गायत्री हसबनीस

मुलांच्या जगात सर्वात जास्त प्राधान्य असते ते ‘शूज’ला. एव्हाना थंडीतही फुटबॉल, क्रिकेट, अन्य खेळांमध्ये रमणारी मुलं सगळीकडे ब्रॅण्डेड बूट / शूज घालून फिरतात. बरं, त्यातही सर्वाची आवड जवळपास सारखी असते तर काहींची चॉइस ही वेगळी पण असते. काही अवली सोडले तर बाकी सर्व ट्रेण्डमध्ये असतात. या थंडीत ‘शूज’चा ट्रेण्ड जरा बदलला आहे. आज ‘आदिदास’ हा आवडता ब्रॅण्ड आहेच पण त्याचबरोबर अनेक विविध ब्रॅण्ड बाजारात आले आहेत ज्यातून कम्फर्टेबल आणि स्टाइलिश असे शूज मिळतील. थोडय़ा कॉमन रंगांमध्ये काळा, मरून आणि मडी कलर कॅ ज्युअल म्हणून सुटेबल आहे. पठडीच्या बाहेर जाऊन फंकी पण डार्क मिनिमलिस्ट रंग आहेत.

ज्यात पिवळा, नारंगी, हिरवा (यात मिलिटरी ग्रीन आहे), निळा, लाल हे डे वेअर आणि नाईट वेअर म्हणून योग्य ठरतात.

ड्ट सर्वसामान्य मुलांना डिझायनर शूज इतके नाही आवडत, पण तरीही ट्रेण्डमधील डिझायनर शूज हे इतके कॅज्युअल आहेत की कोणीही सहज ते दिवसांत कितीही वेळा वापरू शकतात. आता मेन्स वेअरमध्ये लेदर स्निकर्स आणि बूट्स आहेत जे कोणत्याही सीझनमध्ये चालतात. हेच स्निकर्स डिझायनर वेअरमध्ये पण आहेत. स्निकर्सचे विंटर कलेक्शन म्हणजे ग्रे, ब्लॅक, ब्राऊन, खाकी, ब्ल्यू, कॅमल हे इतकेच रंग आहेत. ‘वूडलॅन्ड’ या ब्रॅण्डचे डिझायनर स्निकर्स आहेत जे कॅमल कलरमध्ये असून लेस आणि आऊ टर फॅब्रिकमध्ये तुम्हाला डिझाइन दिसेल. यांची किंमत ३,९९९ रुपये इतकी आहे. ‘ली कुपर’कडूनही अगदी कॅज्युअल स्निकर्स तुम्हाला मिळतील; २,५९९ रुपयांत तुम्हाला टॅन ब्राऊ न, टॅन डीप ग्रे असे रंग मिळतील ज्यामध्ये वेगळं कलरफुल पॅटर्न शूजवर मिळेल. ‘फ्रॅ न्को लियोन’चे डार्क ब्लॅक शाइन शूज २,८९५ रुपये एवढय़ा किमतीत आहेत. ‘बकारू’ या ब्रॅण्डकडून डिझायनर ब्लॅक डोटेड, सिंगल थ्री लेस आणि डार्क चॉकलेट रंगाचे स्निकर्स १,८४७ रुपये एवढय़ा दरात मिळतील.

ड्ट या सीझनमध्ये ट्रॅव्हलिंग हे मस्ट यादीत मोडतं. त्यामुळे सामानाच्या यादीत शुजला पर्याय नाही. खास या सीझनसाठी विंटर हायकिंग बूट्स आहेत जे ‘डिकॅ थ्लोन’ या शॉपिंग साइटवर उपलब्ध आहेत. ‘क्युचूआ’चे एन. एच. १०० ब्लॅक बुट्स तुम्ही घेऊ  शकता. त्यांची १,९९९ रुपये इतकी किंमत आहे. सी. एच. १०० हायकिंग बूट्स हे २,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझोनवर वॉटरप्रूफ विथ झिप, विथआऊ ट झिप शूज ४९६ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. यात नॉन स्लिप शूजचेही पर्याय आहेत जे ५७५ रुपयांत मिळतील.

