22 October 2019

News Flash

‘स्निकर्स’ फॅशन!

ट्रेडिशनल साडीवर अथवा लेहेंग्यावर स्निकर्स घातले तरी केशरचनेपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत मात्र कशातही तुटवडा नसतो.

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

साडीवर जॅकेट, क्रॉप टॉप असे प्रकार लोकप्रिय होत असताना पायातही स्निकर्स शूज घालून लग्नापासून वेगवेगळ्या समारंभात टेचात वावरण्याचा नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे.

सर्वसाधारणपणे साडीवर सॅण्डल, दागिने, जीन्सवर शूज अशा गोष्टी मॅचिंग करूनच फॅशन क रण्यावर मुलींचा भर होता, मात्र फॅशनविश्वात सध्या हटके करण्यासाठी म्हणून नव्हे तर कम्फर्टच्या दृष्टीने केले जाणारे प्रयोगही हटके फॅशन म्हणून नावारूपाला येत आहेत. साडीवर जॅकेट, क्रॉप टॉप असे प्रकार लोकप्रिय होत असताना पायातही स्निकर्स शूज घालून लग्नापासून वेगवेगळ्या समारंभात टेचात वावरण्याचा नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे.

बॉलीवूडमधून फॅशनचे प्रयोग वेगाने सर्वसामान्यांमध्ये पसरतात. सध्या साडी किंवा पारंपरिक कपडय़ांवर स्निकर्स, कॅनव्हास शूज घालून वावरण्याचा फॅशन ट्रेण्डही रुपेरी पडद्यावरून जनमानसांत उतरतो आहे. एरवी ब्राइट साडी नेसून त्यावर स्लिवलेस ब्लाऊज घालून उंच टाचांच्या चपला घालून आपल्या नायकासोबत रोमॅन्टिक गाण्यावर नृत्य करणारी नायिका आता मागे पडली आहे. त्याऐवजी नायकाबरोबर तितक्याच ठेक्यात उडत्या गाण्यांवर साडी, शूज, गॉगल असा हटके पेहराव करून नाचणारी नायिका लक्ष वेधून घेते आहे. ‘सिम्बा’ या चित्रपटातील ‘आला रे आला सिम्बा आला’ या गाण्यात रणवीरबरोबर नृत्य करणाऱ्या तरुण नर्तिका भडक पिवळ्या रंगाच्या नऊवारीखाली पांढरे स्निकर्स घालून नाचताना दिसतात. ‘माऊली’ या चित्रपटातही रितेश देशमुखबरोबर ‘धुऊन टाक’ या गाण्यात जेनेलियाने पांढऱ्या घागरा-चोलीवर पांढरे स्निकर्स घातले आहेत. ट्रॅडिशनल लेहेंगा, शरारा, घागरा-चोळी, नऊवारी साडी असे आऊटफिट्स आणि त्यावर स्निकर्स घालून लग्नसमारंभात मिरवणाऱ्या मुली आज हमखास दिसतायेत. कोल्हापुरी चप्पल जशी जीन्स आणि ट्राऊझर्सवरती उतरली तसेच ट्रॅडिशनल आऊ टफिटवर स्निकर्स घालून स्वॅगमध्ये राहण्याचा हा प्रकार आहे. जो सध्या फॅशनविश्वात चांगलाच ट्रेण्डी ठरला आहे.

ट्रेडिशनल साडीवर अथवा लेहेंग्यावर स्निकर्स घातले तरी केशरचनेपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत मात्र कशातही तुटवडा नसतो. ‘डॉली की डोली’ या चित्रपटात सोनमने निळ्या लेहेंग्यावर स्निकर्स आणि जॅकेट घातले होते. तिच्या कूल आणि आऊट ऑफ द बॉक्स विचार करून फॅशन करण्याच्या तिच्या पद्धतीला तिच्या चाहत्यांकडून दादही मिळाली. सोनमनेच पुन्हा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात वन साइड कट डार्क गुलाबी लेहेंग्यावर व्हाइट स्निकर्स घातले होते. तिची बहीण रिया कपूरनेही ही फॅशन उचलून धरली. सोनमच्या लग्नात रियाने पांढऱ्या लेहेंग्यालर ‘नाइकी’ या ब्रॅण्डचे स्निकर्स घातले होते. याशिवाय तिने अनामिका खन्नाच्या लुन्गी स्टाइल मिनी स्कर्टवर लूझ कुर्ता परिधान करीत त्याखाली स्निकर्स घातले होते. सोनाक्षी सिन्हानेही ‘हाय ब्लिट्झ’ या मासिकाच्या पोस्टवर लेहेंगा आणि त्याखाली स्निकर्स घालून पोज दिली होती. तर क्रिती सननेही ‘इंडिया फॅशन वीक’साठी मोनिषा जयसिंग हिचे कलेक्शन सादर करताना भरजरी लाल लेहेंग्यावर त्याच रंगाचे स्निकर्स घातले होते. लेहेंग्याच्याच प्रिंटचे स्निकर्स होते आणि वरून लेहेंग्यावर तिने टी-बॅक घातली होती. त्यामुळे तिचा हा लुक पूर्ण वेगळा ठरला. इलियाना डिक्रूजनेही लेहेंग्यावर स्निकर्स आणि पायात ‘आम्रपाली’च पैंजण घालून भलताच हटके लुक केला. फक्त अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनीही हा लुक आपलासा केला आहे. ‘बेफिक्रे’ या चित्रपटात वाणी कपूर आणि रणवीर सिंगने ‘खुलके डुलके’ या गाण्यात ट्रॅडिशनल आऊटफिटवर ‘आदिदास’चे स्निकर्स घातले होते. वाणी कपूरचा लेहेंगा वन साइड कट स्टाइलचा होता आणि रणवीरनेही शिमर शेरवानी जॅकेट आणि पांढऱ्या धोतीखाली स्निकर्स घातले होते. आनंद अहुजानेही त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला फॉर्मल कुर्ता आणि चुणीदारवर स्निकर्स घातले होते. दीपिका पदुकोणने तिच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये मरून-पिंक ट्रॅडिशनल एम्ब्रॉयडरी गाऊनवर स्निकर्स घातले होते.

