गायत्री हसबनीस

मोजे हे तसं पाहिलं तर फक्त शूजच्या आत पायाच्या तळभागाला आराम मिळावा म्हणून घालण्याची आपली सवय असते. प्रेझेंटेशन असेल, ऑफिस मीटिंग असेल किंवा कोणताही फॉर्मल ड्रेसकोड असेल. फॉर्मल शूजवरती फॉर्मल (डिझायनर नसलेले) मोजे हे घालायलाच लागतात. शाळेसाठीसुद्धा मोज्यांच्या कलर कोड असतो आणि त्या रंगाचे मोजेच घालणं बंधनकारक असतं. शाळा, ऑफिस.. प्रत्येक ठिकाणी फॉर्मल मोजे घातल्याने डिझायनर मोजेसुद्धा अस्तित्वात आहेत हे आपण विसरतोच.

फॉर्मल आणि डिझायनरव्यतिरिक्त एक नवाकोरा ट्रेण्ड मोज्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे ट्रान्स्परंट डिझायनर मोजे. यातही पूर्णपणे पारदर्शक मोजे यंदा ट्रेण्डमध्ये आहेत. यावर शूज, बूट घालून काही उपयोग नाही तर हिल्स किंवा सॅन्डल्स घातले तर एक वेगळा, ग्लॅम लुक तुम्हाला अनुभवायला मिळेल. ट्रान्स्परंट मोजे हे विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे त्या मोज्यांवर विरोधी किंवा आहे त्या रंगापेक्षा गडद रंगाचे, डिझायनर हिल्स अथवा काळ्या रंगाच्या हिल्स/ सेमी हिल्स घालू शकता. ट्रान्स्परंट मोजे हे ‘शिर सॉक्स’ ((sheer socks) नावाने तर डिझायनर ट्रान्स्परंट मोजे हे ‘टय़ूले सॉक्स’ (tulle socks) म्हणून ओळखले जातात. सध्या ब्लॅक ट्रान्स्परंट मोजे हे ट्रेण्डी आहेत. यावर शिमर, क्रिस्टल एम्ब्रॉयडरी, नेट डिझाइन असे विविध प्रकार आहेत आणि त्यातही वेगळे डिझाइन्स पाहायला मिळतात.

९ काळ्या ट्रान्स्परंट शिर सॉक्समधे पॅचवर्कही पाहायला मिळेल. स्टोन वर्क असलेले काही ट्रान्स्परंट सॉक्स यंदा ट्रेण्डमध्ये आहेत. ‘इबे’वरती विविध डिझायनर रफल-फिशनेट-मेश स्टाइल शॉर्ट साइज सॉक्स मिळतील. हे सॉक्स साधारण ९० ते १०० च्या आसपास आहेत. नेट डिझाइन असलेले सॉक्स तुम्ही स्निकर्सच्या आत वापरू शकता. त्यांची किंमत ८५८ रुपयांपासून सुरू आहे. तर ब्लॅक नेट सॉक्स १९७ ते २५९ रुपयांपर्यंत आहे. ब्लॅक व्हेल स्टाइलचे सॉक्सही  १८९ ते २३५ रुपये तर पोनी स्टाइलचे नेट सॉक्स ८१ रुपयांपासून ते १०८ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रफल बो आणि मेश लेस या प्रकारात मोडणारे सॉक्स ६९ ते २५३ रुपयांदरम्यान स्वस्त मिळतील. या दरात फर डिझायनर सॉक्सदेखील आहेत. ज्यांची साइजही नॉर्मल सॉक्सएवढी असून सेमी हिल्स किंवा हिल्सवर ते योग्य ठरतील. यावर जीन्स, केप्री किंवा थ्री फोर्थ घालता येईल.

