमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी भर घालत असतातच. यामध्ये गेल्या काही वर्षांत आणखी एका आयुधाची भर पडली आहे, ती म्हणजे नेल आर्टची. मॅनिक्युअरची कॉन्सेप्ट आता फक्त बेसिक स्टेजवर राहिली नसून नेल आर्टचा भाग त्यात प्रामुख्याने वापरला जाऊ  लागला आहे. मॅनिक्युअर म्हणजे हाताच्या बोटांची आणि नखांची निगा एवढय़ापुरतं हे मर्यादित नाही. नुसतं नेलपेंट लावूनही हल्ली भागत नाही. त्यावर नक्षी केलेली असलीच पाहिजे.

नेल आर्ट म्हणजे फक्त वेगवेगळ्या डिझाईन्स नखांवर तयार करणे असं नाही. नेल आर्टमध्ये आर्टिफिशियल नखं लावण्यापासून नुकतेच सुरू झालेले जेल नेल पेंट लावणे अशा अनेक गोष्टी आहेत. जसं कपडय़ांमध्ये वेगवेगळे सीझन येतात आणि त्यानुसार बाजारात कलेक्शन दाखल होतं तसंच काहीसं आता नेल आर्टमध्येही होतं आहे. सीझननुसार नेल आर्टचे ट्रेण्ड बाजारात येत आहेत. सध्या जास्त प्रसिद्ध होऊ  लागलेला ट्रेण्ड म्हणजे जेल नेल पॉलिशचा. जेल नेल पॉलिश शक्यतो नेल आर्ट पार्लरमध्ये जाऊन केलं जातं. घरीच जेल नेल पॉलिश शक्यतो लावले जात नाही. जेल नेल पेंटचा एकच कोट पुरेसा असतो, त्या एका कोटमध्येच हवी ती शेड सहज मिळते. जेल नेल पेंट जास्त करून आर्टिफिशियल अर्थात खोटय़ा नखांवर लावले जाते. कारण जेल नेल पेंट सहजपणे निघत नाही किंवा काढताही येत नाही. जेल नेल पेंट काढताना मशीनने खरवडून नेल पेंट काढले जाते आणि अगदीच घरी जर जेल नेल पेंट काढायचे असेल तर अ‍ॅसिटोनमध्ये नखं ठेवून बराच वेळ वाट पाहावी लागते. जेल नेल पेंटमध्ये असंख्य रंग उपलब्ध आहेत आणि त्यातले अगदी सगळेच रंग ट्रेण्डमध्येही आहेत. जेल नेल पॉलिश लावून त्यावरती नवनवीन पद्धतीने नेल आर्ट केलं जातं. यामध्ये स्टोन, टिकल्या, सीक्वेन्स, चमकी, मेटलची फुलं अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात. जेल नेल आर्टमध्ये हाताच्या चार बोटांना सेम रंगाचे नेल पॉलिश आणि कोणत्या तरी एका बोटाच्या नखावर वेगळ्या रंगाचे नेल पॉलिश लावलं जातं. शिवाय फक्त एकाच नखावर डेकोरेशनचं सामान वापरून त्याला हायलाइट केलं जातं. काही वेळा एक बोट सोडून पुढच्या बोटाच्या नखांवरही नेल पॉलिश लावलं जातं. असे अनेक ट्रेण्ड सध्या बाजारात आले आहेत.

जेल नेट पॉलिशच्या आधी मॅट नेट पॉलिशचा बोलबाला होता. लिपस्टिकमध्ये मॅट टेक्स्चरने राज्य केल्यावर नेल पॉलिशमध्येही साधारण एक वर्षांपासून मॅट नेल पॉलिश ट्रेण्डमध्ये आले आहे. यामध्येही जेल नेल पॉलिशप्रमाणे अनेक रंग उपलब्ध आहेत, पण ग्राहकांच्या पसंतीमध्ये प्रामुख्याने सिल्व्हर, गोल्डन, काळा, निळा असेच रंग आहेत. मॅट नेल पॉलिशवर जास्त डेकोरेटिव्ह गोष्टींचा वापर केला जात नाही. याउलट दोन रंगांच्या मॅट नेल पॉलिशचा वापर करून त्यावर डिझाईन केले जाते. याचं टेक्स्चर अगदी कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर शोभून दिसतं. याखेरीज साध्या नेल पॉलिशनेही नेल आर्ट केलं जातं आणि यासाठी काही खास नेल आर्ट पार्लरमध्ये जाण्याची गरज नसते. तुम्ही घरच्या घरी सहज आपल्या कल्पकतेने डोकं लढवून नेल आर्ट करू शकता आणि तुमच्या आयडियांच्या कल्पनांना बाजारात मिळणाऱ्या नेल आर्ट किटची साथ दिलीत तर तुमचं नखांवरचं नक्षीकाम अजूनच सुरेख होईल. हजारो रुपयांपासून ते अगदी खिशाला परवडणाऱ्या १०० रुपयांपर्यंत या किट्स दुकानांमधून दिसतात. स्वत:च्या नखांवर तुम्हाला प्रयोग करायचे नसतील तर तुम्ही आर्टिफिशियल नखं लावून त्यावर प्रयोग करा. ही नखं बाजारात अगदी १० रुपयांपासून उपलब्ध आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा साइट्सवर नेल आर्ट्सची पेजेस आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्याचा वापर करून आपण क्लासी नेल आर्ट्स नक्कीच करू  शकतो.  viva@expressindia.com