ड्ट थंडीच्या अनुषंगाने उबदार आणि जास्त आरामदायी म्हणून ‘लिओई मॅन’कडून अ‍ॅन्कल बूट बाजारात आले आहेत जे तुम्हाला ४,०५५ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील, या शूजखाली टॅक्टिकल कॉम्बाट पद्धतीचा बेस आहे ज्यामुळे ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंगसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. ‘युनिस्टार’कडूनही इनर कुशन असलेले अ‍ॅन्कल बूट ४८९ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील.

ड्ट स्टाइल इन असलेले डर्बी बूट्सही ऑनलाइन पहायला मिळत आहेत. ‘टाटा क्लिक’वर तुम्हाला स्टाइलिश बूट मिळतील. ‘अलबटरे तोरैसी’ या ब्रॅण्डकडून डार्क ब्राऊ न बूट २,७९६ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत. डार्क  टॅन डर्बी बूट्स १,४९९ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत तर नेव्ही ब्लू कॅज्युअल बूट्स २,२०५ रुपये आणि ग्लॅमरस ब्लॅक डर्बी बूट्स २,९९६ रुपये एवढय़ा किमतीत उपलब्ध आहेत. क्रिमी ब्राऊ न रंगातील डर्बी बूट्स १,२७७ रुपये एवढय़ा किमतीत लेस-अप मध्ये आहेत. जिप्सी लुक हवा असेल तर त्यातही पर्याय आहेत. ब्राऊ न कलरमधील चक्का बूट्स हे २,०३६ रुपये इतक्या किमतीत मिळतील. यामध्ये अ‍ॅपरॉन – टो चक्का बूट्सही आहेत. ५०० रुपयांपासून त्यांची सुरुवात आहे.

ड्ट रिच रॉयल लुक असणारे बूट्स ‘अजिओ.कॉम’वर मिळतील. यामध्ये पॅनल्ड हाय टॉप लेदर शूज आहेत, ३,८९५ रुपये अशी त्यांची किंमत आहे. त्यामुळे लेस-अप बूट्स ४,१९९ ते १,८०० रुपये इतक्या रेंजमध्ये तर स्लिप-ऑन शुज २,०२५ रुपये एवढय़ा किमतीत मिळतील. तसेच यात डिझायनर चेल्सी शूज आहेत. १,६०० रुपयांपासून ते ३,४९९ रुपयांपर्यंत यांचे दर आहेत. डबल स्ट्रॅप मॉन्क बूट्स तुम्हाला ४,१९९ रुपये या दराने मिळतील. २,४९९ रुपयांत ब्रॉग्युईंग शूजही पहायला मिळतील.

ड्ट काही वॉर्म शूज कॉटन, लेदर, स्टील, ब्रिथेबल फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहेत. यात स्नो बूट्स, अ‍ॅथलेटिक बूट्स, कम्फाय शूज असे पर्याय मिळतील. यांची किंमत ३,७५९, ४,८४९, ४,१७०, ३,९६७, ५,२००, ३,४००, ३,५००, ५,२०० रुपये एवढय़ा वेगवेगळ्या दरात आहे. त्यामुळे यातून तुम्हाला जे आवडतील आणि खिशालाही परवडतील असे शूज घेणे ही मोठी कसरत ठरणार आहे.

या सर्वच शूजवरती आणि विविध प्रॉडक्ट्सवर ५०% सूट आहे. यंदा ‘बेका बुकी’ या ब्रॅण्डकडून शूजमध्येही ऑलिव्ह ग्रीन कलर, जेमस्टोन ब्राऊ न, चारकोल ब्लॅक कलर असे विविध रंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १,४९९ रुपयांपासून यांची किंमत आहे. सर से पाँवतक फॅ शन करणार म्हटल्यावर शूज कसेही असून चालत नाही. बाजार तर वेगवेगळ्या ब्रँड्स, आकारप्रकारांच्या शूजने भरलेला आहे. आता तुम्हाला नेमक्या कोणत्या कारणासाठी शूज खरेदी करायचे आहेत ते लक्षात घेऊनच ही बाजारहाट करा!

viva@expressindia.com