त्यामुळे आता नऊवारी साडीखाली कोल्हापुरी चप्पलच घालायची किंवा लेहेंग्याखाली हिल्सच घालावेत असे काहीच बंधन उरलेले नाही. मुली आता बिनधास्त स्वॅगमध्ये राहणं पसंत करतात. लग्नात स्वत: नवरी मुलगी आता हिल्स विसरून स्निकर्स घालते आहे. अर्थात या स्टाइलचा भाग कमी आणि कम्फर्टचा जास्त आहे. लग्नात जे नटणं-मुरडणं असतं, वजनदार लेहेंगे असतात, जे ओव्हरलोड दागिने असतात ते तसेच राहतात पण आपल्या या हौसमौजेला हिल्स घालून अन-कम्फर्टेबल वाटून घेण्यापेक्षा स्निकर्स घालून आरामात त्याचा आनंद घेण्याला प्राधान्य दिले जाते आहे. थोडक्यात, लग्नाच्या गडबडीत, धावपळीत, वजनदार कपडय़ांमुळे, लग्नात नाचायचे असल्याने स्निकर्स हे आरामदायी ठरतात. लग्नात स्निकर्सशिवाय लेहेंग्यावर सनग्लासेस लावणं आणि लेदर जॅकेट घालणं यालाही महत्त्व मिळतं आहे. लग्नसराईत यंदा हा ट्रेण्ड इतका जोरदार चालू आहे की मोठमोठय़ा वेडिंग फोटोग्राफर्सकडून या नव्या स्निकर्स विथ लेहेंगा घालून नटणाऱ्या नवरीमुलगीची खास छायाचित्रे काढून घेतली जातात. लेहेंग्यावर लग्नात नवरीमुलगीचे ‘ब्रायडल स्निकर्स’ या नावाने ओळखले जाणारे हे स्निकर्स ऑनलाइनवर कस्टम मेड असे उपलब्ध आहेत. आता विविध ब्रॅण्डच्या स्निकर्सवर एम्ब्रॉयडरी आणि डिझायनर अ‍ॅसेट्स आले आहेत. यामध्ये एमबेलिश्ड स्निकर्सही मोडतात. त्यामुळे ऑनलाइनवरून आता लग्नासाठी डिझायनर जुती किंवा हिल्स विकत घेण्यापेक्षा डिझायनर स्निकर्स घेण्याकडे कल वाढला असल्याने नाइकी, प्युमा, आदिदाससारख्या ब्रॅण्ड्सनी असे डिझायनर स्निकर्स उपलब्ध केले आहेत.

या ट्रेण्डचं मूळ तसं पाहिलं तर सध्या चित्रपटातूनच आलंय. मात्र याआधी वयस्कर स्त्रिया पाय दुखतात, टाचा दुखतात म्हणून पंजाबी ड्रेस किंवा साडय़ांवर स्निकर्स घालतच होते. आता तेव्हाचे हे सोय म्हणून केलेले समीकरण सध्या फॅशन सांभाळताना कम्फर्टही मोडला जाऊ नये म्हणून सर्रास वापरले जाते आहे. रूढ फॅशनला मोडीत काढून स्वत:ला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने फॅशन करण्याचे धाडस या तरुणींनी दाखवले असून तीच फॅशन म्हणून मार्केटमध्ये रुळते आहे. स्निकर्स या फॅशन ट्रेण्ड बदलातअव्वल ठरले आहेत. #स्निकने सध्या सोशल मीडियाला मोठय़ा प्रमाणात गाजते ठेवले आहे हे मात्र खरं!

First Published on January 11, 2019 1:19 am

Web Title: article about sneakers fashion shoes 2