९ अ‍ॅमेझोनवर ‘स्टार पॅटर्न शिर सॉक्स’ आहेत. ८०० रुपयांपासून हे मिळतील. यामध्ये काळ्या ट्रान्स्परंट सॉक्सवर सिल्व्हर स्टार प्रिंट आणि गोल्डन स्टार प्रिंटही मिळेल. गोल्डन बलक  हिल्सबरोबर ते फिट होतात. फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि बोटनिक प्रिंट्स असे काही न्यूड रंगातले ट्रान्स्परंट डिझायनर सॉक्स उपलब्ध आहेत जे न्यूड, स्किन कलरच्या जाड हिल्सवर शोभून दिसतात. मुळात न्यूड रंगातले शेड्स यंदा ट्रेण्डमध्ये आहेत. जसं इटालियन नायलॉन ट्रान्स्परंट सॉक्सवर क्रीम कलरचे बूट्स आधूनिक लुक देतात. पूर्ण ट्रान्स्परंट सॉक्समध्ये ब्लॅक रंग टॉप लिस्टवर आहे. पेन्सिल हिलवर ते शोभून दिसतील. काळ्या आणि न्यूड रंगाप्रमाणेच पिंक लोटस रंगसुद्धा वेगळा आहे. यातही गुलाबी ट्रान्स्परंट सॉक्सवर गोल्डन स्टार प्रिंट आहेत. डार्क पिंक हिलवर ते कूल वाटतात. या सर्व सॉक्सची किंमत ऑनलाइनवर ५०० ते १,००० रुपये आहे. तर टय़ूले सॉक्स ५४० ते ८१० रुपये या किमतीत मिळतील. स्टार प्रिंट असलेले सॉक्स १, ३४९ ते १,५२९ रुपये एवढय़ा किमतीत आहेत. यात शिमर, ग्लिटर स्टार आणि क्रिस्टल एम्ब्रॉयडरीला महत्त्व आहे. या सॉक्सचं वैशिष्टय़ म्हणजे हे सॉक्स अत्यंत लूझ असतात त्यामुळे इतर फॉर्मल मोज्यांसारखं त्यांना फोल्ड करावं लागत नाही. त्यांच्या ट्रान्स्परंट वैशिष्टय़ामुळे त्यांची आपोआपच घडी बसते. त्यामुळे ते खूप स्टायलिश दिसतात. रेड ट्रान्स्परंट सॉक्सही यंदा ट्रेण्डमध्ये असून पर्पल रंगाचे टय़ूले सॉक्ससुद्धा ट्रेण्डमध्ये आहेत.

९ अजियो डॉट कॉमवर डिझायनर आणि प्रिंटेड सॉक्स उपलब्ध आहेत. ज्यात फ्लोरल डिझायनर प्रिंटचे ट्रान्स्परंट शिर सॉक्स ४९५ रुपयांपासून मिळतील. स्ट्राइप्ड कफ शिर सॉक्स ४५६ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. यात न्यूड, ब्लॅक आणि ऑफ व्हाइट रंग आहेत. लाइट पिंक आणि राखाडी रंगही यात मिळतील. फरप्रमाणे पॉम पॉम लुक असलेले सॉक्स यंदा ट्रेण्डमध्ये दिसतील. २३६ रुपयांपासून यांची किंमत आहे. गॅलेक्सी पॅटर्न प्रिंट असलेले सॉक्स तुम्ही डिझायनर कॅ नव्हासवर घालू शकता. सेमी फ्लोरल आणि फ्लोरल फिनिशिंग असलेले नी सॉक्स आणि अ‍ॅन्कल सॉक्ससुद्धा २२८, ३१८, २३९ रुपये अशा विविध किमतीत मिळतील. यात फक्त नी लेस फ्लोरल प्रिंटदेखील आहे. मेटल बॉल डिटेलिंग असलेले फॅन्सी सॉक्स ५३६ रुपयांपासून उपलब्ध झाले आहेत. ३११, ३२३ रुपये एवढय़ा किमतीत एम्बलिशमेंट सॉक्स मिळतील ज्यात स्टोनवर्क आणि हाय शिमर सॉक्स मिळतील. असे बरेच सॉक्स बाजारात आणले आहेत ज्यात कलरफुल एम्ब्रॉयडरी आहे. याशिवाय एक उत्तम लुक हवा असेल तर पूर्ण ट्रान्स्परंट, शिमरिंग, एम्बलिशमेंट किंवा सेमी फ्लोरल डिझाइनचे सॉक्स परिधान करू शकता. यात प्रामुख्याने मिडी, जीन्स, मिनी / सेमी मिनी स्कर्ट, डिझायनर कट गाऊन, वन पीस आणि स्ट्राइप किंवा स्लीवलेस गाऊन परिधान करणं योग्य ठरेल. या आऊटफिटचे रंगही न्यूड, पिंक, ऑफ व्हाइट, ब्लॅक, आणि ग्रे हे ट्रेण्डमध्ये आलेले दिसतील. यंदा हा फंडा फार चांगलाच ट्रेण्डमध्ये आला असून रोजच्या कॅज्युअल वेअरमध्येदेखील हा सॉक्सचा लूक कॉन्ट्रॅडक्टरी आणि अ‍ॅस्थेटिक ठरणार आहे.