यंदा हटके बॅग्सचा जमाना आहे मग सीझन कोणताही असो त्यांची खरेदी केली नाही की चुकचुकल्यासारखे वाटते. ऑनलाइन गेलात तर चिक्कार वस्तू खरेदी करायला असतात. यातला सध्याचा हटके बॅग्सचा ट्रेण्ड तुम्हाला नक्कीच भुलवून जाईल.

* बॅगिटच्या नव्या टाय अप क्लोज्ड हॅण्डबॅग्स  आणि शोल्डर बॅग्स या लेदर, डेनिम इत्यादींमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाही पावसाळा म्हणून लेदरसारख्या फॅब्रिकला मागणी आहे. स्लिंग बॅग्स् खास करून ज्यात प्रमाणात ट्रेण्डमध्ये आहेत कारण एकाच साइडला बॅग मिरवण्याचा लुक अगदी फॉर्मल आणि ट्रॅडिशनलमध्येही उठून दिसेल.

* ड्रेसबेरीकडून या सीझनसाठी त्यांच्या नावाप्रमाणेच फ्रुटबेरीच्या रंगामध्ये म्हणजे ब्लॅकबेरी, ब्लूबॅरी, स्ट्रॉबेरी अशा विविध सिंगल कलरच्या विथ पॉकेट शोल्डर बॅग्स उपलब्ध आहेत.

* जवळजवळ टास्सेल असलेल्या बॅग्सचा ट्रेण्ड तोही मिनी हॅण्डबॅग्स तसेच मोठय़ा शोल्डर बॅग्समध्ये दिसून येतोय. गुच्ची या ब्रॅण्डच्या बॅग्स म्हणजे रॉयल टच असणाऱ्या.. त्यातही टास्सेलप्रमाणे रिबीन्स, बो, स्कूबी स्ट्रिप्स आहेत; ज्याने गाऊ न, मिडी स्कर्ट, जम्पसूट अशावर या बॅग्सचा लुक उठून येईल.

* सिन्थेटिक बॅग्स तुम्ही हमखास वापरू शकता. कॉलेज तरुणांसाठी व ऑफिस तरुणांसाठी योग्य बॅग्स म्हणजे टोट बॅग्स. अगदी हलकी व दिसायला आकर्षक असणाऱ्या या बॅग्समध्ये तुमच्या वस्तूही राहतील व सुरक्षितही ठेवता येतील. पावसाळ्यात व्यवस्थित सांभाळताही येतात. टोट बॅग्स या जोरदार ट्रेण्डमध्ये आहेत. लेव्हीच्या बॅग्स या लेदर, वुल मध्ये टॉट आणि बॉक्स बॅग्समध्ये उपलब्ध आहेत.

* ‘दा मिलानो’ने हल्ली आवडणाऱ्या ब्लॅक आणि डार्क ब्राऊ न रंगात आणल्या आहेत. या सगळ्यांनाचा आपल्याशा कराव्याशा वाटतील.

* ‘कप्रेसी’ने ट्रॅव्हल बॅग्स आणल्या आहेत. या वेळेसही त्या इटॅलियन स्टाईलमध्ये आहेत. ‘चुंबक’ या ब्रॅण्डच्या बॅग्सही हटके पण ऑथेंटिक स्टाइलमध्ये आहेत. विविध कलर व आकर्षक रंगसंगती व स्टाइलसह विविध बॅग्स ट्राय करण्यास नक्कीच तुटून पडा.

– या वेगळ्या बॅग वेगवेगळ्या प्रकारच्या व किमतीच्या आहेत. पण या सीझनमध्ये पार्टीवेअर म्हणून असलेल्या बॅग्सच्या किमती ५००० ते ८००० पर्यंत आहेत.

तर कॅज्युअल व वर्किंग वेअरमध्ये बॅग्स ५०० ते ३००० रुपयांत उपलब्ध आहेत.