सणासुदीचा सीझन जवळ येतोय त्यामुळे बाजारात आणि ऑनलाइन साइट्सवर खरेदीसाठी गर्दी होण्यास सुरुवात झालीये. काहींना काय घेऊ  आणि काय नको असं होतं, कारण ई-मार्केटमध्ये फेस्टिव्ह सीझनसाठी खरेदी करण्यासारखं खूप काही असतं. पण त्यातल्या सगळ्या गोष्टी जरी हव्याहव्याशा वाटत असल्या तरी सणासुदीला म्हणून कपडय़ांपाठोपाठ गरज असते ती दागिन्यांची. त्यातही सध्या अंगठय़ांचे वेगवेगळे प्रकार या बाजारात लक्ष वेधून घेतायेत. सध्या ट्रेण्डमधील अंगठय़ा कोणत्या हे जाणून घेताना त्यातील विविधताही जाणून घ्यायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • सध्या बोहेमियन रिंग्सचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यावरील कार्व्हिग आणि डिझायनिंगमुळे त्या रिंग्स कोणत्याही पारंपरिक पेहरावावर सूट होतील. किंबहुना सणासुदीला अगदी डिझायनर कुर्ता, जॅकेट आणि जीन्स हा ऑप्शनही काहींना आवडतो. मग अशा पेहरावावर शोभून दिसणाऱ्या बोहेमियम रिंग्सची खरेदी तर आवर्जून करायला हवी. या रिंग्सवर खासकरून ट्रायबल डिझाइन, जॉमेट्रिकल डिझाइन, मंडला आर्ट, स्पायरल डिझाइन, शेल डिझाइन अशा प्रकारचं डिझाइनिंग पाहायला मिळेल. त्यातून यांची साइजही छोटी असते, त्यामुळे त्या एकाच बोटावर अनेक रिंग्स वापरण्याची फॅशनही तुम्ही ठेवू शकता. साधारण बोहेमियन रिंग्स या २९९ रुपयांपासून तर ऑक्सिडाइज बोहेमियन रिंग्ससाठी ८९९ रुपयांपर्यंत सेट आणि ५३५ रुपयांपर्यंत सिंगल रिंग्स ‘अ‍ॅमेझॉन’वर मिळतील, जिथे ५० टक्क्यांवर ऑफर्स आहेत.
  • नीलमणीपासून बनलेल्या म्हणजे ‘टरकॉइझा रिंग्स’ही उपलब्ध आहेत. ज्या ओवल शेप, अ‍ॅरो शेप व मल्टिशेपमध्ये असून गोल्डन, सिल्व्हर व प्लॅटिनमच्या रिंग्स आहेत. गोल्डन टरकॉइझ रिंग्सची किंमत ५९९ रुपयांपासून आहे. सिल्व्हर टरकॉइझ रिंग्स तुम्हाला १,१२५ ते १,१५० रुपयांपासून मिळतील. सध्या ऑनलाइन साइट्सवर ५० टक्के सूट असल्याने जेमस्टोनच्या रिंग्स खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. सध्या वेडिंग रिंग व एन्ग्जेमेंट रिंगमध्येही पर्याय उपलब्ध आहेत. ज्यात सिल्व्हर रिंग्स ट्रेण्डी असून ९२.५ स्टर्लिग सिल्व्हर आहे, त्यातून इरेग्युलर शेपचा ट्रेण्ड ऑनलाइनवर दिसेल. ‘तनिष्क’ने ७,००० रुपयांपासून डिझायनर रिंग्स आणल्या आहेत. ज्या जेमस्टोनसोबत गोल्डन रिंगमध्ये पाहायला मिळतील.
  • थम्ब रिंग हाही कूल प्रकार. थम्ब रिंगमध्ये या वेळेस स्टर्लिग सिल्व्हरबरोबर स्टेनलेस स्टीलच्याही रिंग्स मिळतील. ज्यात वायर शेप, स्पायरल शेप, बांबू शेप, लिव्ह डिझाइन किंवा फ्लोरल डिझाइन असे पर्याय आहेत. थम्ब रिंग फार स्वस्तात तुम्हाला मिळू शकतील. २०० ते ३०० रुपयांपर्यंत या रिंग्सची खरेदी नक्कीच होईल. ‘इबे’वर विविध गोल्डन थम्ब रिंग्सही उपलब्ध आहेत. डायमंडमध्ये गीताजंली ज्वेलर्सने फ्लोरल डिझाइन आणले आहेत. २,१९९ रुपयांपासून त्या मिळतील.
  • प्लॅटिनम रिंग्सचा ट्रेण्ड कधी थांबतच नाही तो या वेळेस जोरदार आहे. २५५, १३६, १४०, २९९ रुपयांपासून ते ४५०, ६००, १५०, ३३० रुपयांपर्यंत प्लॅटिनम रिंग्स विविध रेंजमध्ये उपलब्ध आहेत. ज्यात ‘डायमंड प्लॅटिनम’ फार आवडीचा प्रकार आहे.
  • कॉकटेल रिंग्स या कॉलेज तरुणींपासून सगळ्यांना आवडणाऱ्या. पर्ल शेप, हार्ट शेप, क्रिस्टल शेपमध्ये उपलब्ध असून ३९९, २९९ रुपयांपासून ते ५७५ रुपयांपर्यंत कॉकटेल रिंग्स मिळतील. फ्लिपकार्टवर ६० टक्के सूट मिळत असल्याने कॉकटेल रिंग्स रिझनेबल प्राइसमध्ये मिळतील.
  • रूबी रिंग्स पार्टी वेअरवर योग्य ठरतील. टिफवनी अ‍ॅण्ड को. या ब्रॅण्डच्या रूबी रिंग्स फेमस आहेत. ऑनलाइनवर तुम्हाला त्या २०० पासून ५०० रुपयांपर्यंत सहज मिळतील. अ‍ॅमेझॉनवरही रूबी रिंग्स वेगवेगळ्या दरात उपलब्ध आहेत. रूबी रिंग्समधला लाल रंग जास्त आकर्षक वाटत असल्याने ब्लॅक किंवा न्यूड कलरच्या आऊ टफिटचा पर्याय त्यासाठी योग्य ठरेल.
  • रिंग्स या साधारणत: १५.६ एमएम आणि १६.९ एमएमच्या सहज उपलब्ध आहेत. तर एक्स्ट्रॉ साइजमध्ये १७.७ एमएमपर्यंत घेऊ शकता. बऱ्याचशा अंगठय़ा या कृत्रिम स्टोनपासून बनवत असल्याने खासकरून ऑक्सिडाइज रिंग्स घेताना त्या खराब न होण्याकरिता कॉटनच्या कपडय़ाने अधूनमधून हलक्या हाताने पुसून घेतल्या तरी त्या जास्त काळ टिकतात.
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about new trending ring
First published on: 07-09-2018 at 03:34 IST